सल्लु ग्रेट की शारु़क ग्रेट की अमिर ग्रेट की अमिताभ ग्रेट...

Submitted by गिरीविहार on 17 November, 2012 - 06:08

रसपच्या जब तक है जान च्या चित्रपट परिक्षणाच्या जागेवर सल्लु, शारुक, अमिर, आणि अमिताभच्या पंख्यांची चांगलीच जुंपलीय... पण तेथे हे संवाद-प्रतिसंवाद संयुक्त नाहीत... कारण तो धागा चित्रपट परिक्षणाबद्द्ल आहे.

त्या विषयावर बोलायला अन लिहायला मी हा धागा काढलाय... ज्या कोणाला सल्लु, शारुक, अमिर, आणि अमिताभ बद्दल (असल्यास अजुन कोणी सोम्या-गोम्या..) जे काही बोलायचे असेल ते येथे बोला....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिरी, खरच काम नाही का तुम्हाला.
इथे सगळ्याना भांडायला आयतच कोलित दिलत तुम्ही Happy

<स्लार्टीने (कीअजून कुणी?) "अचाट गाण्याच्या बीबीवर" एका हीरोची लिंक दिली होती. तो किशनकुमार आणि राहुल रॉयचा बाप होता. कुणाला आठवतंय का त्याचं नाव??>

हाच का तो?

http://www.youtube.com/watch?v=sotm1QDsuV0

आझम,

हे आधीही पाहिले होते, पण आज परत पाहूनही तेवढेच हसू आले....:-))

जेकाही आहे ते भयाण आहे.>> अगदी!

अरे ते जगातले पथेटिक गाणे... ते भीषण आहे...

असे लोक जेव्हा स्क्रीनटेस्टला येतात तेव्हा समोरच्यांचे भीषण हाल होतात.

हाहाहाहा!!

जबरदस्त धागा... जबरदस्त प्रतिक्रिया ! फुल्ल एन्टरटेनमेन्ट!

-----------------------------------------

माझ्या मते -

अमिताभ = आमीर खान
आमीर खान = सलमान + शाहरुख

आणि
किमान १० अमिताभ / १० आमीर = १ नसिरुद्दीन शहा.

रसप, नासिर चांगला अभिनेता आहे, पण १० अमिताभ वगैरे जास्तच होते. कृपया संदर्भासहित स्पष्टीकरण (संस्प) द्यावे ही विनंती Happy

मुळात अमिताभ व नासिर दोघांनाही येथे आणायची गरज नाही, कारण ती पिढीच वेगळी आहे. अमिताभची तुलना विनोद खन्ना, जीतेन्द्र, धर्मेन्द्र, शशी वगैरेंशी योग्य आहे, तर नासिरची ओम पुरी, फारूख शेख आणि राजकिरण (केवळ तुलनेपुरताच Happy ) शी.

Lol
काहि काहि प्रतिसाद लयी भारी. Happy

अबतक बच्चन, (मेरे) मरते दम तक बच्चन निर्विवाद ग्रेट माझ्यापुरता तरी. Happy

त्या खालोखाल आमीर खान आवडता. त्याने केलेला सरफरोश फार आवडलेला.

सलमान आधी फारच आचरट वाटत होता. नंतर त्याने त्याचे गुण अवगुण ओळखुन एन्टरटेनमेन्ट वर लक्ष दिलं आणि आता तो आवडतोय.

शाहरुख बाजीगर / डर मध्ये आवडलेला, नंतर बादशाह आणि फिर भी दिल है हिन्दुस्तानी मध्येही आवडलेला.
अति मेलोड्रामा आवडतं नसल्याने आणि हुच्च श्रीमंतांशी रिलेट करु शकत नसल्याने त्याचे बाकीचे चित्रपट फारसे भावले नाहीत. (अर्थात चकदे आणि स्वदेस मध्येही संयमित असा शारुख आवडलेलाच)

हृतिक देखील आवडतो.
झकास अनिल कपुर आणि संजुबाबा देखील आवडले होते त्या त्या वयाच्या टप्प्यावर.. Happy

मुन्नाभाइ मध्ये संजु बाबाचं.

