मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मिलन से अंबर आज रचा जा
दिल के शीश महल मे आजा..."

मग कळलं की ते 'मिलन स्वयंवर' आहे... मिलन से अंबर नव्हे!

हे वाचे पर्यंत मी 'दिल स्वयंवर' समजतो होतो. Uhoh

झी मराठी वरच्या "तू तिथे मी" चं गाणं
"साथ तुझी दिनरात असे जणू वणवा सुखाचा" असं आहे का??? सुख असेल तर वणवा का??? की दुसरा शब्द आहे?

साक्षी,
अगं ते बहुतेक "साथ तुझी दिनरात असे जणू क्षण हा सुखाचा" असं आहे. म्हण्जे मला तरी तसं ऐकु येतं.

साक्षी,अगं ते बहुतेक "साथ तुझी दिनरात असे जणू क्षण हा सुखाचा" असं आहे>>> ओह्ह... असंच असेल, मी आजपर्यंत वणवा सुखाचा म्हणायचे Lol

अलीकडेच एका मित्रानं थोपुवर स्टेटस अपडेट केलं होतं,
'आज तु डोळ्यात माझ्या
उतरुनी डोळे पहा
तु अशी जवळी रहा'

त्याला ते उतरुनी नाही तर मिसळूनी आहे म्हटल्यावर तो म्हणाला काय फरक पडतो उतरुनी म्हटले तर. Happy
नमुने असतात एक एक..

स्टुडंट ऑफ द यीअर चित्रपटात "केंदे केंदे सास लगी" असे काहीसे गाणे आहे ते कुठल्या भाषेतले आहे. (गाण्याचा ठेका छान आहे.. शब्द कळत नाहीत Happy ) त्याचे शब्द्/अर्थ(असल्यास) लिहाल का?

पंजाबी.

सानु वेल्ले केहेंदे सानु की (मला रिकामटेकडा म्हणतात, मला काय त्याचं)
बस केहेंदे रेहंदे सानु की (बोलणारे बोलत राहतात मला काय)
शायनिंग शायनिंग फ्यूचर साड्डा ब्राईट सी (सी - आहे)
दोस्तोंके (?) संग सबकुछ ऑल राईट सी

मी हे गाणं असं ऐकायची
'मानसीचा चित्र काढतो
तुझे मी नंतर चित्र काढतो'
२ वेळा 'चित्र काढतो' हे शब्द कसे काय असतील? आणि पहिलं वाक्य व्याकरणातही बसत नाही, त्यामुळे पहिलं वाक्य चुकिचे ऐकतेय याची खात्री होती. पण दुसरं वाक्यही चुकिचं आहे हे घरी ऑडियो कँसेट आणल्यावर कळलं.

ऐसा ना कर ना कर ना कर ना कर मेरे यार गाणं मी इतके दिवस ऐसा नागर नागर नागर नागर नागर ऐकत होते आणि विचार करत होते की काय आहे हे नागर नागर

लहानपणी "ये काली काली आंखे" हे गाणं मला "येका लीका लीका आंखे" वाटायचं.
आमच्या शेजारी एक ५ वर्षाचा मुलगा राहत होता आणि तो "आती क्या खंडाला" एवजी "हाती का हंडा ला"
अरे कोणत्या हाती का हंडा आणि कुठे मिळतो हा हंडा
एक मराठी गाणं आहे.."बिलनशी नागिण निघाली" माझा मित्राला ते "Englandची नागिण निघाली" Biggrin अरे England काहीतरी संबंध आहे का? एकदातर "दिलनची नागिण निघाली" म्हणाला होता. Proud

लुगडी माझी सांडली गं... लाथा म्हातार्‍याला... >>>

मानसीचे चित्र काढ तू
तुझे मी नंतर चित्र काढतो

>>> वाईट्ट हसतीये मी Rofl

बायदवे, मूळ शब्द कायेत?>>>>>
मानसीचा चित्रकार तो
तुझे निरंतर चित्र काढतो

दर्पणी पहाता रूप नदीचे हो आपुले...
बापरखुमादेवीवरू मज तैसे केले
... आरशात बघायला गेलं तर नदी दिसते असं करून ठेवलय Sad
अस्मादिकांना ऐकू आलेले शब्दं आहेत.

दर्पणी पहाता रूप नदीचे हो आपुले...>>>>>
दर्पणी पहाता रूप न दिसे हो आपुले... Happy (आरश्यात बघताना देखील त्या सावळ्या विठ्ठलाचेच रुप दिसते आहे.)
बापरखुमादेवीवरू मज तैसे केले

नेहमी मला 'देव माझा विठू सावळा, मान त्याची माझी आवळा' असं ऐकू येई. सध्याचं माझं मत 'माळ त्याची माझी आगळा' असं आहे, पण त्याचा अर्थ लागत नाही. त्यामुळे पुन्हा पहिल्याच शब्दांकडे वळलेय, किमान त्याचा अर्थ तरी लागतोय!

Pages