एगलेस चॉकलेट केक इन कॉफी मग

Submitted by saakshi on 18 July, 2012 - 04:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मैदा - ३ चमचे
कोकोआ पावडर - २ चमचे
बेकिंग पावडर - १ छोटा चमचा (सपाट भरून , शीग न लावता)
पिठीसाखर - ४ चमचे (आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता)
तेल - ४ चमचे
दूध - ४ चमचे

क्रमवार पाककृती: 

काल केक खावा वाटला म्हणून गुगललं तर बरयाच मोठ्मोठ्या पाकृ दिसल्या...
मावेला केक वै. गोष्टींसाठी जन्मात हात लावला नव्हता त्यामुळे म्हटलं ये अपने बस की बात नही...
मग सोप्या रेसिपींसाठी गुगलल्यावर एक छोटीशी रेसिपी सापडली...
म्हटलं चला.... मग काय ऑफिस सुटेपर्यंत डोक्यात नुसते केकचेच विचार.... Proud

मग आठवलं, केक करायला निघालोय पण आपल्याकडे साखर न तेल सोडून इतर काही साहित्य नाही...
मग घरी जाताना सगळं साहित्य घेऊन गेले..

मग माझ्या आवडत्या कॉफी मगमध्ये केक करायची प्रोसेस सुरू...

कृती :
१. मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर आणि कोकोआ पावडर मगमध्ये एकत्र करून मिसळून घ्यावे.
२. मग त्यात तेल आणि दूध टाकून मिसळावे. गाठी न राहिल्या पाहिजेत..
३. मग त्या प्रकरणाचा एकंदरीत appearance (?) smooth, चकचकीत दिसायला लागला की मावेमध्ये ठेवायला केक तयार आहे.
४. मावे हाय पॉवर वर ठेऊन मायक्रोवेव मोडवर १ मिनिट ३० सेकंद ठेवावे. केक ओलसर दिसत असला तरी टेंशन न घेता त्याला मावे बंद करून अजून ४-५ मिनिटे तसाच मावेत ठेवावा.
५. बाहेर काढून खाऊन टाकावा...... Happy

हा केक गरम मस्त लागतो.... Happy

वाढणी/प्रमाण: 
मी दोन मग केक्स खाल्ले... :स्मित:
अधिक टिपा: 

केक थोडुश्या वेळात अगदी मस्त होतो आणि यम्मी पण....
जास्त वेळ नसेल पण केक खायचाच असेल तर अगदी पर्फेक्ट पाकृ.... Happy

माहितीचा स्रोत: 
गुगलबाबा की जय!!!!!!!!!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट आहे ही रेस्पी..
मी ८ दिवसात ३दा केली.
१) गव्हाचं पीठ - चॉकालेट सिरप
२) पार्लेजीचा चुरा-चॉकलेट सिरप
३) सुजाता मल्टीग्रेन आटा- चॉकलेत सिरप..

मैदा आणत नाही घरी, म्हणून जे आहे त्यात केला. जबरीच लागतंय प्रकरण.. म्हणजे गरमागरम केक, वरून थोडा चॉकलेत सिरप. अहाहा... थॅक्यु व्हेरी मच!!

बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा(जो भजीसाठी वापरतो तो) म्हणजे एकच का?
जर नसेल तर खाण्याचा सोडा वापरला तर चालेल का? आणि किती?
जर प्रश्न बावळटासारखा असेल तरी प्लीज उत्तर द्या कारण माओ घेऊन ठेवलाय पण केक बनवायचे धाडसच होत नाही. हा केक बघुन वाटतय की हे प्रकरण जमण्यासारखे आहे.

जबरीच होतो हा केक. मी प्रमाण लिहून ठेवलं आहे. केक खाण्याचं क्रेव्हिंग* झालं की लगेच करून खाता येण्यासारखा आहे हा Happy

बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा(जो भजीसाठी वापरतो तो) म्हणजे एकच का?>> नाही, दोन्ही वेगवेगळे. केक करायचा असेल, तर बेपा घेऊन या. ती केकसाठी अनिवार्य आहे.

मी इनो वापरलं ! हिरवी बाटलीवालं!! आणि दोन चिमुट.. केक व्यवस्थित फुलला, सुरी कोरडी इत्यादी...

हो हो क्रेव्हिंग Lol बदललं. धन्यवाद.

बेकिंग पावडरसाठी दर वेळी ईनो हा पर्याय चालतो का? का बेपा नसेल तर ईनो वापरा- असं असतं? भाप्र!

काल केला होता हा केक. चवीला अफाट झाला होता. मी बेकिंग पावडर पावच चमचा वापरली तरी केक फुलून मगबाहेर आला होता.

पूनम, हो चालतो. मी केले आहेत फक्त इनो घालून केक.
पण हल्ली बर्‍याच केक्समध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असे दोन्ही वापरायला सांगितलेले असते अशा वेळी बेकिंग सोड्याऐवजी इनो वापरुनही केलेले आहेत. बेपा कमी घेते मी. साधारण एक कप मैद्यासाठी अर्धा टिस्पून बेपा आणि दोन टीस्पून इनो.