अभिनय खुप समर्थपणे करणारे आवडतात असे बरेच आहेत. ओम पुरी, नसीरुद्दीन शहा, बोमन इराणी वै वै.

अमिताभची तुलना विनोद खन्ना, जीतेन्द्र, धर्मेन्द्र, शशी वगैरेंशी योग्य आहे,>> कायकू रे फारेंड? अमिताभ "हीरो" नस्ला तरी आजून क्राऊड पुलर आहेच की. पा, बंटी और बबली, के३जी, विरूद्ध, सरकार, असले कितीतरी पिक्चर खास त्याच्यासाठी तर चाललेत.

रसप, नासीर उत्तम "अभिनेता" आहे. हीरो कधीच नाही.

मला वाटतं, ते एका पीढीतले म्हणून तशी तुलना म्हणतोय फारेन्ड. ते सगळेच एकाचवेळी हीरो होते, म्हणून. नासीरची पीढीही तीच पण त्यांचे 'जॉनर' निराळे. त्यामुळे तुलना चुकीची.

नासीर उत्तम "अभिनेता" आहे. हीरो कधीच नाही.>> +१

कदाचित विचित्र वाटेल पण समस्त खानां, कुमारां, बच्चनां, खन्नां पेक्षा मला 'अनिल कपूर जास्त व्हर्सटाईल वाटतो. एक हीरो म्हणूनही आवडतो आणि अभिनेता म्हणूनही. कुठल्याही भूमिकेत फिट्ट वाटतो. कितीही फालतू सिनेमा असो, अनिल कपूरचं काम फालतू दिसत नाही.

अनिल कपूर जास्त व्हर्सटाईल वाटतो>>> +१
कुठल्याही भूमिकेत फिट्ट वाटतो. कितीही फालतू सिनेमा असो, अनिल कपूरचं काम फालतू दिसत नाही.>>>+१

मला वाटतं, ते एका पीढीतले म्हणून तशी तुलना म्हणतोय फारेन्ड. ते सगळेच एकाचवेळी हीरो होते, म्हणून. >>> हो पूनमचे बरोबर आहे. त्यामुळेच म्हणत होतो. त्यांच्या दर्जामुळे नाही.

अनिल कपूरतर चांगला अभिनेता आहेच, मलाही आवडतो (पण 'जाँबाज' सारख्या रोल्स मधे जाम बोअर झाला होता, तसेच ते सो कॉल्ड कॉमेडी चित्रपट, 'नो एण्ट्री' वगैरे. मला त्यात फालतूच वाटला. पण 'मशाल' वगैरे मस्त). पण पुन्हा तो अमिताभपेक्षा व इतर बर्‍याच जणांपेक्षा सरस कसा काय? "आवडतो, व्हर्सटाईल वाटतो" ही वैयक्तिक मते असू शकतात, त्याबद्दल एरव्ही वाद नाही.

नासिरबद्दल नंदिनीशी सहमत. 'त्रिदेव' वगैरे सारखे अपवाद, पण त्यातही तो एक वेगळी भूमिका म्हणूनच आवडला. एक स्टार म्हणून आवश्यक असणारी स्टाईल वगैरे त्याच्याकडे नाही. त्या गाजलेल्या 'इश्कियॉ' मधेही तो भुरट्या चोराच्या मानाने जास्तच खानदानी वाटला.

