पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्लीज मला शेंगोळ्यांची (कुळीथच्या पिठाच्या) रेसीपी सांगाल का? माझी मैत्रीण डब्यात आणायची मी करून बघायचा प्रयत्न केला पण मला जमत नाही ते सगळ पाण्यात विरघळून त्याचे सूप होते आणि ते सर्व कढईभर सूपच प्यावे लागते.

अश्विनी, येतोय भारतात.. त्यावेळी एक्स्चेंज करु या !
पिंकी, कृती चुकत नाही, फक्त शेंगोळ्या वळताना, पाव प्रमाणात कणीक किंवा बेसन घालायचे आणि पाण्याला उकळी आल्याशिवाय त्या सोडायच्या नाहीत.
कुळथाच्या पिठाला चिकटपणा, नसतो, म्हणून असे होतेय.

धन्यवाद दिनेशदा. तुम्ही सांगितल्या प्रमाणे नक्की करून पाहीन. एक शंका- शेंगोळ्या वळण्या येवजि कोईन च्या आकारात केल्या तर चालतील का?

prady , गुड कॉल. आभार्स...मी तीच करुन पाहिली कारण सगळे जिन्नस घरात होते...मस्त आहे....थांब तिकडे फोटो पण टाकते.. Happy

आवळ्याच्या लोणच्याच्या दोन-तीन वेगवेगळ्या रेसिपीज मिळू शकतील का?
लोणच्याचा मसाला घालून माहीत आहे. मोहरी फेसून कसे करतात माहीत नाही.
आवळा+लिंबू+हिरवी मिरची एकत्र करुन मदर्स रेसिपीचे लोणचे मिळते तसे नक्की कसे करायचे, नेहमीचाच लोणचे मसाला घालून करायचे का?

आता सुरेख आवळे मिळायला लागले आहेत. आवळ्याच्या रेसिपीज नावाचा बीबी कुणी पाककला तज्ज्ञ उघडतील का प्लीज?

सहज माहितीसाठी - Happy
तुरट चव जास्तीत जास्त पोटात जावी म्हणून आम्ही आवळा असाही खातो.
(१) आवळ्याच्या रेघांना सुरीने खाचा पाडायच्या, मग ते एका काचेच्या बाटलीत मीठ अन हळदीच्या पाण्यात ठेवायचे. २-३ दिवसात आवळे खायला तयार होतात. रोज एक खावा. पुढच्या ३ दिवसात जास्त प्रमाणात केले असतील तर पाणी कमी करून फ्रीजमधे ठेवावेत.
(२) आवळे किसून त्यात थोडा हिंग आणि साधे मीठ किंवा काळे मीठ घालून मिसळून ठेवावे. जेवणानंतर मुखशुध्दीसाठी मस्त वाटते.
(३) गाजर / काकडीच्या को. त एखादा आवळा किसून टाकला तरी मस्त लागतो.

शर्मिला,
मी क्रॅनबेरीच्या लोणच्याची कृती लिहिली आहे मायबोलीवर. ती खरे तर आवळ्याच्या लोणच्याची आहे. क्रॅनबेरीच्या जागी आवळे वापरायचे - हा का नी ना का.
काहींच्यात आवळे उकडून मग वाटतात अन काहींच्यात कच्चेच वाटतात ( म्हणे ) . काही या उकडणे / न उकडणे यावर हिरीरीने वाद घालतात, काही आयते मिळालेले कुठलेही लोणचे वाद न घालता चाटून पुसून खातात Happy

आजच जागुच्या मासे रेसिपीज बघत होते ... आता बहुदा परत मासे आणायचे वेड आल आहे मला ..
मुड्दुशी,
ढोमी,
शिंगाडा
,तामोशी,
लेपा,
सौंदाले
,पेड्वे
,बोय्,
कुपा,
खजुरा,
मुशी,
वाघली ह्या मासे प्रकार रेसेपीज येउ द्या ..... नविन मासे माहिती घ्यायला व बनवायला आवडतील.

