एगलेस चॉकलेट केक इन कॉफी मग

Submitted by saakshi on 18 July, 2012 - 04:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मैदा - ३ चमचे
कोकोआ पावडर - २ चमचे
बेकिंग पावडर - १ छोटा चमचा (सपाट भरून , शीग न लावता)
पिठीसाखर - ४ चमचे (आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता)
तेल - ४ चमचे
दूध - ४ चमचे

क्रमवार पाककृती: 

काल केक खावा वाटला म्हणून गुगललं तर बरयाच मोठ्मोठ्या पाकृ दिसल्या...
मावेला केक वै. गोष्टींसाठी जन्मात हात लावला नव्हता त्यामुळे म्हटलं ये अपने बस की बात नही...
मग सोप्या रेसिपींसाठी गुगलल्यावर एक छोटीशी रेसिपी सापडली...
म्हटलं चला.... मग काय ऑफिस सुटेपर्यंत डोक्यात नुसते केकचेच विचार.... Proud

मग आठवलं, केक करायला निघालोय पण आपल्याकडे साखर न तेल सोडून इतर काही साहित्य नाही...
मग घरी जाताना सगळं साहित्य घेऊन गेले..

मग माझ्या आवडत्या कॉफी मगमध्ये केक करायची प्रोसेस सुरू...

कृती :
१. मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर आणि कोकोआ पावडर मगमध्ये एकत्र करून मिसळून घ्यावे.
२. मग त्यात तेल आणि दूध टाकून मिसळावे. गाठी न राहिल्या पाहिजेत..
३. मग त्या प्रकरणाचा एकंदरीत appearance (?) smooth, चकचकीत दिसायला लागला की मावेमध्ये ठेवायला केक तयार आहे.
४. मावे हाय पॉवर वर ठेऊन मायक्रोवेव मोडवर १ मिनिट ३० सेकंद ठेवावे. केक ओलसर दिसत असला तरी टेंशन न घेता त्याला मावे बंद करून अजून ४-५ मिनिटे तसाच मावेत ठेवावा.
५. बाहेर काढून खाऊन टाकावा...... Happy

हा केक गरम मस्त लागतो.... Happy

वाढणी/प्रमाण: 
मी दोन मग केक्स खाल्ले... :स्मित:
अधिक टिपा: 

केक थोडुश्या वेळात अगदी मस्त होतो आणि यम्मी पण....
जास्त वेळ नसेल पण केक खायचाच असेल तर अगदी पर्फेक्ट पाकृ.... Happy

माहितीचा स्रोत: 
गुगलबाबा की जय!!!!!!!!!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैदा - १ चमचा
नाचणी सत्व - २ चमचे
कोकोआ पावडर - १ चमचा
बेकिंग पावडर - १ चिमुट
पिठीसाखर - ३ चमचे
तेल - २ छोटे चमचे
दूध - ४ चमचे
लेकीला फार आवडला

झाला, झाला, माझा पण झाला.. जादूच वाटली मला तर Proud केकपेक्षा मफिन सारखा वाटला मला.. मी कधी केक बनवेन अन तो खाण्यालायक बनेल यावर माझाच कधी विश्वास बसला नसता पण आता बनवेन वाटेल तेव्हा Happy

मी आत्ता दोन दोन केलेत. झक्क्कास झालेत.
लैच सोप्पा आणि सॉल्लिड आहे एकदम.
मी एक चॉकलेट केक आणिओ एकात आक्रोड आणि काहीबाही ड्रायप्रृटस आणि वॅनिला इसेन्स घालुन केलाय.
१ला केल्यावर कॉन्फिडन्स वाढला आणि दुसरा मोजुन न घेता अंदाजानीच सगळ घालुन केला. मी दोन मिनिटे ठेवला मावेत.
खुप खुप आभार साक्षी. आता केव्हाही वाटला की करुन खाता येईल.

cake_0.JPGयातला चॉकलेट केक अर्ध्याच्यावर खाल्लाय

लेकीला फार आवडला >>> धन्यवाद deepac.... Happy
मी पण केला केक. छान झाला>>> धन्यवाद अंजली.... Happy

झाला, झाला, माझा पण झाला.. जादूच वाटली मला तर केकपेक्षा मफिन सारखा वाटला मला.. मी कधी केक बनवेन अन तो खाण्यालायक बनेल यावर माझाच कधी विश्वास बसला नसता पण आता बनवेन वाटेल तेव्हा>>>>>>>> नताशा, मलाही अगदी असंच वाटायचं...... पण आता या छोटुशा पण मस्त केक ने बराच आत्मविश्वास वाटतोय..... Happy

खुप खुप आभार साक्षी. आता केव्हाही वाटला की करुन खाता येईल>>>>>> धन्यवाद हेकायनितेकाय... Happy

मस्त होतो आणी खुपच सोपा आहे... >>> धन्यवाद अवना..... Happy

केक बनवा... खा.... खिलवा...... Happy

मी पण केला बोर्नव्हिटा आणि कणिक घालून. Happy चांगला झाला, पण कणकेची आणि किंचितशी बेपा ची चव जाणवतेय. पाव चमच्यापेक्षा किंचित जास्त बेपा घातली होती. बेपा एखादी चिमुट्च पुरेल. पण पोराला मात्र आवडलाय केक.

