अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

Submitted by मी-भास्कर on 31 July, 2012 - 03:36

अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

राजकारणात उतरल्यावर तर कुस्ती अशा विविध १०० अगडबंब सुमोंशी आहे हे नक्की.
Anna and corruption.jpg

आदरणीय अण्णा,
सादर दंडवत.
एक समर्थक या नात्याने हे पत्र.
कोणत्याही सत्तेला एक व्यवस्था चालवावी लागते. लोकशाही मार्गाने सत्ताप्रदान हा सर्वात उत्तम मार्ग मानला जातो. सत्तेचा कल कॆंद्रीकरणाकडेच असतो. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि अनिर्बंध सत्ता संपूर्ण भ्रष्ट करते. सत्तेतील माणसे भ्रष्ट होण्यापासून रोखण्यासाठी चांगली घटना, कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असते. आपल्या लोकशाही-व्यवस्थेत मुख्य सत्ता सत्तारूढ पक्षाकडे एकवटली आहे. विरोधी पक्ष स्वच्छ, जागरूक व प्रबळ असेल तर तो सत्तेवर अंकुश ठेवू शकतो. आपल्या इथे या सर्वांचे तीन तेरा वाजल्याने एक फार अवघड लढाई आपल्याला या वयात हाती घ्यावी लागली आहे.
भ्रष्ट व्यवस्थेत ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा अती बलिष्ट वर्गाशी हा संघर्ष आहे. यांच्याच आश्रयाला असलेला वर्गही प्रचंड संख्येने आहे. ही ताकदच संसदेत कोण जाणार हे ठरवते. याच व्यवस्थेने सर्वसामान्यांनाही इच्छा असो वा नसो भ्रष्टाचाराची सवय लावली आहे. किंबहुना असे म्हणता येईल की जवळपास प्रत्येक जण ( खर्‍या अर्थाने भ्रष्ट नसला तरी ) कोणत्या ना कोणत्या कारणाने भ्रष्ट ठरविला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कोणत्याही पाठिराख्याला ’भ्रष्टाचारी’ म्हणून ’अंदर’ करून बदनाम करणे सत्तेला सहज शक्य आहे. त्यामुळे शक्तीच्या दृष्टीने ही अगदी विषम लढाईआहे.
अंतीमतः पुरेशा संख्याबळाने तुमचे समर्थक संसदेत असल्याशिवाय भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी आवश्यक ते बदल होऊच शकत नाहीत. पाठीशी असणारे संख्याबळ जास्तीत जास्त वाढवणे हेच फक्त तुमच्या हाती आहे. सरतेशेवटी विरोधकांना निवडणुकीत पराभूत करून चळवळीच्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी संख्याबळ हवेच. तुमची ही शक्ती वाढूच नये याची पूर्ण खबरदारी तुमचे विरोधक घेताहेत आणि आपण त्यांच्या सापळ्यात नकळत अडकता असे आम्हाला वाटते.
तुमच्या मागे अल्पसंख्य व दलीत नाहीत असे आरोप केले की तुमची टीम इमेज क्रिएशनच्या मागे आपली शक्ती वाया घालविते. तुमच्या मागे संघ आहे म्हटले की तो कसा नाही हे सांगण्यासाठी आटापिटा केला जातो. आता उद्या तुमच्यात आदिवासी कोठे आहेत असे म्हटले की पुन्हा शक्तिव्यय. हे सर्व करतांना आपला शक्तीव्यय तर होतोच पण संख्याबळही वाढत नाही, असे आपल्याला वाटत नाही का? अगदी ताजे उदाहरण रामदेवबाबा आणी मोदी भेटीचे आहे. तुमचे विरोधक या भेटीबाबत आक्षेप घेऊन जुनेच 'डिव्हाईड अँड काँकर' चे तंत्र वापरत आहेत. उद्या कोणी आदिवासी नेता तुम्हाला पाठींबा द्यायला आला तर ते त्याला माओवादीही ठरवतील आणि तुमची देशद्रोह्यांशी हातमिळवणी आहे असे म्हणतील. मग पुन्हा शक्तिव्यय! असे असूनही आपण त्याच त्या सापळ्यात का अडकतां?
या ठिकाणी चर्चिलचे एक वाक्य आठवते. लढाईची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी जाहीर केले की "हिटलरचा संपूर्ण पाडाव करण्यासाठी मी सैतानाची मदत घेण्यासही मागेपुढे पाहाणार नाही."
इतक्या टोकाचे जरी नाही तरी -
" भ्रष्टाचाराच्या लढाईत प्रामाणिकपणे साथ देणार्‍या कोणाही भारतीयाची मी मदत घेईन." असे ठणकावून सांगण्यात आपल्याला काय अडचण आहे?
आणिबाणीविरुद्ध लढतांना जयप्रकाशांनी हेच केले होते आणि म्हणून ते जिंकले. त्यामुळे
' दिल्ली तो अभि बहोत दूर है| ' हेच खरे!

