झटपट कोंबडी वडे (शाकाहारी)

Submitted by deepac73 on 11 October, 2012 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी उडीद डाळ
२-३ मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता
२ वाटी तांदूळ पीठ
तिखट, हळद, मीठ चवीनुसार
२ मोठे चमचे तेल

क्रमवार पाककृती: 

१. उडदाची डाळ २-३ तास भिजत घाला. कमी वेळ असेल तर १ तास पण चालेल.
२. डाळ, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता मऊ वाटून घ्या.
३. तांदळाच्या पिठात चवीनुसार तिखट, हळद, मीठ घाला.
४. तेल कडकडीत गरम करून पिठावर घाला.
५. आता वाटलेली डाळ घालून थालिपीठासारखे पीठ भिजवून घ्या.
६. पुरी प्रेसने किंवा हाताने थापून वडे करून तेलात पुरीसारखे तळा.
७. गरम नुसतेच, चिकन्/मटण रस्सा कसेही छान लागतात.

अधिक टिपा: 

सीकेपी स्पेशल - चिकन्/मटण रस्श्याबरोबर एक्दम क्लासिक

माहितीचा स्रोत: 
साबा
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झटपट कोंबडी वडे (शाकाहारी)>>>>>>>>>> ???? नुसते वडे म्हण की मग. मी कित्ती आशेने आले बघायला तर कोंबडी कुठाय? Happy

जर हे वडे शाकाहारी आहेत तर ह्यांना कोंबडीवडे हे असे मांसाहारी नाव का बरे आहे? कोणी सांगु शकेल काय ?

कोंबडी वडे, हे एका मेनूचे नाव आहे. ते पण अलिकडच्या काळात प्रचलित झालेले. (पुर्वी इतक्या स्पष्टपणे कुणी म्हणत नसे. )
हे वडे तसे काळ्या वाटाण्याची आमटी किंवा तांदळाच्या खिरीबरोबर पण खातात. पण पारंपारीक वडे करणे तसे कौशल्याचे आहे. ( वडे करणारणीचा --ड पण काढावा लागतो, असा वाक्प्रचार आहे. तेज जाळासमोर बसून, पटापट वडे थापून, त्याला बोटाने मधेच भोक पाडून, ते नेमके तळणे, याला खरेच कौशल्य लागते ) त्यामानाने हे सोपे आहेत.