म्मं म्मं, म्मं म्मं

Submitted by पुरंदरे शशांक on 22 February, 2013 - 23:32

म्मं म्मं, म्मं म्मं

वरण-भाताची शिट्टी झाली
बाळाची कळी खुलली खुलली

फोडणी खमंग तडतडली
आणा आणा सोनूची ताटली

आमटी-भात तुपाची धार
मधून आंबट टमाटु सार

चिऊचे घास काऊचे घास
म्मं म्मं होईल खासम खास

पापा थोडा घुटुक घुटुक
चूळ भरा खुळुक खुळुक

एक येता ढेकर मस्त
ढाराढुर्र गुडुप सुस्त....

hugry.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरंदरे काका , आपण मस्त बालकविता लिहित आहात !!

पुण्यात आल्यावर कधीतरी आपली गाठभेट जरुर होईल !!

मस्त कविता आणि चित्रं..

आमच्या घरातल्या बाळांना, आवाज करायला चमचा, खेळायला बॉल, सांडायला पाणी एवढं सगळं लागत असे.
टिव्ही मात्र अजिबात नाही.

खूप मस्त बालगीत. इतक्या 'सोप्या' रचना लिहिणे किती 'अवघड' असेल नाही? तेवढी निरागसता आधी स्वतःत असायला हवी.

<<इतक्या 'सोप्या' रचना लिहिणे किती 'अवघड' असेल नाही? तेवढी निरागसता आधी स्वतःत असायला हवी<<>>... दहा हजार मोदक आणि वर तुपाची धार!
मस्तचै...

कित्ती मस्त.... शेवटचे कडवं म्हणजे माझ्या मुली साठी लिहिल्या सारखं वाटतय.... नर्सरी मधुन आल्या वर अशाच प्रकारे बाईसाहेबांची दिनचर्या असे.... ( आता घोडी झाली आहे)

खरच तुमच्यातलं बालक अगदी सुसाट धावतय...