मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<लहान पणी मोठ्यांची ऐकुन घालीन लोटांगण ही आरती बोलायचो..<> मुंबईमधे सगळ्या गोष्टी बोलतात का? बोलायचो नाही गं, म्हणायचो, गायचो, असे म्हटले तरी चालेल...

मुंबईमधे सगळ्या गोष्टी बोलतात का? बोलायचो नाही गं, म्हणायचो, गायचो, असे म्हटले तरी चालेल...
>>>
हम्म्म्म्म्म्म्म्म!
हेच इथे लिहिणार होते पण फॅशनच्या धाग्याची आठवण झाली म्हणून कीबोर्डला मूग दिला गिळायला

'अणूहूनिया थोकडा' हे लहानपणी 'धरुनिया थोपला' असे काही समजत होतो!
कॉलेजमध्ये 'पाहीन श्रीमुख..' मध्ये 'श्री' ऐवजी 'स्त्री' असावे असे वाटायचे.
यक्ष

हिंदीमधली गायिका शारदा ( तितली उडी... फेम ) चे मराठीत एक गाणे होते.

अगदी लहापणापासून मी असेच गुणगुणतो..

रायास पाहू नका डोळ्यात.. रायास.. रायास... रायास

आता विचार करताना त्याचे शब्द असे असावेत असे वाटतेय.

राया असं पाहू नका डोळ्यात, राया असं, राया असं, राया असं..

पण असे कठीण उच्चार असणारे गाणे तिला द्यायचे म्हणजे Happy

>>मुंबईत लोक बोलतात का ?>>
वाट लागलेली आहे ..लोक बोलतात, वस्तू 'भेटतात' ..असो.

'घालीन लोटांगण' माझा लहान भाऊ छोटा असताना 'घालिंग टांगण' म्हणायचा ते आठवलं Happy

शोले

ये दोस्ती .. हम नही तोडेंगे
तोडेंगे हम मगर .. तेरा साथ ना छोडेंगे

हे मला अस आता आत्ता पर्यन्त ऐकू यायच. मी त्याच अ‍ॅमिकेबल ब्रेक अप असेल अस रॅशनलायझेशन करून घेतल होत.

सुधीर फडके ह्यांची माफी मागून..
मला बरेच वेळा उच्चार कळत नाही ह्यांचे गाण्यातील.

विमोह त्यागूनी कर्मफलांचा...

त्यातली एक ओळ,
कातर होसी समयी मग तू वीरोत्तम कसला..
मला गूगल येइपर्यंत ती ओळ अशीच एकायला यायची अगदी कान लावून एकले तरी,

गातर होसी मयी मग तू विरूत्तम असला...

>>तोडेंगे हम मगर .. तेरा साथ ना छोडेंग>><<
ह्याच्यात काय चुकीचं? मला तर बरोबर वाटतं. >>>> ते दम आहे.

तोडेंगे हम मगर .. तेरा साथ ना छोडेंग>><<
ह्याच्यात काय चुकीचं? मला तर बरोबर वाटतं

तोडेंगे दम मगर .. तेरा साथ ना छोडेंग> अस असावे
म्हणजे जीव गेला तरी सोबत सोडणार नाही

मला वाटायचे दोस्ती तुटली तरी मनाने "साथ" म्हणजे बरोबरच राहू...
ते कसे अलग हुवे तो क्या, मन से साथ रहेंगे.

धन्यवाद माझा भ्रम तोडल्याबद्दल. Happy

एक आठवण....'शोले' च्या याच गाण्याची.

मागे एकदा माझ्या मित्राने नूतन वर्षाच्या शुभेच्छा भेटकार्ड पाठविताना जे कार्ड पाठविले होते त्यात 'शोले' तील ह्याच गाण्याच्या त्या दोन ओळी इंग्लिशमध्ये प्रिन्ट केल्या होत्या.... त्या वाचताना मजा आली.

"Ye dosti hum na todenge,
todenge dam magar teraa saath naa chhodenge..."

यातील "Dam" चे योजन वाचून आम्ही कोयना डॅमवर फिरायला गेलो असताना तेथील सुरक्षारक्षकांनी डॅमवर जाऊ दिले नव्हते.... कारण ही कॉलेजची पोरे 'डॅम' तोडतील की काय म्हणून.... त्याची आठवण झाली.

एक गाण होतं 'मै खिलाडी तु अनाडी ' - टायटल ट्र॓क होता. त्यात ... आयला आयला उपमा खायला पोरं आले आले अस ऐकु यायचं .. Happy

उपमा खायला Lol

त्यातल चुरा के दिल तेरा आम्ही आस म्हणायचो

चुरा के दिल तेरा भजीया तली. पागल हुवा दिवाना हुवा तेली गली मै चली.

(तेली गल्ली च्या तोंडावर एक भज्याची गाडी लागायची ती गाडी बघून आम्हाला हे गाण आठवायच)

आर्मी चित्रपटातल

मै तो हू पागल मुंडा तू है मेरी सोणी कुडी गाण मी आस एकायचो

मै तो हू सुक्का बांगडा तू है मेरी सोल कढी
हू हा (हा भुरका मारल्याचा आवाज)

शकीरा च हीप्स डोंट लाय मध्ये
' बी वाईज अँड रीड साईन्स ऑफ माय बॉडी' अशी काहीशी ओळ आहे (ती मला ह्याच धाग्यावर कळली)

ती मी
'यु डान्स अ‍ॅकाअर्डींग टू साईझ ऑफ युवर बॉडी ' आशी ऐकायचो
(म्हणजे प्रत्येकाने आपल्या तब्येतीने / जीवाने नाचा ) Lol

केदार१२३,
'यु डान्स अ‍ॅकाअर्डींग टू साईझ ऑफ युवर बॉडी ' आशी ऐकायचो
(म्हणजे प्रत्येकाने आपल्या तब्येतीने / जीवाने नाचा ) >> हा भयानक होता Rofl Rofl Rofl

ह्या गाण्यात मला गोंधळ उडायचा

शकीरा म्हणते आय वाँट टू लाय बट हीप्स डोंट लाय

माझ भाषांतर
मला झोपायचय/ निजायचय / पडायचय (लाय डाऊन)
पण हीप्सना झोपायचय/ निजायचय / पडायच नाहीये

मला वाटायच काय असेल बुवा कदाचित गळू झाल असेल Proud

Pages