सहा शब्दांच्या कथा

Submitted by अनंत ढवळे on 1 January, 2013 - 10:21

सहा शब्दांच्या कथा :
-------
१.

फोटोची चौकट रिकामी पडलीए अनेक वर्षांपासून.

२.

हजार व्हायोलिन्स एका स्वरात रडल्या तेंव्हा.

३.

भाडं, लाईटबिल, किराणा, पेट्रोल, बँकेचा हप्ता.

४.

म्हातारी नंतर म्हातार्‍याची आबाळ होणारच होती.

आता संबंध संपलेत, पण जीव तुटतोचना.

अनंत ढवळे

-----

( थोडा बॅकग्राऊंड - इंग्रजी लेखक हेमिंग्वेने हाताळलेला साहित्यप्रकार. अत्यंत कमी शब्दांमध्ये कविता आणि नाट्यमयता यांच्या मिश्रणातून एक संपुर्ण कथानक उभे राहाते )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम! आधी लक्षातच आले नाही. तुम्ही क्रमांक देऊनही मी एकाचा दुसर्‍याशी संबंध जोडत बसलो. पण सहा शब्दांची एक ओळ, हीच एक काव्यकथा या दृष्टीने ते आहे हे समजल्यानंतर हरखलोच. हे घागर मे सागरच्याही पुढचे वाटले. गझलेचा शेरही जेथे पसारायुक्त वाटावा अश्या या ओळी वाटत आहेत अनंत. त्यातच तुमच्यासारख्याने या फॉर्ममध्ये व्यक्त व्हावे हे आणखीनच सुखद!

फोटोची चौकट रिकामी पडलीए अनेक वर्षांपासून.<<<

म्हातारी नंतर म्हातार्‍याची आबाळ होणारच होती.<<<

आता संबंध संपलेत, पण जीव तुटतोचना.<<<

व्वा व्वा!

>>>इंग्रजी लेखज हेमिंग्वेने हाताळलेला साहित्यप्रकार. अत्यंत कमी शब्दांमध्ये कविता आणि नाट्यमयता यांच्या मिश्रणातून एक संपुर्ण कथानक उभे राहाते <<<

या माहितीसाठी धन्यवाद! एकदा प्रायोगीकपणे करून बघायला हवे, कसे वाटते ते!

-'बेफिकीर'!

वा सर

पण खालची टीप दिली नसतीत तर हे समजले नसते

अधिकाधिक जाणून घ्यायला खूप आवडेल

बेफीजींचेही आभार

आभार - मराठीत अतिशय चांगल्या कथा लिहीता येतील.. कथानक संपूर्ण झाले पाहिजे( हे कठीण आहे, दर वेळी होईलच असे नाही )....

<<एकदा प्रायोगीकपणे करून बघायला हवे, कसे वाटते ते! >> - नक्कीच !

बढिया, अनंत.
कथा छोट्या असूनही विचार करायला लावणा-या आहेत, अव्यक्तपणे बरेचकाही सांगणा-या.
शेवटच्या दोन अधिक भावल्या.

म्हातारी नंतर म्हातार्‍याची आबाळ होणारच होती.

ह्यावरून प्रेमचंदची नेउर ही सुंदर लघुकथा आठवली.
शेअर करायचा मोह होतोय.
नेउर नावाचा मेहनती म्हातारा असतो. त्याची स्वार्थी म्हातारी (बायको) पूर्णपणे त्याच्यावर विसंबून, गावक-यापासून फटकून असते. कुठल्याश्या किरकोळ चुकेपायी बदनामीच्या भीतीने नेउर गावातून फरार होतो.
पश्चातापाने काही दिवसांनी पुन्हा गावात आल्यावर समजते की त्याची म्हातारी ह्या जगात राहिली नाही.
त्या दिवसापासून म्हातारा बोलणं सोडून देतो. शेवट प्रेमचंद असा करतो:
तब होली आई. सब ने खुशिया मनाई, नेउर अपनी झोपडी से न निकला, और
आज भी वह उसी पेड के नीचे, सडक के किनारे, उसी तरह मौन बैठा हुआ नजर आता है-निश्चेष्ट, निर्जीव!

धन्यवाद.

हा प्रकार ह्या वर्षीच्या धनंजय मधे पहिल्यांदा पाहिला / वाचला. त्यात तर ६/४/२ शब्दांच्याही कथा (?) आहेत.

साती! Lol खरं आहे!

ही फार फार तर कथा-बीजं होऊ शकतील. कथा का म्हणावं यांना? >> सेम हीअर!

मध्यंतरी नवीन कळलेला त्रिवेणी हा प्रकार आठवला. तीन लहान पण सूचक ओळींतून एक अर्थपूर्ण भावना (विचार) उलगडते. पण कथा ? ये प्रकार कुछ झेप्या नही!

कथा म्हणजे गोष्ट या अर्थी घेऊ नका. कथा म्हणजे "सांगण्यासारखे काहीतरी" असा अर्थ घेऊन बघा. या प्रकारामधे वाचकाला इतर सर्व डीटेल्स मनामधे उभे करावे लागतील. प्रत्येकाचे डीटेल्स वेगवेगळे असणार, त्यामुळे प्रत्येक वाचकाला मिळणारी अनुभूती वेगळी असणार. कमीतकमी शब्दांमधे जास्तीत जास्त आशय पोचवणे आणि वाचकांच्या अनुभवविश्वाला ढवळणे, एवढेच यातले मर्म.

नंदिनी वहीनींशी सहमत,

वर साजिराजींनी जी लि़ंक दिली त्यातील याच हेंमिंग्वेबाबूंची एक सहाशब्दओळकथा इथे पेस्टतो... हलवून गेली..

"For sale : Baby shoes, never worn."

सहाच शब्द, बस्स !
अन काळजात धस्स !!

अंड्या, प्लीज ते वहिनी, आत्या मावशी इत्यादि संबोधने मला नकोत.

माझा युजर आयडी नंदिनी आहे, तेवढीच हाक मारा. धन्यवाद.

अनंत ढवळे,
ह्या नवीन साहित्यप्रकाराची ओळख करून दिल्याबद्दल अत्यन्त आभार Happy
उत्कृष्ट प्रकार आहे - एका श्लोकात रामायण आणि महाभारत आहे तसे.
एक सुचले: "त्याने भिंतीच बांधल्या. महाल झालाच नाही." (खूप जणांची कथा)

मी जिवंतलो
.....जगलो
.....लग्नाळलो
.....आजारलो
......मेलो.
.
.
.
.
जमलो... ? काव्य आणि आत्मकथा दोन्ही आल्यात ...:)

माझा युजर आयडी नंदिनी आहे, तेवढीच हाक मारा. धन्यवाद.
>>>> नंदिनी, तीन शब्द जास्त आहेत. Happy

सहा शब्दांच्या कथा, असंख्य नि:शब्द व्यथा.

लोकहो,

अतिशय छोटी आणि बीभत्स कथा. दुवा जपून उघडणे!

आ.न.,
-गा.पै.

तळटीप :
१. माननीय प्रशासक, आपणांस आक्षेपार्ह वाटला तर दुवा व प्रतिसाद कृपया उडवून टाकावा.
२. वाचकांचा अपेक्षाभंग झाल्यास लेखक जबाबदार नाही! Proud

Pages