आवळा कॅंडी

Submitted by मुग्धा केदार on 19 March, 2013 - 05:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

आवळे,
साखर,
पाणी,
पिठीसाखर.

क्रमवार पाककृती: 

१)आवळे धुवुन पुसून कोरडे करुन घ्यावे, प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करुन डिप फ़्रीजर मध्ये २ दिवस ठेवावे. २ दिवसांनी बाहेर काढुन ठेवावे thawing होऊ द्यावे. Thawing झाल्यावर त्यातील बिया काढुन पाकळ्या वेगळ्या करुन घ्याव्यात ( सहज करता येतात ).
२)साखरेचा पक्का पाक करावा आणि गार होऊ द्यावा, आवळ्याच्या पाकळ्या पाकात ३ दिवस मुरवत ठेवाव्यात, सगळ्या पाकळ्या बुडतील एवढा पाक असावा, रोज आवळ्याचा रस निघेल तो काढून टाकावा, पूर्ण पाक काढू नये, ( या रसाचे सरबत करता येते ).
३)तीन दिवसांनी आवळे साधारण कोरडे वाटतील,
एका ताटात पिठीसाखर घ्यावी. आवळ्याची १-१ पाकळी त्यात घोळवून एखाद्या जाड प्लॅस्टिकच्या कागदावर काढून ठेवावे, ७-८ तास सावलीतच वाळू द्यावे.
४) आवळा कॅंडी तयार.

मी केली तेव्हा पूर्ण वाळेपर्यंत अर्धी संपली, त्यामुळे फ़ोटो नाही टाकता आला.

अधिक टिपा: 

१)कृती खूप वेळखाऊ वाटली तरी करताना काही वाटत नाही.
२)अगदी बाजारात विकत मिळण्याय्रा कॅंडी सारखी होते.

माहितीचा स्रोत: 
Standard procedure in food processing industry.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एकदा केलि होति ...पन काय तरि चुकले...आनी त्या काळपट झाल्या... उन्हात ठेवल्या होत्या... आता असे करेन..

ही आयडिया छान आहे. नाहीतरी मीपण आवळा कँडीची पाककृती शोधत होतो आणि आयतीच पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद..

- पिंगू

फ्रिझ करायची आयडीया छानच. ( पुर्वी उकडूनच घ्यावे लागत. )>>> फ्रिझ केल्याने उकडण्याची गरज नाही का? कसे काय?

फ्रिझ करायची आयडीया छानच. ( पुर्वी उकडूनच घ्यावे लागत. )>>> फ्रिझ केल्याने उकडण्याची गरज नाही का? कसे काय?>>>>>>>>>>>>>>>>>>फ्रिझ केल्याने पाकळ्या सहज वेगळ्या होतात, उकडण्याची गरज नाही.

साखरेचा पक्का पाक करावा आणि गार होऊ द्यावा, आवळ्याच्या पाकळ्या पाकात ३ दिवस मुरवत ठेवाव्यात, सगळ्या पाकळ्या बुडतील एवढा पाक असावा, रोज आवळ्याचा रस निघेल तो काढून टाकावा, पूर्ण पाक काढू नये, >>
पाकात घातल्यानंतर आवळ्याचा रस सुटतो तो वेगळा दिसतो का? नाहीतर पाकातून आवळ्याचा रस वेगळा कसा करणार?

पक्का / गोळीबंद पाक -- साखरेच्या निम्मे पाणी घ्यावे, मंद आचेवर पाक करत ठेवावा, ढवळत रहावे, साधारण घट्ट झाला की डिशमध्ये थोडा टाकून बघावा, पसरला नाही आणि १०-१२ सेकंदतच गोळी झाली, तर पाक झाला असे समजावे.

पाकात घातल्यानंतर आवळ्याचा रस सुटतो तो वेगळा दिसतो का? नाहीतर पाकातून आवळ्याचा रस वेगळा कसा करणार?>>>>>>>>>>>>>जेवढी liquid ची quantity ( पाक + आवळा रस ) वाढेल, साधारण रोज थोडा रस वेगळा काढावा, जास्त काढू नये नाहितर गोडपणा कमी होईल.

