सहा शब्दांच्या कथा

Submitted by अनंत ढवळे on 1 January, 2013 - 10:21

सहा शब्दांच्या कथा :
-------
१.

फोटोची चौकट रिकामी पडलीए अनेक वर्षांपासून.

२.

हजार व्हायोलिन्स एका स्वरात रडल्या तेंव्हा.

३.

भाडं, लाईटबिल, किराणा, पेट्रोल, बँकेचा हप्ता.

४.

म्हातारी नंतर म्हातार्‍याची आबाळ होणारच होती.

आता संबंध संपलेत, पण जीव तुटतोचना.

अनंत ढवळे

-----

( थोडा बॅकग्राऊंड - इंग्रजी लेखक हेमिंग्वेने हाताळलेला साहित्यप्रकार. अत्यंत कमी शब्दांमध्ये कविता आणि नाट्यमयता यांच्या मिश्रणातून एक संपुर्ण कथानक उभे राहाते )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही आवडलेल्या षट्शब्दकथा

Painfully, he changed “is” to “was.”

Born a twin; Graduated only child.

“Joining the President is his husband…”

“Wrong number,” says a familiar voice.

Sorry soldier, shoes sold in pairs.

Paramedics finished her text, “…love you.”

The Smallest coffins are the heaviest.

Introduced myself to mother again today.

I met my soulmate, she didn't.

An only son, a folded flag.

Passengers, this isn't your captain speaking.

"Just Married" read the shattered windshield.

Brought roses home, keys didn't fit.

Dad left, a flag came back.

वैनिल, अगदी हृदयस्पर्शी कथा.!!

बाळा, सह्या झाल्यात. वृद्धश्रमात लवकर जायचंय!

तुझ्या लग्नाची पत्रिका! कोण हा भाग्यवंत?

शवपेटीला गुंडाळता येईल एव्हढा मोठा झेंडा हवा.

रॅगिंगला तोंड देणे त्याला जमलेच नाही!

शेतकर्‍याच्या अंत्यविधीलाच वावर पाण्याने भरुन गेलं.

बागुलबुवा, सगळ्याच कथा आवडल्या.
इतरही आवडल्या. जवळजवळ सगळ्या दुःख/ वेदना/ हेलावून टाकणाऱ्या आहेत. वेगळ्या भावाच्या पण आवडतील वाचायला.

विठोबाला पाहताच वारकरीचा उर भरुन आला ||

माझ काय? मी कसेतरी जगेनच तुझ्याशिवाय ||

कल्पना छान वाटली; दोन वेगळे रस वापरुन दोन कथा लिहिल्या Happy

मीसुद्धा 'सहा शब्दांची कथा' लिहिण्याचा प्रयत्न करून पाहिलाय. जमलाय का पहा बरं!!!

१) आई गं! सोड म्हणते ना मला.

२) म्हातारी खुरडत, अजूनही रोज स्टँडवर येते.

३) त्याने वर पाहताच, फाटकन फटका पडला.

© सचिन काळे.

व्रण नाहीत?
मग पुरावा काय हिंसेचा?

छान

सहा शब्द कथा व्यक्त करती व्यथा .....

१. अनेक वर्षांनी तिने पाहिले ... अनोळखी नजरेने !

२. परिचित आवाजात म्हणाली ... सॉरी रॉंग नंबर !

३. परिचित वाटेने जाताना , रस्ता कसा चुकला ?

४. मी काहीच देणे लागत नाही, या मुनिमजीचे

५. पैपैची नोंद ठेवली तरी हिशेब चुकलाच

६. कवटी फुटली तशी शांतता वाढली

Pages