पुण्यातील देवालयांची गमतीशीर नावे.....

Submitted by बाळू जोशी. on 16 August, 2012 - 00:38

पुण्यामध्ये असंख्य देवालये आहेत्.त्याचा आकार एखाद्या खोक्यापासून तर विशाल मंदिरांपर्यन्त आहे.इतरत्र न आढळणारी गोष्ट म्हणजे इथल्या देवळांची विचित्र, गमतीशीर नावे.कधी कधी तर ती अगदी टिंगलवजाही भासतात.पुणेरी तिरकसपणाने देवांची सुद्धा गय केलेली नाही. Happy हल्ली जर एखादे नव्याने असे नाव दिले तर मोठ्याच वादाचे प्रसंग उद्भवतील. पूर्वी बहुसंख्य देवळे ही पत्ते ओळखण्यासाठी लॅन्डमार्क म्हणून वापरली जायची. मात्र हल्ली या देवळांच्या आसपास इतर मोठाल्या स्ट्रक्चर्स जसे थिअ‍ॅटर्स, मॉल्स, हॉटेले झालीत त्यामुळे ह्या देवळांचे लॅन्डमार्क्स मागे पडत चाललेत व त्यामुळे नव्या पिढीच्या विस्मरणातूनही ही देवळे चाललीत. परवा तर मला सोन्या मारुतीचे देऊळ अक्षरशः शोधून काढावे लागले.
या धाग्याचा उद्देश अशा देवळांची चर्चा घडवून आणणे हा आहे. यात देवळाचे नाव, त्याचे स्थळ व त्याच्या नावाचा माहीत असल्यास इतिहास अपेक्षित आहे. अर्थात विचित्र नावे नसलेली पण इतिहासाच्या दृष्टीने मोल असलेल्या देवळांवरही चर्चा व्हायला प्रत्यवाय नाही.....

उदा:- खुन्या मुरलीधर.

हे देऊळ सदाशिव पेठेत, भोपटकर मार्गावर, म्हणजे पेरुगेट चौकीवरून बाजिराव रोडकडे जाताना उजव्या बाजूस इंडियन बँकेच्या शाखेजवळ आहे.

या मुरलीधराने कुठलाही खून केलेला नाही. Happy हे देऊळ १७९७ साली श्री सदाशिव रघुनाथ उर्फ दादा गद्रे यांनी बान्धलेले आहे. त्यावेळी इस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी मि. बॉईड हा सैनिकांसह मंदिरावरून जाऊ लागला असता गद्रे यांनी नेमलेल्या अरबांनी त्याना अटकाव केला तेव्हा लढाई होऊन शे-पन्नास माणसे ठार झाली म्हणून याला खुन्या मुरलीधर असे नाव पडले असा इतिहास आहे.
या मंदिराच्या स्थापनेनंतर शम्भरेक वर्षांनी इथल्याच चौकात रँद आयर्स्ट वधाच्या प्रसंगी ज्यानी इंग्रजांकडे चुगली केली त्या द्रविड बंधूंचे चापेकर्-रानडे यांनी मध्यरात्री खून केले (१८९९). पुढे त्यानाही इंग्रजानी फासावर चढविले. या खून प्रकरणाचा चुकीने संदर्भ जोडून चुकीने 'खुन्या'नावाशी संबंध जोडला जातो तो चुकीचा आहे असे जाणकार सांगतात्.इंग्रज अधिकारी आणि अरब यांच्या चकमकीमुळेच त्याला 'खुन्या' असे नाव पडले आहे...

