निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षूदी Happy कसा झाला प्रवास?

सापाचा नै टाक्ला, त्याने टाक्लेल्या कात चा फोटो टाक्ला. Proud

ओ ..अच्छा.. अज्ञानी मी!!!
दिसलाही फोटो.. Happy

जिप्स्या प्रवास तितकासा कंफर्टेबल झाला नाही रे... स्टमक इन्फेक्शन ने बेजार केलं होतं.. Sad

सुक्या.. तू का नाही आलास गटग ला??

जिप्सी, ती वाकेरी. वाकेरीचं भातं, म्हणून याचे मूळ औषधात वापरतात. पण या झाडाला प्रचंड काटे असतात आणि तेही उलटे. हात सोलवटून निघतो.

साधनाने बघितले यात नवल नाही, अंबोलीला भरपूर आहेत.

वर्षू, स्वगृही पोहोचली का ?

हुश्श.........! झालं एकदाचं वाचून. बरेच दिवस ह्या निसर्गाच्या बागेत यायलाच मिळाले नाही.
खूप नव्-नवीन माहिती मिळाली. ते भाताची कापणी, मळणी, झोडपणी, ते खळे, सगळे सगळे डोळ्यासमोर जशास तसे उभे राहिले. परत हे सोनेरी दिवस कधी अनुभवायला मिळतील.......! Uhoh

अनिल, इकडून जाताना नाही पण आम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे विमानाने येतो, त्यावेळी बराच वेळ विमानात असलो तरी उतरल्यावर वेळ फारशी पुढे गेलेलीच नसते.

सुप्रभात...

हुश्श.........! झालं एकदाचं वाचून. बरेच दिवस ह्या निसर्गाच्या बागेत यायलाच मिळाले नाही.
खूप नव्-नवीन माहिती मिळाली. ते भाताची कापणी, मळणी, झोडपणी, ते खळे, सगळे सगळे डोळ्यासमोर जशास तसे उभे राहिले. >>>>>>>>>>+१००

काल पोर्णिमेचा चंद्र कुणी बघितला का ? काल रात्री आणि आज पहाटेदेखील चंद्राच्या अगदी जवळ एक चांदणी होती. ( मधल्या काळात चंद्र त्या चांदणीच्या पुढून गेला का ? ) आम्ही दक्षिण गोलार्धात, भारतात पण असेच दिसले का ?

काल पोर्णिमेचा चंद्र कुणी बघितला का ? काल रात्री आणि आज पहाटेदेखील चंद्राच्या अगदी जवळ एक चांदणी होती. >>>>> काल रात्री आणि आज पहाटे सुध्दा बघितला. खुप तेजस्वी दिसत होता.

हो ना, खुप छान दिसत होता.
गोव्यात मोठा उत्सव असतो. नदीत दिवे सोडतात, सांखळी नावाचे गाव यासाठी पूर्ण सजलेले असते. बोटीच्या मॉडेल्सची स्पर्धा असते. तिथले सरकारच सगळी व्यवस्था करते. रात्रीच्या बसेस पण असतात. देखणे आयोजन असते.

काल ह्या खारुताई काहीतरी हातात धरुन खात होत्या. काय खाताहेत ते सूर्यप्रकाशामुळे कळलच नाही.

चंद्राजवळ असूनही ठळक दिसत होता. आता १५/२० दिवसांनी सूर्याचे दक्षिणायन पूर्ण होणार ना ! सूर्याची उगवायची जागा आणि चंदाची उगवायची जागा, यात फार अंतर पडलय आमच्याकडे. घराच्या खिडकितूनच
सगळे क्षितीज दिसत असल्याने, ते फार जाणवते.

आकाशात ठळक असे दोन ग्रह आणि एक तारा आहे. ता-याची जागा फिक्स आहे, कारण तो एका मोठ्या सेटमध्ये आहे Happy ग्रहच नाचत बसतात इकडे तिकडे... Happy

मी बरोबर ओळखला गुरूला Happy Happy खालची लिंक बघा...

http://avakashvedh.com/haa_mahina/grahasthiti.html

माझ्या लाडक्या मित्राची साईट आहे ही.. Happy

हि बघायचो साईट मी नेहमी. छानच आहे.

ग्रहांना सगळ्यांच्या पत्रिकेत बारीबारीने जायचे असते. एकाजागी बसून कसे चालेल त्यांना ?

दिनेश Happy

ही साईट डेवलप करणा-या सचिनला कॉम्प्युटरचे फॉर्मल शिक्षण अजिबात नाहीय, ऑफिसात नशिबाने हाती काँप्युटर मिळाल्यावर त्याने स्वतः अभ्यास करुन वेब डिजाइनींग शिकला, स्वतःची साईट बनवली, आणि आता इतरांना कॉम्प्युटर शिकवण्यचे ऑफिसही उघडलेय त्याने. कोणाच्याही कसल्याही मदतीशिवाय हे सगळे त्याने कसे जमवले त्यालाच माहित.....

त्याच्या अजुन चार-पाच साईट्स आहेत. अवकाशवेधला महाराष्ट्र सरकारचे सर्वोत्तम साईटचे बक्षिसही मिळालेय.

सचिनला भेटायला नक्कीच आवडेल. पुढच्या गटगचे आमंत्रण देईनच.
खुप कल्पक आहे ही साईट.. फॉर्मल शिक्षणाने कदाचित कल्पकतेला मर्यादा आल्या असत्या.

<<<ग्रहांना सगळ्यांच्या पत्रिकेत बारीबारीने जायचे असते. एकाजागी बसून कसे चालेल त्यांना ?>>>>
दिनेशदा, Proud

'वर्षु,
इकडुन निघाली आणि तिकडॅ पोचली पण ?'... अनिल,... हो रे आजकाल कितीसा वेळ लागतोय पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकाला जायला...

आठवून बघितले तर अशा खुपच कमी रात्री आठवल्या, कि ज्यावेळी शहरातील प्रदूषणापासून दूर कुठेतरी,
रात्र काढली आणि आकाशभर ग्रहतारे दिसले... Sad

Pages