मी पण केला बोर्नव्हिटा आणि कणिक घालून>>>> मस्त झाला!!! मला केक जमेल असे वाट्लेच नव्हते .... आता मस्त होतो ... धन्यवाद

साक्षी, मस्त झालाय केक. खूप खूप धन्यवाद इतक्या सोप्या रेसिपीसाठी. हा केक साध्या चॉकलेट केकला पर्याय म्हणून नाही होणार कदाचित पण गरमगरम केक + आईस्क्रीम / व्हिप्ड क्रीम असे डेझर्ट म्हणून करायला बेस्ट आहे. गरम खाण्यातच मजा आहे.
माझ्याकडे कोको पावडर नव्हती, चॉकलेट सिरप होते. तरीही बाकी प्रमाण तेच घेतले. बेपा मात्र पाव चमचाच घातली. कणिक घेतली. खजूर तुकडे आणि अक्रोडही घातले. एकदम मॉईस्ट झालाय Happy

Cake in mug 1.jpgCake in mug 2.jpg

आमच्याकडे जंबो साईझ मग आहे. ह्या प्रमाणात अर्धा मगच भरला Happy

मी बोर्न्व्हिटा+ मैदा घालून केला..
चांगला झाला..तेल ३ च टाकलं होतं तरी बुडाशी उरलेलं दिसलं. पुढच्या वेळी तेल अजून कमी वापरून, कणीक वापरून करून बघेन..छान रेसिपी. धन्य्वाद .

dhanyawad jagutai, avana, ago, binu... Sorry,Typing from mobile..
Yes ago, this cake tastes best when hot and wonderful as dessert.

सा़क्षी मस्त रेसीपी.आताच करते.काल हे बघितले असते तर बरे झाले असते Sad कारण कालच लेकिला केक पाठवला पण नेहेमीचा अंड्याचा.एगलेस केक ची फर्माइश पुरी करणे आता सोपे जाइल Happy

साक्षी, मैद्याऐवजी, कणिक आणि नाचणिची पावडर, साखरेऐवजी गुळाची पावडर,वेपा पाव चमचा, बोर्नव्हिटा अस ट्राय केल. झक्कास झाला. Happy

छान रेसिपी. धन्यवाद.

वरच्या प्रमाणाला बेकींग पावडर पाव चमचा आणि तेल ३ चमचे, पिठीसाखर ५ चमचे लागली. जास्त गोड खात असू का? Happy दूधही जरा जास्त लागलं.

धन्यवाद इन्ना... बदल मस्त आहे... करून बघायला हवा Happy
>>>>जास्त गोड खात असू का? >>>>>>>आर्च, Happy
केक खुप मस्त बनला..खुप छान..>>> धन्यवाद श्रेया... Happy

एक प्रश्नः जर मोठ्या प्रमाणात हा केक करायचा असेल तर किती वेळ तो मावे करावा? उदा: सगळ्या गोष्टी तिप्पट प्रमाणात घेतल्या तर त्यासाठी केक ४.५ मिनीटे मावे करायचा का?
प्लीज लवकर सांगा कोणीतरी.

जर मोठ्या प्रमाणात हा केक करायचा असेल तर किती वेळ तो मावे करावा? उदा: सगळ्या गोष्टी तिप्पट प्रमाणात घेतल्या तर त्यासाठी केक ४.५ मिनीटे मावे करायचा का?
प्लीज लवकर सांगा कोणीतरी.>>> rmd माहित नाही Sad पण २ मिनिटे मावे करून पहा, कच्चा वाटला तर पुन्हा १ मिनिट असं करून पहा आणि कसा झाला ते इथे कळवा Happy

आदिती१, नक्की करून पहा.

पेरू, कोको पावडर चॉकलेटची चव यावी म्हणून वापरली होती. जर ती नसेल तर vanilla essence वै. टाकून पाहू शकता.

फायनली सगळ्या गोष्टी तिप्पट प्रमाणात घेतल्या असल्याने केक ४.५ मिनीटे मावे केला आणि ५ मि. नंतर बाहेर काढला. तो कसा झाला हे मी सांगण्यापेक्षा हा फोटो सांगेल. बादवे, मी कॉफी घालून केक केला होता.

coffee cake.jpg

साक्षी,आग हा तर माझ्या खूपच कामी येईल Happy मी नक्की करून बघेन Happy शिवाय अंड वगैरे काही नाही ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे Happy

rmd, मस्तच दिसतोय केक Happy
अर्चना नक्की करून बघा..
स्मिता, मी कधी ओव्हन वापरला नाहिये, इथे कोणी वापरला असल्यास सांगा..

मी पण केला केक. छान झाला.धन्यवाद गं साक्षी ! खरच जादू वाटली मला !!!

Pages