निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु.. सूर्यफुलाच्या बिया नाहीत त्या.. तो काळा घेवडा आहे..

इथे थंडीच्या दिवसात माणसं , मणामणाने सूर्यफूल, खरबूज आणिक ही कसल्या कसल्या बिया खात बसतात .. दि व स भ र!!!!

हा फोटो काढताना अनिल आणी त्याच्या हळदी च्या शेतांची हमखास आठवण काढली Happy

ही ती रसवंती... थेट उसाच्या शेतातच उभी केलेली..
यहाँ तो मेरेको 'पहिली धार' की मिली... ला ज वा ब!!!

वर्षू तो टायगर बांबू... पण बांबूने चीनच्या इतिहासात / संस्कृतीमधे खुपच माह्त्वाची भुमिका केली आहे. आजही त्याचे तिथले स्थान अढळ आहे.

शांकली, लिटरली जीवघेणा प्रकार आहे तो. एकक्षण असे वाटून गेले कि आपल्याकडच्या कबुतरांवर नियंत्रण ठेवायला हे झाड भारतात आणावे. पण लगेच वाटले, आपले सर्वच पक्षी त्यात अडकतील. नकोच ते.

हो ना, दिनेशदा, नकोच ते आपल्याकडे. आणि आणखी एक कारण असंही की हे परदेशी झाड! आपल्याकडे त्याची अमर्याद वाढ होईल.आणि आपल्याकडच्या पक्ष्यांचं तर काही खरं नाहीच......
बी, तुम्ही लिहिलेलं वाचलं. आश्चर्यच आहे हं हे एकेक! ह्या सगळ्या गोष्टी तिकडे बाराही महिने मिळतात हे! कसं काय पिकवतात ते वर्षभर?

शांकली, बी सांगेलच. पण सिंगापुरात फारच कमी जमीन आहे आणि त्यातली लागवडीखाली तर अगदीच कमी.
पण त्या देशाचे भौगोलिक स्थान अशा मोक्याच्या ठिकाणी आहे कि सगळ्या जगाशी व्यापार ( जलमार्गे ) होऊ शकतो. शिवाय उत्तर आणि दक्षिण गोलार्ध, दोन्हीकडच्या पिकांचा लाभ घेता येतो.

वर्षु,
हळद खास आली आहे, फोटो देखील !

(गेल्या वर्षी ज्या हळदीला १५००० ते १८००० क्विं. होता तो या वर्षी त्याच हळदीला ५००० ते ८००० इतका आहे,उलट गेल्या वर्षी पेक्षा उत्पादन खर्च,मजुरी वाढला आहे, हे फक्त शेती मालाबाबतच घडु शकतं)

ओ: सॉरी! गडबड हुई...दिनेशदा, मी बी चं प्रोफाईल आत्ता बघितलं! मला हे माहीतच नव्हतं की बी सिंगापूरमधे रहातात. मग बरोबरे.... तिकडे बारमाही सगळंच मिळतंय ते!!....:स्मित:

१५०००. ५०००... बाप्रे.. इतका फरक.... Uhoh

अनिल, या आतल्या गोष्टी तुझ्याचमुळे कळतात... आम्ही नुस्त्या हिरव्यागार सुंदर शेतांचे फोटो, तिकडून कारमधून पास होताना काढणार .. Sad

पाचगणी चा मेवा

मॅप्रो मधे मिळणारा स्ट्रॉबेरी आईसक्रीम संडे... कुणाबरोबरही शेअर न करता खायचा Wink

वांगे - म्हणजेच Solanum melongena

तर बटाटा Solanum tuberosum

आणि टोमॅटो - Solanum lycopersicum

कोणीतरी टोमॅटो व बटाटा यांचे कलम करुन पोमॅटो म्हणून नवीनच वाण तयार केल्याचे ऐकले होते.
गुगल्यावर हे मिळाले - Pomato is a hybrid variety of potato and tomato. It is a small tomato-like fruit, with white flesh, edible either raw or cooked.

Pomato plant produces tomatoes on the top and potatoes underground.