ओके. धन्यवाद.
निल्सन वाचत असतील तर त्यांना पर्याय मिळालेला आहे. बेकिंग पावडर अनिवार्य नाही Happy

सोडा आणि ईनो दोन्हीचा एक प्रकारचा वास आणि चव लागते मला -एस्प. गोड पदार्थात. त्यामुळे माझ्यापुरती बेकिंग पावडर केकसाठी अनिवार्य आहे असे लिहून मी इथे माझ्या बाजूने चर्चासमाप्ती करते.

माझं काय चुकलं?
काल मोठ्या हौशेने सर्व सामान गोळा केले. जास्त केक बनविण्याचा विचार होता पण म्हंटल आधी दिलेल्या मापाप्रमाणे बनवून बघु म्हणुन सेम तेच माप घेतले. मिश्रण तयार करुन कपात घातलं आणि मावे सेट केला. अर्ध्या मिनिटातच केक फुलून वर आला आणि त्याच बरोबर आंबुस वासपण. तरिही म्हंटल येत असेल केक बेक होताना असा वास, खावुन बघुया. म्हणुन ५ मि.नी मावेतुन काढुन पाहिला छान फुगला होता आणि कपाच्या सर्व बाजुने सुटला होता. मी एक तुकडा खाल्ला आणि लेकीला भरवला तर तिने थुंकूनच टाकला. केक दाताला चिकटत होता आणि वास सहन होत नव्हता. नवर्याने तर १० वेळा सुनावले असेल किती घाणेरडा वास येतोय. शेवटी केकला कचर्याचा डब्बा दाखवला आणि केक फसल्याचा राग नवर्याला.

काय झालं असेल? प्लीज मदत करा.

मावे हाय पॉवर वर ठेऊन मायक्रोवेव मोडवर १ मिनिट ३० सेकंद ठेवावे. केक ओलसर दिसत असला तरी टेंशन न घेता त्याला मावे बंद करून अजून ४-५ मिनिटे तसाच मावेत ठेवावा.>>> हे कसे करायचे? माझ्या मावेला कन्व्हेक्शन नाही. तरी होऊ शकेल?
(केकच्या प्रतिक्षेत अधीर बाहुली)

मावे हाय पॉवर वर ठेऊन मायक्रोवेव मोडवर १ मिनिट ३० सेकंद ठेवावे. >>>> हे कळत नाहीये. कोणीतरी सांगणार प्लीज?

सहेली, विशेश काही नाहीये. मावेचं दार उघडा, कप आत ठेऊन १.३० मिनिटं लिहून स्टार्ट करा. कुठलाही मोड व बाकी फंदात न पडता. ते झाल्यावर४-५ मिनिटं आतच राहूद्या कप. मग खा. (शक्यतो गरम , लगेच)

काल हा प्रयोग केला. मैदा नसल्याने कणीक वापरली. पण चमचे कोणते घ्यायचे यावर कफ्युज झाले. (टे.स्पू,टी.स्पू.इ.) जमेल, सुचेल तसे केले. जे बनले ते हलके नव्हते पण टेस्टी होते मस्त आणि पोट पण छान भरले.
आता एकेक प्रयोग करून पाहीन.
प्राची, बस्के धन्यवाद! अहो-जाहो नकोच प्लीज.

निल्सन, तुम्ही वापरलेल्या साहित्यातील कुठलातरी एक पदार्थ खराब(डेट एक्स्पायर्ड) झालेला असणार, म्हणून आंबूस वास आला. केक नासला असणार.

mast
1 st I prepare using small cup in cooker
then made large 1 for my daughter
today is her bday Happy
I have put some dairy milk cream on it for decoration looking great and write her name with radish slices Wink

काल ख्रिसमसच्या मुहुर्तावर लेकीबरोबर हा आणि सोप्पा केक (हाईड अ‍ॅन्ड सीक बिस्कीटांचा) केला. दोन्ही मस्त झाले होते,

मुख्य म्हणजे eggless असल्याने आजीला पण देता आला Happy

मुलांच्या रोजच्याच make something nice या अत्यंत डोकेखाउ डिमांड्मधे काय सामाविष्ट करायचं हा एक प्रश्न असतो. आज ऑर्डरच्या पुर्ततेसाठी केक बनवला.

माझी modifications - ३ स्पुन मैद्याऐवजी ( २ स्पुन गव्हाचं पीठ + १ स्पुन मैदा), दुध एक चमचा जास्त घेतलं त्यामुळे केक अजिबात कोरडा झाला नाही, तेलाऐवजी साजुक तुप पातळ करुन घातलं (तेल सफोला वापरते, पण तरी उगीचच वास लागेल असं वाटलं). बाकी सेम हीच कृती. गरम केक आणि वॅनिला आइसक्रीम..... जेवण सुखासुखी विना रुसवा फुगवा झाली आहेत, म्हणजे केक यशस्वी. .

फोटो रिसाइझ करावे लागणार आहेत. आता उत्साह नाही. उद्या टाकेन.

आता कंटाळा आलेला असताना सुद्धा ही पोस्ट फक्त साक्षीला थँक्स म्हणण्यासाठी. Happy

Pages