अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

Submitted by मी-भास्कर on 31 July, 2012 - 03:36

अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

राजकारणात उतरल्यावर तर कुस्ती अशा विविध १०० अगडबंब सुमोंशी आहे हे नक्की.
Anna and corruption.jpg

आदरणीय अण्णा,
सादर दंडवत.
एक समर्थक या नात्याने हे पत्र.
कोणत्याही सत्तेला एक व्यवस्था चालवावी लागते. लोकशाही मार्गाने सत्ताप्रदान हा सर्वात उत्तम मार्ग मानला जातो. सत्तेचा कल कॆंद्रीकरणाकडेच असतो. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि अनिर्बंध सत्ता संपूर्ण भ्रष्ट करते. सत्तेतील माणसे भ्रष्ट होण्यापासून रोखण्यासाठी चांगली घटना, कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असते. आपल्या लोकशाही-व्यवस्थेत मुख्य सत्ता सत्तारूढ पक्षाकडे एकवटली आहे. विरोधी पक्ष स्वच्छ, जागरूक व प्रबळ असेल तर तो सत्तेवर अंकुश ठेवू शकतो. आपल्या इथे या सर्वांचे तीन तेरा वाजल्याने एक फार अवघड लढाई आपल्याला या वयात हाती घ्यावी लागली आहे.
भ्रष्ट व्यवस्थेत ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा अती बलिष्ट वर्गाशी हा संघर्ष आहे. यांच्याच आश्रयाला असलेला वर्गही प्रचंड संख्येने आहे. ही ताकदच संसदेत कोण जाणार हे ठरवते. याच व्यवस्थेने सर्वसामान्यांनाही इच्छा असो वा नसो भ्रष्टाचाराची सवय लावली आहे. किंबहुना असे म्हणता येईल की जवळपास प्रत्येक जण ( खर्‍या अर्थाने भ्रष्ट नसला तरी ) कोणत्या ना कोणत्या कारणाने भ्रष्ट ठरविला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कोणत्याही पाठिराख्याला ’भ्रष्टाचारी’ म्हणून ’अंदर’ करून बदनाम करणे सत्तेला सहज शक्य आहे. त्यामुळे शक्तीच्या दृष्टीने ही अगदी विषम लढाईआहे.
अंतीमतः पुरेशा संख्याबळाने तुमचे समर्थक संसदेत असल्याशिवाय भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी आवश्यक ते बदल होऊच शकत नाहीत. पाठीशी असणारे संख्याबळ जास्तीत जास्त वाढवणे हेच फक्त तुमच्या हाती आहे. सरतेशेवटी विरोधकांना निवडणुकीत पराभूत करून चळवळीच्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी संख्याबळ हवेच. तुमची ही शक्ती वाढूच नये याची पूर्ण खबरदारी तुमचे विरोधक घेताहेत आणि आपण त्यांच्या सापळ्यात नकळत अडकता असे आम्हाला वाटते.
तुमच्या मागे अल्पसंख्य व दलीत नाहीत असे आरोप केले की तुमची टीम इमेज क्रिएशनच्या मागे आपली शक्ती वाया घालविते. तुमच्या मागे संघ आहे म्हटले की तो कसा नाही हे सांगण्यासाठी आटापिटा केला जातो. आता उद्या तुमच्यात आदिवासी कोठे आहेत असे म्हटले की पुन्हा शक्तिव्यय. हे सर्व करतांना आपला शक्तीव्यय तर होतोच पण संख्याबळही वाढत नाही, असे आपल्याला वाटत नाही का? अगदी ताजे उदाहरण रामदेवबाबा आणी मोदी भेटीचे आहे. तुमचे विरोधक या भेटीबाबत आक्षेप घेऊन जुनेच 'डिव्हाईड अँड काँकर' चे तंत्र वापरत आहेत. उद्या कोणी आदिवासी नेता तुम्हाला पाठींबा द्यायला आला तर ते त्याला माओवादीही ठरवतील आणि तुमची देशद्रोह्यांशी हातमिळवणी आहे असे म्हणतील. मग पुन्हा शक्तिव्यय! असे असूनही आपण त्याच त्या सापळ्यात का अडकतां?
या ठिकाणी चर्चिलचे एक वाक्य आठवते. लढाईची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी जाहीर केले की "हिटलरचा संपूर्ण पाडाव करण्यासाठी मी सैतानाची मदत घेण्यासही मागेपुढे पाहाणार नाही."
इतक्या टोकाचे जरी नाही तरी -
" भ्रष्टाचाराच्या लढाईत प्रामाणिकपणे साथ देणार्‍या कोणाही भारतीयाची मी मदत घेईन." असे ठणकावून सांगण्यात आपल्याला काय अडचण आहे?
आणिबाणीविरुद्ध लढतांना जयप्रकाशांनी हेच केले होते आणि म्हणून ते जिंकले. त्यामुळे
' दिल्ली तो अभि बहोत दूर है| ' हेच खरे!

