राइस पालक पकोडे (आंन्ध्रा स्टाईल)

Submitted by स्वप्ना_राज on 14 December, 2012 - 04:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालक, भात (शिळा असला तरी चालेल), हिरव्या मिरच्या, खायचा सोडा, काळं मीठ, तांदळाच पीठ, पाणी, तेल

क्रमवार पाककृती: 

पालक उभा चिरा, जास्त बारीक नको. त्यात भात मिक्स करा (भातापेक्षा पालकाचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजे पकोडे कुरकुरीत होतील).

मग बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, खायचा सोडा, काळं मीठ, तांदळाच पीठ, पाणी घालून मिक्स करा.

चांगलं मळून छोटे गोळे करा. तेलात डीप फ्राय करा.

केचप वा चटणीबरोबर सर्व्ह करा.

DSC0000303.jpg

माहितीचा स्रोत: 
आम्ही सारे खवय्ये, झी टीव्ही मराठी, डिसेंबर २०१२ एपिसोड
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हापण छान प्रकार. मला यात शेंगदाणे पण आवडतील. कोकण रेल्वेत असा प्रकार मिळतो. त्यात मेथी असते.

स्वप्ना, थँक्स ! नविन वर्षाच्या पार्टीसाठी एक स्नॅक मिळाला. अजुन काही आहे का? Happy पनीरचा अगदी कंटाळा आला आहे. एक मश्रुमची हातखंडा रेसिपी आहे ती करणारच आहे, पण अजुनही काही हवं आहे. जरासं वेगळं. Happy