मायबोली दिवाळी गटग मुंबई २०१२

Submitted by घारुआण्णा on 8 November, 2012 - 22:32
ठिकाण/पत्ता: 
छत्रपती शिवाजी स्मारक, मासुंदा तलाव , ठाणे (पश्चिम)

"आण्णा दिवाळीची काय तयारी?गटगच काही ठरलय का?
"कुठे , कधी केव्हा भेटायचयं,?" मालक गटगच काय करायचय?"
हे असे भ्रमण ध्वनी आणी समस गेले ८ दिवस सगळ्याच उत्साही माबोकरांकडुन आणि हो काही कार्यग्रस्त संयोजकांकडुनही येत होते.....तर
मुंबईकर मायबोलीकरहो प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आपण दिवाळी गटग साठी भेटतोय , तीचे वेळ तेच
स्थळ
दिनांक: १४ नोव्हेंबर, २०१२(अर्थात बालदिन )
सकाळी १०.०० वाजता मायबोलीप्रमाण वेळेनुसार
छत्रपती शिवाजी स्मारक, मासुंदा तलाव , ठाणे (पश्चिम)

सर्व मुंबईकर,माबोकरांना सहकुटुंब सह परीवार हार्दिक आमंत्रण......
एकत्र भेटुन आमंत्रण्मध्ये (किंवा त्यावेळेस उपस्थित गण्संख्येच्या विचारानुसार कुठेही)अल्पोपहार.
पण घरचा फराळ मात्र आपण सगळे आणाल ही खात्री.
अधिक माहीतीसाठी संपर्क ९८१९९९३६३४

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Tuesday, November 13, 2012 - 23:30 to Wednesday, November 14, 2012 - 02:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

का नाही ? पुढच्या दिवाळीत नक्की करु... Happy

बादवे तूला ठाण्यात प्रवेशबंदी नाहीये ना रे ? मग ये की.

मुंबई जर जास्त लोकांना सोयीस्कर पडणार असेल तर मुंबईत करु....

हा का ना का

चला एक तरी मावळा निघाला, प्रांतिक दडपशाही विरोधात आवाज (क्षीण का असेना) उठवणारा. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो. देसाई, सोयीची शिष्टाई बरोबर सुचते तुम्हाला. लबाड ठाणेकर जाता येता फसवतात बिचार्‍या भोळ्या मुंबईकरांना.

भिडे, इन्द्र्या, आपण विद्रोही दिवाळी गटग करु सुयोग्य ठिकाणी. आणि तरीही काळ्या फीती लावुन पारंप(I)रिक गटगस हजेरी लावुच.

योडे, स्टेशनवरून सरळ जा अगदी फ्लायओव्हर जातो तोच रस्ता... मामलेदार मिसळीचा चौक लागेल तो ओलांडून तळ्याचा रस्ता पकडून सरळ चालत रहा. तुला दिसेलच महाराजांचा पुतळा.

मुह्हमद पर्वाताकडे येत नसला तर पर्वताने मुह्हम्दाकडे जावे.

तलावाकिनारीच आहे योडे. यक्झॅक्टली गडकरीच्या अपोझीट.

बाब्या.. गडकरीच्या अपोझिट काय रे... तिला काय शिवसमर्थ मध्ये पाठवतोस काय... Proud

झाले का गटग? वृ आणि प्रचि टाका लवकर. Happy

प्रयत्नशील आहे!

जमल्यास अवश्य भेटू. न जमल्यास किंवा तसेही,

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गटग छान झालं Happy

अमा, अम्या आणि सामोपचार ( Proud ) we missed you. You Tangaroos !!!
बाकी नोंदणी केलेले सगळे + आशुतोष ... यांनी शिवाजी पुतळ्याजवळ आणि आमंत्रण मध्ये नेहमीप्रमाणेच गोंगाटयुक्त धमाल केली.

योडीने महेशला माहेरी पाठवले आणि एकटीने इथे उंडारून मजा करुन मग सासरी रवाना झाली. नील, आनंदसुजु आणि आनंदमैत्री यांच्याशी नेहमीप्रमाणेच मस्त हि हा हू हू झालं. इंद्राची आणि मंजूडीची आठवण आली.

