चहा कुठे प्यावा ?

Submitted by Kiran.. on 6 August, 2012 - 00:18

पुण्यातली चहाची प्रसिद्ध ठिकाणं कोणती ? त्या त्या ठिकाणच्या चहाचं आणि त्या दुकानाचं वैशिष्ट्य याबद्दलच्या चर्चेसाठी धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टपरीवर प्यावा.
पेशल दे म्हणावं आणि त्याला जरा कडक बरका अशी सलगीतली सुचना करावी..

फेमस बिमस माहिती नाय बॉ..

'महानाज' नावाचे उडपी हॉटेल चालू आहे कॅम्पात.. जरा कोपर्‍यात गेलंय इतकंच.

दापोडीच्या पुढे, जिथे मारुतीचे आणि बजाजचे 'साई सर्व्हिस' आहे- त्या रस्त्यावर 'अशोक' नावाचे हॉटेल होते. आजवर मी अनुभवलेला सगळ्यात चवदार चहा इथलाच ! कॉलेजला असतांना आम्ही जवळपास रोज इथे येत असू- पिंपरीहून ! आता हायवे रुंदीकरणात ते बंद झाले म्हणतात. वाईट वाटते. Sad
पुण्यातल्या कुठल्याच 'अमृततुल्य' मधला चहा मला कधीच आवडला नाही.

चहासाठी पुण्यात तशी अनेक ठिकाणे आहेत.

मात्र काही ठिकाणे स्पेशली आठवल्याशिवाय नाही राहवत.

१. ज्ञानेश्वर पादुका चौकातील तृप्ती अमृततूल्य (शेजारच्याच उम्मेद स्वीटमार्टमधील २ समोसे ढकलून मग घेतल्यास अधिक लवकर मोक्षाप्रती नेतो).

२. विश्रामबाग वाड्यापासचे अंबिका अमृततूल्य

३. गरवारे शाळेच्या डायगोनली अपोझिट असलेले इराणी हॉटेल पॅराडाईझ (हा इराणी स्टायलीचा चहा आहे)

४. करिश्मा चौकातील प्राची (घरगुती चहाचा आनंद)

५. चक्क गरवारे कॉलेजचे कॅन्टीन (कळकट मळकट रेल्वे टायपचा चहा, पण तरतरी आणतो खरा. मी त्या कॉलेजला पंधराच दिवस - उगाच आपला - होतो, पण २७ वर्षांनीही आठवते ती चव - त्यात त्या टकलू शेट्टीने पैसे आहेत का विचारत तो चहा घेऊ देणे - हा हा)

६. अलंकार पोलिस चौकीहून भरतकुंजकडे यायच्य अरस्त्यावर लगेचच डावीकडे असलेले माऊली! मालकाचे नांव माऊली आहे. अतिशय कडक स्वभाव व तिरसट भाव चेहर्‍यावर. चहात काही विशेष नसले तरी इतके खरे, की हा चहा पिऊन आणि एखादी बिडी (सोबतच) मारून माणूस अगदी उन्हातही सुखावतो.

आठवेल तसे अधिक देत राहीनच

Happy

-'बेफिकीर'!

गरवारे शाळेच्या डायगोनली अपोझिट असलेले इराणी हॉटेल पॅराडाईझ (हा इराणी स्टायलीचा चहा आहे) >>
इथला चहा१ नंबर असतो.. Happy
हे हॉटेल एराणी आहे ते माहिती नव्हतं.. Happy

गरवारे कॉलेज समोरच मयुरेश्वर अम्रुततुल्य

ते भरत नाट्य वाले खरंच महान आहे. 'य' पब्लिक पडीक असते तिथे खरंच

(खरे तर अनेक अमृततूल्यंची चव एकच असली तरी चहा पिताना सभोवतालही प्यायला जातो सोबतीने, त्यामुळे वेगळेपणा निर्माण होतो) Happy

कमला नेहरु पार्कच्या अमृततूल्य मधला चहा खूपच सुंदर असतो.>>>>>

हो हो , बासुन्दियुक्त

नेहरू मेमोरियल च्या समोरचं सुप्रिया. वाडिया कॉलेज्चे बरेचसे चेहरे भेटतात. बॅचमेट भेटले कि अरे तू तो हा का रे ? अशा प्रश्नाने गप्पा सुरुवात होऊन चहाची लज्जत आणखी वाढते. कधी कधी आता लग्न झालेल्या मुली दिसल्या कि ओळख द्यावि कि न द्यावी या विचारात असताना तिनेच स्वतःहून तू तो .... ना ? अशी ओळख करून द्यावी आणि हा माझा नवरा म्हणून ओळख करून दिलेल्या प्राण्याशी काय बोलावं हे न समजल्याने हात हातात घेऊन स्मित करणे इतकाच सोपस्कार उरतो. हे दृश्य अनेकांच्या बाबतीत घडताना पाहीलंय Happy

इथल्या चहा मधे ही गंमत असते. नाहीतर नेहरू मेमोरियल हॉलला ऑर्केस्ट्रा / कार्यक्रम यांच्याशी संबंधित लोकांच्या गप्पा ऐकताना टाईमपास व्हायचा. पुढे बालगंधर्वच्या समोर गंधर्वला बरेच कलाकार भेटायचे म्हणून तिथं अड्डा जमला.

