प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 07:30

मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्‍या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.

चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!

हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्‍यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का? Wink
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.

उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
Zabbu_003.jpg
आणि नवीन क्लू दिला- होडी

तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
IMG_1339.JPG
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)

चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्‍यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)

*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकतर फोटोही दिसत नाहिये आणि मल्टिप्लेक्स वरचा बित्तुचा फोटु गेल्याने क्लु बदललाय.
त्यामुळे काढुनच टाकतोय.

गांधीजींची खोली...तीन्हीबाजूंनी काचेची तावदाने आहेत

आँहाँहाँहाँ... काचेच्या घरासाठी माझ्याकडे अत्युत्कृष्ट फोटो आहे, पण मोबाईलात आहे Sad Sad Sad

कुणीच कसं ईमान उडवंना! Sad
मला इतक्या पटापट फोटो शोधायलाच होत नाहीये.
एखादा क्लु जमणार असेल तर रुमाल टाकेन. एकदा मला बी भाग घिऊ द्या मंग!

चला आता इमान उडू द्या कुनाचं तरी! Happy

गौरी छान फोटो ही गुगल काकांची देण... पण टायमिंग चुकले...
मंजु आज ऑफबिट फोटो का बरे टाकुन राहीली... Happy

airplane_0.jpg

पुढचा क्लु - धावपट्टी

DSCN2981.JPG

मंजु... गुगलवरुन घेतलाय फोटो... त्यामुळे शॉर्ट रनमधे काही प्रॉब्लम यायची शक्यता कमीये... तसं काही असेलच तर फोटो डिलीटता येईलच...
नी मी माझ्या भाच्यांचे सोडुन कुठलेच फोटो काढत नाही... पण ईमेजिस शोधणे हा माझ्या रोजी रोटीचा भाग आहे...

मी इतक्या वेळ मीच काढलेले फोटो शोधात आहे.. मला वाटले downlaod करून नाही टाकायचे .. नाहीतर काय मजा

रुमाल टाकायचा नाही असे सांगितले आहे ना संयोजकांनी मागच्या पानावर?

नेटवरून घेतलेले फोटो पण चालतात होय इथे?

प्रॉब्लेम येण्याबद्दल नाहीये हे. प्रताधिकारमुक्त असावा ही खेळाची अट आहे. तसं तर गुगलवरून शोधून किती फोटो टाकता येतील. मग मजा काय राह्यली खेळाला?

Pages