फारेंड, अनिल कपूर 'नो एंट्री' वगैरे मधे आला तेव्हा त्याच्या बर्‍याच आधी त्याचा पडता काळ चालु होता त्यामुळे त्याचाही इलाज नसेल. पण तरी जे करतो ते प्रामाणिकपणे करतो, कधीही पाट्या टाकल्या आहेत असे जाणवत नाही. 'नो एंट्री' मधे पण त्याचा एक डायलाग आहे शेवटी, सलमान नागाला पाहुन गाणे म्हणु लागतो तेव्हा अ.क. म्हणतो, 'क्या आदमी है यार, ऐसे सिचुएशन मे भी गाना गाता है'. ह.ह.पु.वा. होते त्याचे ते वाक्य ऐकुन (त्या सिनेमात सलमान ने बोर केले आहे). अ.क. चा करिश्मा बरोबर एक 'रिश्ते' नावाचा खुप जास्त ड्रामा असलेला पडेल सिनेमा आला होता त्यात पण त्याने जीव तोडुन काम केले होतेच. तो उत्तम आहेच.

रसप, किमान १० अमिताभ / १० आमीर = १ नसिरुद्दीन शहा.... नसीर फंटास्टिक आहेच पण तरीही इतके जास्त ताणु नका हो. Happy ..
ह्यावरुन एक विचार मनात आला. नसीर ने ज्या भुमिका केल्या त्या बच्चनने कशा केल्या असत्या व त्या उलट झाले असते तर ते इतके प्रभावी झाले असते का?

बाय द वे, वरचे ते भयंकर गाणे नक्कीच कोणाचेतरी एप्रिल फुलच असणार म्हणजे मुद्दामच लोकांना कावरबावरं (इथे काही शब्द टाका, योग्य असा) करायला तयार केलेले. असे गाणे, गाणे म्हणुन गंभीरपणे कोणी तयार करुच शकत नाही.

आजचे चि.पुराण समाप्त.

ह्यावरुन एक विचार मनात आला. नसीर ने ज्या भुमिका केल्या त्या बच्चनने कशा केल्या असत्या व त्या उलट झाले असते तर ते इतके प्रभावी झाले असते का? >> बच्चनच्या बर्‍याच भूमिका नासीरलाही सहज जमल्या असत्या, सूट झाल्या असत्या कि नाही हा प्रश्न वेगळा आहे. नासीरच्या बर्‍याच भूमिकेंमधे बच्चनला बघणे मला तरी सहन होणार नाही.

कोणता अभिनेता सरस आहे वगैरे कसे ठरवायचे नक्की ? बर्‍याच जणांची मते ह्यबाबत एव्हढी ठाम आहेत हे वाचून आश्चर्य वाटते.

नसीर आणी ओम पुरी आर्ट फिल्मचे बादशाह होते. पण नसीर खरच त्रिदेव सोडला तर हिरो म्हणून शोभणे कठिणच. कमर्शियल मध्ये अमिताभ, विनोद, राजेश, धर्मेन्द्रच छान.

हो, अनिल कपूर मला पण आवडायचा. त्याचे काम तो प्रामाणीकपणे करायचाच. आणी तसा तो फारसा बोजड जाणवला नव्हता मधल्या काळापर्यंत. ( लोफर वगैरे) नंतर त्याने स्वतहुन बदल स्वीकारला ते बरे.

बिचारा ऋषी कपूर मागे पडला वाटतं या स्पर्धेत.

असामी, बच्चनच्या कुठल्या बर्‍याच भुमिका नसिरला जमल्या असत्या??? कांय ते 'जलवा' मध्ये दिसले आहे... त्यामुळे हे आम्हाला नाही सहन होणार..
आणि स्पर्श' मध्ये बच्चन नाही सहन होणार...
प्रश्न त्यांच्या सूट होण्याचा नव्हे तर प्रेक्षकांनी स्विकारण्याचा आहे.
दोघेही आपापल्या ठिकाणी ग्रेट आहेत. ही तुलनाच चुकीची आहे .

अनिलचा 'चमेली की शादी' आपल्या आवडीचा...त्या छाती पुढे करुन चालण्याची नक्कल तर चुलबुल पांडेही करतोय...

