स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या, विंध्यवासिनी देवी ची जी आरती तू दिली आहेस सेम तीच आरती आमच्याकडे रेणुका देवी साठी म्हटली जाते. फरक फक्त विंध्यवासिनी देवी च्या एवजी रेणुककल्पक दंबे जय जय जगदंबे असे म्हणतात.

श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ गहन
गुरुपुत्रांसी सुगम सोपान
भावे घडता श्रवण मनन
लाभे समाधान अखंडित ||

उपासनामार्ग सापडे
योगसार हाता चढे
उघडती ज्ञानाची कवाडे
सहज घडे निष्कामकर्म ||

होवोनि अंतरंग अधिकारी
भावे अवलोकिता ज्ञानेश्वरी
साक्षात प्रकटे भगवान श्रीहरि
स्वये उद्धरी निजभक्ता ||

नित्य अंतरी ज्ञानदेव
सर्वांभूती भगवद्भाव
देव-भक्ता एकचि ठाव
अपूर्व नवलाव अनुभवावा ||

-स्वामी स्वरुपानंद (पावस).

सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज

नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसी सांगावे ।
हाचि सुबोध गुरुंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥

नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।
हाचि सुबोध गुरुंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥

आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।
हाचि सुबोध गुरुंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥

गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे ।
हाचि सुबोध गुरुंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥

स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे ।
हाचि सुबोध गुरुंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे ॥५॥

’माझा राम सखा, मी रामाचा दास’ नित्य बोलावे ।
हाचि सुबोध गुरुंचा, रामापाशी अनन्य वागावे ॥६॥

यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे तुझी सत्ता ।
हाचि सुबोध गुरुंचा, मानावा राम सर्वथा कर्ता ॥७॥

आचार संयमाने युक्त, असा नीतिधर्म पाळावा ।
हाचि सुबोध गुरुंचा, खेळाऐसा प्रपंच मानावा ॥८॥

दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा ।
हाचि सुबोध गुरुंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा ॥९॥

स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा ।
हाचि सुबोध गुरुंचा, मीपण जाळोनिया जगी वागा ॥१०॥

अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने ।
हाचि सुबोध गुरुंचा, मारावा तो समूळ नामाने ॥११॥

राज्याधिकार येवो, किंवा जावो समस्त धनमान ।
हाचि सुबोध गुरुंचा, भंगावे ना कदा समाधान ॥१२॥

प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी ।
हाचि सुबोध गुरुंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची ॥१३॥

रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती

अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो,
प्रतिपदे पासूनी घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र जप करुनी भोवती रक्षक ठेऊनी हो
ब्रह्मा विष्णु रूद्र आईचे पूजन करीती हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ॥१॥

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ठ योगिनी हो
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवत भांगी शेंदुर भरुनी हो
उदोकारे गर्जति सकळ चामुंडा मिळुनी हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ॥२॥

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो
अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ॥३॥

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो
पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो
भक्तांच्या माऊली सूर ते येती लोटांगणी हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ॥४॥

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो
अर्धपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो
रात्रीचे समयी करिती जाग्रण हरी कथा हो
आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडता हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ॥५॥

षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो
घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो
जोगवा मागता प्रसन्न झाली अंबा भक्तकुळा हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ॥६॥

सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो
तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता झेलूनि घेसी वरचे वरी हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ॥७॥

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगजननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो
स्तनपान देऊनि सुखी केले अंत:करणी हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ॥८॥

नवमीचे दिवशी नऊ दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवन सद्भक्ती करुनी हो
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो
आचार्यब्राह्मणा तृप्त केले कृपे करोनि हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ॥९॥

दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो
सिंहारुढ दारूण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी हो
शुंभानिशुंभादीक राक्षसा किती मारिसी रणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो ॥१०॥

संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा

अनादी निर्गुणं, निर्गुणं प्रकटली भवानी
मोह महिषासुरं, महिषासुरं मर्दना लागुनी
त्रिविध तापाची, करावया झाडणी
भक्तांलागी तू, पावसी निर्वाणी
आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेनं

द्वैत सारुनी, सारूनी माळं मी घालीनं
हाती बोधाचा, बोधाचा झेंडा मी घेईनं
भेदरहीतं, वारीस जाईनं
आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेनं

पूर्ण बोधाची, बोधाची भरीनं परडी
आशा तृष्णेच्या, तृष्णेच्या पाडीनं दरडी
मनोविकारं करीनं कुरवंडी
अमृतरसाची भरीनं दुरडी
आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेनं

नवविध भक्तीच्या, भक्तीच्या करीनं नवरात्रा
धरोनी पोटी मी, पोटी मी मागेनं ज्ञानपुत्रा
धरीन सद्भावं, अंतरीच्या मित्रा
दंभ संसार, सांडीन कुपात्रा
आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेनं

आता साजणी, साजणी झाले मी नि:संग
विकल्प नवऱ्याचां, नवऱ्याचां सोडीयेला संग
कामक्रोध हे, झोडीयले मांगं
केला मोकळा, मार्ग हा सुरंग
आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेनं

आईचा जोगवा, जोगवा मागुनी ठेविला
जाऊनी नवसं, नवसं महाद्वारी फेडीला
एकपणे मी, जनार्दने देखिला
जन्ममरणाचा, फेरा चुकविला
आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेनं
आईचा जोगवा, जोगवा, जोगवा मागेनं

अतिशय मधुर आणि करुणामय अशी रचना आहे ही. म्हणायला चाल लक्षात यावी आणि सोपे जावे म्हणून शेवट जिथे पूर्ण म्हणायचा आहे तिथे अनुस्वार आणि जिथे थोडं थांबायचं आहे, पॉझ घ्यायचा आहे तिथे स्वल्पविराम (कॉमा) दिलेला आहे.

एकश्लोकी रामायणः
आदौ रामतपोवनादि गमनं हृत्वा मृगं कांचनं
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणं
वालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनं
पश्चाद्रावणकुंभकर्णहननं एतादि रामायणं||

एकश्लोकी रामायण मस्त आहे. पश्चाद्रावणकुंभकर्णहननं याचा अर्थ काय? कुंभकर्णवध रावणाआधीच झाला होता ना?

अजून एक मारुती स्तोत्रः
श्रीमदांजनेयं प्रसन्नांजनेयं प्रभादिव्यकायं प्रकृतीप्रदायं
प्रशस्तप्रकायं भजे वायुपुत्रं भजे वायुगात्रं भजेहं पवित्रं
भजे सूर्यमित्रं भजे रुद्ररूपं भजे ब्रह्मतेजं हनुमंता अंजनीसूता
वायुपुत्र महाबला कपींद्र पिंगळाक्ष लंकाद्वीपभयंकरा
प्रभंजनसुता वीरा सीताशोकविनाशना
श्रीरामसखा रामकार्यधुरंधरा महात्मा वागीशा तारका मैनगिरीभंजना
निरंजनजितक्रोधः कदळीवनसंहृता ऊर्ध्वरेतस्का महासत्वा सर्वमंत्रप्रवर्तका
महालिंगप्रतिष्ठाता शिवध्यानपरा शिवपूजापरा | |

तो प्श्चात शब्द लंकादहनाच्या संदर्भात आहे. म्हणजे लंकादहन झाले. तत्पश्चत रावण - कुंभकर्ण यांचे हनन केले.

हे एकश्लोकी भागवत

आदौ देवकी देवी गर्भजननम् गोपीगृहे वर्धनम्

माया पूतन जीविताप हरणम् गोवर्धनोद्धारणम् ।

कंसच्छेदन कौरवादी हननम् कुंतीसुत पालनम्

एतद् भागवतम् पुराण कथितम् श्रीकृष्णलीलामृतम्।।

आम्ही या ऐवजी कुंतीतनुजावनं असे म्हणतो. नक्की काय आहे?