मेधा थॅन्क्स लोणचं इंटरेस्टींग वाटतय. करुन बघण्यात येईल.

मोरावळ्याला आमच्याकडॅ अजिबात गिर्‍हाइक नाहीत पौर्णीमा.

अनघा धन्यवाद माहितीसाठी.

शर्मिला, स्वातीने इकडे मिरच्यांचं लोणचं लिहिलं आहे, तसंच्या तसंच आवळ्याचं मोहरी फेसवलेलं लोणचं करतात. तिथल्या प्रतिक्रिया वाचून मस्त मनोरंजन होईल Wink

निंबुडा, घरी टॉमॅटो केचप बनवणे खूप उपद्व्यापाचं काम आहे. माझी आई बनवायची १०-१५ किलोंचं केचप, अजूनही बनवते थोड्या प्रमाणात.

ढोबळ पद्धत सांगते, मला आठवतेय तशी. टॉमॅटो धूवून स्वच्छ पुसायचे आणि मोठ्या पातेल्यात चिरायचे. त्यात साखर, मीठ, तिखट, वाटलेलं आलं-लसुण घालून शिजवायचं. (आंबटपणा कमी असेल तर सायट्रिक अ‍ॅसीड /लिंबू सत्व घालायचं) बहूतेक शिजतानाच प्रिझर्व्हेटीव्ह्ज घालायचे. शिजलेलं प्रकरण पुरणयंत्रातून काढायचं /गाळायचं आणि मग हवी ती कंसिस्टंसी येईपर्यंत आटावायचा. या सगळ्या प्रकारात पाण्याचा हात /थेंबही कुठे लागायला नको. पुरणयंत्रातून काढताना खूप पसारा होतो आणि आटवायला खूप वेळ लागतो. तरीसुद्धा तुला हवं असेल तर आईला विचारून प्रमाण वैगरे सांगते.
आणि हो, आटलेलं केचप पुर्ण वाळलेल्या सॉसच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरणं पण खूप कंटाळवाणं काम आहे.

माझ्या आईची सिमीलर पद्धत पण ती यात लवंग + मिरे + दालचिनी अशी पुरचुंडी करुन केचप उकळताना टाकायची... पुरण यंत्रातुन काढताना ही पुरचुंडी काढुन टाकायची. टॉमेटॉ सोबत ती एखादे बीट टाकायची त्यामुळे सॉस चा रंग ही मस्त लाल्चुटुक यायचा. सॉसला दाटपणा येण्यासाठी त्यात थोडे कॉर्नफ्लावर पण घालायची बहुतेक... आता आठवत नाही....

काही लोक यात भोपळाही घालतात.

आई पण घालते बहूतेक दालचीनी आणि मीरे. लवंगेचं आठवत नाही. हो व्हिनेगर घालते उकळताना आणि आई बहूतेक सोडीयम बेन्झॉइट पण घालायची प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून.

पण एकूणच केचप करणे (त्यावेळी आम्ही सॉस करणे म्हणायचो) खूपच कुटाण्याचं काम म्हणून आठवतं मला. एकतर आई १० ते १५ किलो टॉमॅटोचा सॉस करायची. सॉस करायच्या दिवशी घरात एखादी आईची मैत्रिण किंवा काकु सोबतीला असायची. पुरणयंत्रातून काढायच्या कामासाठी आम्ही किंवा बाबा. आणि मग नंतर आटवताना घरभर सुटलेला सॉसचा वास. आटवताना तो सॉस रटरटत असतो आणि त्याचे शिंतोडे उडतात ओट्यावर बरेच. नंतर ते पुसत बसणं, आदल्या दिवशी घरातल्या सगळ्या जुन्या बाटल्या शोधून धूवून वाळवून ठेवणं.... आणि सॉस करायच्या काही दिवस आधीपासून फ्रिजमध्ये व्हिनेगरची बाटली ठेवलेली असायची आणि दर सिझनला कोणी ना कोणी चूकून पाण्याच्या ऐवजी व्हिनेगर प्यायचं. Happy

अरारा! इतका कुटाणा? Uhoh त्यापेक्षा विकत आणलेलं काय वाईट?

