Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लहान पणी मोठ्यांची ऐकुन घालीन
लहान पणी मोठ्यांची ऐकुन घालीन लोटांगण ही आरती बोलायचो...पण जेव्हा ती पुस्तकात वाचली तेव्हा शॉक .....
घालीन लोटांगण वंदीन चरण
डोळ्यानी पाहिन रुप तुझे
प्रेमे अलिंगीन
आनंदे पुजिन
भावे ओवाळिन म्हणेन माता
त्वमेव माता पिता त्वमेव
त्वमेव बंधु सखा त्वमेव
त्वमेव विद्या दगडम त्वमेव
त्वमेव सर्वम ममदेव देव
गायेन वाचा मर्सिंद्मेवा
तुजा स्मरावा प्रसिद्धा व्हावा
करोनी यज्ञम सकल परस्पर
नारायणा इती समर्पयामी............
>>त्वमेव विद्या दगडम
>>त्वमेव विद्या दगडम त्वमेव
बाप रे! बिचार्या गणपतीला मोदक खाताना ठ्सका लागेल
बाप रे! बिचार्या गणपतीला
बाप रे! बिचार्या गणपतीला मोदक खाताना ठ्सका लागेल>>>>>>>>.लागलाच असेल ...चांगलं मोठं झाल्यावर माझ्या एका मामाने ही गोष्ट लक्शात आणुन दिली......
>>गोड कपोली उत्तर आले म्हणजे
>>गोड कपोली उत्तर आले
म्हणजे काय दिनेशदा? कपोल म्हणजे कपाळ ना?
काल 'नीलकमल' मधलं 'तुझको पुकारे मेरा प्यार' ऐकत होते. त्यात 'तेरे बदनकी ओट मिटे तो रहे लाज लगनकी' अशी ओळ आहे. हे 'ओट' प्रकरण काय आहे? ह्याचा अर्थ 'आकर्षण' असा आहे काय?
ओट =
ओट = शेल्टर
http://dict.hinkhoj.com/words/meaning-of-%E0%A4%93%E0%A4%9F-in-english.html
कपाल = कपाळ कपोल = गाल
कपाल = कपाळ
कपोल = गाल
भरत, दोन्हीबद्दल धन्स
भरत, दोन्हीबद्दल धन्स
मला तर असं वाटलं होतं की आजा
मला तर असं वाटलं होतं की आजा आजा दिल निचोडे...रात की मटकी फोडे..कोइ गूड्लक निकाले ...आज गुल्लक को फोडे>> मी पण हे गाणे असेच ऐकते आणि म्हणते . आजा आजा दिल्ली छोडे हे आजच कळले.
अनिश्का मी अजुन एक शब्द बोल्ड केला.
गायेन वाचा मर्सिंद्मेवा
खूप जणं "कायेन वाचा मणेन्द्रदेवा" म्हणतात . ते मनसेन्द्रियैर्वा असे आहे.
ते करोमि यद यद आहे ते पण
ते करोमि यद यद आहे ते पण करोमि यज्ञम असं म्हणतात बरेच जण. "करोमि यद यद" म्हणजे मला वाटतं मी जे जे काही करेन ते
आभार भरत, मला लहानपणी
आभार भरत, मला लहानपणी वाटायचे, कपोल म्हणजे कबुतर. मग ते गोड कसे असणार, असे पण वाटायचे.
स्वप्ना, हे गाणे मायमाऊली चित्रपटातले आहे आणि हा चित्रपट त्याकाळी मुंबई ब वर ( हो चित्रपट संक्षिप्त रुपात रेडिओवर ऐकवत असत ) फारवेळा लागे.
बर्याच पुस्तकात तर कायेन
बर्याच पुस्तकात तर कायेन वाचा असेच आहे.
मी हि कायेन म्हणते.
मनसेंद्रीय असेच म्हणायचे.
ते करोमि यद यद आहे ते पण
ते करोमि यद यद आहे ते पण करोमि यज्ञम असं म्हणतात बरेच जण. "करोमि यद यद" म्हणजे मला वाटतं मी जे जे काही करेन ते> +१००
बा बा ब्लॅक शीप मी लहान पणी
बा बा ब्लॅक शीप मी लहान पणी बाबा ब्लॅक्स शीट म्हणायचो
>>बर्याच पुस्तकात तर कायेन
>>बर्याच पुस्तकात तर कायेन वाचा असेच आहे.
बरोबर आहे ते. कायेन म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे बोलण्याने, मनसेन्द्रियैर्वा म्हणजे मनाने वा इन्द्रियांनी मी जे जे करेन ते ते देवाला अर्पण. माझं संस्कृत शाळेनंतर न वापरल्याने गंजलंय पण थोड्याफार फरकाने बरोबर असावं.
>>बा बा ब्लॅक शीप मी लहान पणी
>>बा बा ब्लॅक शीप मी लहान पणी बाबा ब्लॅक्स शीट म्हणायचो
__/\__
हो स्वप्ना, तोच अर्थ आहे. या
हो स्वप्ना, तोच अर्थ आहे. या घालीन लोटांगण बद्दल सविस्तर लेख लोकसत्ता मधे वाचला होता. मराठी आणि
संस्कृत ची खिचडी आहे त्यात.
०००
बर्याच लहान मुलांना व चा उच्चार जमत नाही, आमच्या शेजारची चिमुरडी, हॅव यू एनी बुल ? असे म्हणायची, आणि तेच बरोबर आहे असे ठासून सांगायची.
कटीपतंगमधल्या 'प्यार दिवाना
कटीपतंगमधल्या 'प्यार दिवाना होता है' या गाण्यात मला 'शमा कहे परवाने से "बडे कलाकार"' असं ऐकू यायचं.
मी ते 'बढे चला जा' असं
मी ते 'बढे चला जा' असं ऐकायची.
मी ते बदे चला जा ऐकायचो (पतंग
मी ते बदे चला जा ऐकायचो (पतंग बदवतात आणिक चित्रपटाच नाव कटी पतंग )
घालिन लोटांगण मध्ये माझीही फे
घालिन लोटांगण मध्ये माझीही फे फे उडते. शेवटी गाडी ठेचकाळतेच.
अमर अकबर अँथनी मधल्या कव्वालीत मध्येच तो मंदा, मंदा असा ओरडल्याचा भास होतो का कोणाला? मला नेहमी होतो. खरे शब्द आता माहित आहेत तरी होतो...
"तेरा दामन, दामन दामन ...." = तेरा दा मंदा मंदा मन
मी ते बदे चला जा ऐकायचो (पतंग
मी ते बदे चला जा ऐकायचो (पतंग बदवतात आणिक चित्रपटाच नाव कटी पतंग ) >>>
म्हणजे हिरो त्या परवाना ऊर्फ पतंगाला बदवत रहा असा सल्ला देतोय काय?????? लॉजिक भारी आहे.
मामी : ही ही तीच ती मंदा ती
मामी : ही ही
तीच ती मंदा ती मंदाकीनै नंतर राम तेरी गंगा मैली मध्ये दिसलेली
प्रीटी वुमssन मला कधी नीट
प्रीटी वुमssन
मला कधी नीट ऐकूच यायचं नाही ....नवीन होतं तेव्हा... मला ते "कुडी..गुमान" का काहितरी वाटायचं ..>>>> हे हे हे हे हा हा हा हा हा :हहगलो:....... मला पण सेम ऐकू यायचं .
शमा कहे परवानेसे परे चला जा
शमा कहे परवानेसे परे चला जा ,मेरी तरह जल जायेगा यहां नही आ.... असे आहे ना ते? म्हण्जे दुरूनच निघून जा. नाहीतर माझ्यासारखाच जळून जाशील असे आहे ते,
कटीपतंगमधल्या 'प्यार दिवाना
कटीपतंगमधल्या 'प्यार दिवाना होता है' या गाण्यात मला 'शमा कहे परवाने से "बडे कलाकार"' असं ऐकू यायचं.>>>