पोमॅटोबद्दल वाचलेले. वरची वर्षूची फुले पोमॅटोची आहेत काय??? Happy पाने थेट टोमॅटोसारखी आहेत पण माझ्या टोमेटोला पिवळी फुले यायची. वांग्याला असल्या रंगाची आणि अशा प्रकारची फुले पाहिलीत. फक्त पाकळ्या गोल असतात बहुतेक.

स्ट्रॉबेरी....... असले फोटो मी पाहात नाही, भुकेची वेळ झाल्यावर तर नाहीच नाही.

<<कोणीतरी टोमॅटो व बटाटा यांचे कलम करुन पोमॅटो म्हणून नवीनच वाण तयार केल्याचे ऐकले होते.<<
हो शशांकजी, शाळेत असतांना होतं हे शास्त्राच्या पुस्तकात.

ही फुले एका वेलीची आहेत, त्याला जमिनीवर आणि जमीनीखाली काहीच लागत नाही.
असा पंचकोनी फुलांचा एक साचा असतो, तो अनेक झाडांनी वापरलाय. वांगीवृक्ष पण असतो. त्याला याहून मोठी फुले लागतात.. पण वांगी लागत नाहीत. पण या झाडाला मात्र एकाचवेळी ३ रंगाची ( गडद जांभळी / आकाशी / पांढरी ) फुले लागलेली दिसतात. अर्थात त्या एकाच फुलाच्या ३ अवस्था असतात. दिवसाच्या आणि रात्रीच्या किटकांचा फायदा घेता यावा म्हणून हि ट्रिक. पण एवढे करुन त्याला फळ मात्र लागत नाही.

वर्षू, स्ट्रॉबेरीच्या शेतात जायला मिळाले का ? आणि मलबेरी कुठेत ?

Happy स्ट्रॉबेरी च्या शेतात जायला मिळालं ..पण मलबेरीज च्या नाही..

खूप्प वर्षांनी ' शहतूत' पण खायला मिळाले.. मस्त मोठ्ठे, काळेभोर आणी गोड..

कित्ती सुंदर आहेत स्टूऊबेरीज.....
मस्तच.... लगेचच तोंडात टाकाव्यात असे वाटते....

वर्षूतै, दिनेशदा म्हणतात तसंच आहे. ही वांगीवेलच आहे. पुण्यात आघारकरमधे आहे ही वेल. बघून प्रेमातच पडायला होतं हिच्या! मला खरंतर हिची फळं पळवायची होती... पण ती आघारकरमधली लोकं फार चिक्कू आहेत! देत नाहीत काई...जाऊंदे एक नही तो और कोई देगा मुझे!!

बाय द वे, आईस्क्रीम अन स्ट्रॉबेरीजचे फोटो इथे देऊन किती जळवशील गं???

आमच्याकडे आता सकाळ झाली !
वर्षू, तूमचाकडे यापेक्षा सुंदर फुले / स्ट्रॉबेरीज असतील. तरी देशातल्या साध्यासुध्या फुलांचे अप्रुप वाटते. हो ना ?

दै लोकसत्ताच्या दर शनीवारच्या "वास्तुरंग" पुरवणीत श्री उमेश वाघेला हे सातत्याने विविध पक्ष्यांवर लिहित असतात. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि लोभस लेखनशैली यामुळे हे सर्व लेख फारच भावतात.
२४ नोव्हें १२ च्या वास्तुरंगमधे त्यांनी "हळद्याचा पाळणा" या नावाचा सुंदर लेख लिहिला आहे. (गोल्डन ओरिओल किंवा हळद्या ).
त्याच लेखातील हा एक परिच्छेद -
"चिंचवडच्या धनेश्वर मंदिराचा परिसर पक्ष्यांच्या घरट्यांचा अभ्यास करण्यासाठी माझ्यासाठी अगदी 'हॉटस्पॉट' झाला आहे. खरेतर जुनी मंदिरे वास्तुकलेच्या बाबतीत उत्तम आहेतच, पण त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी मंदिराच्या परिसरात निसर्गाचा विचार करुन जी देशी झाडे लावली आहेत ती आजसुद्धा कित्येक जीवांना अन्न आणि निवारा देत आहेत हे विशेष! अशाच पुरातन वास्तूंच्या आणि परिसरातील वृक्षराजीच्या सान्निध्यात अनेक पक्षी आपली विविध प्रकारची वास्तू बांधून नव्या पिढीला जन्माला घालत निसर्गचक्राला अविरत फिरत ठेवत आहेत."

