श्रावण गीत
Submitted by पुरंदरे शशांक on 16 August, 2012 - 05:55
श्रावण गीत
अंगाखांद्यावर थेंब..... थेंब अलवार
थेंब श्रावणाचे बाई .....थेंब मऊशार
मस्त माजलेलं बाई ....रान तालेवार
रानफुलं अंगावर ..... किती रंगदार
श्रावणाचं ऊन बाई ..... ऊन हळुवार
जरा चमकता झालं ..... सप्तरंगी पार
चमकती उन्हात या ...... थेंब कळीदार
लक्ष दर्पणांनी बाई .......खुललं शिवार
किलबिल वाढली गं ..... रानातूनी फार
भेटेना साजणी होई ...... पाखरु बेजार
टाळ घुळघुळा वाजे ....... देवळात दूर
कान्हा जल्मता रातीचा ..... नदीला गं येई पूर
शब्दखुणा: