॥ रावण विरचित शिव तांडव स्तोत्र ॥ - मराठी अनुवाद

Submitted by नरेंद्र गोळे on 28 November, 2012 - 08:19

॥ रावण विरचित शिव तांडव स्तोत्र ॥ http://hindi.webdunia.com/religion/occasion/vijayadashami/0710/19/107101...

मूळ संस्कृत श्लोक व मराठी अनुवाद




जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌

डमड्डमड्डमड्डम न्निनादवड्डमर्वयं
चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम्‌

जटांमधून धावत्या जलांनि धूत-कंठ जो
धरीत सर्पमालिका, गळ्यात हार शोभतो

डुम्मूडुम्मू करीत या, निनाद गाजवा शिवा
करीत तांडव प्रचंड, शंकरा शुभं करा




जटा कटाहसंभ्रमभ्रम न्निलिंपनिर्झरी
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि

धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम

जटांतुनी गतीस्थ, गुंतल्या झर्‍यांपरी अहा
तरंग ज्याचिया शिरी विराजती, शिवा पहा

ललाट ज्योतदाह ज्या शिवाचिया शिरी वसे
किशोर चंद्रशेखरा-प्रती रुचीहि वाढु दे




धराधरेंद्रनंदिनी विलास बंधुबंधुर-
स्फुरद्दिगंत संतति प्रमोद मानमानसे

कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि
क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि

नगाधिराज-कन्यका-कटाक्ष मोदिता शिवे
दिगंत संतती स्फुरून, मोदतीहि भक्त हे

कृपाकटाक्ष टाकिता जया, विपत्ति दूर हो
कधी दिगंबरामुळे कळे न रंजना मिळे




जटा भुजंगपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा-
कदंबकुंकुमद्रव प्रलिप्तदिग्वधूमुखे

मदांध सिंधुरस्फुरत्व गुत्तरीयमेदुरे
मनो विनोदद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि

जटाभुजंग तद्मणी-प्रदीप्त कांति ह्या दिशा
कदंब-पुष्प-पीत-दीप्त, शोभती झळाळत्या

दिशाधरांग-चीर ज्या विभूषवी दिगंबरा
प्रती जडो मती, घडो मनोविनोद, तारका




सहस्रलोचनप्रभृत्य शेषलेखशेखर-
प्रसूनधूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः

भुजंगराजमालया निबद्धजाटजूटकः
श्रिये चिराय जायतां चकोरबंधुशेखरः

सहस्रलोचनादि देव, पादस्पर्शता सदा
तयांस भूषवित त्या, फुलांनि भूषती पदे

भुजंगराज हार हो, नि बांधतो जटाहि तो
प्रसन्न भालचंद्र तो, चिरायु संपदा करो




ललाटचत्वरज्वल द्धनंजयस्फुलिंगभा-
निपीतपंचसायकं नमन्निलिंपनायकम्‌

सुधामयुखलेखया विराजमानशेखरं
महाकपालिसंपदे शिरोजटालमस्तु नः

कपाल-नेत्र-पावका क्षणात मोकलूनिया
वधी अनंग, हारवी सुरेंद्र आदि देवता

सुधांशुचंद्र ज्याचिया शिरास भूषवीतसे
कपालिना, जटाधरा, दिगंत संपदा करा




करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल-
द्धनंजयाहुतीकृत प्रचंडपंचसायके

धराधरेंद्रनंदिनी कुचाग्रचित्रपत्रक-
प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचने रतिर्मम

अनंग ध्वंसिला जिने, त्रिनेत्रज्योत तीच ती
नगाधिराज-नंदिनी-स्तनाग्र भाग वेधती,

चित्र रेखते तिथे जयाचि दृष्टी योजुनी
त्रिलोचनाप्रती मना, जिवास वाढु दे रती




नवीनमेघमंडली निरुद्धदुर्धरस्फुर-
त्कुहुनिशीथिनीतमः प्रबंधबद्धकंधरः

निलिम्पनिर्झरि धरस्तनोतु कृत्तिसिंधुरः
कलानिधानबंधुरः श्रियं जगद्धुरंधरः

नव्या घनांनि दाटली, निशावसेपरी जशी
तसा गळा जटानिबद्धजान्हवीधरास ज्या,

गजेंद्र-चीर-शोभिता शशीकला विभूषवी
जगास धारका प्रसन्न व्हा, नि संपदा करा




प्रफुल्लनीलपंकज प्रपंचकालिमप्रभा-
वलंबिकंठकंदली रुचिप्रबद्धकंधरम्‌

स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं
गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे

प्रफुल्ल नील पंकजापरी प्रदिप्त कंठ ज्या
तसाच कामदेव तो, जये त्रिपूर ध्वंसिला

भवास तारणार जो नि याग मोडला जये
भजेन मी शिवास त्या, गजांतका यमांतका


१०

अखर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी-
रसप्रवाहमाधुरी विजृंभणामधुव्रतम्‌

स्मरांतकं पुरातकं भवांतकं मखांतकं
गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे

कलाबहारमाधुरीस भृंग जो शिवा असे
अनंगहंत आणि जो त्रिपूर, याग ध्वंसतो

भवास तारणार जो, सदा शुभंकरी शिवा,
भजेन मी शिवास त्या, गजांतका यमांतका


११

जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुर-
द्धगद्धगद्वि निर्गमत्कराल भाल हव्यवाट्-

धिमिद्धिमिद्धिमिनन्मृदंगतुंगमंगल-
ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवः

गतीस्थ सर्पहार जे, विषाग्नि सोडती असे
फणा उभा करून ते, कपालि ओतती विषे

मृदंगनाद गाजतो, ध्वनी मनास मोहतो
पवित्र तांडवी शिवा, विराजतो नि शोभतो


१२

दृषद्विचित्रतल्पयोर्भुजंग मौक्तिकस्रजो-
र्गरिष्ठरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः

तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः
समप्रवृत्तीकः कदा सदाशिवं भजाम्यम्‌

शिळा नि शेज, मोतियांचि माळ, सर्प वा असो
जवाहिरे नि मृत्तिका, मृगाक्षि वा असो तृणे

असोत मित्र वा न वा, करून भेद नाहिसे
कधी भजेन मी मना, सदाशिवा सदा सुखे


१३

कदा निलिंपनिर्झरी निकुंजकोटरे वसन्‌
विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्‌

विलोललोललोचनो ललामभाललग्नकः
शिवेति मंत्रमुच्चरन्‌ कदा सुखी भवाम्यहम्‌

कधी शिरी धरून हात, शंकरा स्तवेन मी
वसेन जान्हवीतिरी विमुक्त होउनी गती

सुनेत्रचंचलेचिया कपालिचा ’शिवाय’ तो
कधी चिरायु सौख्य पावण्या सदा स्मरेन मी


१४

निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-
निगुम्फनिर्भक्षरन्मधूष्णिकामनोहरः

तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं
परिश्रय परं पदं तदंगजत्विषांचयः

पदांस देवता जशा विनम्र होत त्यामुळे
तयांशिरी समर्पिता फुलांमुळे विभूषिता

मनोहराकृतींमुळे मनोज्ञ भासती पदे
प्रसन्न ती करो अम्हा, सदाच सौरभामुळे


१५

प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी
महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना

विमुक्त वामलोचनो विवाहकालिकध्वनिः
शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम्‌

विशाल सागरातल्या शुभेच्छु पावकापरी
महाष्टसिद्धिकामना करीत सर्व सुंदरी

विवाहकालि शंकरा व पार्वतीस चिंतिती
जगास जिंकता ठरो, ’शिवाय’ मंत्र संगरी


१६

इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं
पठन्स्मरन्‌ब्रुवन्नरो विशुद्धिमेति संततम्‌

हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं
विमोहनं हि देहिना तु शंकरस्य चिंतनम्‌

सदा करून मोकळ्या स्वरात श्लोक पाठ हे
म्हणून वा श्रवून हे, विशुद्धता सदा मिळे

हरीप्रती, गुरूप्रती, रती, न वेगळी गती
अशा जिवास मोहत्या, शिवाप्रती सदा रुची


१७

पूजाऽवसानसमये दशवक्त्रगीतं
यः शम्भुपूजनपरं पठति प्रदोषे

तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां
लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः

पूजासमाप्तीस संध्येस जो हे
म्हणेल लंकेश-रचित स्तोत्र

तयास रथ-हत्ती-अश्वासहित
शंभू प्रसन्नलक्ष्मी देई खचित

॥ इति श्री. रावणकृतं शिव-तांडव स्तोत्रं संपूर्णम्‌ ॥

अशाप्रकारे, श्री. रावण विरचित शिव-तांडव स्तोत्र संपूर्ण होत आहे.

http://anuvad-ranjan.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

संदर्भः
१. शिवतांडवस्तोत्राचा हिंदीत अर्थ http://hindi.webdunia.com/religion/occasion/vijayadashami/0710/19/107101...