@पुण्यातली चहाची प्रसिद्ध ठिकाणं कोणती ? त्या त्या ठिकाणच्या चहाचं आणि त्या दुकानाचं वैशिष्ट्य याबद्दलच्या चर्चेसाठी धागा.

पुण्यात चहा कुठला प्यावा यावर चर्चा करायची?
उद्या विचाराल
चहा प्यालावर पुण्यातली कुठली सुलभ वापराल?
असले भिकार धागे काढायला कस काय सुचत बुवा लोकांना =))

सोप्पं उत्तर असताना आपल्यासारख्या पंडितांनी अशा धाग्यावर वेळ का घालवावा हे पण नवलच नाही का ? Biggrin ::दिवा:

रच्याकने
http://www.maayboli.com/node/34174?page=3

असे धागे काढावेत का ? Wink
बन्या यांची उच्च आवड आपल्याला मार्गदर्शक ठरावी !

किरण्या.. Rofl .. आई गं!! Biggrin
इतकी इन्फो जमा कर्तोयेस तर,चल आता मी पुण्यात आले तर तुलाच विचारून गटग ठरवू कुठे करायचे ते..

मला तर कुठलाही चहा चालतो.. (अगदी मी स्वत: केलेलाही मी खपवून घेते :फिदी:) सीसीडी च्या मशीनचा चहासुद्धा मी प्रेमाने पिते. चहाला अमृततुल्य म्हटले आहे ते अगदीच खरे आहे. Happy
माझ्या आजी व माजी (हिंजवडी, सेबा रस्ता) ऑफिसच्या आजूबाजूच्या टपऱ्या हीच माझी प्रिय चहास्थाने! Happy
अवांतर: ट्युलिपने तिच्या ब्लॉगवर चहाविषयी एक खूप सुंदर ललितलेख लिहिला होता.. त्याची आठवण झाली.

ज्ञानेश | 6 August, 2012 - 10:22 नवीन
'महानाज' नावाचे उडपी हॉटेल चालू आहे कॅम्पात.. जरा कोपर्‍यात गेलंय इतकंच.

दापोडीच्या पुढे, जिथे मारुतीचे आणि बजाजचे 'साई सर्व्हिस' आहे- त्या रस्त्यावर 'अशोक' नावाचे हॉटेल होते. आजवर मी अनुभवलेला सगळ्यात चवदार चहा इथलाच ! कॉलेजला असतांना आम्ही जवळपास रोज इथे येत असू- पिंपरीहून ! आता हायवे रुंदीकरणात ते बंद झाले म्हणतात. वाईट वाटते

>>>>> नाही ज्ञानेश, तिथे ते चालू आहे. फुगेवाडीला मेगामार्ट समोर, नाशीक फाट्यावर आणि पिंपळे गुरव या तिनही ठिकाणी अशोका मधील चहा मिळतो. Happy

एक मात्र आहे राव, अमेलियांच्या प्रतिसादावरून आठवले. मशीनचा चहा आपल्याला नाही आवडत Sad

नाही ज्ञानेश, तिथे ते चालू आहे. फुगेवाडीला मेगामार्ट समोर, नाशीक फाट्यावर आणि पिंपळे गुरव या तिनही ठिकाणी अशोका मधील चहा मिळतो. स्मित >> आबासाहेब पिंपळे गुरव मधे कुठे मिळतो सांगाल का ? मी तिथेच राहतो , लगेच जाता येइल Happy

एक मात्र आहे राव, अमेलियांच्या प्रतिसादावरून आठवले. मशीनचा चहा आपल्याला नाही आवडत अरेरे
>>
+१

मॉडर्न कॉलेजच्या मागे आण्णाची टपरी आहे त्यावरचा चहा अप्रतीम
अर्थात तो चहा अप्रतिम होता की आमचे ते दिवस आणि गृपमुळे तो चहा तेंव्हा आणि त्या आठवणींमुळे आता ती चव हवी हवीशी वाटते ते माहीत नाही पण जेएम रोड ला गेल्यास तो चहा प्यायल्याशिवाय मी परत येत नाही एवढं मात्र नक्की

तशी 'चहा' हा विषय मला, आणि मी चहाला, नवीनच!
अधिकारवाणीने बोलावं असे कुठलेहि कौशल्य माझ्या गाठीशी नाही..तरीही लिहिते.

डहाणुकर कोलनी मध्ये "कट्टा नामे एक फूड-जोईंट आहे..तिथे मिळणारा चहा, हा अत्यंत चवदार, आरोग्यवर्धक आणि स्फूर्तिदायक असा असतो!

कधी जाणार असाल त्या भागात, तर आवर्जून कट्टा ला जा, आणि चहाचा अस्वाद घ्या!

-
भानुप्रिया!

दापोडीच्या पुढे, जिथे मारुतीचे आणि बजाजचे 'साई सर्व्हिस' आहे- त्या रस्त्यावर 'अशोक' नावाचे हॉटेल होते. आजवर मी अनुभवलेला सगळ्यात चवदार चहा इथलाच ! >>>> +१. खरेच चवदार चहा असतो..

Pages