माझी बाईक भ्रमंती - दक्षिण भारत

Submitted by प्रथम फडणीस on 12 December, 2012 - 13:20

आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायची असं बरेच दिवस मनात असावं, पण काही कारणांमुळे त्यात व्यत्यय यावा, आणि मग अचानक एके दिवशी ती संधी स्वत:हून चालत आपल्या दारी यावी, याहून दुसरा आनंद तो कशात असणार? माझ्या बाबतीत असंच काहीसं घडलं. कित्येक दिवसांपासून बाईकवरुन कुठेतरी लांब भटकायला जायचं मनात होतं, आणि यंदाच्या दिवाळीत अखेरीस ती संधी आली.
मी आणि सोबत अजून ३ riders नी सुट्ट्यांचा फ़ायदा घेऊन एक आठवड्याचा बेत ठरवला, आणि जागा ठरली ती दक्षिण भारतातील कर्नाटकाची किनारपट्टी आणि पश्चिम घाटांमधील काही भाग. Google maps वापरून पक्का plan बनवला, आणि अखेरीस ९ नोव्हेंबरला आम्ही निघालो.

दिवस १ / रात्र १ : मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर-बेळगाव-मेल्लोम-सावर्डे-कारवार-गोकर्ण.

आमचे २ riders मुंबईवरून संध्याकाळी ५ च्या सुमारास निघाले आणि आम्हाला रात्री ८.३० च्या आसपास NH4 वर कात्रज च्या पुढे खेड शिवापूर टोल नाक्याला भेटले. Plan नुसार आम्ही रात्रभर प्रवास करून दुस-या दिवशी सकाळी ११-१२ पर्यंत कर्नाटकात दांडेली ला थांबणार होतो. ठरल्या प्रमाणे जेवणं आटपल्यावर रात्री ११ वाजता आम्ही NH4 वरून पुढे कुच केले आणि पुढील ठिकाणं ठरवल्याप्रमाणे गाठली. (सातारा रात्री १२.३०, थोड्या वेळ थांबून पुढे कोल्हापूर MacDonald’s ला रात्री २.४५ वाजता). MacDonald’s ला तासभर खानपान आणि थोडा आराम करून पुढे बेळगावकडे निघालो. वाटेत निपाणीजवळ एका कोल्हे महाशयांनी माझ्या गाडीला धडक दिली. सुमारे १००-११० चा वेग असल्यामुळे कोल्ह्यासारख्या लहानशा प्राण्याची धडकसुद्धा इतकी जोरदार बसली की पायातलं ब्रेक लिव्हर वाकडं झालं. त्या प्रकरणामध्ये निष्कारण अर्धा पाऊण तास गेला, आणि आम्ही बेळगावला पहाटे ५.३० च्या सुमारास पोहोचलो.
आणि इथून "आपण ठरवल्याप्रमाणे नशिब आपल्याला चालू देत नाही" हा धडा आम्हाला मिळाला. बेळगावमधल्या एका पेट्रोल पंपावरच्या माणसाने दांडेलीमध्ये पाहण्यासारखे नाही, आणि तिकडे जाण्यात आमचा वेळ व्यर्थ जाईल, तरी जाणे टाळा असा सल्ला (फ़ुकटचा) दिला. तो स्थानिक असल्यामुळे त्याच्या सांगण्यात तथ्य असेल असा समज(?) करून आम्ही plan मध्ये बदल केला, आणि गोवामार्गे गोकर्णला जायचा बेत केला.
मध्ये मध्ये लहान लहान फोटोग्राफी ब्रेक्स घेत घेत आम्ही गोव्यात सावर्डेला दुपारी १२.३०-१ ला पोहोचलो. जेवणं आटोपली, आणि कारवार मार्गे संध्याकाळी ४.३० ला गोकर्णला आमचा काफ़िला अखेरीस पोहोचला. जवळपास रात्रभर जागरण करून २०-२१ तास बाईक चालवल्यामुळे सगळेच जण अतिशय थकले होते. त्यामुळे दुसरं काही न करता सर्वांनी आराम करणं पसंद केलं. तरी संध्याकाळी समुद्रावर जाण्याचा मोह कोणालाच आवरला नाही. त्यापाठोपाठ जेवण करून परत येऊन निद्राधीन झालो, आणि २१ तास ६१० किमी नंतर पहिला दिवस संपला.