शमा कहें परवानेसे अबे चला जा
असं पण ऐकू यायचं
सारीका ... अशक्य आहे हा
सारीका ...


अशक्य आहे हा धागा!
लताचे एक फार जुने गाणे
लताचे एक फार जुने गाणे आहे,
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले.
यात एक ओळ आहे,
हसले माझे ओठ म्हणू की हसले माझे डोळे .. आम्ही लहानपणी ही ओळ,
फुटले माझे कान म्हणू की फुटले माझे डोळे.. अशी म्हणायचो. कारण नसताना !
पण गाणे सुंदरच आहे.
जादुगिरी ही कोणी केली कळुनी नाही आले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले !
मज कळले नाही काही मी कधी पाहिले त्यांना
मज कळले नाही बाई मी काय बोलले त्यांना
हसले माझे ओठ म्हणू की हसले माझे डोळे ?
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले !
ते सद्गूण की ते रूप मज काय नेमके रुचले
ते निसर्गजीवन दिसता मज काय नेमके सुचले
माया-ममता माझ्या भोवती विणती कैसे जाळे ?
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले !
हे वेड अनामिक आहे की अधीरता ही मनची
उघड्याच लोचनी दिसती स्वप्ने ही जागेपणची
मला न कळता माझ्या हाती साज असा हा ल्याले !
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले !
शमा कहें परवानेसे अबे चला जा
शमा कहें परवानेसे अबे चला जा >>

तेरे चेहेरे मे वो जादु है मधे
तेरे चेहेरे मे वो जादु है मधे एक वाक्य आहे
तु जो एक नजर डाले जी उट्ठे मरने वाले...
मी नेहेमी उलटं बोलायची
तु जो एक नजर डाले मरजाये उठने वाले.......
शमा कहें परवानेसे अबे चला जा
शमा कहें परवानेसे अबे चला जा >>>>>>>
Pages