सल्लु ग्रेट की शारु़क ग्रेट की अमिर ग्रेट की अमिताभ ग्रेट...

Submitted by गिरीविहार on 17 November, 2012 - 06:08

रसपच्या जब तक है जान च्या चित्रपट परिक्षणाच्या जागेवर सल्लु, शारुक, अमिर, आणि अमिताभच्या पंख्यांची चांगलीच जुंपलीय... पण तेथे हे संवाद-प्रतिसंवाद संयुक्त नाहीत... कारण तो धागा चित्रपट परिक्षणाबद्द्ल आहे.

त्या विषयावर बोलायला अन लिहायला मी हा धागा काढलाय... ज्या कोणाला सल्लु, शारुक, अमिर, आणि अमिताभ बद्दल (असल्यास अजुन कोणी सोम्या-गोम्या..) जे काही बोलायचे असेल ते येथे बोला....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अब आयेगा मजा. Happy

गिरी, सलमान्-शाहरूखमधे आमिर का नको? तो पण खानत्रयींमधलाच आहे की. त्याच्या पण पंख्यांना लिहिता येइल इथे. Happy

गिरी, सलमान्-शाहरूखमधे आमिर का नको? तो पण खानत्रयींमधलाच आहे की. त्याच्या पण पंख्यांना लिहिता येइल इथे. स्मित >>>>> +१

अरेच्चा
स्कोप वाढवला का ?

अमिताभची आजच्या नायकांशी केलेली तुलना अस्थानी वाटते. मग दिलीपकुमार का नको ?

तिन्ही खानात आमीर अभिनयात सर्वश्रेष्ठ आहे. सलमानला एंटरटेनर म्हणून पाहीलं जातं, तर शाहरूख चांगल्या बॅनरच्या सिनेमात हिट जातो असा अनुभव आहे. एकट्याच्या बळावर तो कमी पडतो.

१० सलमान खान+१० आमिर खान + १० शाहरूख खान + (आताचे सर्व हीरो) = अमिताभ बच्चन. कोइ शक??? >> +१०
फक्त
त्यातून तुषार कपूर आणी उदय चोप्रा वजा करा . नाहीतर बेरीज निगेटीव्ह मधे जाईल Wink

संजीवकुमारने अमिताभ + धर्मेन्द्र या दोघांनाही वीस हजार रुपयात कामावर ठेवलेलं (शोले). हे फक्त संजीवकुमारलाच जमू शकले. म्हणून संजीवकुमारच ग्रेट.

बाळांनो
येतो जरा फिरून. चाचीने कामाची यादी दिली आहे. चांगली दंगल झाली पाईजेल

हा......कमल हसन ग्रेट....त्या च्या सारखे प्रयोग कुणी केलेच नाहीत...
.
अमिताभ हे सुध्दा त्यांचा तरूण नायक लोकांनी नाकारल्यावर...चरीत्र भुमिकेकडे वळले..(वळवले) Wink तेव्हा कुठे त्यांनी विविध भुमिका केल्यात आणि मिळालेल्या संधीचे सोने केले......

नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया...
'हिन्दी चित्रपट म्हनजे नुसती 'खाना'वळ झाली आहे ! " Proud

वाट्टेल ती कामे केल्यावरसुद्धा त्यांचे सिनेमे पाहून 'ते'च कसे ग्रेट ह्यावर हमरातुमरीवर येणार फॅन ग्रेट Happy

राहुल रोय = अमिताभ + आमिर +शाहरुख + सलमान + दिलिप + देव + राजेश

आहे कोणाची बिशाद !

राहुल रोयशी स्पर्धा करणारा एकच नट आला - त्याने एकाच सिनेमात काम करुन त्याचे मोठेपण दाखवले - किशनकुमार!

राहुल रोयशी स्पर्धा करणारा एकच नट आला - त्याने एकाच सिनेमात काम करुन त्याचे मोठेपण दाखवले - किशनकुमार!>>>>>:हहगलो:

स्लार्टीने (कीअजून कुणी?) "अचाट गाण्याच्या बीबीवर" एका हीरोची लिंक दिली होती. तो किशनकुमार आणि राहुल रॉयचा बाप होता. Happy कुणाला आठवतंय का त्याचं नाव??

Pages