दाल-बाफले ,रविवारचा "स्पेशल"मेनू

Submitted by सुलेखा on 16 December, 2012 - 10:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

हिंवाळ्याची चाहुल लागताच "दाल-बाफल्या"ची आठवण येते..आणि हा मेनू केला जातो..बाटी थोडी कडक म्हणुन बाफले जास्त आवडतात..बाफले भाजायला स्पेशल बाटी ओव्हन/तंदूर असल्याने भाजणे सोप्पे व्ह्यायचे..आता मावे.वापरायला लागल्यापासुन त्यात भाजायला सुरवात केली..चुकत-माकत आता त्याचे तंत्र छान जमले आहे..पहिल्यांदा केले तर खरपुस,गुलवट रंग आणण्याच्या नादात बाफले इतके जास्त भाजले गेले कि ओव्हन मधे भाजायचे तसा रंग तर आलाच नाही पण गरम बाफले बत्त्याने फोडावे लागले.आता कळले कि बाफल्याला तसा रंग येत नाही तरी तो आतुन भाजला जातो.तर अशी ही अनुभवलेली बाफले कथा..
बाफले चुरुन दाल बरोबर खातात तसेच बाफले चुरुन त्याबरोबर पिठीसाखर वरुन भरपूर तूपाची धार सोडुन खातात .त्यासोबत इतर पदार्थ म्हणजे बटाटा भाजी,हि. चटणी,कढी,पुलाव ही करतात..
DAL BATI--16---12----12 004.JPG
बाफले जाडसर कणकेचे करतात.जाडसर कणिक नसल्यास १ भाग जाड रवा व ३ भाग कणिक घ्यावी.
३ वाट्या बाफल्याची जाडसर कणिक,
२ टेबलस्पून तेल मोहनासाठी,
१/२ टी स्पून मीठ.
पाव टी स्पून खाण्याचा सोडा,
१/२ टी स्पून हळद,
१ टी स्पून साखर,
कणिक भिजवायला पाणी,
एक मोठे पातेले बाफले उकडण्यासाठी,
बाफले डुबतील इतके म्हणजे एक तांब्याभर पाणी,
१ टीस्पुन तेल,
तूप-तयार बाफल्यांसाठी

क्रमवार पाककृती: 

कणिक, मोहनाचे तेल व मीठ,खा.सोडा,हळद,साखर घालुन एकत्र करुन घ्यावे..लागेल तसे पाणी घालुन , पोळ्यांसाठी कणिक भिजवतो तशी भिजवुन व थोडी मळुन घ्यावी.फु.प्रो .वापरला तरी चालेल.
भिजवलेल्या कणकेचे लहान चपटे गोळे करुन प्रत्येक गोळ्याला मधे अंगठ्याने थोडा दाब देवुन खळगा तयार करुन घ्यावा.
गॅसवर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवावे.पाणी उकळले कि त्यात १ टी स्पून तेल टाकावे.आता त्यात बाफल्याचे चपटे गोळे सोडुन पातेल्यावर झाकण ठेवुन मध्यम आचेवर ७ ते ८ मिनिटे ठेवावे..
त्यानंतर झाकण उघडुन पहावे..सर्व गोळे पाण्यावर तरंगताना दिसतील..गोळे तरंगले कि शिजले आहेत असे समजायचे.
आता एका कापडावर हे गोळे झार्‍याने पाण्यातुन बाहेर काढुन थंड करायला ठेवावेत..या गोळ्यांवरील पाणी कापडावर टिपले जाईल..
मावे ला मावे+कन्वेक्शन मोड -६००* वर सेट करुन २ मिनिटे प्री-हीट करावा.
बेकिंग ट्रे ला तूपाचा हात फिरवुन त्यावर हे बाफल्याचे गोळे मांडुन मावेत ठेवावे.
DAL BATI--16---12----12 002.JPG
याच मोड वर २-२-२ मिनिटे बेक करावे.त्यानंतर गोळे उलटवुन पुन्हा ३-३ -३ मिनिटे बेक करावे.
आता तळहातावर कापड घेवुन त्यात प्रत्येक गोळा ठेवावा .बाफल्याच्या रुंदीच्या बाजुने दाबावा म्हणजे त्याला मधुन तड पडुन तो उघडेल त्याच्यामधली वाफ बाहेर निघेल..असे सर्व बाफले करुन घ्यावे व पुन्हा २ मिनिटे ठेवावे.
एका लहान पातेलीत तूप पातळ करुन घ्यावे.त्यात हा प्रत्येक बाफला डुबवुन काढावा.त्यातील फटींमधे चमच्याने तूप सोडावे व हे बाफले एका पसरट डब्यात ठेवावेत.
मस्त मऊसर बाफले तयार आहेत.
DAL BATI--16---12----12 001.JPG
असे हे भरलेले ताट समोर आले कि भूक जागृत होते..आस्वाद घेतला कि मस्त तृप्ति होते.

