निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हां बहिणीने सांगितलं होतं खरं.. पण तिने भराभरा अजून ही काही फुलं, झाडं दाखवत त्यांची नांवही सांगितल्यामुळे गोंधळ उडाला...

जरा रांगती झाल्यावर, आई झोपेत असताना, आपणच जरा फेरफटका मारणारी गुणी बाळं माहीत आहेत मला !>>>>>>>>आणि आईला झोपवून सुद्धा! Lol

वर्षू, तूळस रुजवायला काही खास करावे लागत नाही, तशाच फेकायच्या. आपोआप उगवतात. एकदा उगवली कि मात्र, प्रत्येक मंजिरी अगदी दिसताच खुडायची. म्हणजे झाड आणि पाने वाढतात.

( आताच वर्षूने आमच्या अंगोलातल्या पावसाचा थडथडाट ऐकला. एवढा पाऊस पडतोय आता. नंतर कडक ऊनही पडू शकते. )

ओ ही तर फारच कामाची टिप आहे Happy

हो ना.. कसला आवाज ...' खाडखाड,धाडधाड,मुसळधार' वगैरे शब्द कमकुवत पडतायेत त्याच्यासमोर

वर्षु,
अगदी अप्रतिम फोटो !

दिनेशदा,
तिकडे काय छान मोसम असेल ना !!
काल पोर्णिमेचा चंद्र कुणी बघितला का ? काल रात्री आणि आज पहाटेदेखील चंद्राच्या अगदी जवळ एक चांदणी होती.
ऑफीसवरुन घरी जाताना समोर/वरती दिसणार्‍या चंद्राकडे सहज लक्ष गेलं आणि खुप मस्त वाटलं
गावा़कडे शेतात ज्वारी,मका,हरभरा यांची मळणी होण्यापुर्वी राखणी करायला मुक्कामाला (वस्तीला) जात होतो, त्यावेळी मोकळया शेतात दिसणारा पोर्णिमेच्या चंद्राचा लख्ख प्रकाश, तारे पहायला खुप आवडायचं.

शशांकजी,
छान माहिती !

वर्षू,
पाचच मिनिटांपुर्वी थांबला. आता घरी जाताना, रस्त्यात लागू नये, परत.

अनिल,

माणसाचे मन रे, जे समोर आहे, त्यापेक्षा आधी अनुभवलं त्यातच गुंतलेलं असतं. त्याला ओढून वास्तवात आणावं लागतं. सांगावं लागतं, हे पण अनुभव. मग याची पण आठवण काढशील.

माणसाचे मन रे, जे समोर आहे, त्यापेक्षा आधी अनुभवलं त्यातच गुंतलेलं असतं. त्याला ओढून वास्तवात आणावं लागतं. सांगावं लागतं, हे पण अनुभव. मग याची पण आठवण काढशील.>>>>>>>>>>+१००००००!!

जरा रांगती झाल्यावर, आई झोपेत असताना, आपणच जरा फेरफटका मारणारी गुणी बाळं माहीत आहेत मला !>>:हाहा:

दिनेशदा,
तुम्ही लिहिलेलं नेमकं आणि १००% खरं वाटलं आणि पटलं देखील

हे पण अनुभव. मग याची पण आठवण काढशील.
कॉम्पुटरमध्ये दोन फाईल जशा लिंकड होतात् आणि क्षणार्धात जसा डेटा एकत्र आणुन दाखवतात तस हे मन खुप मागे, दुरवर जाऊन आठवणींचा संबंध लावतं, याच खुप नवल वाटतं,त्यात या पानावर मिळणारे ज्ञान ,अनुभव तर खुप अस्सल आहे, तो डिलीट होणं तर शक्यच नाही.

शांकली,
अनुमोदन !

अनिल, स्मरणासाठी हे लिंकिंगच व्हायला पाहिजे. एकातून दुसरे, दुसर्‍यातून तिसरे असे आठवत गेले पाहिजे.
नाहीतर आपण म्हणतो ना, विचारांची लिंक गेली.