16 September, 2012
अण्णा नवी टिम निवडून आंदोलन सुरू करणार असल्याचे वाचले.
या नव्या टीमच्या आंदोलनाचा मागोवा घ्यायचा आहे खालील धाग्यावर :
http://www.maayboli.com/node/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@Kiran.. | 13 August, 2012 - 15:45
मी भास्कर
तुम्हाला कळले नव्हते तर थेट विचारण्याचा मार्ग मोकळा होता असं मला वाटतंय.<<

बरोबर. याचा अर्थ तुम्ही तुमच्या सोईकरता नेहमीच्या शब्दांना 'तुमच्या मनातले ' अर्थ लावायचे आणी मी तुम्हाला त्याचे अर्थ विचारत बसायचे! असेच ना?
असा माझा आणि तुमचा वेळ घालवण्यापेक्षा मी 'फामा' पसंत करीन.
'फामा' च्या अर्थासाठी हा घ्या रेडीरेकनर :
http://www.maayboli.com/node/36889

असो उद्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्यासह सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा!

@योग
लिंकवरील लेख चिंतनीय पण बराचसा एकांगी वाटला. मला वाटले ते असे:
'सामाजिक, शासकीय पातळीवर संतांची गरज ही अप्रगत समाजांना लागते. आधुनिक शासनप्रणाली असणाऱ्या देशांत सुधारणा या व्यवस्थेतूनच कराव्या लागतात. परंतु याची जाणीव नसणारे संत मग त्या व्यवस्थेलाच भ्रष्ट ठरवतात आणि ती बदलण्याची हाक देतात. व्यवस्था भ्रष्ट नसते, तर ती चालवणारे भ्रष्ट असतात. तेव्हा सुधारणा करायला हवी ती व्यवस्था चालवणाऱ्यांमध्ये. म्हणजे आपल्यातच! तसे करायचे तर दोष आपल्यातच आहे, हे मान्य करायला हवे. ते कसे करणार? त्यापेक्षा व्यवस्थाच बदलायची हाक देणे जास्त सोपे.. आणि अर्थातच आकर्षकही असते. <<

अहो आधुनिक शासनप्रणालि आणली म्हणजे कागदावर! त्यामुळे क्षणार्धात लोक प्रगत झाले का? आधुनिक शासनप्रणालितील मंत्रीदेखील तिला साजेसे बोलतात व वागतात काय?
तेव्हा मानवी मनातच दोष रुजलेला आहे. त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न अध्यात्म करत असले तरि फार प्रगति झाल्याचे दिसत नाहि. त्यामुले मनावर 'डिटरंट' उपचार हाच व्यावहारीक ठरतॉ आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात चूक काय आहे?

अति झालं.

प्रशासकांनी भास्कर यांच्या इथल्या पोष्टींकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती. हा वाद इथून सुरू झालेला आहे जो भास्कर यांनीच सुरू केलेला आहे. चौथ्या पानावरच्या तिस-या पोष्टीतला रुमाल हा शब्द त्यांना खटकलाय. त्याचे कारणही माहीत नाही. त्यांनी यासंदर्भात कुठलीही शहानिशा न करता थेट अवमानकारक भाषा वापरली याबद्दल त्यांना जराही पश्चात्ताप नाही. त्यांनी असे का केलेय हे न समजल्याने मार्मिक उत्तर दिलं पण त्यावर संयम सुटल्यासारख्या पोष्टी येऊ लागल्याने माबोच्या पॉलिसीनुसार इग्नोर केले.