आमचे रथ - Bullet आणि Pulsar 220F
100_1859.KDC_.jpg

बेळगावहून गोव्याकडे..
100_1867.JPGIMG_6125.CR2_.jpg

आम्ही Riders (डावीकडून) - निखील, प्रथमेश (मी), सागर, जयेश.
IMG_6132.CR2_.jpg

कर्नाटक प्रवेश - मार्गे कारवार..
100_1900.KDC_.jpg

गोकर्ण किना-यावरून सूर्यास्त.
IMG_1976.CR2_.jpgदिवस २ : गोकर्ण-याना-जोग-सागर-तिर्थहळ्ळी.

दुसरा दिवस उजाडला तो "कुणाचाही सल्ला न मानता आपण ठरल्याप्रमाणेच पुढे जायचं" हा निर्णय घेऊनच. त्या साठी plan मध्ये थोडेफ़ार बदल करून आम्ही सकाळी ८ ला याना साठी प्रयाण केलं. याना हे ठिकाण उत्तर कन्नड जिल्ह्यातील unusual rock formations साठी प्रसिद्ध आहे. यानाकडे जाणारा रस्ता मात्र अत्यंत कठीण, खराब आणि तीव्र चढाईचा असल्यामुळे ५५ किमी जायला २.५-३ तास लागले.
याना झाल्यानंतर पुढे जोग धबधबा पाहण्यासाठी निघालो आणि दुपारी १२.३० ला जोग ला पोहोचलो. मनमुराद फ़ोटोग्राफ़ी करून ठरल्याप्रमाणे अगुंबेला जाण्यासाठी आम्ही निघालो. सुमारे २५-३० किमी वर सागर नावाच्या गावात जेवणासाठी थांबलो. आणि अचानक तुफ़ान पावसाला सुरूवात झाली. २ तास वाट बघूनही थांबत नाही म्हटल्यावर आम्ही निघायचं ठरवलं. कॅमेरा, मोबाईल लॅपटॉप वगैरे वस्तूंना वाचवत आम्ही मार्गस्थ झालो. पण पुढील रस्त्याच्या दुर्दशेमुळे पुन्हा plan मध्ये बदल करण्याचा निर्णय झाला, आणि रात्री ८.३० वाजता तिर्थहळ्ळी ला १२ तास २६० किमी नंतर थांबलो.

याना कडे जाणारा खडतर रस्ता..
100_1919.JPG

चाके ही चालती, याना ची वाट..
IMG_6165.JPG

Attitude फोटु..
IMG_6171.CR2_.jpg

याना चा मार्ग.
IMG_6194.JPG

याच साठी केला होता अट्टाहास. याना मधील Unsual Stone Formations.
IMG_6217.JPG

जोग फ़ॉल्स.
IMG_6249.JPG

हे आपलं सहजच, फ़ोटुग्राफ़ीची हौस भागवायला..
IMG_6253.JPGदिवस ३ : तिर्थहळ्ळी-मुडिगेरी-बेल्लुर-हळेबिडु-हसन-सोमवारपेट-मणिकेरी (कुर्ग)

सकाळी सकाळी ७ ला तिर्थहळ्ळीचा निरोप घेऊन निघालो, आणि मुडिगेरीच्या चहा कॉफ़ीच्या मळ्यातून जाणा-या हिरव्यागार निसर्गाचा आस्वाद घेत दुपारी १२.३०-१ ला हळेबिडुला पोहोचलो. तेथील प्रसिद्ध श्री केदारेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन म्हैसूरला जाण्याच्या हेतूने २.३०-३ ला निघालो. पण म्हैसूरला पोहोचेपर्यंत रात्र होईल आणि तेथील वृंदावन गार्डन पाहता येणार नाही याची जाणीव झाल्यावर आम्ही सोमवारपेटला पोहोचल्यावर पुनश्च एकदा plan बदलून कुर्ग ला जायचा निर्णय घेतला, आणि हा निर्णय आमच्या संपुर्ण ride मधला सर्वात thrilling निर्णय ठरला. सोमवारपेट ते कुर्ग हा सगळा रस्ता हत्तींसाठी राखीव असणा-या अभयारण्यातून जातो. अभयारण्यातून जाणारा सुनसान खराब रस्ता, आदल्या दिवशीच्या पावसामुळे त्यातला चिखल, रात्रीचा मिट्ट काळोख आणि त्यातून वाट काढणा-या आमच्या बाईक्स, अशा अवस्थेत आम्ही ९०-१०० किमी चा पल्ला २.५-३ तासात गाठून १० ल कुर्ग ला पोहोचलो आणि १४ तास ४२० किमी नंतर थांबलो.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा.
चहाचे मळे, मुडिगेरी.
100_2000.KDC_.jpg

मळ्यात थोडा आराम.
IMG_6330.JPG

हळेबिडू मंदिर.
IMG_6395.JPGदिवस ४ : कुर्ग-कासरगोड-मंगलोर-उडुपी-मालपे.

