फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ला पण खूप आवडलाय तो ड्रेस्..पण आधीच आडव्या असणार्‍या लोकांना ( इन्क्लुडिंग मी!!!) घालता येणार नाही बहुतेक Uhoh
नी, कुछ प्रकाश की किरणे डालो इसपर..

हो स्लेण्डर आणि मॉडेल फिगरलाच त्या आडव्या स्ट्राइप्स ठिक दिसतील. बारीक असाल तरी आणि कमी किंवा मिडीयम उंचीलाही नाही बरे दिसणार. उंची किमान साडेपाच हवी.

वर्शु सोप्पय ते.......टाईट कपडे घालायचे नाही....उभ्या स्ट्रीप असलेले आणि डार्क रंग असलेले कपडे घलायचे.....जीन्स मात्र ढगळ असेल तर वाइट दिसते

वर्षु तु आडवी नाहीस, पण तुझी चण लहान आहे, आणि उंची पण तशी कमीच
तु नेहमी जे कपडे घालतेस तेच मस्त दिसतात तुला Wink

दक्षे घे वाच आता वरचं ... पटेल मग तुला मी का असं म्हटलं ते Wink
थांकु नी अँड अनिश्का

वर्शु मला पण डबल एक्सेलच कपडे लागतात,........ब्रँडेड कपडेच घ्यावे लागतात......खांदे रुंद आहेत त्यामुळे मला लोकल दुकानतले कपडे घेताना खुप वेळ खर्चवा लागतो........ त्यामुळे मला तुझी पटकन आय्डिया आली.....थांकु काय त्यात??

अनिश्का.. सॉरी टू डिसापॉइंट यू.. Proud
मला एम साईझ चालतो.. आणी अमेरिकेत ' पिटिट' ... तर माझा उंचीचा प्राब्लेम आहे.. Happy

ह्म्म्म्म...........मग तर छान आहे एम असेल तर तु आडवी स्ट्रीप का नाहि घालु शकत??? माझी उंची जास्त असल्याने माझं वजन दिसुन येत नाही....... पण कपडे डबल एक्सेलच लागतात,......

वर्षू ताई, तुझा ड्रेसिंग सेन्स मस्त आहे आणि तुला काय छान दिसेल हे तुला परफेक्ट माहितीये.

हा माझा पिक आहे... माझा टि शर्ट डबल एक्सेल आहे...पण मी सर्व प्रकारचे कपडे घालते....मला अवडतात...

अनिश्का
माझी उंची जास्त असल्याने माझं वजन दिसुन येत नाही >>> तुझं वजन खुप असेल असं वाटतं नाही ह्या पिक वरून!

थांकु...पण माझं वजन जास्त आहे...म्हणुन मी म्हटलं ना की माझं वजन उंचीमुळे दिसुन येत नाही...

लखनवी कपडे पण छान आलेत बाजारात....आजच स्टेशन वर एका बाईनी लेव्हेंडर कलर ची लखनवी साडी घातली होती....ती बाई दिसायला साधीच होती पण त्या साडी मुळे तीचा एलिगंस उठुन दिसत होता... Happy

मुलींनो, मला सांगा ३ १/२ वर्षाच्या मुलीचा नाच आहे शाळेत. तर काय आणि कसा मेक-अप करता येईल? कॉस्मेटीक्स ब्रॅन्डेड असली तरी इतक्या लहान त्वचेवर वापरायला भिती वाटतेय.

Pages