अधिक टिपा: 

बटाटे मावे.त भाजुन नेहमीच्या फोडणीत सुक्या लाल मिरच्या,बादयान/चक्री फूल ,मोठी वेलची,दालचिनी घातली .बटाट्यांच्या फोडी घालुन त्यावर तिखट,मीठ धणे-जिरे-बडीशोप -लवंग भरडुन घातली.परतलेल्या भाजीवर कसुरी मेथी हातावर चुरुन घातली.
मावेत बटाटे भाजुन घेतल्याची चव ही नेहमीच्या बटाटे उकडुन केलेल्या भाजीपेक्षा जास्त छान लागली..
दाल च्या फोडणीत तेल व एक चमचा तूप घेतले तसेच हिंग,हळद्,जिरे-मोहोरी,मेथीदाणा व खडा मसाला,टोमॅटो ,आमसुले,लाल सुकी मिरची ,तिखट धनेजिरे पुड व मीठ घातले.

माहितीचा स्रोत: 
नेहमीचा पारंपारिक आणि काही स्व-प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, फार भारी ! सगळेच फोटो अत्यंत तोंपासु आहेत.
मी अवनमध्ये दालबाटी करते कधीतरी. त्या बाट्यांपेक्षा हे बाफले मऊसर असतील तर नक्की ह्याच पद्धतीने करुन बघणार पुढच्यावेळी Happy

नानबा, बाट्या पाण्यात न उकळता नुसत्या बेक करायच्या असतील तर मी ३५० फॅ. ला २० ते २५ मिनिटं ठेवते. मध्ये एकदा पलटायच्या. छान सोनेरी-तांबूस रंगावर भाजल्या जातात.
हे बाफले आतून शिजलेलेच आहेत त्यामुळे बहुतेक जास्त तापमानावर ( ४००-४२५ फॅ. ) ला कमी वेळ ठेवून फक्त वरुन तांबूस करुन घ्यावे लागतील नाहीतर कडक होतील.

अगो,फार जास्त टेम्प. ठेवले तर बाफल्याचा वरचा भाग टणक होईल व आतुन गिच्च. किंवा जर बाट्या असतील तर त्याही वरुन कडक आतुन कच्च्या राहतील्..बाफले करणे जास्त चांगले.एकतर पाण्यात शिजलेले असतात ,नंतर भाजले जातात्.थंड बाफले ही सहज कुसकरता येतात.गुळ्+तूपाबरोबर्ही छान लागतात..
नानबा,ओव्हन ला केक चेच टेम्प.३०० *ठेवावे टाइम १० मिनिटे ठेवुन मधुन एकदा पलटावे..साधारण १५ मिनिटात "इतके" बाफले भाजले जातात.प्रत्येक ओव्हन चे तापमान वेगवेगळे असते.त्यामुळे टाइम थोडाफार इकडेतिकडे होईल्.पण दर ५ मिनिटानी बाजु पलटावी.मी उसगावात असताना गॅस ओव्हन मधेच करत होते.

मस्तच! फार आवडता प्रकार आहे! बाफला/बाटी चुरुन मनसोक्त साजुक तुप ओतायचे आणि गुळ चिरुन्/कुस्करुन खायचा! आहाहा! करायलाच हवेत!

ते बाफले कसले टका टका माझ्याकडेच बघत आहेत असे वाटतयं.. Proud आणि ते बालुशाहीसारखे पण दिसत आहेत....

भूक लागली...

दाल बाटीचे दोन्तीन प्रयत्न असफल् रीत्याकेल्यावर मी आता त्या वाटेला जाणार नाही असं ठरवलं होतं.. निग्रह मोडणार असं दिसतंय.