हा दिवस उजाडला आणि कुर्ग मधील प्रसिद्ध ऍबी फ़ॉल्स बघून नाष्टापाणी करून ९.३० ला पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो. उडुपी ला पोहोचण्यासाठी NH17 ला लागण्यासाठी Google maps च्या मदतीने कासरगोड ला जायचा निर्णय झाला. कुर्ग ते कासरगोड हा ८० किमीचा घाटातला पट्टा अप्रतिम रस्त्यामुळे केवळ १.५ तासात आटपला आणि ११ ला आम्ही कासरगोड गाठलं.
ब-याच दिवसांनी मिळालेल्या चांगल्या रस्त्यामुळे झालेल्या आनंदात भर पडली ती कासरगोड केरळात असल्याचं कळल्यावर. केरळाला आमचे पाय लागतील असं आमच्या मनातसुद्धा नव्हतं. त्यामुळे, plan च्या पुर्ण बाहेर येऊन १५०-१६० किमी केरळसारख्या अतिशय निसर्गरम्य आणि नितांतसुंदर रस्त्यांच्या राज्यात बाईक चालवायचा आनंद घेतला. भारतातील सगळ्यात सुशिक्षीत राज्य कसं आहे, आणि शिक्षणाचा परिणाम कसा असतो हे त्या वेळात आम्हाला खूप जवळून अनुभवता आलं. जिथे आधी कर्नाटकामध्ये लेन मार्किंग नसलेले खराब रस्ते, कन्नड भाषेतले बोर्ड्स आणि हिंदी इंग्लीशचा गंध नसणारे लोक होते, आणि त्याच्या उलट केरळातील दृश्य होतं. व्यवस्थित लेन मार्किंग केलेले गुळगुळीत रस्ते, मल्याळमसोबत इंग्लिश भाषेत असणारे बोर्ड्स आणि हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलणारे लोक यामुळे त्या राज्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला.
कासरगोड वरून NH17 पकडून आम्ही उत्तरेकडे मार्गस्थ झालो, आणि ४.३० ला मंगलोर, ५ ला उडुपी आणि ५.३० ला मालपे ला ११ तास २६० किमी नंतर थांबलो.

ऍबी फ़ॉल्स, कुर्ग.
100_2041.KDC_.jpg

आणि हे शिरलो केरळात.
100_2072.KDC_.jpg

केरळमधला लय भारी रस्ता.
100_2075.KDC_.jpg

अशा रस्त्यावर cornering चा मोह कसा आवरावा?
100_2080.KDC_.jpgदिवस ५ : मालपे-मुरुडेश्वर-मडगाव-पणजी-पोर्वरीम.

चवथ्या दिवशी उत्तम रस्त्यांवरून कमी प्रवास झाल्यामुळे पाचव्या दिवशी सकाळी सगळे अगदी फ़्रेश होते. सकाळी ९.३० ला आम्ही मालपे सोडलं, आणि NH 17 वरून वर सरकत ११.३० वाजता कर्नाटकातील प्रसिद्ध मुरुडेश्वर मंदिर ला पोहोचलो. मनमुराद फोटोग्राफ़ी आणि तुडुंब पेटपूजा केली. आमच्या plan प्रमाणे आम्ही मुरुडेश्वर ला थांबणार होतो. पण हातात जवळपास अर्धा दिवस असल्याने आणि पुढच्या दिवशीचा प्रवास थोडा कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला. गोवा आमच्या plan मध्ये अचानक आल्यामुळे आमचे सगळ्यांचे "दिल गार्डन गार्डन" झाले होते. १.३० ला मुरुडेश्वर चा निरोप घेतला, आणि कानकोंड, मडगाव, पणजी मार्गे संध्याकाळी ७.३० वाजता पोर्वरीम ला पोहोचलो.
माझा स्थानिक मित्र Aldrin आणि त्याचे भाऊ Angelo आणि Jason ना भेटलो, आणि १० तास ३७० किमी नंतर पाचवा दिवस संपवला.

