प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 07:30

मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्‍या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.

चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!

हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्‍यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का? Wink
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.

उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
Zabbu_003.jpg
आणि नवीन क्लू दिला- होडी

तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
IMG_1339.JPG
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)

चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्‍यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)

*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

रुमाल

Happy

ए, शिस्त म्हणून एक नियम इथे खेळणार्‍या सगळ्यांनीच कृपया पाळा.

जर फोटो रीसाईज वगैरे करण्यासाठी म्हणून रूमाल टाकणार असाल तर रुमालाबरोबर क्लू देखिल द्या म्हणजे बाकी मंडळी खोळंबून रहायला नकोत.

पण जर फोटो शोधण्यापासून कसरत असेल तर प्लिज रूमाल टाकू नका, खेळाची मजा जाईल.

जर फोटो रीसाईज वगैरे करण्यासाठी म्हणून रूमाल टाकणार असाल तर रुमालाबरोबर क्लू देखिल द्या म्हणजे बाकी मंडळी खोळंबून रहायला नकोत.
पण जर फोटो शोधण्यापासून कसरत असेल तर प्लिज रूमाल टाकू नका, खेळाची मजा जाईल. <<<
+१००००
दोन पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ रूमाल नकोच.

तसेच फोटो टाकताना आपल्या आधी ऑलरेडी कुणाचा फोटो पडला आहे का ते न बघता टाकू नका. खूप गोंधळ होतो.

शक्यतो क्लू ऑड आणि अवघड द्या गोंधळ चालू झाला असेल तर म्हणजे जरा वेग मंदावेल. आता कसा थंड पडलाय तसा Happy

Rofl
लयी भारी टकरा टकरी सुरुय.
क्लु देण्यामुळे जास्त टकरा टकरी झाली की माघार घ्यावी लागतेय. ह्यासाठी काय करता येइल?
फुलप्रुफ सिस्टीम पाहिजे. पेज रिफ्रेश करुन बघुन मी फोटो टाकेपर्यंत दुसर्‍याचा पडु शकतो.

फोटो मात्र मस्त येत आहेत.

आता कोळ्याचे जाळे म्हणून हा फोटो चालतोय का बघा, नाहीतर मी एडीट करते.

Giant Wheel.JPG

फोटो चालत असेल तर क्लू घ्या मशीन.

टकरा तर होणारच. पर्याय नाही. पण दुसर्‍याचा पडल्यावर तरी अ‍ॅटलिस्ट टाकायचा नाही हे करता येईल.
तसेच कुणाचा रूमाल असेल तर २ मिनिटे थांबायला काहीच हरकत नाही.

मंजूडी चालायला हरकत नाही. एवढ्या मोठ्या पाळण्यात कुठेतरी कोळ्याचे जाळे असणारच ना? Happy

ठिके

एवढ्या मोठ्या पाळण्यात कुठेतरी कोळ्याचे जाळे असणारच ना?>>> डोंबल Lol
मी कोळ्याच्या जाळ्यासारखी रचना म्हणून आपला तो फोटो टाकला.

काजूकतली :

kajukatali.jpg

क्लू : काळी पार्श्वभूमी

मी तर म्हणतो संयोजकानी एक क्लु द्यायचा आणि त्यावर दहा-पंधरा फोटो पडले की मग दुसरा क्लु संयोजकानी द्यायचा असं केल की गोंधळ कमी होइल. Happy

बित्तु एन्ट्री बाद असली तरी फोटो अहाहा आहे Happy

Pages