शशांक.. बघ ना.. आजकाल दिनेश दा ,तू ,मी ,शांकली व्यतिरिक्त कुणालाच फुरसद दिसत नाहीये इकडे यायची..

दिनेश दा मनकवडे आहेत Happy

यावेळी मेणवली ला नाना फडणीसान्चा वाडा, वाई ला ओळखीच्यांचा ४५० वर्ष जुना ( राहता) वाडा, कृष्णा नदी चा घाट, महबळेश्वर चं पंचगंगा मंदीर( ४५०० वर्षं जुनं आहे म्हणे) , त्याच्या जवळच असलेलं पुरातन शिवालय जिथे शिवाजीमहाराजांनी जिजाऊ ची सुवर्णतुला केली होती, कोल्हापूर ची अंबाबाई चं देऊळ, इतकं इतकं पाहिलं ना कि काय आधी लिहावं या संभ्रमात आहे.. Happy

वर्षू - घायल कि गति, घायल जाने !

००००००००००००००

आपल्याकडचे फायकस कूळ ( वड, पिंपळ, पिंपरणी, ऊंबर, रबर.... ) ही सर्व झाडे पक्ष्यांना / छोट्या प्राण्यांना आसरा आणि खाऊ देखील पुरवतात. यापैकी एका मोठ्या झाडावर कितीतरी मंडळी, सुखाने / एकोप्याने रहात असतात. शिवाय ही झाडे एकाचवेळी फुलत फळत नाहीत, त्यामूळे बराच काळ हा खाऊ मिळत असतो. तसेच अगदी पूर्ण पानगळ होऊन, हि झाडे ओकिबोकी पण होत नाहीत.

आमच्या कॉलनीत बसस्टॉपजवळच पिंपळाचे झाड आहे. एका नाक्यावर वडाचे झाड रुजतेय. बायकांनी त्याला दोरा गुंडाळायला सुरवातही केलीय. म्हणजे आता त्यांची कत्तल होणार नाही.
आमची कॉलनी / घरे राहणार नाहीत कदाचित पण ही झाडे मात्र नक्कीच राहतील. आम्ही १९७४ ला तिथे रहायला आलो. त्यावेळी लावलेली झाडे आता छानच वाढली आहेत ( त्यावेळी फारसा विचार नव्हता केला. पण आर सी एफ चे प्रदूषण कमी व्हावे हा हेतू होता.) नंतरही नव्याने झाडे रुजलीच आहेत. देशी बदाम, जंगली बदाम, मोठा करमळ, करंजा, जांभूळ, ताम्हण, वड, पिंपळ, पीतमोहोर, गुलमोहोर, जाम, आंबा, पेरु, नारळ, सप्तपर्णी, उंबर, प्राजक्त, पांगारा, करंजा अशी बरीच झाडे आहेत. सर्व रस्त्यांवर छान सावली असते. उन्हाळ्यात देखील, हवा जरा थंडच असते. पहिल्यांदा पाणी घातले असेल तेवढेच. आता काहीच देखभाल करावी लागत नाही.
कॉलनीत जाहीरातींचे बोर्ड्स नाहीत / कॉलनीत एस टी चा डेपो असला तरी आतल्या रस्त्यावर फारशी रहदारी नसते / दुमजली बेस्ट बसेस कॉलनीत येत नाहीत .. त्यामूळे त्या कारणाने तोड होत नाही. कुणाच्या बाल्कनीसमोर झाड आलेय, म्हणूनही कुणी तोडत नाही.

Pages