२. पंडित जसराज यांनी गायलेले
http://mp3ruler.com/mp3/shiv_tandav_stotram_pandit_jasraj.html

३. रामदास कामत यांनी गायलेले
http://music.cooltoad.com/music/song.php?id=456184&PHPSESSID=1eb37958618...

४. मूळ पंचचामर छंदातील, स्व. बजरंग लाल जोशी द्वारा रचित हिंदी अनुवाद
http://joshikavi.blogspot.in/2011/03/blog-post_1945.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता चालीत म्हणून त्याची ऑडिओ क्लिप टाका... https://www.youtube.com/watch?v=McrjgeI-PtI

हरीप्रती, गुरूप्रती, भक्ती, न वेगळी गती

इथे भक्ती शब्द थोड्या वेगळ्या प्रकारे उच्चारला तरच सुरात बसतो. जाणकार सांगतीलच.

-- जय लंकेश !! Happy

मस्त आहे.... जमल........
.
.
.इथे कोणत्यातरी धाग्यावर अनुवाद केल्यावर परवानगी घेतली का असे विचारलेले ??
.
.
तुम्ही "रावणाची" परवानगी घेतली ना ????? Uhoh Lol Light 1

गोळेसाहेब दंडवत तुम्हाला. माझ्या हिटलिस्टवर हे नेहेमी नं १ गाणे आहे. ( गाणे म्हणणे चुकीचे, साक्षात शिवस्तुती.) मी रामायण मालिकेत ऐकल्यापासुन याची पंखा. अरविन्द त्रिवेदीने काय म्हंटलय हे. तो खरा रावण शोभला.

छान Happy

___/\___

वरदा, आंबा३, उदयन, शैलजा, टुनटुन, अश्विनी के व असामी

सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

आंबा३,
तुमची सूचना वाजवीच होती. तिला अनुसरून किरकोळ फरक केलेला आहे. रुचेल अशी अपेक्षा आहे.
चालीत म्हणून श्राव्य संचिका निर्माण करणारा कोणी कलाकार भेटला तर तेही शक्य होईल.
मला संगीतात आणि गायनात रुची आणि गतीही, हवी तितकी नाही.

उदयन,
मनोमन रावणाची अनुमती मागितलेली आहे.
रावण महाशय वरील रचनेवर प्रसन्न होऊन अशी अनुमती देतील असा विश्वास वाटतो.

ग्रेट जॉब गोळे साहेब

मूळ स्तोत्रर्‍ ४ ओळीऐवजी दोन ओळीच्या श्लोकात लिहिले असावे असे वाटते (अनेकजागी सन्धीविग्रह होतो आहे चार ओळीत लिहिताना ज्याने वृत्त भन्ग होतो आहे यावरून असे वाटले )

वृत्त काहीजागी जरा लडखडतेय अनुवादातही

हे स्तोत्र असल्याने अधिक काटेकोरपणे वृत्त पाळावे असे मला वाटते

मूळ सन्स्कृत स्तोत्राच्या पठणाने जे फळ मिळते ते या अनुवदातून मिळावे असा आशिर्वाद विठ्ठलाने तुम्हास द्यावा अशी मी त्यास प्रार्थना करतो

अफाट... ग्रेट !

मला संस्कृत अर्थ माहित नाही.. पण जबरदस्तच !!

=====================================

डुम्मडुमीत डमरू नाद तीव्र तो करीत या

मत्त-हत्ती-चर्म-वस्त्र विभूषिता दिगंबरा

चित्र तेथ रेखते जयाचि दृष्टी योजुनी

हत्तीचर्मकळा, तशी शशीकला विभूषवी

फुस्स रवे करून ते, कपालि ओतती विषे

शत्रू असोत दोस्त वा, करून भेद नाहिसे

>>>> ह्या ओळींतील वृत्तभंग खटकला.

फलश्रुती मला वाटततं -

'गागालगा लललगा ललगा लगागा' ह्या लगावलीत हवी..

वैभव आणि रसप प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद.

