'काय बदललं?'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 26 December, 2012 - 23:29

१९९२ साली भारतात सुरु झालेल्या जागतिकीकरणानं बाजाराचं व्याकरण बदलून टाकलं. 'गोष्टी जपून वापरा, पिढ्यान् पिढ्या टिकवा' ही शिकवण मागे पडून 'अधिक खरेदी करा, वापरा आणि फेकून द्या' या मूल्यानं भारतीयांच्या मानसिकतेत शिरकाव केला. परदेशी ब्रँडदेखील सुलभतेनं मिळू लागले तसं साहजिकच एकेका गाडीसाठी सहा महिन्यांच्या प्रतीक्षायादीचे किस्से जुनेपुराणे वाटू लागले.

डालड्याचा पिवळा डबा, चेतकची स्कूटर, बोटांनी गोलगोल फिरवत डायल करायचा टेलिफोन ते आजच्या स्टायलिश चारचाकी गाड्या, आयफोन या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. बाजारव्यवस्था बदलली, तसे नातेसंबंध बदलले, आपली परस्परांतली वागणूकही बदलली.

’पुणे ५२’ हा चित्रपट १९९२ साली घडतो. भारतानं मुक्त अर्थव्यवस्थेसाठी आपली दारं उघडली, त्या काळात.

pune52changes.jpg

१८ जानेवारी, २०१३ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट याच बदलांचा वेध घेतो. या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा या काळाच्या आठवणी जागवूयात.

ही स्पर्धा सोपी आहे. तुम्हांला करायचंय इतकंच की, तुम्हांला आठवत असलेल्या, १९९२ सालानंतर घडलेल्या बदलांमुळे आता आपण फारशा वापरत नसलेल्या, किंवा विस्मरणात गेलेल्या दहा वस्तू लिहायच्या आहेत. उदाहरणार्थ, डालड्याचा पिवळा डब्बा, आणि चेतकची स्कूटर. Happy

या वस्तू (किंवा तुमच्या यादीतल्या जास्तीत जास्त वस्तू) ’पुणे ५२’ या चित्रपटातही असतील, तर तुमचं नाव विजेत्यांच्या यादीत येईल. एकापेक्षा अधिक विजेते असल्यास लकी ड्रॊ पद्धतीनं विजेते निवडले जातील.

या स्पर्धेतल्या दोन विजेत्यांना मिळतील पुणे / मुंबई इथे १७ / १८ जानेवारी, २०१३ रोजी होणार्‍या शुभारंभाच्या खेळांची प्रत्येकी दोन तिकिटं.

चला तर मग, आठवूयात तो काळ!!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे १० :

०१. एचेमटीची चावीची मनगटी घड्याळं (उच्च दर्जाची होती).
०२. लोकलगाडीतली जुनी हँडले.
०३. बेस्ट बसचे जुने तिकीट.
०४. मोझेकच्या फरश्या (१ फूट * १ फूट). हल्ली नवीन मोठ्या आकाराच्या फरश्या लावतात.
०५. ऑईल पेंट.
०६. गंगावन.
०७. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम.
०८. कँपाकोला.
०९. (बायकांच्या) डोक्यातल्या केसात घालायचे U आकाराचे आकडे.
१०. रंगीत खडू, टीपकागद, शाईच्या दौती.

-गा.पै.

१) काही म्हणी जसे की शुभस्य श्रीघम
२) घरोघरी कुरडया वाळत घातलेल्या दिसत आणि चिक खायला मिळायचा
३) चीनचोके आणि गोट्या रस्त्यावर खेळायला मिळायच्या
४) आताशा शहरांमध्ये धोतर नेसलेले आजोबा क्वचितच दिसतात.
५) बजाज च्या प्रमाणेच लामब्रेटा नावाची स्कुटर दिसायची
६) पुण्यात हत्ती गणपतीला नगारा वाजवून लायटिंग करायचे. तो नगारा कित्येक वर्षात आईकाला नाहीये.