पण त्यांना इग्नोर केल्यावरही ३- ३ दिवस माझ्या नावाने पोष्टी टाकत बसले होते. इथून पुढे त्यांनी इतरही धाग्यांवर शंख सुरू केल्याने तक्रार करावी लागत आहे. बाफवर वाद नको म्हणून विपुत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते समजून घेण्यास तयार नाहीत असं दिसतंय. त्याना वाद पेटता ठेवण्यात रस आहे अशी शंका येते आहे कारण त्यांनी विपूतले संभाषण कॉपी पेस्ट करून बाफवर द्यायला सुरूवात केली आहे.

एकदा बॅन झाल्यावर आपल्याबरोबर आणखीही कुणाला तरी बॅन करावे हा हेतू यामागे दिसून येतो.

>>@Kiran.. | 20 August, 2012 - 14:10 नवीन
अति झालं.
प्रशासकांनी भास्कर यांच्या इथल्या पोष्टींकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती. हा वाद इथून सुरू झालेला आहे जो भास्कर यांनीच सुरू केलेला आहे. इथे त्यांना इग्नोर केल्यावरही ३- ३ दिवस माझ्या नावाने पोष्टी टाकत बसले होते. इथून पुढे त्यांनी इतरही धाग्यांवर शंख सुरू केल्याने तक्रार करावी लागत आहे.<<

काहो किरण , मी वाद थांबवल्याचे प्रशासकांना आश्वासन देऊनही तुमचा अहंकार शमलेला दिसत नाही. माझा आय डी डिलीट होईपर्यंत वाद चालू ठेवण्याचे ध्येय तुमच्यासमोर आहे काय?

यात माझी कांहीही चूक नसतांना मी मात्र केवळ माझे आश्वासन पाळण्याकरता हा वाद थांबवलेला आहे असे प्रशासकांना पुन्हा निदर्शनाला आणीत आहे.

एका आय डिच्या अहंकारि स्वभावामुले ही चर्चा भरकटली. मी त्याचेच शस्त्र त्याच्याविरुद्ध वापरताच त्या आय डीने प्रशासकांकडे तक्रारी केल्या. आणि आता माझ्यावर बहिष्कार टाकण्याचे सर्वांना आवाहन केल्याने इथलि चर्चा रुळावर येऊ शकते. 'ए बून इन डिस्गाईस' !

इथे पुन्हा येण्याची कारणे दोन.
(१) राजकारनात पडण्याच्या इराद्यामुळे अण्णांचा लढा आणखीच विषम झाल्याचे मी म्हटले होते. मुळात निव्वळ भ्रष्टाचाराविरुद्धचाच लढा किति विशम होता ते दाखवणारे एक कार्टून आता मूळ लेखातच टाकले आहे [२७-८-१२].
(२) अण्णांना आवाहन :
अण्णा, राश्ट्रीय स्तर राहू द्या. इथे महाराश्ट्रात, तुमच्या मुळच्या कर्मभूमीत , तुमच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्यासाठी कामाचे केवढे प्रचंड डोंगर उभे आहेत तिकडे तुमचे लक्ष जाउ द्या ही प्रार्थना! एका केंद्रीय मंत्र्याला [बेनिप्रसाद वर्र्मा(?)] दुष्काळ पडल्यानेच इतका आनंद झाला कि त्याला तो झाकताही आला नाही. महाराष्ट्रातही दुष्काळी पेकेजेस येऊ लागली आहेत आनि त्याबरोबरच तुमच्यासाठी कामांचे डोंगर देखिल. कृपया विचार करा.

अण्णा आणि भ्रष्टाचार यांच्यामधील कुस्ती किति विषम आहे ते यथार्थपणे दाखवणारा इथला फोटो मूळ लेखातच टाकला आहे.
राजकारणात उतरल्यावर तर कुस्ती अशा १०० विविध प्रकारच्या अगडबंब सुमोंशी आहे हे नक्की.

@ग्रेटथिंकर v 1.0 | 26 August, 2012 - 15:06 नवीन
भास्करराव, तो 'सुमो' म्हणजे सुस्त पडलेली निर्ढावलेली हलकट जनता आहे...राजकारणी नव्हेत.
<<
'लोकशाहीत जशि प्रजा तसा राजा' असल्यामुळे तुम्ही म्हणता त्या सुमोचेच राजकारणी प्रतिनिधी असल्याने जनतेला लावलेली विशेषणे त्यानाही चिकटणार!

