गाजराचं रसरशीत लोणचं

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 26 December, 2012 - 04:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

DSC01985-002.JPG

मस्त लाल गाजरं - ५-६
लसूण पाकळ्या ५-६
मीठ चवीप्रमाणे
गूळ - चवीप्रमाणे
लिंबाचा रस - चवीप्रमाणे
केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून
फोडणीसाठी तेल - चांगलं वाटीभर Happy
मोहरी
हिंग

क्रमवार पाककृती: 

१. गाजरं अगदी बारीक चिरुन घ्यायची. हे सगळ्यात महत्वाचं ! गाजरं जितकी बारीक आणि एकसारखी चिरल्या जातील तितकं लोणचं छान लागतं आणि दिसतं.

२. लसूण पाकळ्या सुद्धा बारीक चिरुन घ्या.

३. त्यात मीठ, लिंबाचा रस, गूळ आणि लोणच्याचा मसाला घालून मस्तपैकी मिसळायचं.

४. फोडणी तयार करुन त्यात मोहरी आणि हिंग घालून ते तेल गरमच ह्या मिश्रणावर घालायचं आणि मिसळायचं.

एकदम रसरशीत गाजराचं लोणचं तय्यार Happy

वाढणी/प्रमाण: 
लोणच्यासारखं खाल्लं तर १०-१५ जण (पण ते तसं खाता येत नाही ;) )
अधिक टिपा: 

फोडणी घालायच्या आधी सगळं मिश्रण चमच्याने नाही तर हाताने कालवायचं. म्हणजे मस्त छान पाणी सुटतं आणि सगळा मसाला व्यवस्थित लागतो.
ह्यात जर पातीचा लसूण मिळाला तर बेस्ट.
आपली नेहेमीची गाजरं मिळाली तर उत्तम पण केशरी गाजराचं लोणचं सुद्धा झकास लागतं.
गाजरं चिरायच्या ऐवजी किसायची मात्र नाही....मज्जा येत नाही !! थोडी मेहेनत करुन बारीक चिरुनच करायचं लोणचं Happy
माझ्या आईची ही रेसिपी. एकदम सोप्पी आणि हमखास सुपर डुपर हिट होणारी आहे.
अरे..पण फोटू कसा टाकायचा इथे ??

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यु Happy
रामी लसूण कच्चाच टाक. फोडणीत नको. मिळाला तर पातीचा लसूण घाल....मग आणखी छान लागतं आणि दिसतंही Happy

Happy

जयवी:
मी कधी कुठल्याही प्रकरचं लोणचं घालेन ( घालण्याइत्पत) सुगरण होईन ) अस वाटलं नव्हतं..
ही सोपी रेसिपी बघून , घातलं...मस्त झालय..
धन्यवाद.

दुसरी बॅच संपत आलेय. एकदम हिट्ट झालय हे लोणचं. आता तिसर्‍या बॅचला पातीचा लसूण घालून बघेन. ह्यावेळी मी एका आवळ्याचे बारिक तुकडे पण घातले होते. तसही छानच लागतय.

मी पहिल्यावेळी २ मोठ्या गाजरांचं लोणचं केलेलं - जेमतेम ४-५ दिवस पुरलं. विकांत टू विकांत ताज लोणचं ते ही झटपट म्हणून लगेच दुसरी बॅच पण झाली. आता ते ही संपत आलय.

झालं, एकदम मस्त आणि रसरशीत!!

आता झालंय करून आणि अगदी फोटोतल्यासारखं दिसतंय त्यामुळे सांगायला हरकत नाही.. माझ्या सुगरणपणाबद्दल फाजिल विश्वास असल्यामुळे मी पहिल्यांदा हे केलं तेव्हा गूळच घालायला विसरले Proud मग वाट बघत बसले की फोडणी घातल्यावर रस सुटेल वगैरे. छे! काऽऽही नाही! मग लिंबू पिळलं, तरी ढिम्म! तोवरही आपलं काही चुकलं असेल वगैरे शक्यता लक्षातच नाही!! मग पार दुसर्‍या दिवशी ट्यूब पेटली. अर्थात, तेही मस्तच लागतं. पण ते 'रसरशीत' नाही होत, नुसतंच लोणचं ते!! काल न विसरता गूळ घातला आणि त्याला रस सुटायला लागला तेव्हा जीव भांड्यात पडला! Happy

Happy सुगरणपणाबद्दल फाजिल आत्मविश्वास............प्लीज पूनम..... कोणाला खरंच वाटेल Wink

गाजराचं लोन्चं कसं काय होऊ शकतं बॉ. म्हणजे असू शकतं हेच मला अजून झेपलेलं नाही. आम्ही खेड्यातले लोक लोन्च म्हणलं की कैर्‍याचं लोन्चं, मिर्च्याचं लोन्च, इथपर्यंतच आमची मजल.

पण, हेबी करुन पाहू. हाय काय आन नाय काय. Happy

-दिलीप बिरुटे

प्रोफेसर.......... अहो आहात कुठं...... आजकाल चिकन च्या लोणच्यापासून सुरवात होते Wink

Pages