तर लोकहो, व्हा सुरू आता...... Proud

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म बाजो छान माहीति........यानिमित्ताने बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील...... Happy

मलाहि हे डुल्या मारुति, पत्र्या मारुति असे काही ऐकल्यावर नवलच वाटते..... Proud

सोन्या मारुतीचे मूळ नाव 'सुवर्ण मारुती' आहे. सिटी पोस्ट चौकाच्या (बेलबाग चौक) पुढचा चौकात फूटपाथ सुरु होताना चे देऊळ. आजूबाजूला सगळा सराफांचा शेजार असल्याने बहुधा. पूर्वी हे मंदीर अक्षरश: खोक्याएवढेच होते Proud

माती गणपती, तळ्यातला गणपती, निवडुंग्या विठोबा.
बाकी नावं ठेवणारे फक्त पुण्यातच नाहीत. बेळगावचा मिल्ट्री महादेव, वाईचा ढोल्या गणपती. Happy

अगदी ऐतिहासिक महत्व असलेला हा विषय आहे असे मी समजतो. कारण 'खुन्या मुरलीधर....उपाशी विठोबा....पासोड्या मारुती...डुल्या मारुती [योगुली, गणेश पेठेत जे हनुमानाचे मंदिर आहे त्याला 'डुल्या मारुती' असे नाव आहे. अशी एक आख्यायिका आहे की पानिपतच्या पराजयाची आणि भाऊ व विश्वासराव यांच्या मृत्युची बातमी पुण्यात येऊन थडकली, त्यावेळी दु:खाने या मारुतीची मूर्ती हलू लागली....म्हणून ते 'डुल्या' नाव पडले. गणेशपेठेतच पेशव्यांचा वाडा होता त्यामुळे ती बातमी प्रथम तिथेच आली.] अशी नावे ज्याज्या वेळी वाचनात येत असत त्यावेळी उत्सुकतेने मी थांबत होतो. पुण्यात कोणत्यातरी कामानिमित्य येणे घडले तर शनिवारवाड्याच्या अगोदर सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधरला पाहाण्याची उत्सुकता लागून राहिली होती. [परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर कृष्णराव भलतेच मोहक वाटले. सिंहासनाची नक्षीकामदेखील अप्रतिम आहे. अशा देखण्या मूर्तीला 'खुन्या' असे बटबटीत नाव का पडले याचाही मग शोध घेतला... जो वर श्री.जोशी यानी दिलेला आहेच.]

"बटाट्या मारुती', 'जिलब्या मारुती', 'सोन्या मारुती' अशीही काही चटकन लक्ष वेधून घेणारी देवळे आहेत पुण्यात, त्या नामांचाही इतिहास असेलच.

अशोक पाटील

श्री.बाळू जोशी यांच्या या मताशी सहमत .... "लोकेशन्सही सांगा".

~ मी जरी कोल्हापूरचा असलो तरी पुण्यात कामानिमित्त वा मुलाकडे आल्यास फावल्या वेळेत अशा ऐतिहासिक कथांशी निगडीत ठिकाणाला भेट देण्याचा प्रयत्न करीत असतो....त्यामुळे या एका चांगल्या धाग्यात सहभागी होणार्‍यांनी अशी देवळाची नावे सांगताना पुण्यात नेमक्या कोणत्या भागात आहेत याचाही कृपया उल्लेख करावा. [पुण्यातील सध्याच्या ट्रॅफिकची 'भयावह' अवस्था पाहिल्यावर रस्त्यात अधेमधे थांबून माझ्यासारख्या बाहेरच्या व्यक्तीने कुणाला पत्ता विचारणेही मुश्किल झाले असल्याने या बाफवरच मार्गदर्शन मिळाल्यास ते उचीत होईल.]

तसेच 'अमुक एक नाव' का पडले असावे ? याचाही, शक्य झाल्यास, मागोवा घेऊन त्याबद्दल लिहिल्यास विषयातील रुची वाढेल.

अशोक पाटील

बुधवार पेठेत पूर्वी पासोड्या (घोंगड्या) विकत असत. त्यामुळे त्या विठोबाला पासोड्या विठोबा नाव पडले, असे ऐकले होते.

<<आर्या, नाही गं. गुंड हे आडनाव पण असतं<<
हम्म! काय माहित बाई, कसब्यातली माझी आतेबहीण म्हणत होती.