००००००००

काल मी आयलंड मॅजिक हा माहितीपट बघत होतो. सध्या जे जावा बेट आहे, ते अलिकडेच ( म्हणजे फक्त १०,००० वर्षांपुर्वी ) मूख्य जमिनीपासून वेगळे झाले. शेवटचे आईस एज त्यावेळी संपले, आणि समुद्राची पातळी वाढली. त्यामूळे हे बेट वेगळे झाले.

आणि त्या बेटावरच्या प्राण्यापक्ष्यांचा, जगाशी संबंध तुटला. त्या बेटावर खायला प्यायला भरपूर होते, पण ते समूह एकाकी पडले. त्यामूळे त्यांच्यात बाहेरचे जीन्स आलेच नाहीत.. आणि मग ते प्राणीपक्षी जगातील इतर
प्राण्यांपेक्षा वेगळेच घडले.

तिथल्या मोरांचा रंग ( खास करुन मानेचा ) निळा नसतो तर तो चक्क हिरवा असतो.

असे बर्‍याच ठिकाणी घडत गेले. आपल्या परिचयाचे कांस / पांचगणी / अंबोली हे पण जगापासून तूटलेलेच होते. पण आता आपलेच तिथे येणे जाणे जास्त झाल्याने, त्यांचा प्रसार होईल.. कधी कधी निसर्गच असा, माणसाला वापरुन घेतो. आपल्या खास प्रयोगशाळेत तो काही वाण तयार करतो.प्रयोग करत करत त्यांना, जगण्यासाठी लायक बनवतो, आणि माणसाला म्हणतो, ये. हे नमुने जगभर ने.

वर्षू सुंदर आहेत फुल.

त्या गुलाबी फुलांना आमच्याकडे पिनची फुले म्हणतात.

तुळशी बिया मातीत नुसत्या पेरून पाणी टाकल्स तरी उगवतील. आमच्याकडे तुळशिच्या जुन्या झाडाखाली पावसाळ्यात भरपूर तुळशी उगवतात.

पिनची फुलं... किती मजेशीर नांव... Happy

म्हंजे पिन ला लावता येणारे ' ब्रोचेज' तर नाही???

'जावा' बद्दल रंजक माहिती ,दिनेश दा..

या जावा वर राहात असतानाच ' कोमोडो' पाहायला मिळाले होते. आमच्या जवळून चालले होते.. \
एका घनदाट अरण्यात , समुद्राकिनारी टूरिस्टना राहायला लॉग कॅबिन्स आहेत . मात्र इथे वॉटर स्पोर्ट्स ना पूर्णपणे बंदी आहे. नॅचरल हॅबिटाट सुरक्षित ठेवता यावे म्हणून..

दुपारच्या चहाफराळाला येता का??

नाही? बरं , मग मला शांपणे खाऊ द्या ..बघू नका असं माझ्याकडे सारखं सारखं..

Komodo monitor, is a large species of lizard found in the Indonesian islands of Komodo, Rinca, Flores, Gili Motang and Padar. A member of the monitor lizard family (Varanidae)

ओ हो हो - हे कोमोडो काय ? मला हे मॉनिटर लिझार्ड वाटायचे..

सध्या वर्षूने इथे फोटो टाकण्याचा सपाटाच लावलेला दिसतोय.... पण सगळे फोटो मस्त आहेत हां... अजून येउदेत..

दिनेशदा जावा बेटाची माहिती इंटअरेस्टींग आहे.

जागू हे पक्षी खुपच छान शीळ घालतात. त्यांची संख्याही बरीच आहे.

वर्षू नील, वानरांचे फोटो भारीच ..

कधी कधी निसर्गच असा, माणसाला वापरुन घेतो. आपल्या खास प्रयोगशाळेत तो काही वाण तयार करतो.प्रयोग करत करत त्यांना, जगण्यासाठी लायक बनवतो, आणि माणसाला म्हणतो, ये. हे नमुने जगभर ने.>>>>+१००००००००............
वर्षूतै, सगळेच फोटो मस्त!
कमोडो ड्रॅगनवर एक छान माहितीपट डिस्कव्हरी किंवा अ‍ॅनिमल प्लॅनेटवर दाखवला होता. (स्टीव्ह आयर्विनचा पण एक प्रोग्रॅम आहे यांच्याबरोबरचा!)

Pages