सहा शब्दांच्या कथा

Submitted by अनंत ढवळे on 1 January, 2013 - 10:21

सहा शब्दांच्या कथा :
-------
१.

फोटोची चौकट रिकामी पडलीए अनेक वर्षांपासून.

२.

हजार व्हायोलिन्स एका स्वरात रडल्या तेंव्हा.

३.

भाडं, लाईटबिल, किराणा, पेट्रोल, बँकेचा हप्ता.

४.

म्हातारी नंतर म्हातार्‍याची आबाळ होणारच होती.

आता संबंध संपलेत, पण जीव तुटतोचना.

अनंत ढवळे

-----

( थोडा बॅकग्राऊंड - इंग्रजी लेखक हेमिंग्वेने हाताळलेला साहित्यप्रकार. अत्यंत कमी शब्दांमध्ये कविता आणि नाट्यमयता यांच्या मिश्रणातून एक संपुर्ण कथानक उभे राहाते )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहाणपणी ऐकलेल्या काही लघुकथा.

१. एक होते गाव. गावात होते पोष्ट. संपली आमची गोष्ट.

२. एक होता राजा. एक होती राणी. संपली आमची कहाणी.

वरच्या कथांमध्ये "संपली आमची गोष्ट" आणि "संपली आमची कहाणी" हे शब्द केवळ अजाण वाचकांना कथा संपली आहे हे समजण्यासाठी असल्याने ते मूळ कथेत गृहीत धरले नाहीत तर या कथा सहा आणि फक्त सहाच शब्दांच्या आहेत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल.

वा

सर्वांचे आभार - विडंबने वगळता प्रतिसादात आलेल्या कथा चांगल्याच आहेत, एक नवा वाचनानुभव मिळतो आहे.

गामा - शर्मन अलेक्सी ना वाच्या लेखकाची एक अशीच प्रसिध्द कथा आहे, अवश्य बघा !

"A lot can happen over coffee".
कॅफे कॉफी डे ची टॅगलाईन वाचल्यावर मला तुमचा धागा आठवला.

६ शब्दात आक्खी गोष्ट. मस्त आयडिया. वाह.
धन्यवाद , हे दाखवल्याबद्दल.

अन्कुरी,

>> केस कोर्टात जाण्याआधीच तिने श्वास सोडला.

अतिशय समर्पक! Sad चांगली तरी कशी म्हणू हिला!

आ.न.,
-गा.पै.

वा सुंदरच......!!! प्रयत्न केला पाहिजे.

"पिल्ले उडून गेल्यावर घरटे ओस पडले" ....... ही होईल का सहा शब्दांची कथा. Happy

कामगार हवे आहेत : कबर खणणारे (रात्रपाळीसाठी).

एका सुंदर कथाप्रकाराची उजळणी... खूप धन्यवाद, अनंत. वाचकाच्या मनःस्थितीप्रमाणे कथा फुलते. अनेकदा अगदी आतशबाजीसारखी किंवा बॉम्ब फुटल्यासारखी.

मध्यंतरी म.टा . मध्ये इंग्रजीतल्या काही अतिलघुकथांबद्दल लिहिलं गेलं होतं .
त्यातली एक --

त्याला जाग आली तेव्हासुध्दा डायनासोर तिथेच होता .

नवं सरकार आलं,धोरणं बदलली नाहीत.
.
.
सगळा प्रचार आहे, जगणारा लाचार आहे.
.
.
तो गेला, ती वाट पाहत बसली.

>>> माझा प्रयत्न.

छान प्रकार वाटतोय हा...
मला चक्क एक गाण्याची ओळ आठवली येथे....

ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता !!

Pages