असामी, बच्चनच्या कुठल्या बर्‍याच भुमिका नसिरला जमल्या असत्या? >> तुम्हाला खरच असे वाटतेय का कि बागबान, मोहबते, बूम, आंखे, पा, K3G, जादुगार, तुफान, गंगा जमना सरस्वती, अक्स, रुद्राक्ष, देव, विरुद्ध, निशःब्द, चीनी कम, दिल्ली-६, अजूबा, अकेला, म्रुत्युदाता, मेजर साब, लाल बादशाह, सूर्यवंशम, खाकी वगैरे मधे बच्चन ने फरक पडला ? ह्या भूमिकांमधे प्रेक्षकांनी बच्चनला स्वीकारलय असे म्हणणे धाड्साचे वाटते. परत स्वीकारणे न स्वीकारणे हा conditioning चा भाग असतो हे विसरू नका. जे तुम्हा आम्हाला स्वीकारायला सोपे वाटले (बच्चन rulez) तेच आपल्या आधीच्या पिढीला कठीण गेले होते (त्यांच्यासाठी दिलीप्साब rulez होते). तुलना मीही करत नाहीये, फक्त वर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलय.

असामी, यातील खाकी, देव व बागबान मधे पडला. अमिताभच्या नासिरला भूमिका जमल्या असत्या पण त्यात तो ग्लॅमर आणू शकला नसता, जे चित्रपट लोकप्रिय होण्यासाठी आवश्यक आहे. तसेच नासिरच्या भूमिका अमिताभला जमल्या असत्या. पण त्याला तसे बघायला मला आवडले नसते (सचिन - द्रविड लॉजिक). एखादी भूमिका अभिनेता किती सखोल करू शकतो हे स्क्रिप्ट, दिग्दर्शक वगैरेंवर प्रचंड अवलंबून असते. सगळे त्याचे स्वतःचे कौशल्य असेल अशी शक्यता फार कमी आहे. सलीम-जावेदचे संवाद असलेल्या चित्रपटांतील अमिताभ (ज्यांना लक्षात नाही त्यांच्यासाठी: जंजीर, शोले, दीवार, त्रिशूल, काला पत्थर, डॉन, दोस्ताना, शक्ति आणि शान. यात इमान धरम चा अपवाद) आणि इतर चित्रपटांतील अमिताभ याची तुलना केली तर लगेच लक्षात येइल. हे जवळजवळ दोन वेगळे अभिनेते वाटतील एवढा फरक आहे.

मूळचे अभिनय कौशल्य, स्टार व्हॅल्यू, क्लास अपील, मास अपील, स्टाईल, मीडिया साठी न्यूज व्हॅल्यू, अनेक वर्षे इंडस्ट्रीत टॉप वर राहू शकणे याबाबतीत तुलना केली तर अमिताभ इतरांपेक्षा अनेक लेव्हल वर असेल. (केवळ अभिनेता म्हणून तो भारतातील सर्वोत्तम असेल असे मला म्हणायचे नाही).

बागबान, मोहबते, बूम, आंखे, पा, K3G, जादुगार, तुफान, गंगा जमना सरस्वती, अक्स, रुद्राक्ष, देव, विरुद्ध, निशःब्द, चीनी कम, दिल्ली-६, अजूबा, अकेला, म्रुत्युदाता, मेजर साब, लाल बादशाह, सूर्यवंशम, खाकी वगैरे मधे बच्चन ने फरक पडला ?
ही यादी बच्चनची नंतरची इनिंग आहे.. फारएण्ड म्हणतात त्याप्रमाणे हा ग्लॅमरचा भाग आहे. बच्चन होता म्हणून ही यादी लक्षात तरी राहिली. नसिर असता तर एवढी नांवं ११ मिनिटांत आठवली नसती.

फारएण्डच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन..

