कल्पकता संयोजकांची-१ (दवंड्या, जाहिराती आणि रिक्षा) - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 15 September, 2012 - 18:32

यावर्षीच्या तिन्ही दवंड्या आणि जाहिराती आवडल्या, कल्पक वाटल्या असे बर्‍याच मायबोलीकरांनी आम्हाला सांगितले. या सगळ्याच जाहिराती इथे एकत्रीत स्वरूपात देत आहोत.

१) दवंडी पहिली

2012_Davandi_1_final.jpg

संकल्पना आणि मांडणी:-_मधुरा_ मजकुरः- शुगोल
***************************************

२) दवंडी दुसरी
Davandi 2

"ए शंभ्या, खातोयस काय वर्गात?"
"सर! खूप भूक लागलीय"
"जेवून नाही का आलास?"
"नाही! सर, आई किनई आज माबोच्या तोंपासु स्पर्धेसाठी पदार्थ करतीय."
"कोणासाठी काय करतीय?"
"माबोलीच्या, इ-गणेशोत्सवाच्या, 'तोंडाला पाणी सुटणे' स्पर्धेसाठी न-पदार्थ बनवतीय."
"न-पदार्थ?"
"हो सर! न-पदार्थ! म्हणजे काय की हस्तकलेच्या माध्यमातून, खाद्य पदार्थासारखी दिसणारी पण खाता येणार नाही अशी वस्तू बनवायची."
"अरे, वा! आणखी काय काय आहे म्हणे त्या इ गणेशोत्सवात?"
"सर खूप! 'गर्जा महाराष्ट्र माझा' ही गट-लेख स्पर्धा! मायबोली सभासदांचे विविध विषयांवरचे लेख, त्यांची सुश्राव्य गाणी, झालंच तर फोटो झब्बू, गणपतीची आरास, मुलांसाठी गाणी-गोष्टी उपक्रम, चित्रकला काय काय आहे. मी पण एक गोष्ट आणि गाणं रेकॉर्ड करुन पाठवणार आहे."
"वा! वा! धन्य आहे ही मायबोली! बरं ते खाणं संपव! हात धुवून ये आणि त्या मायबोलीच्या 'इ-गणेशाला' वंदन करुन अभ्यासाला सुरुवात कर बरं!"

संकल्पना आणि मांडणी:-_मधुरा_, दोन्हीकडील मजकुरः- शुगोल

******************************************

३) दवंडी तिसरी

2012_davandi 3_.jpg

चाल : 'जय गणराय नर्तन करी' (संदर्भ - घाशीराम कोतवाल)

जय गणराय नर्तन करी
'मायबोली' त्याला वंदन करी
वंदन करी हो वंदन करी
मायबोलीचे हे वारकरी

लिहा लेख, चढवा ची रंग
बाप्पाच्या सुंदर चित्रावरी
चित्रावरी हो चित्रावरी
मायबोलीचे हे वारकरी

मिसळम् गट्टम् पाककृती,
खादाडी होता, गाणी की गाती
सभासदांनो झब्बू द्यावा
मायबोलीवर किरपा ठेवा

किरपा ठेवा हो किरपा ठेवा
उत्सवाच्या खेळा यश द्या देवा
यश द्या देवा हो यश द्या देवा
मायबोली आहे तुमचाच 'ठेवा'

संकल्पना आणि मांडणी:- मधुरा,तोषवी. मजकुरः- शुगोल

*******************************************

जाहिराती

१)
maayaboli ganesha.jpg

रेखाटन, संकल्पना आणि मांडणी:- तोषवी, मजकुर:- शुगोल

*****************************************

२)
ganapati on udir.jpg

संकल्पना आणि मांडणी:- तोषवी, मजकुर:- शुगोल, युगंधर

*****************************************

३)
kampu-ad.jpg

संकल्पना आणि मांडणी:-_मधुरा_

******************************************

४)
ganesh symbol11.jpg

गणेशाच्या स्वागताला, दारी सडा नी रांगोळी
मायबोलीच्या गणेशा, वाही चित्रावर चारोळी !

गणेशाच्या उत्सवाला, घरी आरास सजवा
मायबोली गणेशाचे, चित्र रंगवा..सजवा !

गणेशाच्या उत्सवाला, नाना उपक्रम नी स्पर्धा
मायबोलीच्या कंपूंनो, माझा महाराष्ट्र गर्जा !

रेखाटन, संकल्पना आणि मांडणी:- तोषवी, मजकुर:- युगंधर

******************************************

५)
Bal-Ganesha.jpg
संकल्पना आणि मांडणी- तोषवी

६)
rikshaw1.jpg

संकल्पना आणि मांडणी:-_मधुरा_

७)
ताई माई आक्का, आवडत्या प्रवेशिकेवर मारा शिक्का Happy
काका दादा भाऊ, लवकर मतदान करा पाहू Happy

matadan.jpg
मतदान आणि परीक्षण : प्रवेशिकांची एकत्रित यादी - मायबोली गणेशोत्सव २०१२ इथे पाहायला मिळेल.

संकल्पना आणि मांडणी:- तोषवी

******************************************

गणेशोत्सवाच्या गप्पाटप्पा !

