शेंगदाण्याची सोलापुरी पद्धतीची झटपट चटणी - shengdana chatni

Submitted by अवल on 22 August, 2012 - 00:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाजलेले शेंगदाणे १ किलो ( न सोललेले )
लसूण पाकळ्या १०
तिखट ५ चमचे
मीठ १ चमचा
शेंगदाण्याचे तेल अर्धी वाटी

क्रमवार पाककृती: 

मूळ सोलापूरी शेंगदाणे आकाराने मोठे अन तेलाचे प्रमाण जास्ती असणारे असतात. इतरत्र मिळणार्‍या शेंगदाण्यांना तेव्हढे तेल सुटत नाही. त्यामुळे इतरत्र मिळणार्‍या शेंगदाण्याची चटणी वेगळी होते. त्यावर शोधून काढलेला हा पर्याय आहे.

भाजलेले शेंगदाणे (सालासकट), लसूण, तिखट, मीठ आणि पाव वाटी शेंगदाणा तेल कढईत घ्यावे.

1345605193620.jpg

मंद गॅसवर थोडा वेळ परतावे. चांगले खरपूस झाले की गॅस बंद करावा.

1345605219024.jpg

गरम असतानाच हे सर्व मिक्सरमध्ये "विप"वर दोनचारदा फिरवावे. अधमुरे वाटलेले थोडे काढून ठेवावे.

1345605241526.jpg

यात लसून आला असेल तर तो काढून पुन्हा मिक्सरमध्ये घालावा.
आता मिक्सरवर हे बारीक वाटावे.

1345605266692.jpg

आता मघाशी काढून ठेवलेले अधमुरे वाटलेले पुन्हा मिक्सरमध्ये घालावे. त्यात पाव वाटी शेंगदाणा तेल टाकावे. अन मिक्सर पुन्हा एकदा फिरवावा.
तयार आहे खमंग, झणझणीत शेंगदाण्याची चटणी.

1345605311503.jpg

अर्धातास तशीच ठेवली की असे तेल सुटते. अन तोंपासु दिसते Happy

1345605291570.jpg

वाढणी/प्रमाण: 
झेपेल तेव्हढे ;)
अधिक टिपा: 

यात शेंगदाणा तेलच वापरावे तरच चव पर्फेक्ट येते. इतर तेलांनी ती मजा येत नाही.
या चटणीत खाताना दही घालून खावे. एकतर चवही मस्त लागते अन पचायलाही बरे पडते Wink

माझा नवरा सोलापूरला राहिलेला. पुण्यात अनेक वर्षे राहिला तरी त्याला सोलापूरचे भारी प्रेम Sad लग्न झाल्यापासून सोलापूरच्या चटणीची अती कौतुकं ऐकली. अन माझी नेहमीच्या पद्धतीची चटणी नाकं मुरडत खालेली. मग एकदा सोलापूरची चटणी बघितली, खाल्ली. अन मग केला हा प्रयोग. आता अगदी नावाजत खातो Happy
shengdana chatni in marathi solapur

माहितीचा स्रोत: 
स्वतः केलेला प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख दिसते आहे.
मी अंजलीने लिहील्यानुसार करत होते. आता अशीही करुन पाहीन. धन्यवाद. Happy

अवल एखाद-दोन वाट्यांचे वगैरे प्रमाण देशील का कृपया. १ किलो संपणे अवघड आहे थोडेसे.

यम्मी दिसते आहे. सोलापूरच्या बाहेर एक जंगली म्हणून हाटेल आहे तिथे गरम भाकरी व चटणी मिळते. मी पण दही घालून खाणार्‍यातली. १०० ग्रॅमची करून बघते. Happy

शेंगदाणे भाजताना सुरुवातीला पाव वाटी शेंगदाणा तेल घ्यायचे आणि पुन्हा मिक्सरमधून काढतानाही घ्यायचे का? मस्त दिसते आहे चटणी.

मस्त पाककृती. पण मनापासून, तुमच्या इतर पाककृतींचा परिणाम यावेळी मनावर झाला नाही. (मी ही चटणी खाल्ली आहे म्हणून नव्हे, पण एकुणच ही चटणी मला आपल्या ठेच्या / खरड्यापेक्षा माईल्ड असल्याने एवढी का डोक्यावर घेतली जाते हे समजत नसल्याने असेल)

पण अर्थातच, तुमच्या पाककृतींचा धागा असल्याने वाचत राहणारच

मस्त. तोंपासु Happy
पोळ्या झाल्यावर ५ पाकळया ल.+४ हि.मी.+२०-२२ शे.भाजलेले, त्याच तव्यावर एक छोटा चमचा तेलावर परतून खलबत्त्यात ओबड धोबड कुटून अशी झटपट चटणी मी नेहेमी करते. Happy

सोलापुरात कोरडीच खाल्ली होती हि, हा प्रकारही चांगला दिसतोय.