१ लाकडी पट्टी
२ शाळेबाहेर ५ पैश्याला मिळणार्‍या त्या लाल छोट्या गोळ्या
३ साखरेच्या गुलाबी पट्याची खेळणी, मनगटावर घडयाळ अस बनवून देणारा एक माणूस यायचा,
त्याच्या कडचा तो खाऊ.(ह्या गुलाबी पट्यांना काय म्हणायचे ते आठवत नाही. Sad )
४. पिना, टिकल्या, काचेच्या पेटीत दारावर घेऊन येणार्‍या विक्रेत्यांकडच्या त्या वस्तू..
५. रक्तचंदनाची घरात असणारी बाहुली
६ मापट,चिपट
७ सूप
८.पितळ्याच्या पेढेघाटी ड्बा, आणि कडीचा डबा
९ बोरकूट Happy
१० घंगाळ आणि बंब
११. विळी (ही हल्ली शहरातुन कालबाह्य होऊ लागली आहे,बर्‍याच जणांकडे नसते)
१२ पाटा वरवंटा
१३ पंचपाळ.

वरची लिस्ट धरून हे एक (आतापुरतं),

१. ५०१ कपड्याचा साबणाची वडी(पिवळ्या रंगाची, ती किसून पाण्यात गरम करायची आमची कामवाली बाई)..
आम्हाला ते चीज वाटायचं.

२. पेप्सीकोला ५० पैसेवाला
३. ९४ साली आमच्या घरी आलेला मोठाच्या मोठा कंप्युटर्.त्यात DOS प्रॉम्प्ट वरून दिलेले कमांड.
४. शाळेतला जर्मचा डबा (हा मला बिलकूल आवडायचा नाही)
५. ते जाड सर असलेले कुठले ते फेमस शाईचे पेन व ती शाई(?)

१) ढेकुण मारण्याचा पंप
२) कार मध्ये खिडकीची काच खाली करण्यासाठी असलेले handle. आता तर प्रेस बटन असतं.
३) जुने गोल काळ्या रंगाचे switches.
४) कॅमेलची शाई
५) दर्जेदार हिंदी-मराठी सिरियल्स.
६) टेप रेकॉर्डर मधील कॅसेट ची रिबन निघाल्यास ती पेन्सील ने फिरवून आत घालणे.
७) चायना पेन
८) कोल्ड ड्रिंक- गोल्ड स्पॉट -The zing Thing, लिम्का,
९) जून्या गोळ्या-चॉकलेट्स - पान पराग, peppermint , श्रीखंडाच्या गोळ्या, Kismi चॉकलेट्स
१०) multicoloured refills ballpen.

१) वातीचा स्टोव्ह
२) रेशन च्या दुकानात मिळणारं रॉकेल , धान्य
३) व्हि सी आर , व्हिडियो टेप्स
४) पान पराग ची लाल गोळी
५) केसांच्या दोन वेण्या आणी लावलेल्या रिबिनी
६) ५० पैशाना मिळणारा पेप्सीकोला
७) बजाज स्कूटर , त्याला लावलेली साईड कार
८) बोहारणी
९) ५०१ साबण , भांड्याम्ना लावायची पावडर
१०) कल्हईवाला
११) पाटी - पेन्सील
१२) ३ पायलीचे पत्र्याचे डबे
१३) स्वयंपाक घरातील रॅक.. दुधाचं कपाट
१४) बंब , घंगाळं

११)

या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy

निर्मात्यांकडे या स्पर्धेच्या प्रवेशिका पाठवण्यात आल्या होत्या.
त्यांनी दिलेल्या निकालानुसार निंबुडा, मी_आर्या, chaitrali, avani1405 यांनी दिलेली उत्तरं सर्वाधिक बरोबर असल्याने त्यांना 'पुणे ५२'च्या शुभारंभाच्या खेळाची तिकिटं दिली जाणार आहेत.