16 September, 2012
अण्णा नवी टिम निवडून आंदोलन सुरू करणार असल्याचे वाचले.
या नव्या टीमच्या आंदोलनाचा मागोवा घ्यायचा आहे खालील धाग्यावर :
http://www.maayboli.com/node/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्याच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी किती जणांनी या लोकांबरोबर काम केले आहे, किती दिवस त्यांच्याबरोबर घालवले आहेत, अथवा एकदा तरी बोलले आहेत का हे निकष असतात हे पाहून आश्चर्‍य वाटले ओबामावर टीका करायला आता त्याच्याबरोबर राहूनही यावे लागेल असे दिसते....>>>

जर ओबांमा बरोबर रहाता येत असेल तर जरुर जा! पण ज्यांच्याशी बोलता येते, हाताच्या अंतरावर आहेत त्या लोकांनातर एकदा भेटुन या ! Happy

>>ओबामावर जी टीका केलेली असते ती खरंतर त्याच्या निर्णयांवर असते. हीच भूमिका इतरत्रही घेणे इष्ट होय. म्हणजे मला म्हणायचंय की धोरणांवर टीका करावी. वैयक्तिक रीत्या नावे ठेऊ नयेत.
<<

गापै,
म्हंजे एकंदर कांग्रेसच्या पालिश्या थोड्या चुकल्या आहेत. कांग्रेस चांग्लीच असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
Wink

ओबामावर टीका करायला आता त्याच्याबरोबर राहूनही यावे लागेल असे दिसते....

नाही, नाही. तसे काही नाही. ओबामाची पॉलिसी, वैयक्तिक ओबामा या कशालाहि शिव्या दिल्यात, विशेषतः भारतात बसून, तर मुळीच हरकत नाही. शिवाय मायबोलीवर तर काय, काय वाट्टेल ते लिहावे. खरे, खोटे, असभ्य काहीहि लिहावे!
मूळचे भारतीय पण आता अमेरिकन असलेले अश्या लोकांकडे त्याचे किंवा, त्याच्या असंख्य भक्तांपैकी कुणाचे तरी लक्ष जाते, विशेषतः निवडणुका जवळ आल्या म्हणून. अर्थात तो फक्त नाव, पत्ता बघतो, बाकी काही वाचत नाही. मग तो लगेच ओबामाला पुनः निवडून येण्यासाठी केलेल्या निधीला पैसे पाठवा, त्याला पुनः निवडून द्या. असे पत्र पाठवतो.
पण भारतातून भारतीयांनी टीका केली तर ओबामाचा कुत्राहि लक्ष देत नाही, मग भलेहि तो भारतीय, कुणातरी मंत्री असो.
पण सध्या तुम्ही भारतातून पत्र लिहीले तरी तो पैसे मागायला पत्र लिहील. बाकी तुम्ही काय म्हणालात त्याकडे मुळीच बघणार नाही. तुम्ही पैसे पाठवा, नि मग भारतात फुशारकी मारत हिंडा, की 'माझा अमेरिकन प्रेसिडेंट शी पत्रव्यवहार आहे, त्याला पैसे हवे होते तर मीच दिले. म्हणून तर त्याचा प्रचार चालू राहीला. नाहीतर काय जमणार त्याला!' Proud

>>ओबामावर टीका करायला आता त्याच्याबरोबर राहूनही यावे लागेल असे दिसते....<<
झक्की उवाच-
नाही, नाही. तसे काही नाही. ओबामाची पॉलिसी, वैयक्तिक ओबामा या कशालाहि शिव्या दिल्यात, विशेषतः भारतात बसून, तर मुळीच हरकत नाही. शिवाय मायबोलीवर तर काय, काय वाट्टेल ते लिहावे. खरे, खोटे, असभ्य काहीहि लिहावे!<<

@झक्की
माबोवर खरे/खोटे, सभ्य/असभ्य, खरे आयडी/खोटे आयडी, ...., ....., ......,..
यांना समान न्याय आहे असे मी पाहिले आहे. इथे समतेचे पालन केले जाते असे दिसून आले आहे.
एवढे लक्षात ठेवा बरंका.

अखेर अण्णांनी पुण्यात मीटिंग घ्यायचे ठरवले . त्यात धर्माधिकारी, दाभोळकर जाणार आहेत. महाराष्ट्राची ३०-३५ जणांची कार्यकारिणी पहाता तीच जुनी माणसे पुन्हा घेतली आहेत्.राळेगण परिवारातील शेख, असावा , सब्बन वगैरे. आणि त्यांचे ते भ्रष्टाचारविरोधी जन आन्दोलन पुनुरुज्जीवीत केले आहे. आता हे सगळे ठरवणार की राजकारणात पडू नये. मग उद्या दिल्लीत गेल्यावर केजरीवालचे आणि अण्णांचे मतभेद होणार व दोघे आपापल्या मार्गाने जाणार....

@बाळू जोशी. | 18 September, 2012 - 11:02
>> मग उद्या दिल्लीत गेल्यावर केजरीवालचे आणि अण्णांचे मतभेद होणार व दोघे आपापल्या मार्गाने जाणार....<<
आपापल्या मार्गाने गेले तरी त्यांचे काम एकाच ध्येयासाठी असल्याने एकमेकांच्या कार्याला पूरक असेच राहील असे मानायला हरकत नाही. केजरीवालचे तरूण रक्त आहे तेव्हां घेऊ द्यात त्यांना राजकारणात उडी. डिपॉझिट जप्त झाले म्हणजे कळेल त्यांना कि सुरुवातीला दिलेल्या चित्रांतील अण्णा-सुमोच्या जागी ते स्वतःच आहेत हे. आणि अशा १०० सूमोंशी झटापट व्हायची आहे. यदाकदाचित निवडून आलेच तर एक चांगला लढवय्या संसेदेत आहे हीही जमेचीच बाजू म्हणावी लागेल. नाहीतरी सरतेशेवटी हवे असलेल्या सुधारणा सम्सदेकडूनच करवून घ्याव्या लागणार. तेव्हां चळवळीची फार कांही हानी होईल असे वाटत नाही.

आ. अण्णा,
जनजागरणासाठी आपण देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार असे कळते.
महाराष्ट्राचे एक चीफ इंजिनियर श्री पांढरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणे लवासाप्रमाणे उडून जाण्याची शक्यता दिसत असतांना या वयात तुम्ही देशभर प्रवासाला जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच ठाण मांडून बसणे आवश्यक दिसते. इथेच १०० पेक्षा जास्त सुमो तुमच्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यांचा समाचार घेण्यासाठीच तुमची शक्ति तुम्ही राखून ठेवायला हवी.

अण्णांच्या टीममध्ये नव्याने आलेल्या माजी सेनाप्रमुखांनी पत्रकारांना एका वाक्यात उत्तर देऊन कटवले : भ्रष्टाचाराविरुद्ध जो जो लढतोय त्याला आमचा पाठिंबा आहे.
फार छान उत्तर !
आता आणखी एक सांगावे : भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत जो जो आम्हाला पाठींबा देईल आणि त्यासाठी काम करील त्याचा पाठिंबा आम्ही घेऊ. आम्हाला पाठींबा दिला की सरकार त्याच्यामागे हात धुवुन लागेलच. तो भ्रष्ट असेल तर शिक्षा करीलच. तो भ्रष्ट आहे कि नाही ते शोधायची यंत्रणा आमच्याकडे नाही. त्यामुळे ते शोधत बसण्यात आमची शक्ती आणि वेळ आम्ही दवडणार नाही.

बातमी [१३-४-१३] : बागपतात अण्णांकडे लोकांनी पाठ फिरवली.
असे होणारच होते असे वाटले म्हणूनच मी खालीलप्रमाणे लिहिले होते.

मी-भास्कर | 22 October, 2012 - 09:33
आ. अण्णा,
जनजागरणासाठी आपण देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार असे कळते.
महाराष्ट्राचे एक चीफ इंजिनियर श्री पांढरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणे लवासाप्रमाणे उडून जाण्याची शक्यता दिसत असतांना या वयात तुम्ही देशभर प्रवासाला जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच ठाण मांडून बसणे आवश्यक दिसते. इथेच १०० पेक्षा जास्त सुमो तुमच्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यांचा समाचार घेण्यासाठीच तुमची शक्ति तुम्ही राखून ठेवायला हवी.

@आदरणीय अण्णा
कुठे उतारवयात भारतभर फिरता आणि आपली शक्ती वांझोट्या सभांमध्ये खर्च करता?
इकडे महाराष्ट्रातच चिखलीकरासारखी हजारो प्रकरणे आहेत आणि ती दडपली जाणार आहेत. तुमच्या नेतृत्वाअभावी भ्रष्टाचाराविरुद्ध सर्व प्रयत्न विस्कळित झाले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार्‍यांचे फावते आहे. सिबिआय सरकारच्या ताटाखालचे मांजर असल्याचे सिद्ध होत आहे इतके सर्व चालू असतांना चुकीच्या रणनीतीने तुम्ही आणी केजरीवाल निष्प्रभ झाला आहात.
तुमच्या प्रयत्नाला हातभार लावणार्‍यांना तुम्ही निराश करताहात.

आ.अण्णा
१० एप्रिल १२ ला नवी दिल्ली मध्ये आपण नरेंद्र मोदी आणि नितीश्कुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा जाहीर गौरव केला होता आणी इतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याप्रमाणे काम केले पाहिजे असे सांगितलेत.
आज चेन्नईत मात्र मी मोदींची कधीच स्तुती केली नाही असे म्हणालात. शिवाय भाजप जातीयवादी आहे अशी राजकीय टीका टिप्पणीही केलीत.
अण्णा,
काय करताहात तुम्ही! मागे तुम्ही काँग्रेसविरोधी राजकारण करता असा तुमच्यावर आरोप होत होता म्हणून तुम्ही आता भाजप विरोधी होणार का?
तुम्ही भ्रष्टाचार या अगडबंब सुमोविरुद्ध्ची कुस्ती सोडून राजकीय भाष्ये करू लागलात तर तुमच्या आणि केजरीवालांच्या मध्ये फरक काय राहिला? सरळ आम आदमी पार्टीत जाणे जास्त चांगले.
तुम्ही आणि केजरीवालांनी हारण्यासाठीच रण्नीती आखली आहे अशी खात्री पटली, होती तीही आशा मावळली.

>>शिंदी हे झाड तुम्ही पाहिले नसेलच २५ वर्षापूर्वी तुम्ही गेले होते तेव्हा अण्णांच्या चरणाकडे पहतापहाता वर पाहिले असते तर तीही दिसली असती<<.

.............बाळू जोशी यांच हे विधान त्यांच्यावरील नैतिक संस्काराची मर्यादा स्पष्ट करणारे आहे हे नक्की. जो माणूस एका शुल्लक प्रतिसादात एव्हढी मर्यादा सोडून बोलू शकतो, त्याच्याकडून भ्रष्टाचारासारख्या मुद्दयावर प्रांमाणिकपणे बोलण्याची अपेक्षा काय करावी?