मेधीचं पिल्लू अ‍ॅज युज्वल सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन होतं. योगेश पहिल्यांदाच भेटला पण असं वाटलंच नाही की पहिल्यांदा भेटतोय. सावली, वर्षा, योडी, मी आणि योगेश असे निवांत कट्ट्यावर बसलो असताना घारुची एंट्री झाली आणि नंतर सरपटी बाण सोडणार्‍या पोरांवर योग्य ती कारवाई केली गेली Wink त्या आधी मी, घारु, योगेश आणि योडीने त्या पोरांना आपापल्या परीने एकेका पॅरेग्राफचं लेक्चर दिलं Proud तेवढ्यात लली आणि स्वाती आंजर्लेकर ह्या साडी परिधान केलेल्या छान ललना आल्या.

कविता आणि विन्या कंपनी उशीरा आल्याने जास्त गप्पा झाल्या नाहीत Sad . भर 'आमंत्रणात' संगीत खुर्ची खेळ हॉटेलच्या थेट दोन टोकांपर्यंत चालू होता. एकदाचे सेटल झाल्यावर सगळे मिसळीवर तुटून पडले. मी कॉफीवर समाधान मानल्याने मी सगळ्या खादाडांना ऑब्झर्व करत उभी होते Proud मध्येच विन्याच्या कॅमेर्‍याने फोटो काढले. मजा म्हणजे, मी तो कॅमेरा आधी आशुतोषच्या हातात पाहिला होता आणि आशुतोषचा कॅमेरा समजून त्यालाच "कॅमेरा कसा चालू करायचा आणि काय दाबायचं" असं विचारुन पिडलं. नंतर कळलं की मी खरंतर विन्याला पिडायला हवं होतं Uhoh Proud नंतर एका खांद्याला माझी कंडक्टर पर्स आणि एका खांद्याला ती कॅमेर्‍याची केस लटकवून खाली उतरले. नंतर आरामात विन्याने सुम्म्मध्ये येऊन ती काढून ताब्यात घेतली. आणि माझी स्वतःची मोठी पिशवी वरच आमंत्रण मध्ये सोडून आले ती मुग्धानंद हातात घेऊन खाली आली. मी 'आमंत्रण' मध्ये, मध्येच हरवल्यासारखी होऊन काय झालं? कशाबद्दल बोलताय? असं विचारताच मला मनी (मनिषा लिमये) म्हटलं गेलं Proud

लाजो आणि प्रमोद देव फोनवरुन उपस्थित होते Happy

तिथून टेम्प्टेशन मध्ये जाऊन आईस्क्रीम खाऊन गटगची सांगता झाली. आईसक्रीम खाता यावं म्हणून चिंतामणीपाशी माझी वाट पहात थांबलेल्या माझ्या मामेभावाला व वहिनीला मी पाठवून दिलं (तो ही मजा कर असं मनापासून बोलून न वैतागता परत गेला) आणि आईसक्रीम खाऊनच मामीकडे गेले. दिवस चांगला गेला.... धन्यवाद Happy

आज खरेच खुप मजा आली. योगेश आणि स्वाती हे नवीन मेंबर जुन्याच ओळखीचे आहेत असे वाटले. माझ्या लेकाला घारुअण्णांची खुप आठवण येत होती..कारण ते त्याला "कंबर तुटलेला फिश पहायला घेवुन गेले होते" (आता हे काय नवीन अण्णा? ) सावली, तिचे पिल्लु, सौ. अण्णा, चि. कु. अण्णा यांना पहिल्यांदाच भेटले.
अश्विनीने आणलेली जिलेबी मीच जास्त खाल्ली असेन. योडिची चॉकोलेटस माझी सोनपापडी यावर जमेल तसा ताव मारला.
वर्षा, आणि सावलीचा निरोप घेवुन मोर्चा आमंत्रण्च्या दिशेने वळविला. बराच वेळ खुर्ची साठी पळापळ करुन, परत मुळच्याच जागी येवुन, मिसळ आणि डोसे यांची ऑर्डर दिली. माझ्या लेकराला, भिडेपुत्राजवळच बसायचे होते. कारण त्याची खात्री पटली होती की खावुन झाले की पाण्यात जायचे आहे ( ववि की यांदे! )
मिसळ, (आनंदसुजु ची मिसळ जास्त यम्मी दिसत होती!) ताक, आणि परत जिलेबी यांचा आस्वाद घेवुन, बाहेर पडलो, तर मेधाची असावी अशी मोठी पिशवी वेटरने माझ्या हातात आणून कोंबली. (ती अश्विनीची होती; आणि अश्विनीची शोभेल अशी सॅक मेधाकडे होती.) मधल्यामधे आमच्या गोंगाटाने मेधाच्या पिल्लाची झोपमोड झाली बहुतेक.

Pages