अमोल प्रश्न एव्हढाच होता कि "ह्यावरुन एक विचार मनात आला. नसीर ने ज्या भुमिका केल्या त्या बच्चनने कशा केल्या असत्या व त्या उलट झाले असते तर ते इतके प्रभावी झाले असते का?", ह्यात कुठेही "स्टार व्हॅल्यू, क्लास अपील, मास अपील, स्टाईल, मीडिया साठी न्यूज व्हॅल्यू, अनेक वर्षे इंडस्ट्रीत टॉप वर राहू शकणे " ह्या गोष्टींचा उल्लेख नाहीये. भूमिका झेपणे कि न झेपणे ह्यात स्टार असणे/ न असणे ह्याचा भाग येउ नये. अभिनय कौशल्य ह्या एकाच निकषावर तूच उत्तर दे. Happy (यातील खाकी, देव व बागबान मधे पडला हे वाक्य कळले नाही पण खाकी एक चांगला सिनेमा होता असे वगैरे सांगत असशील तर JTHJ ला पुढे ऑस्कर वगैरे मिळाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. Lol )

ही यादी बच्चनची नंतरची इनिंग आहे..>> दुर्दैवाने हि लिस्ट लक्षात ठेवण्यासारख्या लिस्टपेक्षा मोठी झाली आहे ह्याचा अंदाज आहे का तुम्हाला ? काही दिवसांनी फक्त हीच नावे आठवणार आहेत. "फारएण्ड म्हणतात त्याप्रमाणे हा ग्लॅमरचा भाग आहे." हे बरोबर आहे पण प्रश्न भूमिका झेपण्याचा होता कोणाचे ग्लॅमर प्रभावी आहे हा नव्ह्ता.

ह्या गोष्टींचा उल्लेख नाहीये. >>> पण माझी पोस्ट त्या एकाच पोस्टीबाबत नाहीये. या बाफवरच्या मूळ प्रश्नाबद्दल आहे.

यातील खाकी, देव व बागबान मधे पडला हे वाक्य कळले नाही>>> तू फरक पडला का विचारत होतास, या चित्रपटांत पडला असे म्हंटलो मी. मला खाकी बघितला तेव्हातरी आवडला होता. अमिताभचा रोलही चांगला होता. मला खरे म्हणजे त्याचे सध्याचे रोल्स आवडत नाहीत पण बागबान, आरक्षण मधे त्याने एकदम चांगले काम केले आहे (बंटी और बबलीत तर जबरीच केले आहे, तसेच सरकार वगैरे).

अभिनय कौशल्य या एकाच निकषावर उत्तर द्यायचे तर मी आधीच म्हंटले आहे की अमिताभ सर्वोत्तम अभिनेता आहे असे मला म्ह्णायचे नाही. पण या बीबीवर कोण ग्रेट आहे याची चर्चा चालू आहे, त्यात मी लिहीलेले सगळे फॅक्टर्स येतात. तरीही निव्वळ अभिनय कौशल्य जरी म्हंटले तरी त्याचे श्रेय त्या अभिनेत्याचे असेल असे नाही. स्क्रिप्ट चा अभ्यास करून एखाद्याने उपजत कौशल्याने ती भूमिका, सेटिंग वगैरेंचा विचार करून पहिल्यांदाच चपखल शॉट देणे व प्रत्येक रिटेक ला दिग्दर्शकाशी चर्चा करत इम्प्रूव्ह करत नेणे यातील फरक आपल्याला फक्त एण्ड रिझल्ट दिसत असल्याने कळत नाही. त्यामुळे अभिनय कौशल्याचे श्रेय सुद्धा मी फक्त अभिनेत्याला देणार नाही.

मला वाटते तू फक्त अभिनय कौशल्याबद्दल बोलतोयस आणि मी एकूणच स्टार्/अ‍ॅक्टर म्हणून असलेल्या स्थानाबद्दल.

मला वाटते तू फक्त अभिनय कौशल्याबद्दल बोलतोयस आणि मी एकूणच स्टार्/अ‍ॅक्टर म्हणून असलेल्या स्थानाबद्दल. >> होय. आणी तेही मी फक्त त्या वरच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलत होतो.

त्या अचाट गाण्याच्या हीरोला (??) कोपरापासून दंडवत. इतकं अचाट नाचायला काय हिम्मत लागत असेल. खरंच हसू आवरता आवरत नाहीये. Rofl

Pages