Submitted by पुरंदरे शशांक on 16 August, 2012 - 05:55
श्रावण गीत
अंगाखांद्यावर थेंब..... थेंब अलवार
थेंब श्रावणाचे बाई .....थेंब मऊशार
मस्त माजलेलं बाई ....रान तालेवार
रानफुलं अंगावर ..... किती रंगदार
श्रावणाचं ऊन बाई ..... ऊन हळुवार
जरा चमकता झालं ..... सप्तरंगी पार
चमकती उन्हात या ...... थेंब कळीदार
लक्ष दर्पणांनी बाई .......खुललं शिवार
किलबिल वाढली गं ..... रानातूनी फार
भेटेना साजणी होई ...... पाखरु बेजार
टाळ घुळघुळा वाजे ....... देवळात दूर
कान्हा जल्मता रातीचा ..... नदीला गं येई पूर
श्रावणाचं रुप टाकी ..... जीवा मोहवून
दीठ याची काढा कुणी ..... मीठ ओवाळून
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुपच सुंदर,
खुपच सुंदर,
गोड, लयबद्ध असं श्रावणाचं
गोड, लयबद्ध असं श्रावणाचं वर्णन .... आवडलं.
खूप गोड अन् छान आहे कविता ८+६
खूप गोड अन् छान आहे कविता
८+६ अक्षरे ..आकर्षक मान्डणी
वा वा
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार..........
व्वाव! मस्त माजलेलं बाई
व्वाव!
मस्त माजलेलं बाई ....रान तालेवार>>>सुंदर!
चमकती उन्हात या ...... थेंब
चमकती उन्हात या ...... थेंब कळीदार
लक्ष दर्पणांनी बाई .......खुललं शिवार
व्वा! खूप सुंदर.
टाळ घुळघुळा वाजे ,ऐकू आला
टाळ घुळघुळा वाजे ,ऐकू आला छान.
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार..........
श्रावणाचे कवतिक सगळ्यांनाच जरा जास्तच असतं नाही का ?