कुलदैवत

Submitted by नंदिनी on 24 February, 2012 - 02:29

प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न मुंज अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.

इथे कृपया तुमच्या घराण्याच्या कुलदैवतेविषयी लिहा. शक्य झाल्यास त्या ठिकाणी कसे जायचे याबद्दल देखील लिहा.

लिहिताना कृपया तुमचे आडनाव्-मूळ गाव तसेच कुलदैवताचे ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती लिहा. ज्या लोकाना स्वतःचे कुलदैवत माहित नाही, अथवा नक्की कुठे आहे ते माहित नाही, अश्या लोकाना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.
(इथे वादविवाद अथवा श्रद्धा-अंधश्रद्धा यांची चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद)

http://maps.google.com/maps/ms?ie=UTF&msa=0&msid=203739402596125295695.0...

हा आस्चिगने बनवलेला दुवा आहे. इथे लोक आपापली कुलदैवते नोंदवू शकतात
नोंद करतांना
(१) नकाशात जागा शोधावी
(२) EDIT वर ई-टिचकी मारावी
(२) नकाशात वर डावीकडे दिसणार्‍या तीन चिन्हांपैकी मधले (पाण्याच्या थेंबासारखे दिसणारे) निवडावे
(४) योग्यजागी ते चिकटवावे (निश्चीत जागा माहीत नसल्यास शक्य तितके जवळ चिकटवावे - नंतर बदलणे शक्य आहे)
(५) Title मधे जागेचे नाव लिहावे
(६) Description मधे कुलदैवताचे नाव आणि कंसात आडनाव लिहावे
(७) OK वर ई-टिचकी मारावी
(धन्यवाद आस्चिग)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहेरचं कुलदैवत : जेजुरीचा खंडोबा. कुलस्वामिनी : वनीची सप्तशृंगी माता.

सासरचं कुलदैवत पण खंडोबाच. Happy
माहेरचं आडनाव तांबोळी. मुंबई नाशिक हाय वे वर असलेलं पडघा हे मुळ गाव. सासरचं पनवेलकर. मुळ गाव अर्थातच पनवेल Happy

जेजुरीला जाण्याबद्दल बहुतेक सर्वांना माहित असावं. वनी हे शिर्डी च्या जवळपास आहे. नीट माहिती कुणाला हवी असेल तर नक्की कुठे ते चौकशी करून सांगेन. Happy

विवाहानंतर प्रथमच तिथे जाणार्‍या नवविवाहित जोडप्यांपैकी पतीने नववधूला उचलून घेऊन किमान पाच पायर्‍या चढाव्या लागतात. जेजुरीच्या मंदिराला ३५० पायर्‍या आहेत. मध्ये मध्ये दगडी कमानीपण आहेत. गडावर्चे काही फोटो येथे माहितीसाठी देत आहे.

183840_210682842315829_100001223432308_627028_580025_n.jpg

आम्ही येळकोट करताना
217448_210681508982629_100001223432308_627026_6860966_n.jpg

या धुनीमध्ये भाविक वाटीभर तेल घालतात. श्रद्धेचा भाग आहे तो Happy

252191_210676245649822_100001223432308_627009_685546_n.jpg

भटजीने खोबरं+ भंडारा हवेत उडवळ्यावर आम्ही सगळे वेचायला धावलो. Happy
223657_210680388982741_100001223432308_627023_7020337_n.jpg

माझ्या माहिती प्रमाणे कुलदेवी आणि कुलदेव असतात.
माहेरचे आडनाव पेठे : कुलदेवी : दुर्गादेवी , गुहागर
कुलदेवः व्याडेश्वर, गुहागर

सासरचे आडनाव मराठे: कुलदेवी : योगेश्वरी , अम्बेजोगाई
कुलदेवः व्याडेश्वर, गुहागर

>>विवाहानंतर प्रथमच तिथे जाणार्‍या नवविवाहित जोडप्यांपैकी पतीने नववधूला उचलून घेऊन किमान पाच पायर्‍या चढाव्या लागतात.
खालच्या लिस्टमधे असा फोटो आहे की काय अस वाटतं होतं. Happy

किती गोड जोडी आहे टोकू. Happy
माहेरचे घाटे कुलदैवत तिरुपती बालाजी.
सासरचे खाडिलकर : कुलदैवत ओरोसची देव/ देवी. अजून माहिती हवी आहे. आंबोळीच्या रस्त्यात ओरोस आहे असे ऐकले आहे.

मॅपिन्ग चे काम एकदम जबरी.

माझे आधनाव परब आहे.मुल गाव मालवन तालुक्यातील चुनवरे. पन पुर्वजानी नविन गाव वसवले (मालवन तालुका-मासुरे जवल वेरली गाव).गवात सातेरी देवीचे मन्दीर आहे.तीची पूजा केलि जाते पन मूल कुल्दैवत आनि कुलदेव्ता महित नाही.कोनाला माहित असेल तर क्रूपा करुन सान्गा.