त्यापेक्षा विकत आणलेलं काय वाईट?
>>>
मी आले कधीच बॅकफूटवर Happy

बापरे इतका आटाना-घाटाना असतो हे माहीतच नव्हते. Sad १०-१५ किलोचा नाही पण एखाद किलोचा करायला गेला तरी इतका व्याप होईल का? Uhoh
एखाद किलोचा केल्यास किती क्वांटिटीचा सॉस होईल?

एक किलो टोमॅटोचा, साधारण २००/३०० ग्रॅम होईल.
लाल भोपळा / कच्चे केळे असा बेस घेतला, तर व्याप कमी असतो Happy बाजारातल्या अनेक केचपमधे हेच असतात. याने सॉस जाड होतो.

७ किलो टोमॅटो चे ५ मोठ्या व एक लहान, बाटल्या सॉस तयार होते.
टोमॅटो +किसलेले आले[जास्त प्रमाणात]+कांदा +अगदी थोडा लसुण असे मिक्सरमधे बारीक वाटुन घ्यायचे..वाटलेले मिश्रण स्टील च्या चाळणीवर गाळुन पुन्हा कूकरमधे उकळायचे.घट्टसर झाले कि १ किलो रसाला पाउण वाटी साखर १ सपाट चमचा मीठ,१ चमचा तिखट घालुन एकदा उकळायचे..कोंबट असताना एका वाटीत थोडेसे सॉस घेवुन त्यात , १ किलो तयार सॉस ला पाउण चमचा ग्ले.एसिटिक अ‍ॅसिड व पाव चमचा पो.मे.बाय सल्फेट मिसळायचे व हे मिश्रण तयार सॉस मधे घालायचे.शेवटपर्यंत लाल रंग टिकतो ..आल्याचा तिखटपणा पुरतो..

कृपया
कृपया
कृपया

नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

कृपया
कृपया
कृपया

खरं तर माझाच प्रश्न चुकला. टोमॅटो केचप ची पाकृ असल्यास इकडे लिंक द्या किंवा नवा पाकृ चा धागा उघडून त्याची इथे लिंक द्या असे क्लीअर इथे लिहिले असते तर लोकांनी इथे डायरेक्ट पाकृ लिहिल्या नसत्या. स्वारी, मंजुडी बाय!

पण एवढा मोठ्या क्वांटिटीमधे केचप का बरं करायचा? टोमॅटो सिझनल भाजी नाही. मग प्रत्येक वेळेस १-१ किलो असं फ्रेश बनवलं तर कष्टही कमी आणि वाया जाण्याची भीती ( बुरशी येणं किंवा चव बिघडणं या अर्थाने) नाही. केचपसुद्धा मुरावं लागतं का? म्हणुन एकदम क्वांटीटीमधे बनवायची सुचना आहे का? ( मी कधी बनवण्याची शक्यता नाही, पण नुसत्याच भोचक चौकशा Wink आणि थोडी माहिती मिळवण्याची उत्सुकता पण. Happy )

मनिमाऊ, स्वस्त पडावं म्हणून. ज्याकाळात टॉमॅटो खूप स्वस्त असतात त्यावेळी वर्षभरासाठीचं केचप बनवून ठेवायच्या बायका पुर्वी. जसं पापड-कुरवड्या करतात ना तसंच. घरच्या घरी केल्यानं स्वस्त पडतं आणि क्वालिटीबद्दल शंका नसते. (आईची पिढी स्वस्त पडणं, घरचं खाणं यासाठी जरा जास्तच खपायची /खपते)

Pages