तुमचं अभिनंदन Happy

निंबुडा, मी_आर्या, chaitrali, avani1405,

तुमचे फोन नंबर कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर कळवाल का?

chaitrali, तुमचा संपर्क क्रमांक कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर पुन्हा एकदा पाठवाल का? काही तांत्रिक अडचणींमुळे तुम्ही पाठवलेला ईमेल डिलीट झाला. तसदीबद्दल क्षमस्व.

या स्पर्धेतल्या दोन विजेत्यांना मिळतील पुणे / मुंबई इथे १७ / १८ जानेवारी, २०१३ रोजी होणार्‍या शुभारंभाच्या खेळांची प्रत्येकी दोन तिकिटं. >>>
मुंबईच्या विजेत्यांना मुंबई खेळाची तिकिटे मिळणार असे गृहित धरायला हरकत नाही ना?

मी_आर्या,avani1405, निंबुडा,

तुमचे ही अभिनंदन.

-----------------------------
Admin, नंबर परत कळवला आहे.

स्पर्धीचा निकाल लागल्याचे आत्ता वाचले! विजेत्यांचे अभिनंदन!
तरी माझी लिस्ट सहज देते
लोकहो, कॅसेटवाला वॉल्कमन कसा विसरलात?
आणि हल्लीच्या मावेइतका क्राऊन कंपनीचा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टीव्ही?
हमलोग आणि बुनियाद
पिन असणारा रेकॉर्ड प्लेयर (स्टीरिओ)
लुना मॅग्नम
राजदुत
उन्हाळ्यातली वाळवणं
जुन महिन्याच्या सुरुवातीला चमचमीत लोणचं पोटात घेऊन बसणार्‍या मोठ्या बरण्या
लोणचं पोळीचा शाळेत नेलेला डबा (स्टीलचा गोल किंवा अंडाकृती)
खिडक्यांना लावले जाणारे साड्यांचे पडदे
उषा कंपनीचे शिवणयंत्र
आजोळाहुन परतताना आजी-आजोबांनी एकाच कापडातुन शिवलेले ढगळ फ्रॉक्स/ शर्ट्स

कॅसेटवाला वॉल्कमन कसा विसरलात?
>>
मी लिहिलाय की वत्सला Happy माझ्या लीस्ट मधला तो पहिलाच आयटम आहे.

पिन असणारा रेकॉर्ड प्लेयर (स्टीरिओ)
>>९२ साली? Uhoh
जुन्या काळातला कुणाच्या आजोबा/ पणजोबांच्या जमान्यातला राहिला असेल कुणाकडे चांगल्या अवस्थेत तरच हे शक्य आहे. अदरवाइज, पिन असणारा रेकॉर्ड प्लेयर (स्टीरिओ) हे ९२ च्या आसपास चे उत्पादन नाही, असे वाटते.

लोणचं पोळीचा शाळेत नेलेला डबा (स्टीलचा गोल किंवा अंडाकृती)
>>
स्टीलचा डबा असायला. सिंगल किंवा डबल डेकर. आणि त्यातून भाजीचा रस्सा, तेल इ. हमखास गळायचे. मग दप्तराला, वह्या-पुस्तकांना डाग इ. Sad

अरेच्चा, आता वाचली ही बातमी. Happy

निंबुडा, chaitrali, avani1405 तुमचे मनःपुर्वक अभिनंदन!
माप्रांचे धन्यवाद!

माप्रा, आताच चिनुक्स यांना इमेल केला आहे. कृपया पोचपावती द्या!

धन्यवाद मामी.. Happy

माप्रा...! काल रात्रीच चिनुक्स यांना ईमेल करुन माझा नंबर पाठवला होता. फेसबुकवरही मेसेज टाकला होता. अजुन फोन वै. काहीच आलं नाही. Uhoh

Pages