सहा शब्दांच्या कथा

Submitted by अनंत ढवळे on 1 January, 2013 - 10:21

सहा शब्दांच्या कथा :
-------
१.

फोटोची चौकट रिकामी पडलीए अनेक वर्षांपासून.

२.

हजार व्हायोलिन्स एका स्वरात रडल्या तेंव्हा.

३.

भाडं, लाईटबिल, किराणा, पेट्रोल, बँकेचा हप्ता.

४.

म्हातारी नंतर म्हातार्‍याची आबाळ होणारच होती.

आता संबंध संपलेत, पण जीव तुटतोचना.

अनंत ढवळे

-----

( थोडा बॅकग्राऊंड - इंग्रजी लेखक हेमिंग्वेने हाताळलेला साहित्यप्रकार. अत्यंत कमी शब्दांमध्ये कविता आणि नाट्यमयता यांच्या मिश्रणातून एक संपुर्ण कथानक उभे राहाते )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

70 , 72 80 ? 88 99

शेवंती , शेवंती तू येती ?
येती तर ये , नाय तर नाय

(मूळ लेखक अनामिक )

मी पण लिहू शकतो, अशी गोष्ट!

(ही झाली पहिली आणि आता तिसरी...)

इथे सुरू होण्याआधी संपली की कहाणी!

#‎MYSIXWORDSSTORY‬

बाकी विनोद जाऊ द्या आणि यात होणारी अतिशयोक्ती सोडली, तरी हा प्रकार डोक्याला भुंगा लावणारा आहे नक्की. ढवळीकरसाहेब चांगला आणि वेगळा प्रकार आहे हा.

आई बाप , बायको , भाउ , मुलगी , मुलगा यांच्यावरील अन्यायाबद्दल संघर्ष विविध शिनेमात बच्चनने केला. आता नातीवरील अन्याय असलेला सिनेमा आला. चौथी पिढी आली .

जून महिना आणि आठवणी बालभारती च्या...
स्वातन्त्र्या नंतर ची एक वाहती जखम...
खग ही जाने खग की भाषा
घराच्या भिंतीवर वारली चित्रकला कशी साकारावी?

..नाही नाही या सगळ्या सहा शब्दांच्या कथा नाहीयेत.. माबोवरच्या काही धाग्यांची नावं आहेत Light 1

१. परश्या आणि आर्चिचे प्रेम होते पण...
२. ... पण परश्या आणि आर्चिचे प्रेम होते
३. परश्या आणि आर्चिचे पण प्रेम होते
४. परश्या आणि आर्चिचे प्रेम पण होते

घ्या बसल्या बसल्या ४ कथा लिहिल्या. Happy

सहाच हवेत? पाच नाही चालणार का?
पाचच हवेत? चार का नको?
तीन अजुन छान ना?
दोन का नाही?
का नाही?
का?

शेवटच्या ओळीवर माझा कॉपीराईट © टग्या

हर्पेन, तुझ्या वाक्यात अजून एक शब्द वाढव. तू पण कथालेखक होशील मग Happy

उभ्या उभ्या कथालेखन? ह्म्म्म, चांगला वाटतोय कथाप्रकार. Happy

Pages