2012_saina-gp.jpgप्रसंग : सायना नेहवाल (सा ने) आणि पुल्लेला गोपीचंद (पु गो) लंडनहून परत येताहेत...
सा ने : दमले बुआ... एक तर खेळ खेळ खेळायचं, हिला हरव, तिला हरव...वर जरा मनासारखं खायला मिळेल तर तेही नाही. तिथे तुमची मेली ती शिस्त आडवी येते सारखी.
पु गो : मान्य. पण म्हणून तर टिकलीस ना.
सा ने : हे बरीक खरं हं गुर्जी. पण..पण.. आता मला खूप भूक लागली आहे... अब नही मै रुकुंगी, सारे बंधन तोड दुंगी, सारा जंक फूड खाउंगी... हिहाहाहा...
पु गो : नाहीSSS..(किंकाळी)...
(गातो - चाल : दिल्या घेतल्या वचनांची) पहिल्या वहिल्या कांस्य पदकाची, शपथ तुला आहे..
कन्ये, माझ्यावर विश्वास ठेव... मी आधीच याचा विचार केला आहे..मी तुला जंक फूड कदापि खाऊ देणार नाही..साधू..साधू..
सा ने : गुर्जीSSS (किंकाळी)...
पु गो : वत्से, लवकरच मायबोलीवर गणेशोत्सव आहे... उत्तमोत्तम पाककृतींचा नुसता पाउस पडेल पाउस..अर्रर्र..अशी धास्ताऊ नकोस.. नुसतीच हुल द्यायला हा काही मान्सुन चा पाउस नाही...
पाककलानिपुण अशा मायबोलीकरांच्या आंतरजालीय प्रायोगिक कृतींचा पाउस..अहाहा..काय ते प्रयोग...काय त्या कृती..मिसळम..पाकम आणि मग गट्ट्म गट्ट्म अ ग दी.. तों पा सु (स्वगत: हिला डाएट साठी मुद्दाम तों.पा.सु. पदार्थ सांगतो Wink )
सा ने : अय्या हो?
पु गो : इतकंच नाही, तोंडी लावायला चटकदार चारोळ्या, खा, खेळा, चघळा, झब्बू द्या..गाणी गा, चित्र रंगवा, आरत्या म्हणा...आहे कि नाही मज्जा?
सा ने : वा वा वा वा... गुर्जी जिंदाबाद... हे मी सुशील कुमार ला ही सांगते पटकन...
पु गो : अरेच्चा! शिंदेंना कशाला? त्यांचं आता वय झालंय. ते नाही हो खायचे.
सा ने : गुर्जी, विनोद कसले करताय? पैलवान सुशील कुमार म्हणतेय मी. बायकोच्या मागे भुणभुण करत होता... आलू प्राठ्यांसाठी...
पु गो : हो... हो... सांग त्याला...

जसा बाप्पा सायनाला पावला, तसा तुम्हा, आम्हा लाभो...
संकल्पना आणि मांडणी:-_मधुरा_, मजकुरः- युगंधर

*****************************************

* काही पोस्टर्स साठी आंतरजालावरील प्रताधिकार मुक्त चित्रांची मदत घेतली आहे, तसेच जिथे वेगळा परवाना वापरला आहे तिथे तसे नमूद केले आहे.
** सर्व संवादांत, लेखनात गरजेप्रमाणे फेरबदल करणे, भर घालणे, नवीन कल्पना सुचवणे इत्यादींमधे सर्व संयोजकांचा व सल्लागार मामी यांचा सहभाग आहे.

कल्पकता संयोजकांची-२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
.

सर्व संयोजकांचे आणि संबंधीतांचे अभिनंदन. गणेशोत्सव फार छान पार पडला. स्पर्धा खरंच कल्पक होत्या. एकदम स्तुत्य उपक्रम !! Happy

क्या बात है......... संयोजक, सल्लागार, आयोजक..........कमाल आहे !! एकदम दणक्यात झाला गणेशोत्सव !!
खूप खूप अभिनंदन Happy

सर्व जाहिराती कल्पक होत्या. सगळ्याच जाहिरातींमधील मांडणी/ मजकुर दोन्ही पण आवडले.
संयोजकांचे आणि त्यांच्या सर्व साथीदारांचे परत मनःपुर्वक अभिनंदन!

हे फार छान केलंत.

गणेशोत्सवातील दवंड्या, भित्तीचित्रे, रिक्षा नेहमीच खूप कल्पक असतात आणि यातल्या पडद्यामागचे कलाकार कोण हे जाणून घ्यायची उत्सुकता असते.

मधुरा, शुगोल, तोषवी, युगंधर, उत्तम कामगिरी!

मस्तच Happy

कोणत्याही उपक्रमाच्या रिक्षा, दवंड्या ह्याकडे माझं फार लक्ष जात नाही. त्याचप्रमाणे ह्याकडेही गेलं नाही पण खूपच कल्पकतेने संयोजकांनी स्पर्धा ठेवल्या होत्या. जास्त करुन तोंपासु. सुरवातीला त्याला एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं. पण गप्प बसतील ते मायबोलीकर कसले? स्पर्धकांनीही एक से एक आयडिया वापरुन पदार्थ बनवले होते.
उत्तम संयोजनाने गणेशोत्सव पार पाडल्याबद्दल संयोजकांचं अभिनंदन.