आस्चिग, एकदम जबरदस्त काम. Happy लोकानो, आता तिथे मार्किंग जरूर करा. मला जी स्थळे माहित आहेत ती मी मार्क करत आहे.

माहेरचे आडनावः सकळकळे
कुलदेवता: माहूरची रेणुकादेवी (विदर्भ)
(ही देवी कुलदेवता असल्याचा एकही प्रतिसाद इथे दिसला नाही.)

सासरचे आडनावः मोडक
कुलदेवता: आंबेजोगाई (मराठवाडा)
कुलदैवतः कोळेश्वर (कोकणात आहे)

आंबोळीच्या रस्त्यात ओरोस आहे असे ऐकले आहे.

कणकवली ते सावंतवाडी या महामार्गावर ओरस लागते.. ( ओरस म्हणजे सिंधुदुर्गनगरी) आंबोलीवरुनही मार्ग असेल एखादा.

माहेरचे कुलदैवत: शिखर शिंगणापुरचा महादेव. हे देवस्थान सातारच्या छत्रपतींचे खाजगी देवस्थान आहे. जिर्णोधाराच्या खर्च वै गोष्टीत ते आपला वाटा उचलतात. मुख्य मंदिर एका डोंगरावर आहे व त्याच्या थोडं खालच्या बाजुला गुप्तलिंग मंदिर आहे. त्या मंदिरात असलेली पिंड जमिनीखाली आहे व तिथे सतत पाणी असणारा झरा आहे.बाजुलाच असलेल्या छोट्या खड्ड्यात हात घालुन पिंडीला स्पर्श करता येतो.
या मंदिरात शिवाजी महाराजांनी संभाजीमहाराजांचे शुदधीकरण करुन घेतले होते असे ऐकले आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे.. आधी बरीच शिल्पे दिसायची पण आता नुतनीकरणाच्या नावावर शिखराला रंग दिला आहे. Sad
नेटवर शोधल्यावर ही साइट सापडली..इथे थोडी इतर माहीती व आख्यायिका आहेत. http://www.shikharshingnapur.com/index.php
कुलदेवी: माहीत नाही.

सासरी खोचीचा भैरवनाथ. वारणेच्या काठावर भैरवनाथ व त्याची पत्नी जोगेश्वरीचे मंदिर आहे. मंदिर २००-२५० वर्षे जुने असेल.. पण अतिशय शांत जागा आहे.
कुलदेवी: तुळजाभवानी.

आमचि कुल्देव रनगिरितिल भैरि भवनि आहे.
कोक्नत भैरि हे काल भैरवचे सन्शिप्त नाव आहे.
या बरोबर देविला भवनि.जोगेश्वरि , योगेश्वरि, ललिता, या नावाने ओल्खतात.
प्रमुख मन्दिरे या प्रमने
मुरुद (अलिबौग) , हरिहरेश्वर , चिप्लुन, वेल्नेश्वर , रत्नगिरि , लन्जा , सन्गमेश्वर , हतिस, कन्कवलि ,, खरेपतन.
रत्नगिरि याजिल्ल्हुयत बहुतेक सर्व गावात भैरि भवनि चे मन्दिर आहेत.
या सर्व मन्दिरत लन्ज जव्लिल मन्दिरात जे दाभोल रस्तयवर आहे . मान्दिरात कल्भैरव अनि भवनि पिन्दि स्वरुपत आहेत. हे मुल स्थान असवे असे गुरवचे मत आहे.
मला ही सर्व मन्दिरे बचायचि आहेत.
कुनल भैरि भवनि मन्दिरबद्दल अजुम महैति अअस्यास क्रुपया कल्ववि.

जेजुरीच्या मंदिरासमोर भला मोठा कासव आहे जमिनीवर, त्यावर लोक भंडारखोबरे उडवतात, लहान मुले तो गोळा करतात. कुणी कासवावर आडवे झोपून खंडोबास साष्टांग नमस्कार घालतात. Happy

सासरच आडनाव : केसरकर
गाव : केसरी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
कुलदैवत : करलाई देवी
माझ्या सासरच्या देवीच अगदी छोटस देउळ आहे देवराइतच. गाव केसरी आंबोलीच्या कुशीत. आधी तर रस्ता पण नव्हता. आता काम चालु आहे. जर नवीन आंबोली घाट झाला तर मंदिराच्या बाजुनेच होइल. ह्या मंदिराकडे पाण्याचा स्त्रोत आहे ज्या पाण्याने पुर्वीच्या काळात सावंतवाडी गावाला पणीपुरवठ्याची सोय होती.