वैभव,
वृत्त काहीजागी जरा लडखडतेय अनुवादातही >>> तपशील सांगितलात तर सुधार शक्य होईल.
हे स्तोत्र असल्याने अधिक काटेकोरपणे वृत्त पाळावे असे मला वाटते >>> बरोबर आहे.
विठठलाकडे शिफारस केल्याखातर पुन्हा एकदा धन्यवाद.

रसप,
१. डुम्मडुमीत डमरू नाद तीव्र तो करीत या
२. मत्त-हत्ती-चर्म-वस्त्र विभूषिता दिगंबरा
३. चित्र तेथ रेखते जयाचि दृष्टी योजुनी
४. हत्तीचर्मकळा, तशी शशीकला विभूषवी
५. फुस्स रवे करून ते, कपालि ओतती विषे
६. शत्रू असोत दोस्त वा, करून भेद नाहिसे >>>> ह्या ओळींतील वृत्तभंग खटकला.

>>>> २,३,५,६ मध्ये केलेला सुधार तपासा, बरोबर वाटतो आहे का. १ व ४ करता मला सध्यातरी पर्याय सुचत नाही आहे. सुचल्यास अवश्य बदलेन.

फलश्रुती मला वाटततं -
'गागालगा लललगा ललगा लगागा' ह्या लगावलीत हवी.. >>>
भिन्नवृत्ती असेल तरीही चालेल मात्र, किमान ते तरी वृत्त घट्ट असायला हवे होते.

१) असा बदल सुचतोय <<<<<थरारनाद डमरुचा डमड् डमड् करीत या
४),,,,,,,,,,, (क्षमस्व !!! मला अर्थ समजला नाहीये त्या ओळीचा)

मदोन्मत्त-हत्ती-चर्म विभूषिता दिगंबरा

फुत्कारवा करून ते, कपालि ओतती विषे

ह्यात अजूनही गडबड वाटते,

असोत दोस्त वा रिपू, करून भेद नाहिसे - इथे दोस्त ऐवजी मित्र..??

धन्यवाद हर्षल,
खूप छान... हे चालीत म्हणायला आवडेल >>> अवश्य म्हणा. रेकॉर्ड करा. नेटवर ठेवा आणि इथे दुवा द्या.

वैभव,
१) असा बदल सुचतोय <<<<<थरारनाद डमरुचा डमड् डमड् करीत या >>>
र्‍हस्व-दीर्घ-र्‍हस्व-दीर्घ असे हे वृत्त चालत असल्याने अवघड आहे.

४),,,,,,,,,,, (क्षमस्व !!! मला अर्थ समजला नाहीये त्या ओळीचा)
अष्टदिशांचे प्रतिनिधी आठ हत्ती आहेत असा समज आहे. दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे तो दिगंबर म्हणजे शंकर, त्या हत्तींचे चर्मच जणू वस्त्र म्हणून परिधान करत असतो अशी संकल्पना आहे.

रसप,
मदोन्मत्त-हत्ती-चर्म विभूषिता दिगंबरा
फुत्कारवा करून ते, कपालि ओतती विषे - ह्यात अजूनही गडबड वाटते, >>>>
आहेच. कशी काय काढावी?

असोत दोस्त वा रिपू, करून भेद नाहिसे - इथे दोस्त ऐवजी मित्र..?? >>> हे चालेल.

पुरंदरे आणि वर्षू प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद. आपल्याच रसिक आस्वादनाने कलेला किंमत येत असते. तेव्हा प्रतिसाद अवश्य द्या.

"नामानिराळा" तर म्हणतात की,

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४

रसप,
आणखीही बदल केले आहेत. अवश्य दखल घ्या.

नमस्कार गोळेकाका! सुरेख अनुवाद आहे. माझं अतिशय आवडतं स्तोत्र आहे हे. रामदास कामतांनी गायलेलं मूळ संस्कृत स्तोत्र एकआडएक सोमवारी आकाशवाणीवरून मंगल प्रभात या कार्यक्रमात.प्रसारित व्हायचं. खूप लहानपणी ऐकलेलं होतं. अप्रतिम गायलंय. तेव्हापासून मनात होतं की पूर्ण स्तोत्र कधीतरी मिळवीनच. यूट्यूबवर बर्‍याच आवृत्त्या आहेत, पण मिळमिळीत आहेत. कामतांचा पहाडी आवाज आणि सोबत यथायोग्य तालवाद्य (घटम?) वापरल्याने अगदी तांडवनृत्याचा भास होतो.

आपला अनुवाद वाचून हे असं काही मराठीत आणता येईल यावर विश्वास बसत नाहीये. आपल्याला साष्टांग दंडवत!

