Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाई रातराणी मला पण. ंमाझे २
बाई रातराणी मला पण. ंमाझे २ मोगरे छान तर १ मरणपंथाला लागलाय.़ अनंत कीड पडुन गेला.
भाटिया नर्सरी किंवा सीड्स ऑफ
भाटिया नर्सरी किंवा सीड्स ऑफ इंडिया मधून कुणी रोपं खरेदी केली आहेत का? कुणाला अनुभव असेल तर प्लीज मार्गदर्शन करावे.
च्च! स्वाती२, मी नाही पण
च्च!
स्वाती२, मी नाही पण बहुतेक तरी शोनुने केली आहे खरेदी तिथून. अॅमेझॉनवर पण मिळतात बरीच रोपं.
>> बाई रातराणी मला पण डू आय
>> बाई रातराणी मला पण
डू आय नो यू?
मी chicago area मधेय रहते.
मी chicago area मधेय रहते. मी तुळस आणि जास्वंद घरात आणलेत oct. पसुन. परत बाहेर कधी नेता येतील?
प्राणा, दिवसाचं किमान तापमान
प्राणा, दिवसाचं किमान तापमान पन्नाशीत गेलं की बाहेर न्या.
मी सीडसॉफिंड्या मधून बिया
मी सीडसॉफिंड्या मधून बिया मागवल्यात गेले दोन वर्षे. चांगल्या निघाल्यात.
वहिनीने १५ एक वर्षांपूर्वी भाटिया नर्सरीमधून मदनबाण मोगरा मागवला होता - तो गेली दहा वर्षे आमच्याकडे आहे. दोन्हीकडून ( किंवा इतरही कुठून ) मी कधीच रोपं मागवलेली नाहीत.
धन्यवाद मेधा. सीड्स ऑफ
धन्यवाद मेधा. सीड्स ऑफ इंडियातून मागवून बघते.
करी लीव्ह्ज रोपाची कशी काळजी
करी लीव्ह्ज रोपाची कशी काळजी घेतली तर भरपुर पानें येतील? मी दोन वर्षांपुर्वी रोपटं आणलं. ते उंच होतंय पण पानं नाहीत फारशी वापरायला. हिवाळ्यापासुन पानांची टोकं अन कधी कधी पुर्ण पानंच ब्राउन होतंय. मी त्याला अंड्याच्या सालाचा खुराक चालु केलाय. हे सगळं कॅलिफॉर्नियात.
रातराणी मला पण हवीय. अनंताचं
रातराणी मला पण हवीय.
अनंताचं झाड फुलण्याचा योग आमच्या दोघांच्या पत्रिकेत नसावा बहुतेक
१-२ आठवड्यात बिया घरातल्या घरात स्टार्ट करायचा प्लॅन आहे
नेहेमी प्रमाणे वांगी, मुळा, चार्ड्, अरुगुला, लाल माठ, मायाळू, अंबाडी, मिरची , टॉमेटो.
लसूण, वाल , वाटाणे, कारली , तुरई , दुधी हे पण ट्राय करायचा विचार आहे.
मागच्या वर्षी कटिंग फ्लावर गार्डन चालू केले - सूर्यफुले, डेझीस, कॉस्मॉस अन झिनिया. पूर्ण सि़झन भरपूर फुले मिळाली. या वर्षी अजून काय भर घालता येईल ?
या वर्षी अजून काय भर घालता
या वर्षी अजून काय भर घालता येईल ? >> डेलिया, बेगोनिया ?
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याची
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याची माहिती अंजलीने इथे लिहिली आहे.
http://www.maayboli.com/node/18243
>>या वर्षी अजून काय भर घालता
>>या वर्षी अजून काय भर घालता येईल ?>> ग्लॅडीओलस? फारशी काळजी घ्यावी लागत नाही आणि रंगाचा चॉईसही खूप.
ग्लॅडीओलस जुन्या घरात
ग्लॅडीओलस जुन्या घरात लावलेले. पहिल्या वर्षी भरपूर रंगाचे कंद लावले, भरपूर फुलं आली. पण पुढच्या प्रत्येक वर्षी फक्त पिवळी फुलंच आली त्यामुळे ग्लॅडिओलस परत लावणार नाही
बेगोनिया कटिंग फ्लावर्स साठी? कुठली स्पेशल व्हरायटी आहे का ?
बेगोनिया कटिंग फ्लावर्स साठी?
बेगोनिया कटिंग फ्लावर्स साठी? कुठली स्पेशल व्हरायटी आहे का ? >> dwarf begonia सहज ठेवू शकशील. आम्ही पाण्यात काढून ठेवलेले आठवडाभर सहज राहिलेले. best part about them: They bloom in late summer.
पण पुढच्या प्रत्येक वर्षी फक्त पिवळी फुलंच आली त्यामुळे ग्लॅडिओलस परत लावणार नाही >> हे surprising आहे. परत एकदा प्रयत्न करून बघ कि बल्ब्स नीट आहेत ना बाकीचे ? आमचे परत परत येत आहेत. फक्त एका पॅचमधले जिथे मी नीट म्लच टाकलेले नव्हते तिथले किडले.
धन्यवाद स्वाती. अशी कुठची
धन्यवाद स्वाती. अशी कुठची फुल झाड आहेत जी winter मध्ये पण घराबाहेर राहतील आणि स्प्रिंग समर मध्ये फुलतील? मागच्या वर्षी गुलाब लावला winter मध्ये बाहेरच ठेवायला संगीताला होता. आता बघू ह्यावर्षी फुल येतात का?
चाफ्याची पानं गळून जातात.
चाफ्याची पानं गळून जातात. वसंता आला की नवी येतात.
आमच्याकडे हवाईयन चाफा आहे. त्याला फुले पण आली होती. चांगला सहा फूट वाढला. पण गतवर्षी, हा हंत, हंत, बाहेरच्या डेकवर ठेवलेला, जोराच्या वार्याने त्याचे चक्क दोन तुकडे झाले. तुटलेला तुकडा दुसर्या कुंडीत लावला पण जगला नाही. मूळचा तुकडा, घरात आणला. फेकून द्यायला मन धजले नाही. नि देवाची कृपा! आता त्याला दोन कोवळी पाने पण आली आहेत.
गतवर्षी तुळस पण आणली होती. पूजेला चांगली १०८ तुलसीपत्रे पण वाहिली. (नाहीतर तुळस काशाला लावायची?) पण नाजूक किती, जरा दोन दिवस बाहेर राहिली तर मरून गेली. या वर्षी जास्त काळजी घेऊ.
काहो हे रातराणी वगैरे सो कॉल्ड सुगंधी फुले इथे उगवली तरी त्यांना वास येत नाही म्हणे! भारतात आज गेलात तर जागोजाग इकडे तिकडे फुलांच्या वासांचा घमघमाट असतो.
पुण्यात मात्र नाही. म्हणजे वास असतो, पण प्रदूषण एव्हढे की तोंडाला मास्क लावला नाही तर घशाचे बारा वाजतात. कसला वास नि कसले काय?
मला वाटते इथेच राहून बाजारातून मस्क, कर्व्ह, नि काही बायकी सेंट आणून ते झाडांवर मारावे. मस्त वास येईल.
उर्ध्वमूलं अधःशाखं असे टोमॅटो
उर्ध्वमूलं अधःशाखं असे टोमॅटो नि मिरच्या गेली दोन वर्षे खातो आहोत. यंदा पण बेत आहे, पण कदाचित नवीन सर्व आणावे लागेल.
उर्ध्वमूलं अधःशाखं >> तशा
उर्ध्वमूलं अधःशाखं >> तशा स्ट्रॉबेरी आणल्या आहेत, बघूया काय होते ते.
झक्की, सुगंध येतो ना. घमघमाट
झक्की, सुगंध येतो ना.
घमघमाट हा वातावरणातल्या आर्द्रतेवर अवलंबून असतो. (मराठीत ह्युमिडिटी. :P)
कोरड्या हवेत घमघमाट सुटत नाही.
घमघमाट हा वातावरणातल्या
घमघमाट हा वातावरणातल्या आर्द्रतेवर अवलंबून असतो >> ईबा ते ह्युमिडिटी वाढवायला सेंट मारणार म्हणत असावेत. क्लिओपात्रा नाही का पाण्याऐवजी दूधाने स्नान (अंघोळ म्हणायला काहितरीच वाटतेय) करत असे तसे झक्की पाण्याऐवजी सेंट वापरणार असावेत
मला जिमी न्यूट्रॉनची आठवण
मला जिमी न्यूट्रॉनची आठवण झाली.
रातराणीचा वास चांगला घरभर
रातराणीचा वास चांगला घरभर पसरतो. गेल्या वर्षी घरात आणल्यानंतर एक बहर आला होता. चार दिवसांनी नको नको झाला तो वास.
रातराणी मला इथे पोर्टलँडमधे
रातराणी मला इथे पोर्टलँडमधे लावता येईल का? रोप ऑनलाईन कुठे मिळेल??
अॅमेझॉन. लावता येइल की.
अॅमेझॉन.
लावता येइल की. आम्ही इथे कनेटिकटमध्ये रातराणी बाळगून (:फिदी:) आहोत
चाफ्याला इंग्लिशमध्ये काय
चाफ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात
Plumeria (प्लुमेरिआ.)
Plumeria (प्लुमेरिआ.)
धन्यवाद
धन्यवाद
कॉस्कोत बर्याच फुलांचे बल्बज
कॉस्कोत बर्याच फुलांचे बल्बज आले आहेत. १८,१९ डॉ.ला १५ बल्बज. मी डेलियाचे आणलेत.
bulbs काढून divide करून बघा,
bulbs काढून divide करून बघा, काहि होतेय का ? >>> मग उजेड कसा पडेल ?
Pages