महाराष्ट्रटाईम्स मधे आलेला अतिउत्तम लेख :-

लहान मुले क्रिकेट खेळायला मैदानात उतरतात , तेव्हा प्रत्येकालाच एक तर हाती बॅट धरायची असते किंवा चेंडू. क्षेत्ररक्षण कोणालाच करायचे नसते. आपल्याला आता फलंदाजी करायला मिळणारच नाही हे एकदा स्पष्ट झाले की धटिंगण मुले खेळच उधळून लावतात. भारतीय जनता पक्षाचे नेते लहानपणी नक्कीच अशा मुलांपैकीच असतील. त्यांच्यातले ते बालपण अजूनही तसेच कायम आहे. बालपण निरागस असते असा उगाचच समज करून घेण्यात काही अर्थ नाही ; कारण भाजपच्या बालीशपणापायी संसदेत गेले चार दिवस निव्वळ गोंधळ आणि आरडाओरड सुरू आहे. भारतीय संस्कृतीच्या गौरवाची आणि मोठेपणाची जपमाळ सतत ओढणारा भाजप आपल्या इतिहासातली ' हम करे सो कायदा ' आणि ' हम कहे सो कायदा ' ही प्रवृत्ती संसदेतही आणू पाहत आहे.

कोळसा खाणींच्या वाटपाचे प्रकरण भाजपला उगाळायचे आहे , त्यात काहीच चुकीचे नाही. कॅगचे निष्कर्ष पाहता , त्याचा फायदा विरोधी पक्ष म्हणून भाजप घेणारच. परंतु कॅग म्हणजे काही न्यायालय नव्हे. कॅग म्हणजे काही चौकशी समिती नव्हे. कॅग म्हणजे काही अंतिम शब्द नव्हे. कॅग ही केवळ सरकारी व्यवहारांची तपासणी करणारी संस्था आहे आणि कॅगचे निष्कर्ष स्वीकारण्यापूर्वी किंवा झिडकारण्यापूर्वी संबंधितांची बाजू ऐकणे बंधनकारक आहे. भाजपला हे सगळे ठाऊक असूनही कॅगच्या अहवालावर कोणतीही चर्चा घडू न देता थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मानेवर सुरी ठेवण्याचा आततायीपणा तो करत आहे , यातच खरी मेख आहे. उद्या पुन्हा या देशावर राज्य करण्याची मनीषा बाळगणाऱ्या या पक्षाने आधी जबाबदार विरोधी पक्ष तरी होऊन दाखवावे. यात काँग्रेसची बाजू घेण्याचा हेतू नाही किंवा भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचाही मुद्दा नाही. ज्या आरोपावरून मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यावा असा हेका भाजपने लावला आहे , त्याबाबत मनमोहन सिंग यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे अथवा नाही , असा प्रश्न आहे. प्रथेनुसार खरे तर कॅगच्या अहवालावर पब्लिक अकाउंट्स कमिटीने आधी अहवाल सादर करायला हवा. या समितीचे अध्यक्षपद विरोधी पक्षाकडेच असते. हा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांत सादर झाल्यावरच त्यावर चर्चा होऊ शकते. म्हणजे मुळात सरकार या विषयावरील चर्चेलासुद्धा नियमावर बोट ठेवून नकार देऊ शकते. मात्र देशातले वातावरण , लोकांमध्ये सरकारी निर्णयांबद्दल निर्माण झालेला अविश्वास यामुळे सरकार चर्चेची तयारी दाखवित आहे. त्यालाही भाजप नकार देत आहे. याचा अर्थ एकच होतो की गोंधळ घालून आपल्या झाकल्या मुठीचे गौडबंगाल जगाला कळू द्यायचे नाही.

