फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता माझा नविन प्रश्न

Cute-eyeliner.jpg

वरती ३ नंबरच्या इमेजमध्ये एक पांढरी पेन्सिल दाखवली आहे, तिला काय म्हणतात? आणि ती कुठे मिळते? मागताना काय द्या? असं म्हणायचं?
यू ट्यूबवर पण हाऊ टू पुट आयलायनर असं सर्च केल्यावर जे जे व्हिडिओ दिसतात त्यात सर्व बायका असं पांढरं काय काय अप्लाय करताना दिसतात.

पांढरी आयलायनर पेन्सिल असेच माग.
पेरूगेटाच्या गल्लीत रोहित कडे किंवा भा मा बोळात शारदा नॉव्हेल्टीजकडे मिळेल.

अनिश्का छान आहे. आजकाल समारंभांमधे मुली साडी घातल्यावर, कमरेला चेन घालतात. कोणी बघितले आहे का तसे?

काय माहित ते काय आहे....मी असलं काही लावलं लॅक्मे, रेवलॉन तरी मला खाज सुटते त्यामुळे माहित नाही..मी शोधुन पाहते

मला मंसू पारंपारीक वाट्यांचे आणि साधेच आवडते. मला एकुणातच दागिन्यांचे पारंपरीक घाट आवडतात. फ्युजन करण्यापेक्षा एकदम ऑफबिट नवीनच डिझाइन जास्त बरे वाटते.
माझ्या आईच्या पिढीने अशी वेगळ्या डिझाइनची मंसू करून घेतली आणि वेगवेगळ्या साड्यांवर/ ड्रेसवर वेगळे असे केले. कारण त्यांना 'काय हे मंसू नाही घातलं?' याचा फार जास्त त्रास होता. आता आपल्या पिढीत ती गरज उरली नाही. वेगळ्या डिझाइनच्या गळ्यातल्याबरोबर मंसू घातलेच पाहिजे हे उरले नाहीये (अगदी जेमतेमच उरले असावे!) त्यामुळे हवे तेव्हा पारंपरीक सजायचे तर पारंपरिक मंसू घातले आणि एरवी हवी तशी गळ्यातली हे बरे पडते.

सायली धन्यवाद...
पेरु माझा लग्नात बहिणीने ती चेन घातली होति......त्या साठी कंबर लागते कमरा नाही (म्हणुन मी घालु शकली नाही) ..कारण त्या लहानच पडतात नेहेमी.. Wink

भा मा बोळात >> म्हणजे तुबात ना? <<
नाही. या भा मा बोळातून पुढे जाऊन रस्ता क्रॉस केला की तु बा सुरू होते.
सम्राटचं मोठ्ठं दुकान जिथे सुरू झालंय तो भा मा बोळ. सम्राटकडून तु बा च्या विरूद्ध दिशेला आलीस की पहिल्या कॉर्नरला डावीकडे शारदा.

पांढरी लायनिंग पेन्सिल ही हायलाइटस करण्यासाठी असते. मेकपचे संपूर्ण टेक्निक हे ग्रेस्केल आणि शॅडो-हायलाइटच्या खेळावर आधारित आहे.

अगं हो ना निधप..माझं लग्नातलं पारंपारिक आहे.......पण मोठं.....ते रोज घालायला भिती वाटते ट्रेन मधे वगैरे.....हे लहान बरे वाटतात...

images.jpegimages.jpeg

हाउ अबाउट धिस....)) मस्तच.
लग्नातलं पारंपारिक आहे.......पण मोठं.....ते रोज घालायला भिती वाटते ट्रेन मधे वगैरे.....हे लहान बरे वाटतात...))
....अगदी अगदी.

112736_01.jpg

मी लग्नात सांगितले होते. रोज घालायला हवे असेल तर पारंपरिक डिझाइनचं छोटंच करा. मोठं नको. त्यांनी दोन्ही केली लग्नात घालायचे ते मोठेच हवे म्हणून.
ते छोटं आहे ते एक वाटी, तिच्या दोन्ही बाजूला ६-६ काळे मणी आणि बाकी सोन्याची चेन असं आहे. तेच बहुतेक वेळेला घालते. Happy

मझा पण निधप....पण माझा मुहुर्त मणि आहे वाटी नाही छोट्या मंसु मधे.....मोठ्या मधे आहे वाट्या

ऑफिसात एका आमच्या सिनीअर मॅनेजरने प्लॅटीनमचं मंगळसुत्र करून घेतलं आहे. प्लॅटीनमची अगदी बाऽऽरीक १६ इंची चेन, त्यात पेंडंटच्या जागेच्या बाजूला एक-एक इंच जागा सोडून दोन्ही बाजूला झिरो नंबरचे ५ काळे मणी. बाऽऽस! इतकं एलिगंट आहे ते मंगळसुत्र. त्यात ती नेहमी वेगवेगळी अतिनाजूक पेंडंट्स घालते. सगळी पेंडंट्स चांदीवर पांढरे खडे बसवलेली अगदी नाजूक नाजूक अशी आहेत. ती मॅनेजर स्वत: सावळी आहे. खूप मस्त पर्सनॅलिटी आणि सॉफ्ट स्पोकन. मस्त दिसतो तो दागिना तिला. आणि साडी/ ड्रेस/ वेस्टर्न कशावरही एकदम मस्त दिसते.

अनिश्का

अगं ५फु १०' ना तू.... वर हे सँडल.... मग काय छताला भिडायचा विचार आहे....आम्हा बुटकी वांगीं नी हे घातले तर ठीक.... आधी नीट चालता यायला पाहिजे ते वेगेळेच....

मला तर स्वप्नातही घाबरवतिल हे सँड्ल्स... कशी ही फिगर असली तरी.

माझी लेकही खुप उंच होते आहे. अत्ताच ११वं सरलं. ती अत्ताच ५ फु ३.५' आहे. त्यातही उंच टाचा घालते. त्या मुळे कोणी ६ वी मधली समजतच नाहीत. कॉलेजातली म्हणतात.... ( अजुन वयात यायची आहे)... मी म्हणुनच हे सगळे अनुभव वाचते आहे.... तिला ही हे फेस करायचेच आहे...

पांढरी आय पेन्सिल डोळे थोडे मोठे दिसावे म्हणून पण लावतात आय गेस.
मोठे म्हणजे पांढरा भाग मोठा दिसावा म्हणून.

मी आयुष्यात एकदा तरी स्वत: डिझाइन करून हवा तसा प्लॅटिनमचा दागिना बनवून घेणारे.

उम्म्म... हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिशपे दम निकले.... Wink

मोकिमी.....अगं इतके हाय हिल्स घालुन पण मी नवर्यासमोर बुटली दिसते.......त्या मुळे मी घालु शकते.. Happy आणि मी ४थित होते तेव्हा मला एका रिलेटिव नी विचारलं होतं की किति वर्श नापास झाली आहेस एका वर्गात???? जोक्स अपार्ट >>>> वाढु दे ग उंची.......मस्त दिसेल लेक तुझी.... मला पण कधी कधी वेगळं (जास्तच ऊंच) असल्याचं फीलिंग येतं...पण छानही वाटतं...........

Pages