कुलदैवत

Submitted by नंदिनी on 24 February, 2012 - 02:29

प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न मुंज अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.

इथे कृपया तुमच्या घराण्याच्या कुलदैवतेविषयी लिहा. शक्य झाल्यास त्या ठिकाणी कसे जायचे याबद्दल देखील लिहा.

लिहिताना कृपया तुमचे आडनाव्-मूळ गाव तसेच कुलदैवताचे ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती लिहा. ज्या लोकाना स्वतःचे कुलदैवत माहित नाही, अथवा नक्की कुठे आहे ते माहित नाही, अश्या लोकाना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.
(इथे वादविवाद अथवा श्रद्धा-अंधश्रद्धा यांची चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद)

http://maps.google.com/maps/ms?ie=UTF&msa=0&msid=203739402596125295695.0...

हा आस्चिगने बनवलेला दुवा आहे. इथे लोक आपापली कुलदैवते नोंदवू शकतात
नोंद करतांना
(१) नकाशात जागा शोधावी
(२) EDIT वर ई-टिचकी मारावी
(२) नकाशात वर डावीकडे दिसणार्‍या तीन चिन्हांपैकी मधले (पाण्याच्या थेंबासारखे दिसणारे) निवडावे
(४) योग्यजागी ते चिकटवावे (निश्चीत जागा माहीत नसल्यास शक्य तितके जवळ चिकटवावे - नंतर बदलणे शक्य आहे)
(५) Title मधे जागेचे नाव लिहावे
(६) Description मधे कुलदैवताचे नाव आणि कंसात आडनाव लिहावे
(७) OK वर ई-टिचकी मारावी
(धन्यवाद आस्चिग)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे प्रवासाच्या आनुवांशिक आळशीपणाचे जस्टीफिकेशन असावे>>>> Lol
आमच्या घरी गणपती नसतात. त्याचहि कारण असच काहितरी असेल मग. Happy

आमच्याकडे गौरी नसतात (वाघाने पळवल्या असे सांगतात Happy ). पण एक मला लागलेली तर्कसंगती म्हणजे आमची देवी कुमारिका आहे. आणि गौरी हा देवीला माहेरी आणण्याचा सण. मग जिचे लग्नच झालेले नाहीये तिला कसे आणायचे माहेरी? हे कारण असू शकेल.

पण एक मला लागलेली तर्कसंगती म्हणजे आमची देवी कुमारिका आहे. आणि गौरी हा देवीला माहेरी आणण्याचा सण. मग जिचे लग्नच झालेले नाहीये तिला कसे आणायचे माहेरी? हे कारण असू शकेल.>>> मी वाचलं होतं की माहेरवाशिणी घरी येत असताना जंगलामधे वाघाने (किंवा हिंस्त्र पशूनी) मारल्या त्यामुळे त्यांच्या घरी गौरी आणत नाहीत अशी पद्धत आहे.

आगावा, माझ्या माहेरी तुळजाभवानीला नवरा बायकोनी एकत्र जायचे नाही अशी पद्धत आहे. Happy त्यामुळे माझी आज्जी आजोबांवर वैतागली की म्हणायची "मी जरा तुळजापूरला जाऊन ओटी भरून येते तेव्हढाच आठ दिवस मला निवांतपणा."

लोकहो. नकाशामधे स्थान देखील मार्क करा प्लीज. भावी संशोधक आपणा सर्वाना दुवा देतील.

निंबुडा माझी पण कुलदेवता माहूरची रेणुका देवी आहे. कुलदैवत मैलारचा खंडोबा आणि पाहुणी तुळजापुरची देवी. माझ्या माहेरचे कुलदैवत निरा नरसिंपुरचा नरसिंह आणि तुळजापुरची देवी. त्याशिवाय पाहुणी येरमाळ्याची येडाई किंवा येडेश्वरी. तिच्याबद्दल असे सांगितले जाते की जर तिच्या दर्शनाला गेले तर दर तीन वर्षाला जावेच लागते. तिच नावच येडाई. अशा समजुतीनेच माझ्या माहेरचे कुणितरी जाऊन आल्यावर नेहमी जाण्याचा परिपाठ पडला. येरमाळा हे गाव उस्मानाबादहून ४५ कि. मी. अंतरावर आहे, बारशीहूनही जाता येते.

माझे माहेरचे आडनाव जोशी आहे. सासरचे कुलकर्णी.

मी वाचलं होतं की माहेरवाशिणी घरी येत असताना जंगलामधे वाघाने (किंवा हिंस्त्र पशूनी) मारल्या त्यामुळे त्यांच्या घरी गौरी आणत नाहीत अशी पद्धत आहे. >> असे आहे का?

माझे माहेरचे देव नृसिन्हलक्ष्मी आणि आंबेजोगाई
पण सिंधी लोकाना कुठे आहे कुलदैवत, मग त्यांचं दैवत कोण? माझ्या माहिती प्रमाणे झुलेलाल हाच त्यांचा देव आहे, कोणाला अजून काही माहिती आहे का?