श्री विष्णूच्या १६ नावांचे स्तोत्र
(श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं)

औषधे चिंतयेद्विष्णुं भोजने च जनार्दनं
शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिं
युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमं
नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे
दु:स्वप्ने स्मरगोविंदं संकटे मधुसूदनं
कानने नारसिंहं च पावके जलशायिनं
जलमध्ये वराहं च पर्वते रघुनंदनं
गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवं
षोडशैतानी नामानि प्रातरुत्थायः पठेत्
सर्वपापविनुर्मुक्तो विष्णुर्लोके महीयते ||

शेळीताई,
आम्हीही "कुंतीतनुजावनं" असेच म्हणतो.
पण, हा श्लोक "शार्दूलविक्रीडीतात" असल्यामुळे "तनुजा" च्या ऐवजी "तनूजा" असे (मी तरी) म्हणतो.
किमान गणदोष तरी सुधारतो.
पण,
कुंतीतनुजावनं किंवा कुंतीतनूजावनं चा अर्थ काय? हे माहीत नाही.
तुम्ही लिहीलंय त्यातदेखील, "सुत "च्या ऐवजी "सुतं" केलं तरच गणदोष उरत नाही. पण तुम्ही म्हणताय ते पटतंय. किमान कुंतीतनुजावनं किंवा कुंतीतनूजावनं चा अर्थ कळत नाही तोपर्यंततरी.

धन्यवाद अश्विनी ताई ,ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांनी अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील हे स्तोत्र एकदा तरी जरूर ऐकावे......................नेट वर अनेक ठिकाणी उपलब्ध आहे!

श्लोक आणि स्तोत्र यांत फरक काय?क्रुपया मार्गदर्शन करा.
तसेच ५ वर्ष् वयाच्या मुलांना पाठांतरासाठी सोपे संस्क्रुत श्लोक सुचवा.

वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना ....... [ वाचनात आलेली ]
***************************************************

चिरंजीवी यथा त्वं भो भविष्यामि तथा मुने !
रुपवान्वित्तवांश्चैव श्रिया युक्तश्च सर्वदा ! १ !

मार्कण्डेय नमस्तेस्तु सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं प्रसीद भगवन्मुने ! २ !

चिरंजीवी यथा त्वं तु मुनिनां प्रवरो द्विज !
कुरुष्व मुनीशार्दुल तथा मां चिरजीविनम ! ३ !
...

मार्कण्डेय महाभाग सप्तकल्पान्तजीवन !
आयुआरोग्यसिध्द्यर्थं अस्माकं वरदो भव ! ४ !

जय देवि जगन्मातर्जगदानन्दकारिणि !
प्रसीद मम कल्याणि नमस्ते षष्ठीदेवते !५!

त्रैलोक्ये यानि भूतानि स्थावराणि चराणि च !
ब्रह्माविष्णुशिवै:सार्थं रक्षां कुर्वन्तु तानि मे ! ६ !

प्रार्थनेचा अर्थ : हे मुनिश्रेष्ठा , तू ज्याप्रमाणे दीर्घायुषी रुपधनबुध्दीने युक्त आहेस तसा मी सुध्दा होवो. हे आदरणीय मुनिश्वरा, दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी माझ्यावर प्रसन्न हो. सात कल्पांपर्यंत जीवन असणार्‍या महाभाग्यवान मार्कंण्डेय ऋषीश्वरा, आयुष्य, आरोग्य आणि यशासाठी आम्हाला वर देणारा हो. विश्वाची माता असणार्‍या, विश्वाला आनंदित करणा-या , माझे कल्याण करणा-या हे षष्ठीदेवी तुला नमस्कार असो. तू माझ्यावर प्रसन्न हो. त्रैलोक्यात ब्रह्माविष्णूमहेशासह स्थावर सचेतन आणि जे जे सजीव प्राणी आहेत ते माझे रक्षण करोत.

