गाजराचं रसरशीत लोणचं

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 26 December, 2012 - 04:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

DSC01985-002.JPG

मस्त लाल गाजरं - ५-६
लसूण पाकळ्या ५-६
मीठ चवीप्रमाणे
गूळ - चवीप्रमाणे
लिंबाचा रस - चवीप्रमाणे
केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून
फोडणीसाठी तेल - चांगलं वाटीभर Happy
मोहरी
हिंग

क्रमवार पाककृती: 

१. गाजरं अगदी बारीक चिरुन घ्यायची. हे सगळ्यात महत्वाचं ! गाजरं जितकी बारीक आणि एकसारखी चिरल्या जातील तितकं लोणचं छान लागतं आणि दिसतं.

२. लसूण पाकळ्या सुद्धा बारीक चिरुन घ्या.

३. त्यात मीठ, लिंबाचा रस, गूळ आणि लोणच्याचा मसाला घालून मस्तपैकी मिसळायचं.

४. फोडणी तयार करुन त्यात मोहरी आणि हिंग घालून ते तेल गरमच ह्या मिश्रणावर घालायचं आणि मिसळायचं.

एकदम रसरशीत गाजराचं लोणचं तय्यार Happy

वाढणी/प्रमाण: 
लोणच्यासारखं खाल्लं तर १०-१५ जण (पण ते तसं खाता येत नाही ;) )
अधिक टिपा: 

फोडणी घालायच्या आधी सगळं मिश्रण चमच्याने नाही तर हाताने कालवायचं. म्हणजे मस्त छान पाणी सुटतं आणि सगळा मसाला व्यवस्थित लागतो.
ह्यात जर पातीचा लसूण मिळाला तर बेस्ट.
आपली नेहेमीची गाजरं मिळाली तर उत्तम पण केशरी गाजराचं लोणचं सुद्धा झकास लागतं.
गाजरं चिरायच्या ऐवजी किसायची मात्र नाही....मज्जा येत नाही !! थोडी मेहेनत करुन बारीक चिरुनच करायचं लोणचं Happy
माझ्या आईची ही रेसिपी. एकदम सोप्पी आणि हमखास सुपर डुपर हिट होणारी आहे.
अरे..पण फोटू कसा टाकायचा इथे ??

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.... .....

यम्मी वाटतय. करके देखा जायेगा Happy

गेल्या वर्षी मी एका काकुंच्या घरी असं फ्लॉवरचं लोणचं खाल्लेलं प्रोसिजर सेम फक्त फ्लॉवर किसून घातलेला त्यांनी.

एक्दम तोंपासु Happy
ताई जरा विपु पहा Happy

गाजरं घरी आहेत, जमलं तर आजच करेन >> नशीब घरी आहेत.. नाहीतर सॅलड म्हणुन आणली असती तर ऑफिसमधेच केले असते Wink

वर्षा...........धन्यु गं......आता फोटू टाकता आला Happy

जयवी, एकदम खासच आहे हे लोणचे. ह्या पध्दतीने सध्या इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये मिळणार्‍या ताज्या हळदीचे केले तर टिकेल का?

मनापासून धन्यवाद लोक्स Happy

सामी...... मधला भागही टाकला तरी चालेल.....सगळं छान लागतं Wink

दीपा हे लोणचं फार टिकत नाही. फ्रिज मधे ठेवावं लागतं. पण खरं तर असं ठेवायची वेळंच येत नाही.....त्या आधीच संपतं Happy हळदीचं टिकेल असं वाटतं.

Happy

अरे वा..... Happy

सही दिसतय लोणचं. आजच करणार. धन्यवाद जयश्री.
मागे श्यामलीनेही एक पाकृ टाकली होती तिची आठवण आली. फक्त त्यात लोणच्याचा मसाला नव्हता.

Pages