सुमेधा,स्वाती,
आवळा फ्रीझर मधे २-३ दिवस ठेवला कि त्यातला रस गोठतो .त्यानंतर ते फ्रीझर बाहेर काढुन ठेवायचे .२-३ तासानंतर बाहेरच्या उष्णतेमुळे हे आवळे तडकतील.त्यामुळे त्याच्या फाका,तुकडे अगदी सहज हातानेच करता येतात.
साखरेचा पक्का पाक थंड करायचा त्यात या फोडी टाकायच्या.दुसर्‍या दिवशीपर्यंत या फोडीना सुटलेले आवळ्याचे पाणी/रस, पाकात मिक्स झाल्याने तो पाक कच्चा /पाणीदार होतो.म्हणुन दुसर्‍या दिवशी या फोडी एका रोळीमधे काढुन ठेवायच्या.पाकाचे भांडे गॅसवर ठेवुन हा पाक त्यातील रसाचे पाणी आटुन घट्ट् /पक्का होईपर्यंत आटवायचा.पाक कोंबट झाला कि पुन्हा फोडी त्यात घालायच्या. तिसर्‍या दिवशी पुन्हा हीच प्रोसेस करायची.४ थ्या दिवशी पाकातुन फोडी काढुन एका ताटात सावलीतच[उन्हात नाही पण घरातच] वाळवायच्या.थोड्या मोकळ्या झाल्या कि त्यावर थोडी पिठीसाखर [ मी ग्लुकोज पावडर घालते.त्यामुळे छान खुटखुटीत पण मऊ कॅन्डी तयार होते]पसरायची.या कॅन्डी लहान लहान प्लास्टीक्/झिप्-लॉक पिशवीत पॅक करुन फ्रीज मधे ठेवायच्या.लागेल तशी एक एक पिशवी उघडायची.त्यामुळे कॅन्डीचा ताजेपणा,मऊपणा व रंग टिकतो.
कदाचित ही बरीच मोठी पोस्ट आहे.पण उपयोगी पडेल असे वाटत आहे.

मुग्धा अग खुप दिवस मी ही पाकृ करयच्या विचारात होते पण वाचनात आली नव्हती त्यामुळे नक्की कशी करायची कळत नव्हते. आता समजले. आता लगेच करणार. खुप खुप धन्स.

मी मायबोलीवर नवीनच आहे, माझ्या पाककृतीचा स्विकार करुन, प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार.

सुलेखा >>>>>>>>> तुमची आयडिया पण छान आहे, नक्की करून बघेन.

ह्यासाठी फ्रोजन मिळणारे आवळे चालतील का(तसेही ह्या कृतीत फ्रिज मध्ये ठेवायचे आहेत ना )? आवळा कॅन्डी खूप आवडते पण ताजे आवळे नाही मिळत..

स्मिता,फ्रीझर बाहेर वस्तु ठेवायची ती नॉर्मल रूम-टेम्परेचर ला आली कि थॉ झाली..मावे त ठेवुन ही करता येते.
अनु३,फ्रोझन आवळे चालतील.

हं.................छान! मी दर वर्षी करते. (जावयासाठी!!)
फक्त डीप फ्रिज ऐवजी उकडून घेते.
बाकी साधारण सेम प्रोसेस. पण सुलेखाच्या रेसिपीप्रमाणे गॅसवरही उकळवते....वाळवण्याआधी.

मी फ्रीझर मध्ये ठेऊन पाहीले आवळे... पण त्यांच्या फाका निघायला जड जात आहेत.. वेगळ्या जातीचे आहेत का काय माहीत नाही...

आनंद....तुम्ही किती दिवस फ़्रीजरमध्ये ठेवले आवळे? दोन दिवस ठेवले असाल तर नीट थॉ केल्यावर पाकळ्या निघतातचं, पुन्हा एकदा प्रोसिजर फ़ॉलो करुन बघा.

मुग्धा जी.. मस्त पाकृ.
मी पण मानुषी तै सारखे आवळे उकडुन घेते.. पण ते कोरडे व्हायला फार दिवस घेतात.. आणी रंग पण थोडा बदलतो. आता असे करुन बघेन..

सुलेखा जी.. ग्लुकोज पावडर नी पिठी साखरेत काय फरक पडतो..?... पिठी साखरे च्या नाहीका होत खुटखुटीत आणी मऊ....??

मी आतापर्यंत पिठीसाखरचं वापरली आहे. छान खुटखुटीत होते कॅंडी.
दुसरं म्हणजे मी जी कृती दिली आहे त्यामध्ये गॅसचा वापर कमीत कमी आहे कारण ती फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री मध्ये वापरली जाणारी प्रोसेस आहे. त्यामुळे आवळे उकडणे आणि पाकात घालून उकळवणे हे केल जात नाही. पण तुम्ही ट्राय करु शकता.

Pages