एक शंका आहे. मला संस्कृत डॉक्युमेंट्स या स्थळावर जी आवृत्ती सापडली तीत १५ आणि १६ क्रमांकाचे श्लोक नाहीयेत. तसेच इतरही थोडेफार बदल आहेत. हिंदी विकीवर हे दोन श्लोक आहेत. पण इतर बदलही दिसतात. एकंदरीत कुठलं प्रमाण धरावं हे कळंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

कसलं प्रचंड काम आहे हे... नरेंद्र तुमचं कौतुक करावं तितकं कमी. भाषावैभव आहेच पण ते ही हुकुमी...
माझे शतशः प्रणाम!

जबरदस्त. किती मोठे आणि सुंदर काम करून गेलाय तुम्ही. माझे हे आवडते स्त्रोत्र आहे. मला जमते तितपत चालीत म्हणूनही पाहिले. खरच तुमचे कौतुक करायला शब्द नाहीत.
आणखी एक काम कराच. एखादा भारदास्त आवाज शोधून हे ध्वनिमुद्रित कराच. योग व सूरमाय सुद्धा मदत करू शकतील असे वाटते. मी योगला लिहितो, त्याने अजून पाहिले नसेल हे तर.

गामा पैलवान, दाद, जी.एस. आणि फारेंड सगळ्यांना प्रतिसदांखातर मनःपूर्वक धन्यवाद.

गामा,
यूट्यूबवर बर्‍याच आवृत्त्या आहेत, पण मिळमिळीत आहेत. कामतांचा पहाडी आवाज आणि सोबत यथायोग्य तालवाद्य (घटम?) वापरल्याने अगदी तांडवनृत्याचा भास होतो.>>>
नाही हो. भारतभरातील कित्येकांनी ह्या विख्यात स्तोत्रास नवनवीन पद्धतींनी सजवून चाली देऊन चिरंजीव करून ठेवलेले आहे. त्यातले रामायणातील रावणाने गायिलेले तर सुप्रसिद्धच आहे. चित्र, स्वर, लयबद्धता आणि अदाकारी ह्यांचा सर्वाधिक सन्मान मिळालेले हे स्तोत्र आहे. एवढे की, मला माझीच अभिव्यक्ती अपुरी पडते की काय अशी सार्थ भीती वाटत आहे.

दाद,
कसलं प्रचंड काम आहे हे...>>> आहे खरेच.
पण मूळ स्तोत्रातल्या उपजत लयबद्धतेचे गारूडच मला ह्या रचनेप्रत घेऊन गेले ही वस्तुस्थिती आहे.

जी.एस.,
आणखी एक काम कराच. एखादा भारदास्त आवाज शोधून हे ध्वनिमुद्रित कराच. योग व सूरमाय सुद्धा मदत करू शकतील असे वाटते. मी योगला लिहितो, त्याने अजून पाहिले नसेल हे तर.>>>
कबूल आहे. मात्र मायबोलीवरच ह्याकरता अत्यंत योग्य कला बाळगणारे अनेक आहेत. त्यांनीच मनावर घ्यावे असे मला वाटते. कारण हे माझ्या आटोक्यातील काम नाही.

जे जे खटकते आहे असे प्रतिसादांत म्हटले गेले होते ते ते सर्व सुधारण्याचा प्रयास आता पूर्ण झाला आहे. अजूनही कुणास काही सुधारावे असे वाटत असल्यास अवश्य निर्देश करावा ही विनंती.

गोळे काका

अप्रतिम सुंदर !!

काल मी माझ्या घरी मोठ्ठ्याने सर्वांसाठी हे अनुवादित स्तोत्र म्हटलं..! सर्वांना आवडलं.

-------------------------

अजूनही १-२ ठिकाणी वृत्ताच्या दृष्टिने काही बदल करायला हवेत. मी नंतर परत लिहिन.

धन्यवाद !

गोळे साहेब,

ज...ब....री....!

श्री शंकराच्या कृपेने यथाशक्ती हे गीत आता लवकरच प्रकट होत आहे...

काय ? गीत येत आहे?...........वा !!धन्स योग जी धन्स

वा! गोळेसाहेब ____/\____
डुम्मूडुम्मू करीत या, निनाद गाजवा शिवा....
डुडूमडुडूम करीत या, निनाद गाजवा शिवा......असं केल्यास कसं वाटतंय?

Pages