कोळशाच्या खाणींचा लिलाव होऊ शकला नाही ; कारण भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच त्याला लेखी विरोध केला होता. शिवाय ज्या पद्धतीने खाणींचे व्यवहार केले गेले , ती पद्धत भाजपच्या काळापासूनच अस्तित्वात होती. काँग्रस आणि भ्रष्टाचार या दोन शब्दांत किती सख्य आहे ते नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र कोळसाप्रकरणी भाजपला मनमोहन सिंग यांना कात्रीत पकडण्याची संधी मिळाली आहे. चर्चा घडून आली की मनमोहन सिंग त्या कात्रीतून बाहेर पडणार याची खात्री भाजपला आहे. हे सर्व सुरू असताना सूरजीतसिंग भल्ला यांनी आपल्या संकेतस्थळावर कॅगच्या या अहवालाचे जे काही धिंडवडे काढले आहेत , ते पाहण्यासारखे आहे. भल्ला हे राजकीय निरीक्षक आहेत आणि ते सरकारचे कठोर टीकाकार मानले जातात. कोळसा घोटाळा प्रकरणी कॅगने सरकारच्या नुकसानीचा आकडा सतत कसा बदलला आहे , कॅगचे अधिकारी अनेकदा लाख आणि कोटींमध्ये कशी गफलत करतात , हे सिद्ध करीत भल्ला यांनी अखेर तथाकथित कोळसा घोटाळ्यातली रक्कम कशी नगण्य होते , हे सिद्ध केले आहे.

एखाद्या देशद्रोह्याला कोणतीही चौकशी न करताच फासावर लटकविण्याची मागणी करणारे भावनात्मक बावळट लोक आपल्या समाजात खूप आहेत. भाजपनेही कोळसा प्रकरणी असा बावळट वेष धारण केला आहे. कोळसा पेटवायचा ; कारण त्यात मनमोहन सिंग यांच्या विश्वासार्हतेला आग लावण्याची संधी त्यांना दिसते आहे. मात्र त्यावर चर्चा नको ; कारण त्यामुळे कोळशावर लगेचच पाणी पडून भाजपच्या आकांक्षांचाच कोळसा होणार. अद्वातद्वा भांडणाऱ्यांचे , अकारण अकांडतांडव करणारांचे वर्णन करताना समर्थ रामदासांनी म्हटले होते , युध्द देखावे ऐकावे , स्वये युद्धचि करावे , मारावें की मरावे , तो तमोगुण. भाजपलाही तो तमोगुण लागला आहे

भास्करराव, तो 'सुमो' म्हणजे सुस्त पडलेली निर्ढावलेली हलकट जनता आहे...राजकारणी नव्हेत.

लगे रहो !!

चालु द्या तुमच

@किशोर८२
>> भल्ला यांनी अखेर तथाकथित कोळसा घोटाळ्यातली रक्कम कशी नगण्य होते , हे सिद्ध केले आहे. <<

हे राजकीय निरिक्षक कोणाच्या बाजूने उभे राहायचे हे आधी ठरवितात आणी मग त्यानुसार सिद्ध कर्तात.

>>भाजप आपल्या इतिहासातली ' हम करे सो कायदा ' आणि ' हम कहे सो कायदा ' ही प्रवृत्ती संसदेतही आणू पाहत आहे. <<

कोणत्या इतिहासातिल ते स्पष्ट कराल का?

>>एखाद्या देशद्रोह्याला कोणतीही चौकशी न करताच फासावर लटकविण्याची मागणी करणारे भावनात्मक बावळट लोक आपल्या समाजात खूप आहेत.<<

आणि देश्द्रोह्यांच्या आणि दहशतवाद्यांच्या सरबराईचे समर्थन करणारे अतिशहाणे लोकही विपुल आहेत.

'लोकशाहीत जशि प्रजा तसा राजा' असल्यामुळे तुम्ही म्हणता त्या सुमोचेच राजकारणी प्रतिनिधी असल्याने जनतेला लावलेली विशेषणे त्यानाही चिकटणार!
<<
वा!
हे सरकार तुमचे प्रतिनिधी आहे काय?
नसल्यास तुम्ही या देशाचे नागरिक नाही का?

