पुण्यातील देवालयांची गमतीशीर नावे.....

Submitted by बाळू जोशी. on 16 August, 2012 - 00:38

पुण्यामध्ये असंख्य देवालये आहेत्.त्याचा आकार एखाद्या खोक्यापासून तर विशाल मंदिरांपर्यन्त आहे.इतरत्र न आढळणारी गोष्ट म्हणजे इथल्या देवळांची विचित्र, गमतीशीर नावे.कधी कधी तर ती अगदी टिंगलवजाही भासतात.पुणेरी तिरकसपणाने देवांची सुद्धा गय केलेली नाही. Happy हल्ली जर एखादे नव्याने असे नाव दिले तर मोठ्याच वादाचे प्रसंग उद्भवतील. पूर्वी बहुसंख्य देवळे ही पत्ते ओळखण्यासाठी लॅन्डमार्क म्हणून वापरली जायची. मात्र हल्ली या देवळांच्या आसपास इतर मोठाल्या स्ट्रक्चर्स जसे थिअ‍ॅटर्स, मॉल्स, हॉटेले झालीत त्यामुळे ह्या देवळांचे लॅन्डमार्क्स मागे पडत चाललेत व त्यामुळे नव्या पिढीच्या विस्मरणातूनही ही देवळे चाललीत. परवा तर मला सोन्या मारुतीचे देऊळ अक्षरशः शोधून काढावे लागले.
या धाग्याचा उद्देश अशा देवळांची चर्चा घडवून आणणे हा आहे. यात देवळाचे नाव, त्याचे स्थळ व त्याच्या नावाचा माहीत असल्यास इतिहास अपेक्षित आहे. अर्थात विचित्र नावे नसलेली पण इतिहासाच्या दृष्टीने मोल असलेल्या देवळांवरही चर्चा व्हायला प्रत्यवाय नाही.....

उदा:- खुन्या मुरलीधर.

हे देऊळ सदाशिव पेठेत, भोपटकर मार्गावर, म्हणजे पेरुगेट चौकीवरून बाजिराव रोडकडे जाताना उजव्या बाजूस इंडियन बँकेच्या शाखेजवळ आहे.

या मुरलीधराने कुठलाही खून केलेला नाही. Happy हे देऊळ १७९७ साली श्री सदाशिव रघुनाथ उर्फ दादा गद्रे यांनी बान्धलेले आहे. त्यावेळी इस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी मि. बॉईड हा सैनिकांसह मंदिरावरून जाऊ लागला असता गद्रे यांनी नेमलेल्या अरबांनी त्याना अटकाव केला तेव्हा लढाई होऊन शे-पन्नास माणसे ठार झाली म्हणून याला खुन्या मुरलीधर असे नाव पडले असा इतिहास आहे.
या मंदिराच्या स्थापनेनंतर शम्भरेक वर्षांनी इथल्याच चौकात रँद आयर्स्ट वधाच्या प्रसंगी ज्यानी इंग्रजांकडे चुगली केली त्या द्रविड बंधूंचे चापेकर्-रानडे यांनी मध्यरात्री खून केले (१८९९). पुढे त्यानाही इंग्रजानी फासावर चढविले. या खून प्रकरणाचा चुकीने संदर्भ जोडून चुकीने 'खुन्या'नावाशी संबंध जोडला जातो तो चुकीचा आहे असे जाणकार सांगतात्.इंग्रज अधिकारी आणि अरब यांच्या चकमकीमुळेच त्याला 'खुन्या' असे नाव पडले आहे...

तर लोकहो, व्हा सुरू आता...... Proud

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@बाळू जोशी
मनोरंजन आणि इतिहासाचा मागोवा असे दोन्ही साधणारा धागा सुरू केल्याबद्दल धन्यवाद! नावामागचा इतिहास खूपच माहिती तर देतोच पण मनोरंजकही असतो.
मंडईच्या मागून स्वारगेटकडे जाणार्‍या रस्त्यावर एक गुढगेमोडी माता मंदिर आहे. या नावामागचा इतिहास काय आहे?

मुंबईत असा काही प्रकार आहे की नाही याची कल्पना नाही. पण बहुतेक महादेवाच्या मंदिरांना स्थानावरून नावे दिली जातात. पार्ल्यातला पार्लेश्वर, विरारच्या गोकूळ टाऊनशिपचा गोकुळेश्वर, अंधेरी चार बंगला येथील पिंपळाखाली असलेला म्हणून पिंपळेश्वर... ही यादी वाढत जाऊ शकते. पण देव मात्र एकच.. देवाधिदेव महादेव. Happy

@ कौतुकराव....

'महादेव' नाम व्याप्तीबद्दल सहमत. इथे कोल्हापूरात तर "....श्वर" महादेवांचा सुकाळच आहे. मी ज्या ठिकाणी सकाळी पोहायला जातो तो रंकाळा तलाव...त्याच्या शेजारी तलावाच्याच पाण्यांनी भरलेल्या छोट्या छोट्या आठदहा 'खणी...खाणी' आहेत. सन २००० नंतर रंकाळ्यात केन्दाळ [हायसिंथ] नामक पान-वनस्पतीने उच्छाद मांडल्यावर लोक या खणींचा पोहण्यासाठी वापर करू लागले. तिथे साहजिकच वर्दळ वाढू लागल्यावर मग नियमित येणार्‍यांनी सामुदायिक वर्गणी काढून त्या खणीकडे जाणारा अ‍ॅप्रोच रोड दुरुस्त केला...पायर्‍या बांधल्या...आंघोळीसाठी सपाट जागा करून घेतली.... दिवाबत्तीची सोय केली आणि सर्वात महत्वाचे त्या जागेला पवित्र स्थान प्राप्त व्हावे या करीता तिथे महादेवाचे एक छोटे मंदिरही बांधले....मग आता या महादेवाला काहीतरी नाम दिले पाहिजे म्हणून एकमताने ठरेल..."श्री खणेश्वर मंदिर".