भ्रष्टाचाराविरूध्द लढणार्‍या त्या सर्व (अण्णा हजारे सहित ) लोंकांची भोमिका चूक होती कि बरोबर हे इथे बोंबलून सांगणार्‍या या तथाकथित टिका़कारांनी स्वता:चे आत्मपरीक्षण करावे. बघावे या लढाईत आपले योगदान काय आहे? मग बोलावे या सर्व मंडळींबद्दल.
बांधावरून शेती करणे खूप सोपे असते पण, पण शेतकर्‍यांच्या भावना समजण्या साठी शेतात घामच गाळावा लागतो. त्या नुसते बांधावर उभे राहून नाहि समजत. अर्थात तुम्ही या प्रतिसादावर देखील आपली तेलबुध्दी पाजळणार हे नक्की. पण कोंबडा झाकूण ठेवला म्हणून काय पहाट व्हायची थोडीच थांबते. तेव्हा तुमचे कोंबडा झा़कण्याचे उद्योग चालू द्या!

अविनाश खेडकर | 21 July, 2013 - 11:46नवीन
भ्रष्टाचाराविरूध्द लढणार्‍या त्या सर्व (अण्णा हजारे सहित ) लोंकांची भोमिका चूक होती कि बरोबर हे इथे बोंबलून सांगणार्‍या या तथाकथित टिका़कारांनी स्वता:चे आत्मपरीक्षण करावे. बघावे या लढाईत आपले योगदान काय आहे? मग बोलावे या सर्व मंडळींबद्दल.
<<

अहो आम्ही सर्वसामान्यांनी दिलेला पाठिंबा पाहूनच आ. अण्णांना अटक करणार्‍या सरकारच्या घाबरलेल्या पंतप्रधानांनी संसदेत अण्णांना चक्क सॅल्यूट केला. पण अणांच्या चुकीच्या रणनीतीने आंदोलनातील जोशच निघून गेला. सत्तापक्षाने अचूक रणनीतीने आंदोलनाला धोबीपछाड मारला. आम्ही दिलेल्या योगदानावर बोळा फिरला. भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई आता त्या जोमाने उभी राहाणे फार अवघड आहे.

दि. म. : (१)अण्णा पुन्हा दिल्लीत उपोषण करणार (२) युपिए लोकपाल बील आणणार.
अण्णा आणि काँग्रेस यांच्यात कांही समझोता झाला आहे की काय?
असे वाटण्याचे कारण म्हणजे अण्णांनी अचानक नरेन्द्र मोदींविरुद्ध केलेले राजकीय भाष्य हे होय.
तरीही आ. अण्णांना त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध्च्या लढाईत यश येवो.

<<तरीही आ. अण्णांना त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध्च्या लढाईत यश येवो. >>
आयला, आ. अण्णांची लढाई अजुन चालु आहे? कि भ्रष्टाचाराचा मुद्धा बॅक बर्नर वर आहे? Happy

राज
आयला, आ. अण्णांची लढाई अजुन चालु आहे?
<<
हो. पण अण्णांच्या चुकीच्या रणनीतीने त्या लढाईचा पार खेळखंडोबा झाला.

अण्णा काँग्रेस वर दुगण्या झाडत होते तेव्हा लैच उकळ्या फुटत हुत्या. आता तुमाले लाथा झाडतय तर लैच जड जातय...

रॉबीनहूड | 28 July, 2013 - 09:36नवीन
अण्णा काँग्रेस वर दुगण्या झाडत होते तेव्हा लैच उकळ्या फुटत हुत्या. आता तुमाले लाथा झाडतय तर लैच जड जातय <<
या दोन्ही गोष्टी त्यांनी केंद्रस्थानी सत्तेवर असलेल्यांविरुद्ध झाडायला हव्या होत्या. मग तेथे कोणताही पक्ष येवो. याची कारणे या आधी दिली .आहेत.

Pages