मुरुडेश्वरचे २५० फ़ूट उंच गोपुरम.
100_2082.KDC_.jpg

मुरुडेश्वरमधील भव्य शंकराची मुर्ती..
100_2084.JPG

मुरुडेश्वराचा निसर्गरम्य समुद्रकिनारा.
100_2087.KDC_.jpg

मुरुडेश्वरमधील पेटपूजेची भारी जागा, नवीन बीच रेस्टॉरंट.
IMG_6467.CR2_.jpg

पुन्हा एकदा गोव्याच्या भूमीत.
IMG_6447.JPGदिवस ६ : पोर्वरीम-NH17-पनवेल-डोंबिवली.

अखेरची सकाळ अनपेक्षितपणे गोव्यात मिळाल्यामुळे आम्ही अख्खी सकाळ बागा बीच वर घालवली. दुपारी सामानाची शेवटची बांधाबांध करून, मनात कित्येक दिवस रूळतील अशा आठवणी सोबत घेऊन आणि गोवनिज मित्रांचा निरोप घेऊन १ च्या सुमारास गोवा सोडलं. NH 17 वरून कुडाळ, कणकवली, राजापूर, चिपळूण मार्गे रात्री ८.३० ला खेड ला पोहोचलो. आता सगळ्यांनाच घरी जाण्याची एवढी ओढ लागली होती, की NH 17 वरचा सर्वात कठीण समजला जाणारा कशेडी घाटसुद्धा रात्री ९ च्या मिट्ट काळोखात अर्ध्या पाऊण तासात उतरून आम्ही पोलादपूर ला पोहोचलो होतो. त्या पुढचा प्रवास कसाबसा संपवत शेवटी रात्री १.३० ला डोंबिवलीला टेकलो, आणि ride मधले शेवटचे १२ तास ५८० किमी पार करून आमची दक्षिण भारत यात्रा संपवली.

Ride चे Details:-
• एकूण प्रवास - २५६० किमी.
• प्रत्येकी खर्च - जवळपास ५००० रू. (जेवण, राहणं, पेट्रोल सगळं धरून)
• सोबत नेलेली Gadgets :

1) कॅमेरे -
a) Canon 60D
b) Canon 550D
c) Kodak Z990
d) Nikon Coolpix L24

2) लॅपटॉप - Sony Vaio (फोटो ट्रान्सफ़र करण्यासाठी)
3) ट्रायपॉड, मिनी ट्रायपॉड, गोरिलापॉड.
4) नोकिया N8 (GPS मार्गदर्शक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

______ /\________

काय लिहु तेच समजत नाहीय. १०० ११० च्या स्पिड्ला तुम्ही कोल्ह्याला धडकला (गाडी कोणती होती हो?) ते पण रात्री.
:दहा वर्षापुर्वीचे दिवस आठवलेला बाहुला:

माहिती छान...पण जिथे जिथे थांबलात तिथे काय काय बघितलं? तिथली खासियत काय ते पण लिहा ना... आणि इतके सारे कॅमेरे नेले होते तर थोडे फोटो पण दाखवा ना राव... तेव्हडिच आमची पण सफर घडेल तुमच्या सोबत Happy

त्या कोल्ह्याचे काय झाले कळले का?>>> चिखल्या, लैच काळजी तुला....कोल्ह्या कडुन ब्रेक लिव्हरचा खर्च वसुल करायचा विचार आहे का??? Wink

मस्त

साहेब फिरलात बरंच , पण लिहिण्यात फारच कंटाळा केलात ब्वा .

मागे सारंग यांनी लिहिलेली "पुणे - पानिपत " मालिका वाचून पहा .
आत्तापर्यंत अंतर्जालावर जेवढी प्रवास , ट्रेकिंग आणि काहीबाही वर्णनं असतील , त्यातलं सर्वात आदर्श अस ते म्हणता येईल

असो शुभेच्छा

-- ( १०० स्पीड वर असलेल्या activa मध्ये कुत्रा अडकून साफ थोबाडावर आपटलेला ) प्रसन्न

६ दिवस म्हणजे किमान ६ पोष्टी पायजेत रावं वर खच्चून फोटो पण पायजेत.

