मायबोली दिवाळी गटग मुंबई २०१२

Submitted by घारुआण्णा on 8 November, 2012 - 22:32
ठिकाण/पत्ता: 
छत्रपती शिवाजी स्मारक, मासुंदा तलाव , ठाणे (पश्चिम)

"आण्णा दिवाळीची काय तयारी?गटगच काही ठरलय का?
"कुठे , कधी केव्हा भेटायचयं,?" मालक गटगच काय करायचय?"
हे असे भ्रमण ध्वनी आणी समस गेले ८ दिवस सगळ्याच उत्साही माबोकरांकडुन आणि हो काही कार्यग्रस्त संयोजकांकडुनही येत होते.....तर
मुंबईकर मायबोलीकरहो प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आपण दिवाळी गटग साठी भेटतोय , तीचे वेळ तेच
स्थळ
दिनांक: १४ नोव्हेंबर, २०१२(अर्थात बालदिन )
सकाळी १०.०० वाजता मायबोलीप्रमाण वेळेनुसार
छत्रपती शिवाजी स्मारक, मासुंदा तलाव , ठाणे (पश्चिम)

सर्व मुंबईकर,माबोकरांना सहकुटुंब सह परीवार हार्दिक आमंत्रण......
एकत्र भेटुन आमंत्रण्मध्ये (किंवा त्यावेळेस उपस्थित गण्संख्येच्या विचारानुसार कुठेही)अल्पोपहार.
पण घरचा फराळ मात्र आपण सगळे आणाल ही खात्री.
अधिक माहीतीसाठी संपर्क ९८१९९९३६३४

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Tuesday, November 13, 2012 - 23:30 to Wednesday, November 14, 2012 - 02:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डन

शैलजा बदल केलाय .... आमंत्रण हे सर्वंसाठीच आहे, पन सहसा कार्यव्यग्रतेमुळे मुंबईबाहेरचे कदाचित पोहोचु शकाणार नाहीत त्यांना उगाच हुरहुर लागु नये इतकच

बाबांची तब्येत खूप खराब आहे. ऑलरेडी जयसिंगपूरला आलेय. यंदा यायची फार इच्छा होती. पण जमणार नाही. सॉरी. तुम्ही मजा करा. Happy

अण्णा, जेवणाची काय सोय?? महेशला आणता येईल काही सोय असेल तर.. फिदीफिदी >> काहीही काय योडे?? गधडे.. तूच कर्णारेस ना त्यादिवशी सगळ्यांच्या जेवणाची सोय तुझ्या हॅप्पीवाल्या बड्डेनिमित्त.. Wink Proud

कालच ठाण्यात होतो.. काल गटग ठेवलं असतं आणि आधीच दिवाळी उरकली असती तर? Wink
दिवाळी गटगला यायचा प्रयत्न असेल. Happy

अरेरे.... १४ नोव्हेंबर ला वर्किन्ग आहे . नाही यायला जमणार...
ववी ला मायबोली दिवाळी गटग बद्दल खूप ऐकले होते आणि दिवाळी गटग ला यायचेच असे ठरवले होते...पण वर्किन्ग डे असल्यामुळे नाही जमणार. Sad

2varshapurvee divaLee gtg la gele hote! Mast vaTale sagaLyana bhetun!
Majja kara lokaho!!

अण्णा...
प्रत्येक नव्या प्रतीसादाला या धाग्याला 'बदलून' असं 'प्रमाणपत्र' मिळतंय...
ही विशेष मांडणी कशी काय केलीत?... ते सांगा जरा... Proud ...

मी लावेन हजेरी पण थोड्या वेळाकरताच... सुट्टी नाहीये!
हे शिवाजी स्मारक नक्की कुठे आहे तलावपाळीजवळ? (तलावपाळी = मासुंदा तलाव > बरोबर ना?)

ते काय म्हणणार ? आधीच राम म्हंटलाय... Happy

घारोबादादांनी मामलेदारची मिसळ जवळ पडत्ये म्हणून महाराज पसंत केल्येत...

घारु, तलावात घुसलेल्या शिवाजी पुतळ्याच्या रस्त्यावर गटगला सुरुवात करायची आयडिया मस्त आहे. तिकडे अगदी रस्त्यावर उभं असल्यासारखं वाटणार नाही आणि हवा तेवढा समोरासमोर कट्टा आहे गोंधळ घालायला Happy

आमंत्रण किंवा खवैय्या मध्ये जाऊ. आमंत्रण मध्ये मिसळीपेक्षा पाणीच जास्त ढोसलं जातं. खवैय्यात आमंत्रणसारखं वेटिंगही नसेल बहुतेक. हे मी पाचपाखाडी खवैय्या मध्ये झालेल्या मृण्मयी गटगवरुन म्हणतेय Wink मृण्मयी, खवैय्यामध्ये गेलो तर तुला तिकडे उचक्या लागतील गं Happy

सणानिमित्ताने बायकांना 'साडी' हा ड्रेसकोड ठेवूया काय? म्हणजे कम्पल्सरी नाही पण जमल्यास अवश्य... Happy

मायबोली दिवाळी गटग मुंबई २०१२>>> मुंबई २०१२ गटग ठाण्यातच केला पाहिजे असे आहे काय, मुंबईत करता येणार नाही का?

Pages