नमस्कार, मला श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड करायचा आहे. कुणी जर का लिंक दिलीत तर बरे होइल. गुगलून पाहिले पण नाहि मिळाली लिंक.

चांगले कलेक्शन आहे. श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच तुम्हाला खालील वेबसाईटवर मिळेल.
लसणे गुरुजी तुळजापूर यांची साईट: tuljabhavani.in

@अश्विनी के
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या "जयोस्तुते" या स्वतंत्रतादेवीवरील एकमेव आणि अद्वितीय स्तोत्राला या आपल्या संग्रहात स्थान मिळू शकते का? कि ते आधीच टाकले गेले आहे? मला सापडले नाही म्हणून येथे लिहीत आहे. देवाची स्तुती करणार्‍या रचनेला स्तोत्र म्हणतात असा माझा समज आहे. त्याअर्थी ते स्वतंत्रतादेवीवरील स्तोत्रच ठरेल ना? कि ते स्तोत्रच नाही? आपण ध्वनिमुद्रिकेत नेहमी ऐकतो त्यापेक्षा अधिक कडवी मूळ रचनेत आहेत असे ऐकले आहे. ती मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे.
शंकानिरसन कराल अशी अपेक्षा आहे.

|| जयोऽस्तु ते ||

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०३ मध्ये वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी लिहिलेले स्वतंत्रतादेवी वरील एकमेव, अद्वितीय आणि अजरामर स्तोत्र .

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची
स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी
स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली
तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची

मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं
स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण

( ऐकण्यात नसलेली उरलेली कडवी )

भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।

स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली

पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

- विनायक दामोदर सावरकर

Thanks ashwiniji...khup chan collection aahe...mala ghat sthapane badal mahiti havi aahe... pls milel ka ?

जिव्हा प्रार्थना
मत्प्रिय सखी मत्जिव्हे मयप्नुकंपां कुरुष्व नौमि त्वाम|
अन्यापवादरहिता भज सततमों नमः शिवायेति||१||
वाणी गुणानुनिलये त्वां वंदे मा कुरुष्व परनिंदाम|
त्यज सकललोकवार्ता भज सततमों नमः शिवायेति||२||
कट्वम्ललवाणतिक्तस्वादुकषायादिसर्वरसवांछाम|
जिव्हे विहाय भक्त्या भज सततमों नमः शिवायेति||३||
रसने रचितोयमंजलिस्ते परनिंदापरुषैलरं वचोभि: ||
दुरितापहं नमः शिवायेत्यमुमादिप्रवणं भजस्व मंत्रम||४||
इति श्रीमत आद्यशंकराचार्य विरचितं जिव्हा प्रार्थना संपूर्ण

अर्थ - (१) हे जिव्हे तू माझी खरोखरच अत्यंत आवडती मैत्रिण आहेस. मी तुला नमस्कार करतो. माझ्यावर दया कर. माझी एक प्रार्थना ऐक दुसर्‍या कोणाचीही निंदा चहाडी करु नकोस. ॐ नमः शिवाय हा मंत्र सतत जप. (२) ओज, प्रसाद, माधुर्य, सत्यत्व इत्यादि जे वाणीचे गुण आहेत, ते सर्व तुझ्याजवळ आहेत. मी तुला नमस्कार करतो. दुसर्‍यांची निंदा करु नकोस. दुसर्‍यांच्या सर्व व्यवहारांची सुद्धा चर्चा करु नकोस. लोकनिंदेत किंवा लोकांच्या अवगुणांची चर्चा करण्यात व्यर्थ काळ घालवू नकोस. ॐ नमः शिवाय हा मंत्र सतत जप. (३) तिखट आम्बट , खारट, कडू, गोड आणि तुरत इत्यादि सर्व रसांची इच्छा, षड्रस पक्वांनांची अभिलाषा सोडून देऊन, हे जिव्हे प्रेमाने , भक्तीने सर्व काळ ॐ नमः शिवाय हा मंत्र जप. ९४) हे जिव्हे मी तुला हात जोडून नमस्कार करतो, माझी कळकळीची विनंती ऐक, परनिंदेचे कठोर शब्द बोलण्याचे सोडून दे. सर्व पातकांचा निरास करणारा प्रणवपूर्वक नमः शिवाय हा मंत्र सर्व पापांचा नाश करणारा आहे म्हणून, ॐ नमः शिवाय हा मंत्र सतत जप.