हे असे प्रवास म्हणजे प्रेक्षणीय असतात. तेंव्हा आम्हाला बघ्ण्याचा तो आनंद द्या की.. Happy

काही शंका विचारू का? प्रत्येक बाईक वर १ रायडर होता की पिलियन पण होता? एकच असेल तर जरा खाली माझी शंका आहे त्याचे निरसन करा प्लिज..

तुम्ही लिहिले आहेत की तुमचा प्रवास किमान २५६० कि.मी.च्या आसपास झाला म्हणजे किमान ४० लिटर पेट्रोल तरी तुम्हाला लागले असेल ना? मग इंधनाचा खर्च ४० x ८० = ३२००,/- झाला.
६ दिवसाचे खाणे, दिवसाला ३०० रुपये पकडले तरी झाले १,८००/-

हाच खर्च झाला ५ हजार. राहिलात कुठे हॉटेल की कुठे बाहेरच? की टेंट नेले होतेत?

प्रसन्न, खरेच सारंगचे प्रवासवर्णन आदर्श असेच आहे.
प्रथम साहेब, वरच्या सगळ्यांचे विचार मनावर घ्याच !

प्रसन्न,कोणाच्या थोबाडावर कोण आपटलेला ? Wink

प्रथम, फोटो मस्ट. शक्य असल्यास पिकासावर टाकून लिंक द्या. आणि वर्णनात अजून रंग भरा रा, नाहितर "आम्ही ठरवल, आम्ही निघालो आणि आम्ही जाऊन परत आलो" एव्हढ्यात पण संपवता आलं असतं की. Happy

माहिती कमी, आकडेवारीच जास्त...>> अनुमोदन

थोडे निबंध लिहिल्यासारखे झालेय.

वास्तविक ह्याची ७ भागांत लेखमाला झाली असती. प्रत्येक दिवसाचे अनुभवांचे वर्णन वाचायला आवडले असते.
हा भाग मी अजून पाहिलेला नाही (गोव्याशिवाय) त्यामुळे फोटो आणि प्रासंगिक वर्णन वाचायला आवडेल. जमल्यास प्रयत्न करा.

पण तुमचे प्रयत्न स्तुत्य आहेत, एव्हढा प्रवास करतांना कुठे कुठे राहिलात, काय अडचणी आल्यात , कोणत्या गोष्टी टाळाव्यात ह्याचे उल्लेख केलेत पुढेमागे आमच्यासारख्यांना याचा निश्चितच फायदा होईल.

शक्यतोवर रात्री २-५ चा प्रवास टाळावा असे माझे वैयक्तिक मत आहे, कारण ह्या वेळेस झोप आवरत नाही असा माझा अनुभव आहे आणि राष्ट्रीय महामार्ग वर मोठी वाहने ह्या वेळेत सुसाट धावत असतात.

रोहन,
एक एक करून शंकानिरसन करतो.
१) २ बाईक्सवर ४ जण होतो. पिलीयन होते.
२) आम्ही plan असा बनवला होत की दोन्ही प्रवासात (जाताना आणि येताना) आम्ही गोव्यातून गेलो. तिकडे पेट्रोल ५४ रुपये असल्यामुळे टाक्या फ़ुल्ल करूनच पुढचा प्रवास केला. त्यामुळे दोन्ही खेपेस लिटरमागे किमान १८ रुपये वाचले. अंदाजे ६० लिटर (२ बाईक्स x १५ लिटर एक टाकी x २ वेळा) च्या हिशोबाने ११०० रुपये वाचले. आणि रहायचं म्हणाल तर एकदम साध्याशा हॉटेलात राहिलो (गरीब माणसं) जिथे एक रात्रीचं चौघांचं भाडं अंदाजाने ३५०-४०० च्या आसपास होतं. आणि दक्षिण भारतात खाण्याचा खर्च एकदमच कमी येतो. (३० रुपयात भरपेट राईस प्लेट)

या सगळ्यामुळे खर्च ५००० च्या खाली झाला...

अजून काही शंका असल्यास.... येऊद्यात.. Happy

झकास... Happy

सुरेख आहेत फोटो, बेळगावकडून गोव्याला जाणारा रस्ता देखणा आहे!
कारवारचा समुद्र किनारा किती सुरेख आहे.. हळेबिडू मंदिराचा फोटोही छान.

ये दिल मांगे मोर.... अश्या लिखानाचे किमान ७ भाग आणि प्रत्येक भागात किमान १५-२० फोटो पाहिजेत.... Wink

Pages