Submitted by स्वप्ना_राज on 14 December, 2012 - 04:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पालक, भात (शिळा असला तरी चालेल), हिरव्या मिरच्या, खायचा सोडा, काळं मीठ, तांदळाच पीठ, पाणी, तेल
क्रमवार पाककृती:
पालक उभा चिरा, जास्त बारीक नको. त्यात भात मिक्स करा (भातापेक्षा पालकाचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजे पकोडे कुरकुरीत होतील).
मग बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, खायचा सोडा, काळं मीठ, तांदळाच पीठ, पाणी घालून मिक्स करा.
चांगलं मळून छोटे गोळे करा. तेलात डीप फ्राय करा.
केचप वा चटणीबरोबर सर्व्ह करा.
माहितीचा स्रोत:
आम्ही सारे खवय्ये, झी टीव्ही मराठी, डिसेंबर २०१२ एपिसोड
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद मंजूडी! एव्हढी साधी
धन्यवाद मंजूडी! एव्हढी साधी गोष्ट माझ्या लक्षात आली नाही
पाककृती लेखनात
पाककृती लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
हापण छान प्रकार. मला यात
हापण छान प्रकार. मला यात शेंगदाणे पण आवडतील. कोकण रेल्वेत असा प्रकार मिळतो. त्यात मेथी असते.
स्वप्ना, थँक्स ! नविन
स्वप्ना, थँक्स ! नविन वर्षाच्या पार्टीसाठी एक स्नॅक मिळाला. अजुन काही आहे का? पनीरचा अगदी कंटाळा आला आहे. एक मश्रुमची हातखंडा रेसिपी आहे ती करणारच आहे, पण अजुनही काही हवं आहे. जरासं वेगळं.
मस्त आहेत. तोंपासु
मस्त आहेत. तोंपासु
तळण्याऐवजी (deep fry) काय
तळण्याऐवजी (deep fry) काय करता येईल?
कढईत तळण्याऐवजी अप्पे पात्रात
कढईत तळण्याऐवजी अप्पे पात्रात तळले तर ? आजच करून बघणार ! भात पण उरला आहे.