केजरीवाल म्हणतात कोळशात भाजपही भ्रष्ट आहे ,बेदी बाई म्हणतात भाजपचे नाव घ्यायचे काम नाही.यावर या बालकांच्या मतांवर 'अण्णा टोळी'प्रमुखांचे काय फायनल व्हर्डिक्ट? त्यांचा बहुतेक धृतराष्ट्र झाला. पंतप्रधानांचा खुलासा ऐकला तर कदाचित सदन अणि लिकही कन्विन्स होतील म्हणून त्याना बोलूच द्यायचे नाही व आपले मूद्दे झाकली मूठ म्हणून ठेवायचे ही चाल लैच खाशी. त्यामुळे आपलीच विश्वासार्हता जातेय हे यांच्या लक्षात येत नाही क/? की आपल्या मुख्यमंत्र्यानी कोळशाचा लिलाव करूनका अशी (आपल्याच सांगण्यावरून) दिलेली पत्रे लोकाना कळतील ही भीती? समर्थकानी खुलासा करावा..:)

<इब्लिस | 27 August, 2012 - 16:31 नवीन
'लोकशाहीत जशि प्रजातसा राजा' असल्यामुळे तुम्ही म्हणता त्या सुमोचेच राजकारणी प्रतिनिधी असल्यानेजनतेला लावलेली विशेषणे त्यानाही चिकटणार!
<<
वा!
हे सरकार तुमचे प्रतिनिधी आहे काय?
नसल्यास तुम्ही या देशाचे नागरिक नाही का?>
>>> लोकशाहीत लोकप्रतिनिधी नोकर आहेत 'राजे' नव्हेत.

>>लोकशाहीत लोकप्रतिनिधी नोकर आहेत 'राजे' नव्हेत. <<
तत्वतः हे बरोबर आहे.
पण प्रत्यक्षात, जोवर लोकप्रतिनिधी सत्तेत आहेत तोवर राजाची कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे असेच लोकशाहित अपेक्शित नाही काय? राजेशाहीच्या काळात राजाची म्हणून जी कर्तव्ये असायची ती लोकशाहीत लोकप्रतिनिधिंची कर्तव्ये ठरतात त्याअर्थाने ते राजेच की!

@बाळू जोशी. | 28 August, 2012 - 06:26
>> की आपल्या मुख्यमंत्र्यानी कोळशाचा लिलाव करूनका अशी (आपल्याच सांगण्यावरून) दिलेली पत्रे लोकाना कळतील ही भीती? <<
काय काहो? विरोधकांचे प्रत्येक मत सत्त्ताधारी अमलात आणतात काय? मग 'सिबिआय' ला सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करा ही विरोधकांची मागणी का नाही मान्य करीत? सत्ताधारीही दुटप्पी नाहीत काय?

त्याअर्थाने ते राजेच की!>>>>भास्करराव, राजेशाहीतुन बाहेर या आणि मॅग्नाचार्टा/कार्टा वाचून घ्या...

@बाळू जोशी. | 29 August, 2012 - 09:04
कोणताही सत्ताधारी आणि कोणताही विरोधक हा दुटप्पीच असतो <<
मग आपल्या मते सत्ताधार्‍याचे दुटप्पीपण क्षम्य असे आहे काय?

अण्णा नवी टिम निवडून आंदोलन सुरू करणार असल्याचे वाचले.
या नव्या टीमच्या आंदोलनाचा मागोवा घ्यायचा आहे खालील धाग्यावर :
http://www.maayboli.com/node/37939

भास्कर , धागा काढल्याबद्दल धन्यवाद

बाकि नेटिझनांच्या प्रतिक्रिया वाचुन मजा आली. अण्णा, केजरिवाल, धर्माधिकारी, प्रशांत भुषण, अरुण भाटिया यांना नावे ठेवणार्या किती जणांनी या लोकांबरोबर काम केले आहे, किती दिवस त्यांच्याबरोबर घालवले आहेत, अथवा एकदा तरी बोलले आहेत का हे समजुन घ्यायला आवडेल.

एखाद्याच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी किती जणांनी या लोकांबरोबर काम केले आहे, किती दिवस त्यांच्याबरोबर घालवले आहेत, अथवा एकदा तरी बोलले आहेत का हे निकष असतात हे पाहून आश्चर्‍य वाटले. ओबामावर टीका करायला आता त्याच्याबरोबर राहूनही यावे लागेल असे दिसते....

बा.जो.,

ओबामावर जी टीका केलेली असते ती खरंतर त्याच्या निर्णयांवर असते. हीच भूमिका इतरत्रही घेणे इष्ट होय. म्हणजे मला म्हणायचंय की धोरणांवर टीका करावी. वैयक्तिक रीत्या नावे ठेऊ नयेत. Happy

आ.न.,
-गा.पै.

Pages