एका मायबोलीकराच्या घरी नाशिक / जुन्नर भागातली दाण्याची चटणी खाल्ली होती. तो जरा वेगळा प्रकार होता.

आमची नेहमीच्या वापरातली चटणी Happy भात, पोळी रोल कशाही बरोबर मस्त लागते.
पण आम्ही लसूण भाजून घेत नव्हतो, आता हे असं करून बघेल.

मस्त..मस्त...शेवटचा फोटो बघून गावच्या कुटलेल्या चटणीची आठवण झाली. आमच्या कडे कायमच असते. साबांना एकदम मँडेटरी असते रोज जेवताना. त्यांमुळे तेल घालायची युक्ती गुपितच ठेवलेली बरी. बाकी कुटलेल्या चटणीला असेच तेल सुटते. आमच्या इथे थोडासा गुळ सुध्धा घालतात आणि खाताना दही हवंच. अस्सल चटणीचा तिखटपणा दह्यामुळे पचणेबल होतो.

मस्त,

यांतच २ मूठ भाजलेले काजू घालायचे मिक्सरमधे बारिक करताना....सोलापूरी 'नसले' ब्रँडसारखी होते अगदी.

शेंगदाणे + शेंगदाणा तेल ऐवजी डायरेक्ट पिनट बटर ( मीठ नसलेलं ) वापरून पण मस्त होते. मग फक्त लसूण, तिखट, मीठ, काजू थोडे परतून पिनट बटर सहित कुटावेत / वाटावेत / मिक्सरमधे एकजीव करून घ्यावेत, मस्त क्रिमी होते.

अवल, मस्त कृती! शेंगदाणा तेल नाहीये त्यामुळे करून पाहणे अवघड आहे.. फोटो झकास!!

अर्पणा बेस्ट अल्टरनेटीव्ह! खूप पिनट बटर आहे घरात. करता येईल आता. Happy

मस्तच गं अवल!! करुन पहाणार नक्कीच!
आमच्या ऑफीसातली एक जण आणते डब्यात सोलापुरी चटणी. पंढरपुर सोलापुर हायवेवर एक गाव (लांबोडी की काय म्हणाली ब्वॉ) आहे म्हणे,तिथे या चटण्या मिळतात...दोनच दुकानात. सोलापुरी मोठे शेंगदाणे उखळामधे कांडुन कांडुन त्याला तेल सुटलेले असते.

धन्यवाद सर्वांना Happy
मला दाट संशय आहे त्या "सोलापूरी" चटणीवर. नक्की त्यांनी माझी रेसिपी पळवलीय Wink
रैना, निम्मे कर प्रमाण. ही चटणी चांगली १-२ महिने टिकते Happy
शैलजा, हो. त्या शिवाय ती "तेलकट" नाही होत Wink अन म्हणूनच दह्याबरोबर खायची.
साती, नवरा जरी सीकेपी असला तरी बाटलाय, ब्राम्हणच झालाय Wink त्याला लसूण नाही फार चालत. अन मी खालेल्या सो कॉल्ड सोलापुरी चटणीतही लसणाची चव फार कमी होती. नक्की कोकणातलीच असेल Lol
अपर्णा, अगदी अगदी Happy काजू टाकले की अजून भारी लागते.

अवल.............खूप दिवसापासून मला करुन पहायची होती अशी चटणी, मस्त दिसते आहे.......तो. पा. सू.

सोलापूरची सुप्रसिद्ध "नसले शेंगा चटणी" माझ्याकडे मुंबईत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
एकदा जरुर चव चाखून पहा..
अधिक माहिती साठी मला संपर्कातून मेल करा अथवा विपु करा.

अरे वा! आम्हा सोलापुर माहेरवाशिणींची चांगलीच सोय झाली. नक्की संपर्क करते तुला.

हो, शेंगदाण्याबरोबरच तिखटदेखील थोडा वेळ परतायचे. त्यामुळे जास्त खमंग होते चटणी Happy

करून पाहीली.. मस्त झाली होती.. कृतीबद्दल धन्यवाद.. आता विकत आणण्यापेक्षा घरीच तयार करीन...
पुण्यात कुठे सोलापूरी शेंगदाणे मिळतात? मंडईत म्हणाले की आतशी जास्ती लाल शेंगदाणे नाही मिळत...

जबरी Happy

Pages