माझ्या ऑफिसातल्या रांगोळ्या - २०१२

Submitted by साधना on 12 November, 2012 - 10:53

सगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

माझ्या ऑफिसातल्या हौशी कलावंतानी दिवाळीच्या स्वागतासाठी घातलेल्या रांगोळ्या इथे देतेय.

खालची रांगोळी रंगवलेले तांदुळ वापर्पुन घातलीय.

खालच्या रांगोळ्या दस-यानिमित्त घातल्या होत्या -

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अगं ती तगरीची फुले नाहीयेत तर देवचाफ्याची फुले आहे. पॉइन्सेटीयाच्या लाल पानांवर मध्यभागी आणि बाजुला गोल देवचाफ्याची फुले लावलीत. त्याच्या भोवती पिवळी टिकोमा लावलीत. त्यानंतर हिरव्या पाने तुकडे करुन लावलीत. मग केशरी व पिवळ्या झेंडुच्या पाकळ्या आणि सगळ्यात बाहेरचा गोल ग्लिरीसिडियाची लांबट पाने लावुन केला. मलाही ही रांगोळी खुप आवडली.

सेव द अर्थच्या खाल्ची रांगोळी रंगित मीठ वापरुन घातलीय

मोरपीस प्रचंड आवडलं. दुसर्‍या फोटोतली थ्रीडी इफेक्ट असलेली रांगोळी फार सुंदर! फुलांच्या रांगोळया प्रसन्न करणार्‍या वाटतात. सगळ्या रांगोळ्यांतली मेहेनत जाणवते. मस्त!

छान! मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या. दिवाळि संपल्यावर या फुलांचे आणि तांदळाचे काय होते?

>>>>>ती मधली तगरीची फुलं असलेली एक खूप प्रसन्न आहे >>+१
काही काही रांगोळ्यांची कलर कॉम्बिनेशन्स फारच छान आहेत.

सर्वच रांगोळ्या फार सुरेख आहेत. त्यातही ती मोरपीसाची फारफार आवडली. तांदुळ वापरून काढलेल्यात ३डी ईफेक्ट मस्त आलाय. फुला-पानांच्याही मस्त आहेत. धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल Happy

मस्तच Happy

दिवाळि संपल्यावर या फुलांचे आणि तांदळाचे काय होते?

फुले सुकतात, तांदुळातला रंग हा रांगोळीचा रंग असतो, खायच्या प्रतीचा नसतो. त्यामुळे तांदुळही टाकुन द्यावे लागतात.

ऑफिसात साधारण ४-५ दिवस टिकतात या रांगोळ्या.

Pages