वडलांचे आडनाव : गावडे
गाव : चौकुळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
कुलदैवत : सातेरी देवी.

आजोळचे आडनाव : देसाई
मूळ गाव : गोळवण
कुलदैवत : लक्ष्मीनारायण, वालावल
देवी : माउली, वालावल

कुनल भैरि भवनि मन्दिरबद्दल अजुम महैति अअस्यास क्रुपया कल्ववि.
<<< अभिमित, रत्नागिरी गावामधील भैरीबुवाच्या देवळात अनेकदा गेलेली आहे, तिथे गेल्यास तुम्हाला भैरीच्या इतर देवळांबद्दल माहिती मिळेल.

रच्याकने, लोकहो, शिमगा जवळ आला. गावाकडच्या जत्रा चालू झाल्या का?

आडनाव - कुलकर्णी
कुलदेवता - अलाई मलाई सुलाई - धुळे अमळनेरच्या जवळ निम बोहरे म्हणून गाव आहे त्या गावात.. (असे म्हणतात की ह्या ठिकाणी तुळजाभवानी, अंबाबाई आणि रेणुकामाता एकत्रच आहेत)

सध्या तिकडे धरणाचे काम चालू आहे त्यामुळे जिथे देऊळ आहे ते पाणलोट क्षेत्राखाली येणार आहे.. त्यामुळे देवीची स्थापना दुसरीकडे जागा शोधून करायचे काम आहे. सरकारच सगळे करुन देणार आहे .. पण अजून कोणाची ही कुलदेवता आहे ते माहिती नाही.. त्यांना शोधायचे काम पण अवघड आहे. तरी प्रयत्न चालू आहेत..

शुभांगी तुझ्या पोस्ट मध्ये सुलाई देवीचा उल्लेख आहे ते कुठे आहे..

कोणाला कही माहिती असल्यास नक्की लिहा....

आजोळ- तगारे, कुलदैवत- बदामी बनशंकरी.
माहेर- पिटके, कुलदैवत- सातार्‍याजवळिल औंध ची यमाईदेवी.
सासर- कुलकर्णी, कुलदैवत- पंढरपूर चा विठुराया, माहुरची देवी.

माहेर: देशपांडे (तडवळकर) - नीरा नरसिंहपूर: लक्ष्मी-नृसिंह, देवी: येडाई
सासर: देव(आडनाव)- नीरा नरसिंहपूर: लक्ष्मी-नृसिंह, देवी: कोणालाही कल्पना नाही.

आंबेजोगाई संदर्भाने - आम्ही चित्पावन आणि चित्पावनिझम या दोन पुस्तकातून वाचलेली माहिती अशी -
परशुरामाने १४ प्रेते जिवंत केली/ परशु देशातले १४ ब्राह्मण कोकणाच्या किनार्‍याला लागले ते कोकणस्थांचे मूळ मानले जातात आणि म्हणून कोकणस्थांची १४ गोत्रे आहेत.
या १४ ब्राह्मणांचे विवाह ज्या कन्यांशी झाले त्या सगळ्यांची कुलदेवता आंबेजोगाई होती. त्यामुळे आंबेजोगाई हे कोकणस्थांचे दैवत बनले. कोकणात नसूनही.
पेशव्यांच्या मागोमाग देशावर गेलेल्या कोकणस्थांशी या गोष्टीचा संबंध नाही. Happy

असो माहेरची दैवते
अतुलनीय यांच्याप्रमाणेच Proud
>>> आमचे कुलदैवत - गुहागरचा व्याडेश्वर व कुलदेवता - चिपळूणची करंजेश्वरी, गोवळकोट (आडनाव - पटवर्धन) <<<
आणि गाव कुठलं लिहायचं रे आपलं अतुलनीय? सांगलीच ना?

आजोळची कुलदेवता आंबेजोगाई आहे. आडनाव - वर्तक. गाव - केळशी.

सासरची कुलदेवता - तुळजापूरची भवानीमाता. कुलदैवत मलाच नक्की माहित नाही Happy परत कोकणातलेच (ता.गुहागर, जि. रत्नागिरी) असल्याने जुगाई-सोमजाई आहेतच. (आडनाव - सावंत)

वरती कुणीतरी चिपळूणच्या विंध्यवासिनी बद्दल लिहिलंय. रावतळ्याच्या या देवीचे पुजारी साठे हे माझ्या आईचं आजोळ. सध्या तिथे जे संतोष साठे आहेत तो मामा लागतो माझा.

माहेरचे कुलदैवत-- वाघेश्वरी
माहेरचे आडनाव---कुवर

सासरचे कुलदैवत--जेजुरीचे खंडोबा कुलदैवता---- तुळजापुरची भवानीमाता
सासरचे आडनाव--- सुर्यवंशी

छान धागा आहे. आज पर्यंत एक वाचक होतो. आता लिहत आहे.

