संध्याकाळ

Submitted by रीया on 23 February, 2012 - 21:30

संध्याकाळ

अशाच एका संध्याकाळी तुझी आठवण दाटून आली
डोळ्यामध्ये साठवलेले अश्रू सहज सांडून गेली

एकेक दिवस एकेक क्षण तुझ्या माझ्या भेटी मधले
एकेक भाव एकेक स्पर्श तुझ्या निश्चयी मिठी मधले

तोच चंद्र तीच रात तीच झुळूक वार्‍याची
आजही वेडी प्रीत माझी वाट पाहते या सार्‍याची

बकुळीची फुले पाहता तुझा स्पर्श आठवतो
त्या माळेचा सुगंध सजणा आजही मन भरून वाहतो

आज ही कंठ दाटून येतो होतो आठवांचा पसारा
आज ही तुझाच भास होतो झेलून घेता पाऊसधारा

सारे काही तसेच आहे पाऊस, वारा, बकूळमाळ
आता फ़क़्त परकी झाली तुझ्याविना ही संध्याकाळ.....

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

गुलमोहर: 

आता फ़क़्त परकी झाली तुझ्याविना ही संध्याकाळ.....>>>>>> अप्रतिम. टेन ऑन टेन रिया...खुप आवडली कविता...विरहात प्रत्येक गोष्ट कशी कष्ट्दायी अन प्रत्येक आठवण कशी बोचरी होते हे छान मांडलस.
पुलेशु Happy

कविता, प्रिया. प्रियांका, फडणीस, विकास, उज्जवला, रीया .....
एकंदरीत किती जणांनी लिहील आहे हे काव्य ? :एक भाप्रः
टू मॅनी कुक्स बट केक इज टेस्टी. Happy

धन्स ऑल Happy

@कौतुक : ही कविता मिच लिहिलिये...माझं मुळ नाव प्रियांका फडणीस. माझ्या बाबांचं नाव विकास आणि आईचं उज्ज्वला....मला आईनी कवितेसाठी नेह्मी प्रोत्साहन दिलयं त्यामुळे मी माझ्या नावापुढे दोघांचं ही नाव लावते .. हा खुलासा मी आधी सुद्धा केला होता..पण तुझ्यासाठी पुन्हा एकदा Happy so too many cooks नाहीये... i am the only cook Happy

तोच चंद्र तीच रात तीच झुळूक वार्‍याची
आजही वेडी प्रीत माझी वाट पाहते या सार्‍याची
>>>>>>>>>>>>>>>>>>

झकास ग प्रियांका

खूपच छान आहे कविता. सायंकाळ, सांजवेळ , कातरवेळ मुळातच अंतर्मुख करणारी वेळ, आणि त्यात गतस्मृती. मनापासून आवडली.पुढील कवितांसाठी शुभेच्छा.

अरे, हे कविता मी कशी काय मिसली होती?
आवडली.

आता फ़क़्त परकी झाली तुझ्याविना ही संध्याकाळ..... >> सुरेख वाक्य

सुरेख... (मी खूप काही मिसलय....)
आज ही तुझाच भास होतो झेलून घेता पाऊसधारा.... क्या बात है

रीया मस्त. खुप आवडली.
आता फ़क़्त परकी झाली तुझ्याविना ही संध्याकाळ..>>>>>>>>>> सुंदर

फक्त फारेंडाने म्हण्ल्या प्रमाणे मलाही "सजणा" (शब्द :-)) जरा टोन मध्ये बसत नाही असं वाटलं.

सारे काही तसेच आहे पाऊस, वारा, बकूळमाळ
आता फ़क़्त परकी झाली तुझ्याविना ही संध्याकाळ..... >>> वाह ! विरहाची आर्तता योग्य शब्दांत मांडलीय.

खूपच आवडली कविता रिया.

सारे काही तसेच आहे पाऊस, वारा, बकूळमाळ
आता फ़क़्त परकी झाली तुझ्याविना ही संध्याकाळ.....

'तोच चंद्रमा नभात 'आठवली. परिसर,वेळ तीच.

पण तिथे तीच कामिनी जवळ असूनही दुरावलीय,
इथे तो जवळ असण्याचा काळच मागे पडलाय,पण भावना तीच आहे.