सीमा गरुड, धन्यवाद Happy तुम्ही घटस्थापनेबद्दलची माहिती http://www.maayboli.com/node/5242?page=8 या ठिकाणी विचाराल का? तिथे या बद्दल तुम्हाला मार्गदर्शन कुणी जाणकार देतील. कारण मी घरी पारंपारिक रित्या घट बसवत नाही.

अत्यंत साध्याप्रकारे माझ्या घरचं नवरात्र असतं. एक कलश, त्यात अक्षता / पि़जर / सव्वा रुपया (आता चार आणे मिळत नाहीत म्हणून हाताला येईल ते नाणं :डोमा:), त्यावर ताम्हन, त्यात वस्त्र, त्यावर तांदूळ किंवा गहू आणि त्यात देवीचा फोटो असं ठेवते. रोज घटावर हळद कुंकू वाहून उपलब्ध फूल / गजरा/ वेणी अर्पण करते (रोज त्यावरच फुलं घालत राहात नाही, आधीचं फूल निर्माल्यात घालते) आणि देवीचा जमेल तितका(च) जप करुन नैवेद्य अर्पण करते. सकाळी ऑफिसला निघायची घाई असते त्यामुळे कधी दूध साखरच अर्पण करते नाहीतर एखादा गोड पदार्थ करुन अर्पण करते. मनात भाव मात्र ती आई (मी देवीला मातृरुपात बघते आणि पुजते) समोर बसली आहे आणि मी जे काही वेडंबागडं प्रेमाने करेन ते ती आनंदाने नक्कीच स्वीकारेल असा असतो. सकाळी किंवा संध्याकाळी देवीची आरती करते. नवरात्रात मातृवात्सल्यविंदानम आणि श्री रामरसायन ह्या ग्रंथांचे पारायण रोज जमेल तितके अध्याय / पानं वाचून पुर्ण करते. नवरात्रात एक रात्र कुठले तरी पठण करुन जागरण करते. अष्टमीला सुर्यास्ताला घटासमोर बसून साध्या ताम्हनात मूठभर तांदूळ घालून त्यावर कापूर प्रज्वलीत करुन देवीचा जप १०८ वेळा म्हणते. हा माझा साधासुधा अष्टमीचा होम Happy हे ताम्हन दसर्‍यापर्यंत ठेवून देते कडेला सरकवून. दसर्‍याला हा सगळा मांड उचलते. जे निर्माल्याबरोबर विसर्जन करण्याजोगे आहे ते विसर्जन, जे कुंड्यांमध्ये खत म्हणून चालू शकते ते कुंडीत, ताम्हनातले तांदूळ चांगले असतात ते कामवालीला वापरायला देते. नवरात्रीत देवीला साडीचोळी अर्पण करुन नंतर ती एखाद्या योग्य स्त्रीला (सवाष्णच पाहिजे असं नाही... तिला साडीचोळीची आवश्यकता आहे की नाही एवढाच निकष) देऊन टाकते.

झालं माझं नवरात्रं Happy

इथे कुणाला
परं धाम, परं ब्रह्म, परेशं पर.....इ. पासून सुरु झालेले गणपती स्तोत्र माहित आहे का/ श्री राधा कृत असे आठवते, पण कुठल्या 'पुराणे' ते आठवत नाही. तसेच पूर्ण स्तोत्र पण माहित नाही.
धन्यवाद.

Pages