फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरं म्हणजे मेकप करायला आलेल्या प्रोफेशनल व्यक्तीला स्टेजच्या मेकपची मुलांच्या आयांपेक्षा जास्त चांगली अक्कल असते.

अगदीच अति सेन्सिटिव्ह वगैरे स्किन नसेल तर एखाद्या दिवशी दोन तासापुरते हे सगळे प्रकार काहीही प्रॉब्लेम करत नाहीत.

उलटे स्टेजच्या लाइटसपासून चेहर्‍याचे रक्षण करतात.

प्रॅक्टिस म्हणून आम्हाला शाळांच्या गॅदरिंग्जना पाठवायचा विक्रम.
मुलांच्या आया मेकपच्या विनोदी सूचना देऊन जो काय वात आणायच्या डोक्याला... Happy

लालचुट्टूक पॅच पोराच्या गालावर लागल्याशिवाय मातांचं समाधानच व्हायचं नाही. मग पोरगं डॅन्समधे असो की ज्ञानेश्वर माऊली असो की घरातले आजोबा...

चेहर्‍यावर रिंकल्स रंगवून, केसाला व्हाइटनर लावून मग गालावर 'लालचुटुक्क डाळींब फुटं' प्रकार करायला लागायचे... Wink

धम्माल दिसत असतील सगळी पोरं. आमच्या आया कपडे वगैरे करवुन सरळ शाळेत सोडून यायच्या. काय घालायचाय तो गोंधळ घाला तुम्ही आणि मेकप करणारा. मज्जा असायची पण. कूणीतरी एक्ट्रा केअरवाली आई यायची सगळं मेकअप कीट घेऊन लेकीचा मेकप करायला. मग सगळ्या तिच्याभोवती गोळा व्हायच्या.

आमच्या अडीच वर्षाच्या टिल्लीचा ख्रिसमस प्रोग्राम होता तेव्हा शाळेतल्या बाईने मेकप केला होता. नी म्हणते तसं ते गालावर लाली वगैरे. Proud घरी आल्यावर खोबरेल तेल लावून मेकप काढून पुसला आणि साबणाने धुवून मॉईश्चरायझर लावून टाकलं. स्किनला काहीही झालं नाही. Happy

उलटे स्टेजच्या लाइटसपासून चेहर्‍याचे रक्षण करतात.
>>+१.

>>'अति पॅनिक करू नका'.. अगदी अगदी.. आपले सोत्ताचे शाळेतले दीस आठवा >> +१ Happy
माझे जुने फोटो बघितले की वाटतं की खरंच काय भयंकर प्रकार करू दिले आहेत मी माझ्याच चेहर्‍यावर!! पण फोटोतले निरागस भाव पाहिले की सगळे माफ.

मेक रिमुव्हर म्हणून मला ऑलिव्ह ऑइल आवडतं.
वॉटरप्रुफ आय मेक अप, सगळ्या हाय पिग्मेन्ट्स ना पटकन मेल्ट करण्याचा बेस्ट उपाय, स्किन ला हर्ट न करता.

मायकल कोर्स आणि दुसर्‍या ओळीतले गोल्डन सोडले तर एकही आवडला नाही.
हाय हिल्स तर काहीही आहेत. टू बिझी आणि ट्रॅशी.

ते दुसर्‍या ओळीतले क्रीम हायहील्स खूप स्मार्ट( बिलिव मी.. कंफर्टेबल आहेत या हील्स) दिसतात क्रीम पँट विथ विथ लिटल फ्लेअर बॉटम आणी गोल्डनिश कलर मधे निटेड टॉप बरोबर.. जोडीला ऑरेंज फ्लॅट क्लच..

गोल्डन आणि चित्याच्या प्रिंटचे असे दोनच जोड बरे वाटले. बाकी नाही आवडले Sad

फ्लॅट हील्स मधे मला हे डिझाईन्स आवडले.. ऑल्दो फ्लॅट हील घालून चालता न येणार्‍यांत माझ्याशिवाय आहे का अजून कुणी???
इतक्या फ्लॅट्स घालून चालले कि पायात क्रँप्स येतात आणी लोअर बॅक ला लगेच दुखायला लागतं..

मी हिल्स वापरणं सोडून देईन म्हणतेय. (अजून नीट नक्की नाही :() अलिकडे घेतलेले ३ जोड, ठार फ्लॅट घेतलेत पण. बरं वाटतं चालायला. धावपळ करता येत नाही हिल घातली की.. उगिच बाहुलीसारखं टुकुटुकु नाजुक चालावं लागतं. खास करून संध्याकाळी हापिसातून निघताना कॅब पकडायची असेल आणि हाय हिल असेल तर वैताग येतो. कारण मी कायम वेळ निघून गेल्यावर बिल्डिंगितून निघते.

फ्लॅट हील्स मधे मला हे डिझाईन्स आवडले.. ऑल्दो फ्लॅट हील घालून चालता न येणार्‍यांत माझ्याशिवाय आहे का अजून कुणी???
थोडे तरी हिल्स पाहिजेतच. १-२ इंच बास

हे असल्या पॅटर्नचे सँडल कु़णी वापरलंय का? पिंढर्‍या दुखतात का? मला वाटतंय नसतील दुखत. मी खूप कमी वापरलय असलं.. अगदी एखाद जोड.

platform_0.jpg

लुइ विंत्तो बरोबर कॉबो :).
lv.jpg
मल पण अशा खूप फ्लॅट्स नाही चालत, एखादा इंच तरी कुशन हवीच..

दक्षिणा,
मला असे ब्लॉक हिल्स चालतात, पेन्सिल पेक्षा जास्तं कंफर्टेबल.

मी वापरतेय ती सिमिलर आहे या हील्स ला.. सुप्पर कंफर्टेबल आहेत.. माझी हील ऑलमोस्ट साडे चार इंच आहे.. अजिबात त्रास होत नाही..

hair_1.jpgnails2.jpgnails.jpg

बरं आठवलं. माझा कान चिडलाय सध्या Sad फिरकीची कानातली चालत नाहीत मला. आणि मी मागच्या आठवड्यात एक दिवस नेमकं फिरकीचं कानातलं घातलं. नेहमी डँगलर्स घालते. असे..

tonedrop.jpg

Pages