पुण्याजवळ वाडे बोल्हाई हे माहुरच्या रेणुका देविचे ठाणे आहे का?कोणाला माहीत असल्यास सांगावे...

माहेरची - गुहागरची दुर्गा देवी (आडनावः गोविलकर, मुळ गाव कुलवृत्तांतात बघाव लागेल. गोविल गावी पुर्वज स्थायिक झाले आणि मग आडनाव गोविलकर लागलं असं काहीसं आठवतय आत्याकडून ऐकलेल)

सासरची आडीवरेची कालिका देवी आणि कनकादित्य (आडनावः नवरे, गाव आडीवरे - राजापुर जवळ)

कात्रे

कुलदैवत-श्री भवानी-शंकर
निरूळ [पावस-रत्नागिरी]

कुलदेवता –श्री आर्यादुर्गा
अंकोला-कारवार

आकेरकर
आकेरी - सावंतवाडी
कुलदैवत - श्री शांतादुर्गा - कवळे - फोंडा - गोवा
श्री मंगेश - प्रियोळ - गोवा

दर्शनाला जाताना मात्र आधी शांतादुर्गेचं दर्शन घेउन मगच मंगेशाचं दर्शन घ्यायची प्रथा आहे. कारण माहीत नाही.

या सन्दर्भात वाचा महाराश्ट्राचे लोकदैवत खन्डोबा - लेखक डॉ. रा चि. ढेरे.

आमचे मूळ नांव क्षीरसागर, गांव रूई ता. कोरेगांव जिल्हा सातारा. पाच पिढ्यांपूर्वी पिंपळ्खुंटे ,ता. माढा,जि.सोलापूर येथे स्थानांतर.
देशस्थ रूग्वेदी , कुलदैवते औंधची श्री यमाई व पालीचा खंडोबा.
ही अर्थात वडिलांनी सांगितलेली माहिती.काही वडिलधारी माणसे नीरा नरसिंहपूरचे लक्ष्मिनरसिंह हे कुलदैवत असे सांगतात.
या विशयी जास्त माहिती करून घेण्यासाठी हा प्रपंच.
जर कोणास अधिक माहिती (रूई अथवा कुलदैवतांबद्दल) असल्यास कळवावे.

>>पुण्याजवळ वाडे बोल्हाई हे माहुरच्या रेणुका देविचे ठाणे आहे का?कोणाला माहीत असल्यास सांगावे...
नाही, सिद्धटेक जवळ राशिन नावाच्या गावी आहे रेणुका देवीचे ठाणे.

आडनावः पवार (धार-पवार)
गोत्रः भारद्वाज
गावः उपाळे (मायणी), कडेगावजवळ, कराड.
कुलदेवः श्री सिद्धनाथ - जावली. (फलटणहून शिखर शिन्गणापूरकडे जाण्याच्या मार्गावर)

आमची कुलदेवी माहीत नाही. पणजीच्या सान्गण्याप्रमाणे, ते आणि आमच्या भावकीतील ४-५ कुटुम्बे कराडहून उपाळे येथे स्थलान्तरीत झाली.

कुणी जाणकार कुलदेवी कोण हे सान्गु शकेल का?

माझे सासरचे आड्नाव सोमण (शांडिल्य गोत्र)आहे, आमचे कुळदेवत कुढ्ले आहे कुणाला माहीत असल्यास प्लिज कळवा.

माझे सासरचे आड्नाव सोमण (शांडिल्य गोत्र)आहे, आमचे कुळदेवत कुढ्ले आहे कुणाला माहीत असल्यास प्लिज कळवा.

मी गौरी, तुमचे मूळ गाव कुठले आहे? रत्नागिरी जिल्ह्यामधे की मूळ रत्नागिरी गाव? आमच्या गावामधे एक विलणकर आहेत. त्यांच्याकडून मी माहिती मिळवायचा प्रयत्न करू शकेन.

वंदना, कोकणस्थांचे एक कुलवृत्तांत म्हणून असते त्यामधे आपल्याला माहिती मिळू शकेल. (मी माझ्या सासरेबुवांना विचारीन तरीदेखील)

MI RITESH CHAUGULE
MAZE GAV : DEVDAG(MITHBAV-SIDHUDURGA)
CAST: HINDU BHANDARI
PLZ M LA KULDEVTA MAHIT NAHI AAHE KONI SANGU SHAKEL KA.....................

REG
RITESH

आडनाव : महाडीक
गाव : सातारा
जात : हिन्दु मराठा
कुलस्वामिनि माहित असल्यास लिहा.

आडनाव : महाडीक
गाव : सातारा
जात : हिन्दु मराठा
कुलस्वामिनि माहित असल्यास लिहा.

Pages