Blue Hoodie क्रोशे स्वेटर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

पुन्हा एकदा माझं क्रोश्याचं फॅड Happy
पहिल्यांदाच एव्हढा मोठा स्वेटर विणायचा प्रयत्न केलाय.

2012-10-15 16.43.34 (640x488).jpg

हा मी विणलेला क्रोश्याचा स्वेटर(हुडी). कुठल्याही पॅटर्नशिवाय अंदजानेच विणलाय परंतू दहा वर्षांच्या मुलाच्या मापाचा आहे.

100_7094 (496x640).jpg

लेकाच्या हौसेखातर त्यावर नासा चा सोविनियर चिकटवलाय. Happy

100_7097 (640x486).jpg

क्या बात है यार....... कसला सफाईदार झालाय .....!!
कलर पण एकदम फ्रेश...... मस्तच !!

थँक्स जयुताई, अदिती, सिंडी.

हो गं सिंडे क्रोशे च आहे. Happy
विण बिण अपुन को नै मालूम.. Uhoh
सरळ सरळ खांबांवर खांब विणले आहेत. सोप्पय कि नै ? Wink

सर्वांना धन्यवाद ! Happy

श्रेयानला घालून फोटो काढायचा ना!>> पौ अजून एक दोन वर्षे लागतिल आमच्या बारिकराव ला.. मग निट होईल Happy

सुंदर! अगदी नवीन विकत आणल्यासारखा दिस्तोय. work in progress चा फोटो टाकल्यामुळे तूच विणलास हे कळाले Happy

डॅफो, मस्त झालाय
क्रोशे आहे पण दोन सुयांसारखं घट्ट विणीचं आणि सफईदार आहे...याचं रहस्य काय ?
सुई किती नं आणि लोकर कोणती ?

अवनी स्वेटर विणायला 5.00 mm (एच ८ नं)सुई वापरली. आणि बॉर्डर पट्ट्या विणायला त्यापेक्षा छोटी म्हणजे ९ नं.
रहस्य काही नाही गं. Happy बॉर्डर पट्ट्यांमुळे दोन सुयांसारखे वाटतेय.
एकाहाती आणि खराब न करता.. न उसवता विणल्याने निट्स दिसत असावं. Happy

फारच सुबक, सफाईदार विणलाय! रंग संगती तर खूप मस्त आहे. आणि दोन सुयांवरचा वाटेल इतकी वीण घट्ट आलीये. मस्त खूप आवडला.