वीराच्या मारुतीच्या समोर एक लक्ष्मी विष्णू मंदिर आहे. त्याला बिजवर्या विष्णू म्हणतात.
पानशेतच्या पूराच्या वेळी लक्ष्मी विष्णूच्या मूर्तींपैकी फक्त लक्ष्मीची मूर्तीच वाहून गेली म्हणे. मग नवीन मूर्ती करवून घेतली. म्हणून विष्णू झाला बिजवर. Happy

त्यात अजून एक मजा आहे. लक्ष्मीची नवीन मूर्ती राजस्थानहून मागवली. पण उंची नीट सांगितली गेली नाही. त्यामुळे आता विष्णू बुटका आणि लक्ष्मी उंच अशी जोडी आहे. Happy

नवश्या गणपति, नासिक

याचे मंदिर गंगापुर रोड वर सोमेश्वरला जाताना आहे.

हा गणपति नवसाला पावतो अशी याची ख्याति आहे, म्हणून नवश्या गणपति Happy

मी कोंलेजला असतांना मंदिर वाईट अवस्थेत होते पण आता छान केले आहे.
सवाई माधवराव पेशवे यांच्या मातोश्री येथे शेवटी वास्तव्य करून होत्या असे उल्लेख आढ़ळले आहेत.
राघोबादादा पण तेथे येत असायचे असे काही पुस्तकातील उल्लेखावरून वाटते.
(चू.भु.दे.घे.)

झकास नाशिकचे नवशा मारुतीचे मंदीर हे .आनन्दवली किंवा आनन्दवल्ली या नाशिकला खेटून असलेल्या खेड्यात (आता नाशकातच समाविष्ट झाले आहे म्हणा) आहे. हे गाव राघोबादादांच्या ताब्यात असून आनन्दीबाईंचा वाडा तिथे होता/आहे

तसा नवशा गणपती सर्वत्र असतोच. सिंहगड रोडलाही आहे ना...

(कळ)कळीचा विषय
ज्ञानवर्धक + मनोरन्जक माहीती
बाळोबा जोशी अन् सर्व प्रतिसादकान्चे मनःपूर्वक धन्यवाद

चपेटदान मारुती Happy

तिकोना किल्ल्यावर आहे हा मारुती.
त्याच्या पायाखाली पनवती आहे, एका हातात गदा आणि दुसरा हात चापट मारण्याच्या आवेशात आहे.
चापट मारणारा चपेटदान मारुती... Happy

संपादीत केलाय.
धन्यवाद पूनम Happy

इतर गावांचा विषयच आहे, तर धुळ्यात मिर्च्या मारूती अन भांग्या मारूती असे दोन आहेत.
अन देवळेच कशाला? खुनी मशीद देखिल आहे!

'चपेट'दान असेल रे Happy

बाजो, नावातले 'पुण्यातील' काढा. सगळ्या गावांमधली देवालयं येऊदेत. 'बिस्किट' आणि 'मिलिटरी' महादेव मस्त आहेत. त्यांच्या नावांची रहस्य सांगू शकेल का कोणी?

पुण्यातला 'पत्र्या मारूती' नारायण पेठेत आहे. आता त्याची खूण म्हणजे 'नीळकंठ ज्वेलर्स' लगत. खरंतर आता ही अशी ओळख आहे म्हणून खंत बाळगण्याचे कारण नाही. कारण 'नीळकंठ'च्या पैशामधून मंदिराचे रंगकाम झाले, हनुमान जयंतीला लोकांना खडीसाखर मिळते, मंदिरात ताशा वाजतो. नाहीतर कोणी बघत नव्हते त्या मंदिराकडे.
त्याच रस्त्यावरून खाली गेलं की 'मोदी गणपती' आहे. कोणा 'मोदींचा' आहे का कल्पना नाही Happy पण हे मंदिर एकदम जुन्या पद्धतीचं आहे. छान वाटतं आत गेल्यावर. मूर्तीही मोठी आहे.

हत्ती गणपती म्हणजे भावेस्कूलजवळ

तो हत्तीवर बसलेला आहे

गणेशोत्सवात तो त्यामुळे महत्वाचा ठरतो

गणपती - मोदी, माती, हत्ती, चिमण्या, उंबर्‍या

शकुनि मारुती, पावन मारुती

एकेकाळी छिनाल बालाजी पण होता (बुधवारात) आता त्याचं नामकरण श्री बालाजी झालंय

Pages