नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिलं चित्र - मरीन मर्सेन
दुसरं - स्मायली
७ हा happy number आणि Mercenne prime आहे.

तिसरं - घन ६ बाजू दर्शवण्यासाठी

चार - लिफ्ट घ्यायचा अंगठा
पाच - आकाशगंगा

हे दोन्ही हिचकायकर्स गाईड टू गॅलॅक्सीसाठी H2G2. यात अल्टिमेट ट्रूथ म्हणून ४२ आकडा येतो.

त्याखाली ६ * ९ = हे ही H2G2. अधिक माहितीसाठी हे http://en.wikipedia.org/wiki/Answer_to_Life,_the_Universe,_and_Everythin... बघा.

सर्वात खालची अक्षरे - आकड्यांचे प्रकार (natural, complex ,वगैरे)

डेंजर होतं हे. मी एच२जी२ वर एवढा वेळ अडकून पडलो पण त्याचा संबंध त्या क्यूब आणि स्मायलीशी जाम लावता येईना.

अभिनंदन श्रद्धा आणि चिनूक्स.
ह्या पुस्तकाच्या नावाचा विचार केला होता पण लिंक्स जोडता आल्या नाहीत.

बापरे, माझं गणित दिव्य असल्यामुळे मला हे कोडं ह्या जन्मी सुटलं नसतं.
मी पहिली इमेज शोधली. ती कुणाची ते कळलं पण पुढचे तर्क लावणं अशक्यच होतं.
भारी ! Happy

संयोजक _____^_______
श्रद्धा आणि चिनूक्स त्याहून त्रेचाळीस पटींनी महान. Proud

कालच्या स्मृतीचित्रेसाठी तर तुला दंडवत, बायो. Happy

ग्रीकांजली - डॉ. मीना प्रभू

ग्रीक पुतळा, ओंजळीत पुस्तक वाचणे, डॉक्टरकीचा पेशा

क्लू होते- उपनिषदे,बान झाओचे चित्र ,अस्पाशिआ,जिवंत हृदयाचा आलेख.
बान झाओ आणि अस्पाशिआ ह्या दोघी स्त्री तत्वज्ञ. जिवंत आहे हे दर्शवायला हृदयआलेख.

गार्गीचं आडनाव वचक्नवी. इंग्रजीत vachaknavi. बान शाओसुद्धा चित्रात वाचते आहे, असाही मी विचार केला Proud

>> विद्यावाचस्पतीचा पुतळा
असं आहे होय ते! मला गूगलने काहीतरी निराळंच सांगितलं - अ‍ॅस्पेशिया ऑफ अथेन्स की काहीतरी. Happy

हो, म्हणून तर मला वाटलं ग्रीकांजली. एक ओरिएंटल स्त्री ग्रीक संस्कृतीची माहिती करुन घेतेय आणि पेशाने डॉक्टर आहे असा गहन अर्थ लावला मी Proud

छान कल्पना आहे ही. अचूक उत्तरे देणार्‍यांची कमाल आहे.
संयोजक, येऊद्या पुढ्चे कोडे..

H2G2 चं कोडं बनवण्याबद्दल संयोजकांना आणि एकुणातच विजेच्या वेगानं प्युअर लॉजिकल विचार करू शकणारा मेंदु बाळगत असल्याबद्दल श्रद्धाला ... _____/\_____

लोकहो, आहात का? आम्ही घेऊन आलो आहोत डबल धमाका. दोन्ही कोडी एकमेकांशी काही साधर्म्य राखून आहेत. करा सुरुवात!
puzzle14.png

नामग्याल त्सेमो मोनॅस्ट्री, लेह. लॅबर्नमची (गोल्डन शॉवरची) फुले, चार्ल्स मिंगस. (जाझ संगीताशी निगडित).
खालचे आकडे हेक्झाडेसिमल? डेसिमल कन्व्हर्जन करायचंय? चार्ल्स मिंगसची कुठली प्रसिद्ध रचना लक्षात घ्यायला हवी आहे असं आहे का?

श्रद्धा - बरोबर! त्या आकड्यांवर 'जादूई मंत्र' चालवून बघा. काही आकडे येतात का ते. आणि 'योग्य जागी' असलेल्या आकड्यांचा वापर चार्ल्सवर करा.

Pages