खूप भारी फोटो अन कृती ही Happy केवढे छान छान पदार्थ करता सुलेखा तुम्ही, दांडगा उरक आहे.. मस्त.. Happy दालबाटी मी कधी केली नाही हे करून पहायचा मोह होतोय. Happy

मस्त टेम्प्टींग रेसेपी.
रच्याकने, सोड्याऐवजी यीस्ट टाकले तर फंडू बेगल्स बनतील. उ़कडल्यानंतर खसखशीमध्ये किंवा तीळामध्ये घोळून भाजायचे. आणी आकार डोनटस् सारखा ठेवायचा.

अप्रतिम प्रतिसादांबद्दल खरंच सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद आणि आभार्..
भरत्,खरं आहे तुमचे म्हणणे..ताटात चुरमा लड्डु व खड्या मसाल्याची कढी नाहीये त्यामुळे थोडेसे आधे-अधुरे आहे पान..पण सध्या घरात असलेल्या ३ सिनीयर सिटिझन्स चा फर्माइशी मेनू होता हा..त्यामुळे चुरमा लड्डु ऐवजी तूप्-साखर च दिली व कढी बाद केली..दाल ,भाजी,चटणी त लाल तिखट-आले वापरले नाही त्यामुळे खड्या मसाल्यांचा फ्लेवर आला आणि तिखट अजिबात नव्हतेच्..सिनी.सिटींझन्स ला बाहेरचे तयार /दुसर्‍यांच्या घरी केलेले अति तिखट-तेलकट असल्याने खाता येत नाही /सोसवत नाही पण खावेसे तर वाटतेच ना !!
अविकुमार ,घरी बनवलेल्या बेगल्सची चव न्यारी..पण इथे ताजे यिस्ट व ओव्हन नाही.[मावे त मी करत नाही.]
दिनेशदा,आपण नेहमीच पथ्याचे खातो म्हणुन कधीतरी हे "घरी केलेले" खायला आवडते.
नंदिनी.बाटी पेक्षा बाफला कर.माझा ही मावे.चा पहिला प्रयत्न असफल होता.

ज्जे बात ! इन्दौर / भोपालसाईडला साधारण २० २५ वर्षांपूर्वी खाल्ले होते. नंतर हज्जारदा गेलो तिथे पण कध्धीच जमले नाहीत प्रयत्न करुनही. ;-(

असो. ये चीज जिंदगीमे एकबार तो खानीही चाहीये |

सुलेखाजी, धन्यवाद. मी मंगळवारी करायचा विचार करतेय.. पाहून. मला ते गूळ व भरपूर तूप टाकूनच खायला मजा येते.

कसले टेम्प्टिंग फोटोज आहेत्...यम्मी...मावे तली क्रुती दिल्यामुळे जास्त आनंद झाला...धन्यवाद!!!

सुलेखा, पुन्हा एकदा अप्रतिम फोटो व रेसिपीबद्दल धन्यवाद!
गेल्या आठवड्यात इंदौर येथे गेले होते तिथे जेवणाचा हाच मेन्यू असल्याने ही रेसिपी वाचताना सारखी तीच आठवण होत होती. तेथील काकूंनी सांगितले की आमच्या इथे बाफले कंडीत (गोवर्‍यांमध्ये) खुपसून भाजतात. माझे २ बाफल्यांमध्येच काम तमाम झाले. सोबत ती अप्रतिम चवीची कढी, बटाटा - मटार भाजी, चटणी, अशक्य गोड चवीच्या मुळ्याची व टोमॅटोची कोशिंबीर व चुरमा लड्डू, खोबरेपाक असा बेत होता.

हे ते ताट : jevan copy.jpg

सुलेखाताई तुम्ही आजकाल आम्हाला जरा जास्तच कॉम्प्लेक्स आणता आहात असे नाही तुम्हाला वाटत?:अरेरे::फिदी:

सजलेले ताट पाहून भूक लागली परत. मला ही आधी ती बालुशाहीच वाटली.

आईनेच हल्ली हल्लीच केल्या होत्या बाट्या. विदर्भाकडे त्याला रोडगेही म्हणतात. मला आवडतात म्हणून आईने खास फोन करून बोलावले होते. पण जायला जमले नाही. हा खुसखुशीत प्रकार जास्त आवडेल असे वाटतेय.

Pages