माझे गाव भालावली, ता. राजापुर, जि. रत्नागिरी.
कुलदैवतः नवदुर्गा

आमचे मूळ गावः गावखडी, ता. राजापुर, जि. रत्नागिरी (पुर्णगड जवळ)
कुलदैवतः जुगाई आणि रामेश्वर (दोन्ही देवळे गावखडीतच आहेत)

पुर्वज काही कारणास्तव गावखडीतून भालावलीत सेटल झाले. आता आम्ही ३ ही देवांना कुलदैवत मानतो.

कोकणात अनेक गावात जुगाई चे मंदिर असते. जुगाई म्हणजेच जोगाई, योगाई, योगेश्वरी. हे कदचित अंबाजोगाईचे रुप असावे.

श्री नवदुर्गा देवीची देवदिवाळी व मार्गशीष कृ. ८ ला यात्रा असते. देवदिवाळीला नवदुर्गा देवीची लहान बहीण जाखादेवी तिला भेटण्यास येते तर मार्गशीष कृ. ८ ला नवदुर्गादेवी बहीण आर्यादुर्गा (देविहसोळ, ता. राजापुर) हिस भेटण्यास जाते.
ही मोठी यात्रा असते. (नंतर सविस्तर लिहीन)

नवदुर्गा आणि आर्यादुर्गा यांचा इतिहास पाहता ही देवस्थाने सारस्वत समाजाने वसवली आहेत. मुळची नवदुर्गा मडकई, गोवा आणि आर्यादुर्गा अंकोले, गोवा येथील आहेत. बहुतेक पोर्तुगीजांच्या जाचामुळे स्थलांतरित झालेल्या भक्तांनी ही श्रद्धास्थाने आपल्यासोबत आणली असावीत.

छान धागा आहे Happy (फक्त तो आशिक्ग "कुलदैवत" वगैरेचा विचार करतोय हे बघुन धक्का बसला Wink )
आमचे कुलदैवत तुरवडे येथिल केशवलक्ष्मी
कुलःस्वामिनी आंबेजोगाईची "जोगेश्वरी (वा योगेश्वरी)"
ग्रामदैवत दुर्गादेवी अन अर्थातच भैरोबा (बहिरी)
(कुलदैवत अन ग्रामदैवत यांचे स्मरण नित्यपुजेच्या संकल्पाचे आधी केले जावे, त्याचबरोबर, स्थानदेवता, वास्तुदेवता, मातापिता, देवब्राह्मण यान्चेही स्मरण करुन प्रणाम करावा... जर असे नेहेमीच केले जात असेल, तर व्यक्ति नक्कीच "नम्र" व विना अहंकारी बनत जाते असो.)

माझे पणजोबा, नीरजाने वर लिहिलेल्या विन्ध्यवासिनी देविचे खूप पूर्विचे पुजारी होते. (आईला माहिती विचारुन घेऊन लिहून ठेवले पाहिजे - असे मी दरवेळेस हा विषय निघाला की म्हणतो) त्याकाळी तिथे देवीचा वाघ देवळाभोवती यायचा.

नीरजाने लिहीलेल्या केळशी या गावातील देवीच्या नवसाने माझ्या जन्मवेळची "अडचण" दूर झाली अशी आईची श्रद्धा होती/आहे, सबब माझीही आहे. तिचा तो नवस मी माझ्या वयाच्या तेहेतीसाव्व्या वर्षी पूर्ण केला.

उत्तम धागा!
आम्ही सलगरकर
मूळ गाव - सलगर, जि. सोलापूर ता.अक्कलकोट, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा
कुलदैवत- तिरुपती बालाजी (याच्या दर्शनास गेले तर ते लाभत नाही असा आमच्यात एक जुना प्रवाद आहे, हे प्रवासाच्या आनुवांशिक आळशीपणाचे जस्टीफिकेशन असावे!)
कुलदेवता- बदामीची बनशंकरी (ही माहिती आमच्या चुलत घराण्यांनी शोधली).
दोन्हीहीकडे जायचा योग आलेला नाही.

बायको- मेहेंदळे
मूळ गाव - हेंदळे (हे बहुतेक रत्नागिरी जिल्ह्यात आहे)
कुलदैवत- मालगुंडची मुसळादेवी (इथे मात्र गेलो आहे!!!)

@ वरदा, अश्चिग - लिनिएज ट्रेसिंग आणि कुलदेवता याचा मेळ लावता येऊ शकेल काय?

कुनि ' जागाइ जुगाइ धूत माय बाप " असे देवाला म्हन्नाताना ऐक्ल्यास सान्गावे.
आम्च्या घरि " कुल्धर्मा" च्या वेलि असे म्हन्नतत.

Pages