अशी अनेक महादेव मंदिरे....'कपिलेश्वर....जोगेश्वर....घाटेश्वर... व्याघ्रेश्वर... मार्लेश्वर....इ."

पण एक पाहिले आहे मी....या निमित्ताने का होईना इथला परिसर बाकी सदानकदा स्वच्छ राहिलेला असतो.

महादेव कृपा...दुसरे काय !

अशोक पाटील

@बाळू जोशी. | 18 August, 2012 - 12:03
ज्याच्या नावाच्या शेवटी श्वर (इश्वर) शब्द येतो ते सगळे महादेवच असतात...<<

बर्‍याच कोकणस्थांच्या कोकणातील मूळ गावांना अशाच नावांची मंदिरे आहेत. उदा: ब्याडेश्वर, वेळणेश्वर, हरिहरेश्वर, व्याघ्रेश्वर इ. ही सर्व महादेव मंदिरे आहेत.

इकडे मुंबईत, साकीनाक्याला, खेरानी रोड वर जंगलेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी महाशिवरात्री ला फार मोठं उत्सव असतं. महादेवाची पिंडी स्वयंभु आहे असे ऐकिवात आहे.

sabhya pune. Tadiwala Rd. Madiwale Colony, Daruwala Pool Quarter Gate. Ghari jatana dulya Maruti

औरंगाबादचा सुपारी हनुमान आणि नाशिकचा दुतोंड्या मारुती ! शिवाय नाशिकचे काळाराम मंदिर हेही आहेतच.पुण्यातला कसबा पेठेतला गावकोस मारुती ,लक्ष्मीरोडवरचा सोट्या म्हसोबा, पूर्वी विजय टॉकीज जवळ एक शेडगे विठोबा मंदिर होते असे मला आठवते.

वरदा बरिच म.न्दिर लिहलियेत नाशिकची, नवश्या गण्पति शिवाय, अशोक- स्त.न्भाजवळचा ढोल्या गणपती, आणि १२ वर्शात ( फक्त कुन्भमेळ्यात) एकदाच उघडणारे ग.न्गा ंम.न्दिर.. व्हिक्टोरिया पुलाजवळचे अति अती प्राचिन सुर्य- नारायण म.न्दिर..
नाशिक रोड जवळ चा घन्टेचा म्हसोबा..हा नवसाला पावतो अशी ख्याती आहे, नवस पुर्ण झाला की भाविक येथे घ.न्टा बाध.न्तात..
आमच स्वतःच रामाच म.न्दिर रावेर ला आहे, रामाच्या मुर्ति नाजुक आणि छोट्या असल्याने त्याला चिमणा राम म.न्दिर अस नाव आहे..

ज्याच्या नावाच्या शेवटी श्वर (इश्वर) शब्द येतो ते सगळे महादेवच असतात...
त्याला अपवादहि असतील ना? कारण हटकेश्वर म्हणजे विष्णू असे इथल्याच काही लोकांनी सांगितले होते, अनेक वर्षांपूर्वी.

माझ्या माहितीनुसार हटकेश्वर हे एक दाक्षिणात्य दैवत असावे व ते तिरुपतीप्रमाणे असावे, त्यामुळे विष्णूचा अवतार मानला जात असावा.

(आमच्या कंपनीत कोईम्बतूरहून येणार्‍या टँकर्सवर 'हटकेश्वर' असे लिहिलेले असायचे. आधी मला ते वेंकटेश्वर वाटायचे, नंतर समजले)

भिकारदास मारुती हे दैवत पूर्वी गावाच्या बाहेरचे मानले जात होते. (किती ते लहानसे असेल पुणे!) गावाच्य बाहेरचे असल्यामुळे अनेक लोक सहलीप्रमाणे येत असत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भिकारी जमत असत. त्यामुळे हे नांव पडले असे जुने लोक सांगतात.

ठाण्याला बेडेकर शाळेजवळ (बहुधा गोखल्यांचा )गणपती होता त्याला रिटायर्ड गणपती असंही नाव होतं. आता ते मंदीरही बरंच लहान झालय.

आमच्या पार्ल्याला आहे की ....
एक चिमणा राम (व्यास संगीत विद्यालया च्या बाजुला) आणि एक मद्रासी राम (महिला संघाच्या जवळ)

माझ्या माहेरी कल्याणला एक गणपती मंदिर आहे त्याला अक्षत गणपती अस म्हणतात. कल्याण शहरात कोणाकडेही काहीही कार्य निघाल, लग्न, मुंज इ तर सर्वप्रथम या देवळात अक्षता आणि पत्रिका दिली जाते आणि नंतर निमंत्रणांना सुरुवात होते. म्हणुन या देवस्थानाला अक्षत गणपती असे नाव पडले आहे.

रिटायर्ड गणपती असंही >>> मी ह्याला 'उभा गणपती' असं नाव ऐकलं होतं. पुर्वीचं मंदिर मस्त वाटायचं. आता फक्त गाभाराच आहे.

Pages